इस्लामचे जागतिक ज्ञान क्षेत्रात योगदान

भाग-२
अखिल भारतीयमुस्लिम मराठी साहित्य परिषदेतर्फे दिनांक २८ व २९ जानेवारी २०२३ रोजी नाशिकला साहित्य संमेलन भरलं होतं. या संमेलनाचे अध्यक्ष इस्लामचे अभ्यासक, भाष्यकार व संवादक अब्दुल कादर मुकादम होते. त्यांचं अध्यक्षीय भाषण नजरिया वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहोत. 
पण इस्लामी संस्कृतीच्या उगम आणि विकासाचा शोध घेतो तेव्हा ज्या अरब समाजाला, ज्ञानसाधनेची कसलीही परंपरा नव्हती त्या समाजाने पैगंबरांच्या महानिर्वाणानंतर केवळ २०० वर्षात सांस्कृतिक आणि ज्ञान विज्ञानाच्या क्षेत्रात प्रगतीची जी झेप घेतली ती स्तिमित करणारी होती. हे आपल्या लक्षात येते. त्या दृष्टीने इ.स. ८७० ते ९५० हा कालखंड विशेष महत्वाचे. कारण याच काळात इस्लामी संस्कृतीची समृद्धीच्या दिशेने सुरू झालेली वाटचाल विशेष झाली.

इस्लामी विचारवंत आणि संशोधकांनी वैचारिक क्षेत्रात सर्वात महत्वाचे योगदान केले आहे. त्यातही ग्रीक भाषेतील प्रचंड ज्ञानभांडार अनेक लेखक अनुवादकांनी अरबी भाषेत अनुवादित केले त्याचा विशेष उल्लेख केला पाहिजे. या ग्रीक ज्ञानभंडाराची हस्तलिखिते युरोपमधील अनेक मठाच्या तळघरात धूळ खात पडलेली होती. या हस्तलिखितांच्या महत्वाविषयी सर्व मठाधिपती पूर्णपणे अनभिज्ञ तरी होते किंवा त्याविषयी त्यांना कसलीच आस्था नव्हती.

कॉन्स्टॅन्टिनोपल पर्शिया जिंकल्यानंतर अरबांचा ग्रीक भाषेशी आणि त्या भाषेतील ज्ञानभांडाराशी त्यांचा संबंध आला. या अरब संशोधकांनी हे सर्व ग्रंथ अरबी भाषेत अनुवादित केले. पुढे या अनुवादाच्या माध्यमातून हे ज्ञानभांडार युरोपमध्ये गेले.

याच काळात इस्लामी तत्त्वज्ञानाचा पाय घातला गेला अबू याकूब इब्न इसहाक अल-किंदी हा या परंपरेतील आद्य तत्त्वचिंतक मानला जातो. तो बुद्धिवादी होता त्याच्यावर सॉक्रेटिस, प्लेटो आणि पायथागोरस यांच्या विचारांचा प्रभाव होता. तत्त्वज्ञानाव्यतिरिक्त त्याला वैद्यक, खगोलशास्त्र, गणित अशा अनेक विषयांत रस होता. या विषयावरचे त्याचे ग्रंथही प्रसिद्ध झाले असून त्यांच्या अनेक ग्रंथाचे लॅटिन भाषेत अनुवादही झाले आहेत.

अल-किंदीपासून सुरू झालेली ही ज्ञानसाधनेची परंपरा अनेक शतकांपर्यंत सुरू होती. या काळात अनेक तत्त्वज्ञ होऊन गेले. त्यातील काही महत्त्वाच्या तत्त्ववेत्त्यांचा ओझरता तरी उल्लेख करणे योग्य होईल असे वाटते.

इस्लामपूर्व काळातील अरब समाज सांस्कृतिक वैचारिकदृष्टया आदिम अवस्थेत होता. पण पैगंबरांच्या निधनानंतर केवळ २०० वर्षांत या समाजाने या क्षेत्रात प्रगतीची जी झेप घेतली ती केवळ विस्मयकारक होती.

वाचा : भाग-१ : मुस्लिम मराठी साहित्य मुख्य प्रवाहाचा घटक

वाचा : धार्मिक (?) चर्चांपुरता बंदीस्त केलेला मुस्लिम

वाचा : शिक्षण क्षेत्रात क्रांतिकार्य करणारे मराठी मुस्लिम

अरब विचारवंतांनी आणि संशोधकांनी दोन शतकांत प्रगतीचा जो टप्पा गाठला तसा टप्पा गाठण्यास ख्रिश्चन समाजाला १५०० वर्ष लागली हे ख्रिश्चन अभ्यासक / संशोधकानी लिहून ठेवले आहे. “The Story of Philosophy was discovered by the Muslims and then transmitted to the west, provides one of the most fascinating chapters in the book of mankind’s progress from ignorance to enlightenment”

(Islam & The Arabs, pg 143-144)

.. ८७० ते ९५० या काळात अब्बासी खलिफांच्या कारकीर्दीत इस्लामी तत्त्वज्ञानाचाही उगम आणि विकास झाला. या केवळ ८० वषांच्या कालखंडात आंतरराष्ट्रीय दर्जाचे तत्त्वज्ञ निर्माण झाले या मध्ये अबू नसर अलू-फराबी आणि अत्- अशारी यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. सेंट थॉमस या ख्रिश्चन तत्त्ववेत्त्याने त्याच्या ग्रंथात अल्-फराबीच्या तत्त्वज्ञानाचे अनेक संदर्भ दिले आहेत.

आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात ॲरिस्टॉटल नंतर अल्-फराबीला दुसऱ्या क्रमांकाचे स्थान देण्यात आले आहे. या वरून त्याच्या तत्त्वज्ञानाचा कस काय प्रतीचा होता, हे स्पष्ट होऊ शकेल. अध्यात्मशास्त्र (Metaphysics) मानसशास्त्र, तर्कशास्त्र, पदार्थविज्ञान, वैद्यक, धर्मशास्त्र अशा अनेक शास्त्रांमध्ये त्याला गति होती. त्याच्या नंतरच्या काळात होऊन गेलेल्या तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्याचा अल्  फराबी हीच त्यांच्या व्यासंगाची प्रेरणा आणि ज्ञानाचा स्त्रोत होता. असे असूनही पाश्चात्त्य जगतात इब्न सीना या तत्त्ववेत्याला जितकी मान्यता आणि प्रसिद्धी अल्-फराबीला मिळू शकली नाही.

तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील अल् फराबीची परंपरा इब्न सीना याने त्याच वैचारिक बांधिलकीने पुढे चालू ठेवली. त्याचा जन्म पर्शियातील अफसाना येथे ९८० मध्ये झाला .. १०३७ (रमाधान) मध्ये त्याचे निधन झाले.

कालमानानुसार विचार केला तर अल फराबी आणि इब्न सीना यांच्या मध्ये शतक भराचे अंतर असले आणि त्याकाळात अल् अशारी अल् किंदी या सारखे तत्त्वचिंतकही झाले तरी अलू फराबीचा वैचारिक वारसा, इब्न सीनाला मिळाला होता असे इस्लामी तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात सर्वसामान्यपणे मानले जाते. असे असले तरी विद्वन्मान्यता आणि प्रसिद्धी मात्र अल्- फराबी पेक्षा इब्न सीनाला अधिक मिळाली.

इब्न सीनाला केवळ ५७ वर्षांचे आयुष्य लाभले. पण या अल्प काळातही त्याने ज्ञानाच्या क्षेत्रात जे कर्तृत्व गाजवले ते अतुलनीय होते असेच म्हटले पाहिजे. त्याचे वडिल सरकारी अधिकारी होते. त्यामुळे त्याला उत्तम शिक्षण घेण्याची संधी मिळाली. इब्न सीनानेही त्या संधीचे सोने केले. चौदा वर्षाचा असतानाच त्याने शरीयत (आचार संहिता) आणि (फिकह) इस्लामी न्यायशास्त्र या विषयांवर प्रभुत्व मिळविले होते. दहा वर्षांचा असतानाच त्याने कुराण आणि इतर धार्मिक विषयांचा सखोल अभ्यास केला होता.

या दैनंदिन विषयांच्या अभ्यासाबरोबर ऑरिस्टॉटल, युक्लिड आणि टालेमी यांच्या तत्त्वज्ञानाचा आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या ग्रंथावरील विविध भाष्यांचाही त्याने अभ्यास केला होता. सोळाव्या वर्षी त्याने तत्त्वज्ञानाव्यतिरिक्त वैद्यकशास्त्रावरील सर्व ग्रंथ, गणित, खगोलशास्त्र, विज्ञान, संगीत, भूमीशास्त्र अशा अनेक विषयांच्या त्याने अभ्यास केला होता. इब्न सीनाचे आणखी एक वैशिष्ट्य होते. इस्लाममधील एकेश्वराची म्हणजेच तौहीदवरील आणि अल्लाह चराचर सृष्टीचा निर्भिक आहे या सूत्रा वरील त्याची श्रद्धा कधीही डळमळीत होऊ दिली नाही.

वाचा : मराठी मुसलमानांचा साहित्य मेळा

वाचा : इस्लामचा अवास्तव संदर्भ जिथेतिथे कशासाठी?

वाचा : इस्लामशिवाय जग कसे असते ?

तत्त्वज्ञ विचारवंतांच्या या परंपरेत, अबू हमीद इब्न मुहंमद अल तुसी अल- गझाली या विचारवंत संशोधकाच्या नावाचाही अंतर्भाव करणे आवश्यक आहे. पर्शियातील खोरासन या शहरात १०५९ साली त्याचा जन्म झाला. दुर्दैवाने त्याला छत्र मात्र फार काल लाभले नाही. पण त्याचे सुदैव असे की त्याकाळी उपलब्ध असलेले उत्तमोत्तम शिक्षण घेण्याची संधी मात्र त्याला मिळाली अल् गझालीच्या तल्लख बुद्धिमत्तेची जाणीव तत्कालीन अनेक विद्वान, विचारवंताना होती त्यांच्या सहकार्यामुळे वयाच्या केवळ सेहतीसावा वर्षी बगदाद प्रसिद्ध निझामिया विद्यापीठात त्याला प्राध्यापकाची नोकरी मिळाली.

