मदीनेतील ज्यू धर्मीयांचा अरबांशी संघर्ष

                                                                                                          यहुदी लोकांची बनू नझीर टोळी
रोमन सम्राटानं इ. सन ७०मध्ये पॅलेस्टाइनमध्ये यहुदी लोकांची सर्रास हत्या केली आणि नंतर काही वर्षांनी तिथल्या सर्व यहुदी लोकांना काढून टाकलं तेव्हा बरेच यहुदी लोक अरबस्थानात येऊन स्थायिक झाले होते. जिथं जिथं पाण्याचा स्रोत होता तिथं त्यांनी आपली वस्ती केली.

त्याच काळात यहुदींच्या तीन प्रमुख टोळ्या बनू कैनुका, बनू नझीर आणि बनू कुरैजा मदीनेत स्थायिक झाल्या. त्यांच्या इतर काही टोळ्या ऐला, खैबर, फदक, कुरा घाटी इत्यादी एकूण १२ टोळ्या या ठिकाणी राहू लागल्या. त्यांनी अरबी भाषा अवगत केली. अरब संस्कृती अंगीकारली.

अरबांशी त्यांचा बेटी व्यवहार होत होता. तरीदेखील त्यांना आपली बनी इस्राइली अस्मिता जपायची होती. वरकरणी त्यांनी अरबांची संस्कृती, रितीरिवाज, भाषा, परंपरांचा स्वीकार केला होता, पण आपली वेगळी अस्मिता कायम ठेवली होती.

यहुदी लोक स्वत:ला ईश्वराचे निवडक लोक समजत होते. इतर लोकांना त्यांच्या मतानुसार माणुसकीचा दर्जा नव्हता. बिगर यहुदींना ते जेन्टाइल’ (Gentile) म्हणजेच चांडाळम्हणत होते. यहुदी लोक तटबंदी घरांमध्ये राहत होते.

कैनुका सोनार लोकांची जमात होती. तील काही लोक इतर व्यापारही करीत होते. बनू नझीर लोकांकडे खजुराच्या मोठमोठ्या बागा होत्या. ते लोक शेतीचा व्यवसायदेखील करीत होते. बनू कुरैजा कातडे कमवण्याचा आणि रंगवण्याचा व्यवसाय करीत होते.

वाचा : मक्केचा चक्रावणारा व रक्तरंजित इतिहास

वाचा : इस्लामचा अवास्तव संदर्भ जिथेतिथे कशासाठी?

वाचा : इस्लामशिवाय जग कसे असते ?

खजूर, दारू आणि कापड उद्योग देखील यहुदी लोकांचे होते. अवाढव्य किंमतीवर ते आपला माल अरब लोकांना विकत होते. त्याचबरोबर मोठ्या रकमा त्यांना दुपटी तिपटीने व्याजावर देत होते. त्यांच्या शेत जमिनी आणि राहतं घर ते गहाण ठेवून घेत आणि नंतर त्यावर कब्जा करत.

तरब कबिले-टोळ्यांमध्ये एकमेकांविरुद्ध द्वेष निर्माण करून त्यांच्यात कलह निर्माण करण्यात ते तरबेज होते. अरब लोकांमध्ये एकी होता कामा नये यासाठी ते सतत प्रयत्नशील असत.

यहुदी लोक स्वतःलाच तेवढं सदाचाराच्या लायकीचं समजत. प्रमाणिकपणा फक्त यहुदी लोकांशीच केला जावा, इतर लोकांचा माल हडप करण्यास ते रास्त समजत. इस्राईली आणि बिगर इस्राईली लोकांसाठी वेगळे मापदंड होते. कायदे, नियमदेखील वेगळे होते.

आपसांत व्याज घेऊ नये, पण परधर्मीयांकडून व्याज घेण्यात काही गैर नाही असं ते मानत होते. इतकेच नव्हे तर दस्तुरखुद्द यहुदींमधील गरीब लोकांशी वेगळा व्यवहार केला जायचा. जर एका श्रीमंताकडून व्यभिचाराचा गुन्हा झाला तर त्याला काही शिक्षा केली जात नव्हती पण जर एखाद्या गरीब माणसानं हा गुन्हा केला तर त्यास शिक्षा दिली जाई.