या विद्यापीठाची स्थापना सेलझुक राज्यकर्त्यांचे वजीर निझाम उल-मुल्क याने केली होती. ज्ञानखेत्रातील या नोकरीमुळे त्याला एकीकडे आर्थिक स्थैर्य लाभले तर दुसरीकडे आपली ज्ञानसाधना पुढे चालू ठेवण्याची संधी ही मिळाली. पण हे भाग्य फार काळ टिकले नाही. काही वर्षानव गंभीर अशा मानसिक आणि शारिरिक आजाराना तोंड द्यावे लागले. त्यामुळे त्यांच्या जीवनाला एक वेगळेच पण कायमचे वळण लागले. त्याने ज्ञानदानाचे क्षेत्र सोडले तपस्व्याचे भटके जीवन स्वीकारले. आपल्या जीवनाच्या शेवटच्या पर्वात तर चिंतनशील तपस्व्याचा मार्ग स्वीकारला. ११११ साली म्हणजेच वयाच्या केवळ बावन्नाव्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या जीवनातील अशा मानसिक आणि शारिरिक उलथा-पालथीमुळे त्यांच्या व्यक्तिगत जीवनात तत्ववेत्त्याच्या धार्मिक शिक्षकाच्या भूमिकेचा त्याग करावा लागला. गूढवादी तत्त्वचिंतक ही त्यांची शेवटची भूमिका होती त्याच अवस्थेत त्यानी शेवटचा श्वास घेतला.

इब्न गझालीच्या जीवनात तत्त्ववेत्त शिक्षक, भटका तपस्वी आणि गूढवादी तत्त्वचिंतक अशी अनेक वळणे आली, तरी त्यांच्या चिंतनशील विचारांचा कस मात्र जराही कमी झाला नव्हता.

गूढवादी साक्षात्कारातूनच अंतिम सत्याचा प्रत्यकारी शोध घेता येतो, हे अल्-गझालीच्या तत्त्वज्ञानाचे मध्यवर्ती सूत्र होते. त्याच्या व्यक्तिमत्त्वातील गुणविशेषांविषयी बोलायचे झाल्यास त्याच्या वैचारिक भूमिकेविषयीची प्रामाणिक बांधिलकी आणि आपली उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी तितक्याच खचोटीने कष्ट करण्याची तयारी, यांचा उल्लेख करावा लागेल. त्याच्या व्यक्तिमत्त्वात अविचल धार्मिक श्रद्धा आणि वस्तुनिष्ठ चिंतनशीलता यांचे समतोल संमिश्रण झालेले आढळते. सुफी आध्यात्मिक परंपरेला त्याने प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, हे तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील सर्वात महत्वाचे योगदान म्हटले पाहिजे.

बाराव्या शतकात त्याचे ग्रंथ विशेषतः तत्त्वज्ञानावरील ग्रंथ अनेक पाश्चात्त्य भाषांत अनुवादित झाले होते. त्यामुळेच त्याच्या विचारांचा आणि तत्त्वानात्मक सिद्धांताचा ज्यू आणि ख्रिश्चन तत्त्वविचारांवर खूप प्रभाव पडला होता. मानव आणि ईश्वर यांच्यात अद्वैत साधण्यासाठी कुण्या त्रयस्थाची गरज नाही, हे इब्न गझालीचे सूत्र सेंट थॉमस पासून अनेक ख्रिश्चन संतांनी पूर्ण श्रद्धेने स्वीकारले होते.

विज्ञानाच्या क्षेत्रात गणिताला सर्व विज्ञानशाखांचा स्रोत मानले जाते. मूलतः अरबांपाशी स्वतःचे असे गणितशास्त्र नव्हते. त्यामुळे त्यांना या बाबतीतही ग्रीकांकडेच वळावे लागले. परंतु कालांतराने त्यांना त्यांच्या उद्दिष्टांच्या दृष्टीने ते अपुरे आणि अपर्याप्त वाटू लागले. म्हणून त्यांनी या शास्त्राचा स्वतंत्रपणे विकास करण्याचे ठरविले.

गणिताच्या क्षेत्रातील अरबांच्या योगदानाचा सारांश काढायचा झाला तर अंकशास्त्र आणि दशमान पद्धतीचा प्रामुख्याने विचार करावा लागेल. अंकशास्त्राचा उगम भारतात झाला हे सर्वज्ञात आहे. अरबांनी त्याचा अभ्यास करताना ते अधिक प्रगत केले, हेही मान्य केले पाहिजे. त्याचबरोबर नव प्लॅटोनिक साधनांपासून अंकशास्त्रामध्ये ज्ञान मिळविले असे इतिहास सांगतो. (Legacy at Islam by Cara de Vaux, Pg 384- 85). याचाच अर्थ असा की ज्ञानप्राप्तीसाठी अरबांनी स्वतःवर कुठल्याही मर्यादा घातल्या नव्हत्या. ‘ज्ञान मिळविण्यासाठी चीनला जावे लागले तरी जाहे पैगंबरांचे वचन त्यांनी आदर्श प्रमाण मानले होते.

गणितात शून्याचा (सीकर) वापर, हे अरबांचे सर्वात महत्त्वाचे योगदान आहे. अरब गणितशास्त्रात शून्याचा वापर त्यापूर्वी किमान दोनतीन शतकांपासून होत होता. दशमान पद्धतीबरोबरच त्यांनी बीजगणित (Algebra) त्रिकोणमितीची (Trigonometry) या क्षेत्रातही भरीव कामगिरी केलेली आढळते.

गणितशास्त्राप्रमाणेच वैद्यकीय क्षेत्रातही मुस्लिम संशोधकांनी डॉक्टरांनी भरीव कामगिरी केली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील या संशोधकांचे कार्य केवळ वैद्यकशास्त्राची प्रगती करण्यापुरते मर्यादित नव्हते. त्यांनी आपल्या संशोधनाचा साधा मानवतावादी संकल्पनांशी जोडून मानवी जीवन निरामय आणि निरोगी करण्याचा प्रयत्न केला. या काळातील वैद्यकीय संशोधकांनी देवी, कॉलरा, गोवर, प्लेग यांसारख्या गंभीर सांसर्गिक रोगांवर मूलगामी संशोधन केले.

वास्तविक, इतर अनेक देशांमधील अनेकजण या रोगांचे बळी होत होते. पण या रोगांच्या सांसर्गिकपणाचा शोध मुस्लिम डॉक्टरांनी लावला. हे सहजासहजी घडलेले नव्हते. त्यामागे मानवी जीवन निरोगी करण्याचे उद्दिष्ट होते ते साध्य करण्याची प्रामाणिक बांधिलकी होतीर. नवव्या शतकात म्हणजे खलिफा मामूनच्या काळात होऊन गेलेला हुनैन इब्न इसहाक हा मुस्लिम वैद्यकशास्त्राचा जनक मानला जातो. खलिफा मामून यांनी बगदाद येथे स्थापन केलेल्या अनुवादपीठाचा तो प्रमुख होता. त्याच्या या पदावरील नेमणुकीमुळेच ग्रीक भाषेतील वैद्यकशास्त्रावरील अनेक महत्त्वाच्या ग्रंथांचे अरबीत भाषांतर करता आले... हुनैनबरोबर दुसरे एक नाव घेतले जाते ते अल्- राझी याचे (८६५ ते ९२५). त्याने वैद्यकशास्त्रावर अनेक ग्रंथ लिहिले आहेत. यामध्ये त्याच्या वैद्यकीय विश्वकोषाचा विशेष उल्लेख करावा लागेल. वैद्यकीय विश्वकोषाची ही परंपरा त्यानंतरही दीर्घकाळ सुरू होती...

यानंतर उल्लेख केला पाहिजे तो इब्ने रश्द याचा (११२६ ते ११९८). त्यानेही वैद्यकशास्त्रावर अनेक ग्रंथ लिहिले आहेत. पण त्यापैकी औषधशास्त्राचे सर्वसाधारण नियम (कुल्लियात फित तिब्ब) हा ग्रंथ सर्वांत महत्त्वाचा मानला जातो.

इब्न रश्द याच्या प्रमाणेच इब्न खतीज याचेही वैद्यकशास्त्रातील योगदान महत्त्वाचे आहे. तो प्रखर बुद्धिवादी होता. धर्मशास्त्रात जे काही सांगितले असेल ते वास्तवाच्या निकषावर खरे उतरले पाहिजे, असा त्याचा आग्रह असायचा. त्याच्या या बौद्धिक बांधिलकीचा प्रत्यय त्याच्या ग्रंथात विशेष करून अमल मन तब्बा लिमन हब्बाया ग्रंथात येतो या ग्रंथाच्या शेवटच्या प्रकरणात गर्भपातासारख्या अतिशय संवेदनशील विषयावरही चर्चा केली आहे. मातेच्या जीवाला धोका असेल तर गर्भपात केला पाहिजे असा त्याचा आग्रह होता. या क्षेत्रातील त्याचा सहकारी इब्न खातिमा याचे चरित्र त्याने लिहिले असून त्याच्या प्लेगवरील संशोधनात्मक ग्रंथाची स्तुती केली आहे.

 वाचा : मुस्लिम समाज पुन्हा ज्ञान-विज्ञानाची वाट धरू शकेल?

वाचा : इस्लाम : ज्ञात आणि अज्ञातांचा शोध

वाचा : अर्तुगल गाज़ी क्रुसेडप्रणित नृशंसतेची पार्श्वभूमी

रसायनशास्त्र (Chemistry) आणि रसशास्त्र ( Alchemy)

या काळातील अनेक मुस्लिम वैद्यकीय संशोधकांना व्यावसायिकांना औषधनिर्माणशास्त्रातही रस होता, त्यामुळे त्यातील अनेक जण रसायनशास्त्रज्ञ रसशास्त्रज्ञ होते. त्यांना प्रयोगशाळांची तंत्रपद्धती औषध निर्मितीच्या तंत्रशुद्ध प्रक्रियेची माहिती होती.