एकेश्वरत्व, प्रेषित्व आणि मरणोत्तर जीवन यावर यहुदी लोकांचा विश्वास होता. पण त्यांच्या श्रद्धेमध्ये अनेक विकृतींनी शिरकाव केला होता. त्यांच्या व्यावहारिक जीवनात अशा रुढी-परंपरांचा समावेश होता ज्यांचा त्यांच्या धर्मग्रंथात तौराहमध्ये कोणताच पुरावा नव्हता.

धर्माचा खरा आत्मा त्यांनी हरवलेला होता. त्यांच्या श्रद्धा, नैतिकता आणि आचारविचारांचं अध:पतन झालेलं होतं. तरीदेखील त्यांनी अशा मृत अवस्थेतील धर्माच्या आराखड्यालाच धर्म समजून त्याच्यावर त्यांनी जीवापाड प्रेम केले. धर्मसुधारकाला ते आपलं कट्टर शत्रू समजत होते आणि कसंही करून त्याला या कार्यात यश मिळू नये यासाठी ते वाटेल ती किंमत मोजायला तयार होते.

त्यांच्या धर्मपंडिताचं (रिब्बी) म्हणणं होतं की जर एखाद्या यहुदी आणि यहुदेतर व्यक्तीचं एखादं प्रकरण न्यायाधीशाकडे आलं तर त्यानं यहुदीच्या बाजूनेच निकाल द्यावा. जर यहुदी कायद्यात ते बसत नसेल तर यहुदेत्तर लोकांचा कायदा लागू करून कोणत्याही परिस्थितीत यहुदी व्यक्तींच्या बाजूनेच निकाल द्यावा. त्यांचं म्हणणं होतं की यहुदेत्तर माणसाच्या कोणत्याही चुकीने आपला फायदा करून घ्यावा.

त्यांनी सर्वांना व्याजाच्या वेढ्यात अडकवून टाकलेलं होतं. कर्जपुरवठ्यासाठी ते त्यांच्या मुलाबाळांना आणि स्त्रियांना देखील गहाण ठेवायला विवश करीत होते.

शुल्लक दागिने हस्तगत करण्यासाठी निष्पाप मुलांना दगडांनी ठेचून जिवे मारत होते.

वाचा : मुस्लिम समाज पुन्हा ज्ञान-विज्ञानाची वाट धरू शकेल?

वाचा : इस्लाम : ज्ञात आणि अज्ञातांचा शोध

कअब बिन अशरफ एक सधन एवढी होता त्याच्याकडे कारणाने काही अन्नधान्य कर्ज म्हणून देण्याची विनंती केली. तो म्हणाला, “ठीक आहे पण तुम्हाला काहीतरी गहाण ठेवावे लागेल.

त्या अरबानं विचारलं, “काय गहाण ठेवू.”

तो म्हणाला, “तुम्ही आपल्या स्त्रिया माझ्याकडे गहाण ठेवा.”

प्रेषित मुहंमद () यांच्या आगमनापूर्वी यहुदी लोक एका प्रेषितांच्या येण्यासाठी प्रार्थना करीत. तो आल्यावर त्यांना जगात सर्वत्र वर्चस्व प्राप्त होईल, असा त्यांचा कयास होता. पण जेव्हा प्रेषित मुहंमद यांचं आगमन झालं, तेव्हा त्यांची प्रतीक्षा करीत असलेल्या यहुदींनी त्यांना विरोध करण्याचा विडा उचलला.

सर्वात जास्त विरोध त्यांनीच केला. याचं कारण असं की ते (प्रेषित) यहुदी घराण्यापैकी (बनी इस्राईल) नव्हते. ते स्वतःला ईश्वराचे सर्वात आवडते आणि निवडक समजत. ईश्वर फक्त बनी इस्राईलशीच संवाद करीत असतो.