आठव्या शतकात होऊन गेलेल्या जबीर हैयात यांचे नाव या क्षेत्रात विशेष प्रसिद्ध आहे. त्याला इस्लामी रसायनशास्त्राचा जनक मानले आहे. त्याने धातूंची भूशास्त्रीय निर्मिती प्रक्रिया सल्फर मर्क्युरी सिद्धांत यांचा शोध लावला. त्याच्यामुळेच अलंबिक अँटिमनी, अल्कली या रसायन शास्त्रातील संज्ञा प्रचलित झाल्या.

अल्-राझी या वैद्यकीय तज्ञाने जबीर हैयात यांचे रसायनशास्त्र प्रगतीपथावर आणखी पुढे गेलं. त्याच्या (Book of the Art of Alchemy) या ग्रंथात पदार्थ आणि त्यांची रसायन प्रक्रिया यांचे नेमके वर्गीकरण केले. त्यामुळे रसायनशास्त्राचे स्वरूप रसायनशास्त्र आणि अल्केमी यांच्यातील भेद स्पष्ट करणे शक्य झाले.

रसायनशास्त्राच्या तुलनेत अरब संशोधकांनी पदार्थविज्ञानात फारसे योगदान केले नाही. पण वनस्पतीशास्त्र शेती आणि बागायती या क्षेत्रात मात्र लक्षणीय योगदान केले.

सातव्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झालेली आणि तेराव्या शतकापर्यंत अव्याहतपणे प्रगत होत गेलेली ज्ञानसाधनेची परंपरा त्यानंतर मात्र कुंठित झाली एक नवी संकुचित, सनातनी असहिष्णू कुरआन भाष्यपरंपरा सुरू झाली. अल्पावधीतच या भाष्यपरंपरेने मुस्लिम मनावर आणि बुद्धिवादावर प्रभाव गाजविण्यास सुरुवात केली. हा प्रभाव आजही टिकून आहे. त्यातून कोणत्या समस्या निर्माण झाल्या.

भारतातील संस्कृती संगम (मज्म उल - बहारेन)

अब्बासी खलिफांच्या काळात (. . ७५० ९४५) अरब जगतात सुरू झालेल्या ज्ञानसाधनेच्या परंपरेचा प्रसार केवळ शतकभराच्या अवधीत येमेन, सिरिया, इराक, इराण, अशा मध्यपूर्वेतील अनेक देशात झाला होता. इतकेच नव्हे तर दहाव्या शतकानंतरच्या अल्प काळातच हे ज्ञानसाधक भारतातही येऊन पोचले होते.

मुळातच त्यांच्या या साधनेला प्रदेश धर्म किंवा संस्कृतीच्या मर्यादा नव्हत्या. किंवा स्वतःच्या धार्मिक परंपरांविषयी किंवा संस्कृतीविषयी कसलीही अभिनिवेश नव्हता. त्यांची ज्ञानलालसा आणि ज्ञानसाधना म्हणून उत्कट होती. त्यामुळे जिथे जिथे ज्ञान असेल तिथून ते आत्मसात करायचे आपल्या भाषेत अनुवादित करून त्याचा प्रसार करायचा हेच त्यांचे इप्सित होते. कदाचित ज्ञान मिळवण्यासाठी चीनला जावे लागले तरी जाया पैगंबरांच्या वचनातून त्यांना प्रेरणा मिळत असावी.

दहाव्या शतका पासून भारतावर मुस्लिम आक्रमणे व्हायला सुरुवात झाली. पण ख्रिस्ती घराण्याची सत्ता प्रस्थापित होण्यासाठी तेरावे शतक उजडावे लागले.

त्यानंतरच्या अडीच शतकांच्या कालखंडात तुघलक, सय्यद, लोधी अशा सुलतान शाही घराण्यांनी राज्य केले. पण १५५६ साली बाबरने मोगल घराण्याची स्थापना केली तेव्हापासून विशेषतः सम्राट अकबरपासून सम्राट शहाजहानपर्यंतचा म्हणजेच १५५६ ते १६५८ पर्यंतचा शतकभराचा कालखंड हा मोगलशाहीचा सुवर्णकाळ समजला जातो. पण मध्ययुगातील हा सर्व राजकीय इतिहास जितका आणि जसा शिकविला जातो किंवा तो जसा आपण सर्वाना माहित आहे तितका, याच काळात घडलेला पण राजकीय इतिहासाला समांतर असलेला ज्ञानसाधनेचा आणि कलात्मक आविष्काराचा इतिहास फारसा कुणाला माहित नाही.

वास्तविक मध्ययुगातील राजकीय इतिहासापेक्षा हा सांस्कृतिक इतिहास अधिक समृद्ध आहे कारण या इतिहासात मानवी समाजातील हिंसक प्रवृत्तीवर मात करून त्याला सुसंस्कृत करण्याचे सामर्थ्य होते. सम्राट शहाजहानच्या ज्येष्ठ पुत्र दारा शुकोह याने हे नेमके जाणले होते. म्हणूनच त्याने मज्म-उल- बहरेनम्हणजेच हिंदू आणि मुस्लिम या दोन सांस्कृतिक सागरांचा संगम हा ग्रंथ लिहिला. भारतातील गंगा-जमनी संस्कृतीच्या संकल्पनेचा हाच उद्गम-बिंदू होता म्हणूनच दारा शिकोहला मानवतावादी सुसंस्कृतपणाचे प्रतीक मानले पाहिजे.

इस्लाम भारतात आल्यानंतर अनेक अभ्यासक, संशोधक भारतात आले आणि त्यांनी आपल्या पूर्वपरंपरेनुसार आपली ज्ञानसाधना सुरू केली. त्यांनी या ज्ञानसाधनेला धर्म, भाषा, देश वा इतर कुठल्याही मर्यादा घालून घेतल्या नव्हत्या. त्यांची ज्ञानसाधना पूर्वग्रहविरहित होती. म्हणूनच त्यांनी संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळविले त्या आधारे या भाषेतील समृद्ध ज्ञानभांडार अरबी पर्शियन भाषेत अनुवादित केले भारताबाहेर त्याचा प्रचार आणि प्रसार केला.

अल् बेरुनी अमीर खुस्रो हे याच परंपरेतील विद्वान संशोधक! अल बेरुनी (जन्म १७३ इसवी) हा विद्वान संशोधक होता. अरेबिक, पर्शियन आणि संस्कृत भाषांवर त्याचे विलक्षण प्रभुत्व होते. तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र, खगोलशास्त्र, फल ज्योतिष या विषयात त्याला विशेष रस होता. त्याचबरोबर इतरही अनेक विषयांचा त्याने सखोल अभ्यास केला होता. अकराव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात तो उत्तर हिंदुस्तानात विशेषतः वायव्य सरहद प्रांत, पंजाब, सिंध, हिमाचल प्रदेश, हरियाणा, बिहार या सर्व प्रांतात त्याने प्रवास केला होता. या ते भ्रमंतीत गायकीची नवी शैली तयार झाली ती अल्प काळात लोकप्रियही झाली. या प्रयोगशीलतेत अमीर खुस्रोचेही योगदान होते. त्याने भारतीय संगीतला इराणी संगीताची जोड देऊन त्याला एक नवे परिमाण प्राप्त करून दिले.

सुफी संत परंपरेतील आध्यात्मिक गूढवादाचे (Mysticism) त्याच्यावर संस्कार झाले होते. त्यामुळे भारतीय शास्त्रीय संगीताचे आध्यात्मिकतेशी असलेले नाते त्याला उमगले होते. म्हणूनच भारतीय आणि इराणी या दोन संगीत शैलींचे सहजसुलभ संमिश्रण करणे त्याला शक्य झाले असावे, असे म्हणता येईल.

अल् बेरुनी अमीर खुस्रो हे याच परंपरेतील विद्वान! त्यांची नवे थोड्या फार प्रमाणात परिचित आहेत, पण अपरिचित असलेल्या संशोधकांची, अभ्यासकांची यादीही मोठी आहे. त्यापैकी अबू सालेह शुएब हा एक. त्याने महाभारताचे पर्शियन भाषेत भाषांतर केले आहे. पुढे .. १०२६मध्ये अबू हसन जलाली याने त्याची आणखी एक सुधारित आवृत्ती प्रसिद्ध केली

याच सुमारास इब्न अल मुक्कफा याने पंचतंत्र या नीतिकथा संग्रहाचे कलीलहे--दिमनेहया नावाने अरबी भाषांतर केले. त्यानंतर गझनवी सुलतान इब्राहिम इब्न मसूदच्या काळात, दारुल इन्शा या संस्थेच्या अबुल अली मुसतोफी याने त्याची पर्शियन आवृत्ती काढली. त्यानंतर मुल्ला हुसेन वा इज काशीफी याने त्याची अन्वरे सुहेलीया नावाने पर्शियन भाषेत गद्यात्मक आवृत्ती काढली. पण भाषांतरकर्त्याने त्यात अरबी काव्यपंक्ती आणि वाक्प्रचार यांचा वापर केला. त्यानंतर सम्राट अकबर यांच्या सांगण्यावरून अबुल फझल याने काशीफीच्या अन्वरे सुहेलीची आवृत्तीही काढली.

सुलतान फिरोज शाह तुघलक (१३५१ ते १४९३) याने नागरकोट राजाचा पराभव केला तेव्हा ज्वालामुखी मंदिरात त्याला जवळजवळ तेराशे संस्कृत ग्रंथ आढळले. त्यात अनेक ग्रंथ खगोलशास्त्रावरचे होते. त्याने तेथील पंडितांबरोबर चर्चा करून आणि त्यांच्या सहकार्याने हे ग्रंथ पर्शियन भाषेत भाषांतरित करून घेतले. त्यातील इझुद्दीन खालिद रवानी याने भाषांतरित केलेला दलाई अल फिरुज शाहीहा ग्रंथ महत्वाचा मानला जातो. याच काळातील आणखी एक भाषांतरित ग्रंथ म्हणजे वराहमिहीरचा पंचसिद्धांतिकहा होय. हा ग्रंथ शम्स--शिराजी याने तर्जुमा--वराहीया नावाने भाषांतरित केला. ‘संगीत दर्पणया शास्त्रीय ग्रंथाचे धुनयतुल मूनैय्याया नावाने भाषांतर झाले आहे.

वाचा : मदीनेतील ज्यू धर्मीयांचा अरबांशी संघर्ष

वाचा : ‘इस्लाम खतरे में’लाच रस्त्यावर उतरणार का ?

वाचा : अशालिन ‘हेब्दो’ आणि इस्लाम फोबिया

सुलतान सिकंदर लोधीच्या कारकिर्दीत (१५५६-१६०५) तर या ज्ञानसाधनेला राजाश्रयच मिळाला होता. त्यामुळे या काळात तत्त्वज्ञान, विज्ञान आणि इतर विषयांवरील महत्त्वाच्या संस्कृत ग्रंथांच्या भाषांतराला विशेष उत्तेजन मिळाले होते. खुद्द अकबराच्या ग्रंथसंग्रहात संस्कृत, पर्शियन, अरबी, ग्रीक अशा अनेक भाषांतील ग्रंथ होते. संस्कृत भाषेतील ज्ञानभांडार पर्शियनमध्ये भाषांतरित करण्यासाठी अनेक विद्वानांची खास नेमणूक करण्यात आली होती. तत्कालीन प्रसिद्ध कवी फैजी, इतिहासकार अब्दुल कादिर बदायुनी, धर्मशास्त्रज्ञ नकीब खान, तत्वज्ञ सुलतान थानेेसरी आणि प्रसिद्ध विचारवंत मुल्ला शिरी, ही त्यापैकी काही नावे!

अकबराचा वजीर अबुल फजल याचाही या विद्वानांत समावेश करावा लागेल. याना त्यांच्या कार्यात सहकार्य मार्गदर्शन करण्यासाठी तत्वज्ञान विज्ञान या विषयांतील अनेक तज्ञ पंडितांचीही नेमणूक करण्यात आली होती.

अब्दुल कादिर बदायुनी याने भवन खान (हा धर्मांतरित ब्राह्मण होता) याच्या सहकार्याने रामायणाचे भाषांतर केले. त्यानंतर त्याच्या आणखी चार संक्षिप्त आवृत्याही निघाल्या होत्या. त्यातील पहिली गिरधरदास कायस्थ याने काढली होती ती बादशाह जहांगीरला अर्पण करण्यात आली होती.

अकबरच्याच कारकिर्दीत महाभारताच्या अठरा पर्वाचे पर्शियन भाषांतर रझम नामाया नावाने करण्यात आले होते. कवी फैजी याने या गद्य भाषांतरात सुधारणा करून त्यात आणखी दोन पर्वांच्या भाषांतराची भर घातली फैजीने भगवद्गीता’, भास्कराचार्यांचा लीलावतीहा ग्रंथ आणि सोम सागराच्या कथा सरीत सागरचेही भाषांतर केले होते. त्याने नलोपाख्यानाचे नलदामनया नावाने मसनबी वृत्तांत काव्यरूप भाषांतरही केले. वेदान्त, तत्वज्ञान, योगवशिष्ठ आणि भागवत पूर्ण यांवर आधारित त्याचा शरीकुल मारिफ हा ग्रंथ पर्शियन भाषेत सर्वांत महत्त्वपूर्ण मानला जातो.

अब्दुल कादिर बदायुनी याने सम्राट अकबरच्या आदेशावरून सिंहासन- बत्तिशीचे खेराट अफजाया नावाने भाषांतर केले. जहांगीरच्या काळात सिंहासन- बत्तिशीची, ‘किस्सा--बिक्रमाजीत गुलअफसानअशी आणखी दोन भाषांतरे झाली होती. त्याचप्रमाणे मुल्ला शिरी व्यासांच्या हरिवंश या कृष्ण चरित्राचे हरिबन्सया नावाने भाषांतर केले.

शहाजहान बादशहाचा मोठा मुलगा दारा शिकोह हा या सर्व विद्वानांचा शिरोमणी मानला पाहिजे. बनारसला जाऊन तेथील पंडितांकडून तो संस्कृत भाषा शिकला. संस्कृतवर त्याचे उत्तम प्रभुत्व होते. त्याने सिरे अकबरया नावाने उपनिषदांचे भाषांतर केले. त्याचबरोबर योगावशिष्ठ भगवद्गीतेचेही त्याने पर्शियन भाषांतर केले आहे, परंतु त्याचा मजम-उल- बहरेन’ (हिंदू आणि मुस्लिम या दोन महासागरांचा संगम) हा ग्रंथ सर्वांत महत्वाचा मानला पाहिजे. कारण हा ग्रंथ म्हणजे भारतातील मिश्र संस्कृतीचे प्रतीक आहे. दुर्दैव असे की औरंजेबावर अनेक कादंबऱ्या, नाटके लिहिली गेली आहेत, परंतु दारा शिकोह या सुफी संत प्रवृत्तीच्या शोकांत नायकावर मराठीत एकही पुस्तक नाही.

*

माझ्या आजच्या अध्यक्षीय भाषणाचा समारोप माझे मित्र आणि पहिल्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष प्रा. . . शहाजिंदे यांनी त्यांच्या मुस्लिम मराठी साहित्याची पुढील दिशाया लेखात उपस्थित केलेल्या काही प्रश्नांच्या अनुषंगाने करणार आहे.

इल्म म्हणजे केवळ धर्माचे शिक्षण की धर्मासह सर्व आधुनिक ज्ञानशाखांचे शिक्षण, असा प्रश्न संदर्भाधीन लेखात प्रा. शहाजिंंदे यांनी उपस्थित केला आहे. या प्रश्नाच्या उत्तरात त्यांच्या इतरही प्रश्नांची उत्तरे अध्याहृत आहेत. म्हणून तो प्रश्न मला महत्वाचा वाटतो.

प्रा. शहाजिंदेच्या प्रश्नाचे उत्तर कुरआनच्या ९६व्या अध्यायातील ते या श्लोकात म्हणजेच आयातीत आले आहे. ही घटना आहे . . ६१० या वर्षीच्या रमजान महिन्यातील २७व्या रात्रीची. मक्के जवळच्या हिरा नामक गृहेत नेहमी सारखे चिंतन करत असताना त्यांना पहिला साक्षात्कार झाला आणि त्यांच्या मुखातून कुरआनचा पहिला संदेश प्रकट झाला. हा संदेश ज्ञानसाधनेचा होता.

पैगंबराचा पहिला साक्षात्कारी संदेश

अध्याय-९६ (सूरह अलक)

आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू आहे

१) वाच! तुझ्या पालनकर्त्याच्या नावाने (आरंभ करुन)

२) ज्याने (सर्वांना) निर्माण केले. ज्याने मानवाला गोठलेल्या रक्तबिंदू पासून निर्माण केले.

३) वाच! तुझ्या पालककर्त्यांच्या (नावाने) जो फार उदार आहे.

४) ज्याने (मानवाला) ज्ञानप्राप्तीसाठी लेखणीचा उपयोग करणे शिकविले.

५) मानवाला ते सर्व शिकविले, जे त्यास माहित नव्हतं

(मौलाना वहिदुद्दीन खान यांच्या कुरआन मराठीतमधून) 

या साक्षात्कारी संदेशाची वैशिष्टे अशी आहेत:-

हा क्षण नबुवतचा म्हणजेच प्रोषितत्वाच्या प्रप्तिचा क्षण होता. या क्षणापासून मुहंमद अब्दुल्ला हे पैगंबर म्हणून ओळखले जाऊ लागले.

तसाच तो इस्लामच्या ही जन्माचा क्षण होता.

या ज्ञानसाधनेला धर्म, भाषा, विषय किंवा इतर कुठल्याही मर्यादा नव्हत्या. तसेच ही साधना पुरुष आणि महिलांसाठी मुक्त होती.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे या साक्षात्कारी संदेशातून अनेक अरब अभ्यासक संशोधकानी सहिष्णु, सर्वसमावेषक, समृद्ध अशी इस्लामी संस्कृती निर्माण केली.

ती संस्कृती सातशे वर्षे सातत्यपूर्वक विकासित होत होती. या संशोधक अभ्यासकांनी किती विविध क्षेत्रांमध्ये प्रगती केली त्याचा तपशील माझ्या भाषणात यापूर्वी आलाच आहे.

पंधराव्या सोळाव्या शतकापासून या समृद्ध संस्कृतीची अधोगती सुरू झाली ती अजूनही कोणी थांबवू शकलेला नाही. कारण याच काळात नव्याने अस्तित्वात आलेल्या जमाते इस्लामी आणि वहाबी या सनातनी शक्तीपुढे सर्व समावेशक समृध्द संस्कृती टिकू शकली नाही.

धन्यवाद...

(समाप्त)

(अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद आयोजित नाशिक येथील ९वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन २०२३)

दिनांक २८-२९ जानेवारी २०२३

संमेलनाध्यक्ष

अब्दुल कादर मुकादम

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,42,इस्लाम,37,किताब,15,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,271,व्यक्ती,4,संकलन,61,समाज,222,साहित्य,68,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: इस्लामचे जागतिक ज्ञान क्षेत्रात योगदान
इस्लामचे जागतिक ज्ञान क्षेत्रात योगदान
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg5bUoFIbe-LRlctcbybH7yf6KcACDY0CUC8s3JzAMojIBYbDVJIv4UdKrBNU0olGl0llYtnu-jXzczBO0vwmDobRfslYCBiTZuMHMA7gdH2S4CX42R6wOVC_Pv3kkjIodTVSc-Owd2KnWlqLMg277merDCJA8gT2hPUlWcoOFY75DVfnArWyt1nK2tAA/w640-h420/Mukadam%20NSK-2.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg5bUoFIbe-LRlctcbybH7yf6KcACDY0CUC8s3JzAMojIBYbDVJIv4UdKrBNU0olGl0llYtnu-jXzczBO0vwmDobRfslYCBiTZuMHMA7gdH2S4CX42R6wOVC_Pv3kkjIodTVSc-Owd2KnWlqLMg277merDCJA8gT2hPUlWcoOFY75DVfnArWyt1nK2tAA/s72-w640-c-h420/Mukadam%20NSK-2.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2023/01/blog-post_29.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2023/01/blog-post_29.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content