यहुदी लोक प्रेषित मुहंमद यांना म्हणत, “तुम्ही प्रेषित होऊ शकत नाहीत. सारे प्रेषित त्याच घराण्यातून आलेले आहेत. याशिवाय दुसर्‍या मानवी समाजामधून कोणी प्रेषित होण्याच्या लायकीचा नाही. तुम्ही प्रेषित होऊ शकता पण त्यासाठी तुम्हाला आमचा धर्म स्वीकारावा लागेल आणि आमच्या लोकांमध्ये सामील व्हावं लागेल.”

वाचा : अशालिन ‘हेब्दो’ आणि इस्लाम फोबिया

मदिनेचे यहुदी प्रेषितांच्या आगमनाने आनंदी होत. पण त्यांना अशी खात्री होती की ते लवकरच त्यांचा धर्म स्वीकारतील. प्रेषितांनी हिजरतनंतर मदीनेत पोहोचण्यापूर्वी मदिनेपासून दोन-तीन महिलांच्या अंतरावरील कुबा या वस्तीत जी पहिली मस्जिद बांधली होती, त्याची दिशा त्यांना पॅलेस्टाईनमध्ये मज्जिद ए अक्साकडे केलेली होती. त्यामुळे यहुदींच्या आशा आणखीनच वाढल्या होत्या.

काही यहुदी धर्मीयांनी प्रेषित मुहंमद यांना विचारले देखील होते, की ते त्यांच्या धर्मामध्ये प्रवेश करणार आहेत?

ते म्हणाले, “तुम्हाला पैगंबर व्हायचं असेल तर यहुदी व्हा. कारण आजवर सगळे पैगंबर यहुदी लोकांमध्येच आलेले आहे आणि यहुदी लोकांनाच फक्त हा मान लाभला आहे. ईश्वर फक्त यहुदींशीच संभाषण करतो. यहुदी लोक जगात पहिल्या क्रमांकावर आहेत. बाकीचे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.”

प्रेषित मुहंमद यांनी त्यांना उत्तर दिलं, “मी स्वेच्छेने प्रेषित झालो नाही. मला ईश्वराने प्रेषित निवडलं आहे. अल्लाहच्या नजरेत सर्व मानव समान आहेत. कोणत्याही समुदायात इतर मानवी समुदायावर प्रभुत्व नाही. फक्त यहुदी लोकांशीच ईश्वर संभाषण करीत नाही तर कोणाशीही संवाद साधू शकतो.”

म्हणूनच एक बिगर यहुदी (बिगर बनी इस्राईल) व्यक्तीला अल्लाहने प्रेषित म्हणून नियुक्त केलं तेव्हा यहुदींनी त्यांच्याविरोधात कोणतीही सीमा ठेवली नाही. “जेव्हा त्यांच्याकडे तो ग्रंथ आला ज्यांच्याशी ते अपरिचित होते तरीदेखील त्यांनी त्याला नाकारलं. (कुरआन-२:८९) ग्रंथ येण्यापूर्वी ते आपल्या विरोधकांवर विजय मिळवण्यासाठी प्रार्थना करीत होते.

प्रेषित मुहमंद यांच्या एक पत्नी हजरत सफिया यांचे वडील हुयी बिन अखतब यहुदी धर्मपंडित होते. त्यांचे चुलते देखील मोठे विद्वान यहुदी होते.

हजरत सफिया म्हणतात की प्रेषित मुहंमद (स) मदीनेत आल्यानंतर या दोघांनी प्रेषितांची भेट घेतली. त्यांच्याशी बराच वेळ चर्चा करून घरी आले. त्या दोघांमध्ये प्रेषितांच्या बाबतीत जी चर्चा झाली ती मी ऐकली.

चुलत्यांनी विचारलं, “आमच्या धर्मग्रंथात ज्या प्रेषितांच्या आगमनाच्या बाबतीत जे म्हटलं गेलंय हेच का ते प्रेषित?”

माझ्या वडिलांनी उत्तर दिलं, “ईश्वराशपथ ! हेच ते प्रेषित आहेत.”

माझ्या चुलत्यांनी विचारलं, “तुम्हाला खात्री आहे काय?”

वडील म्हणाले, “होय.

चुलते म्हणाले, “मग काय विचार आहे?” वडिलांनी उत्तर दिलं, “जोपर्यंत जीव आहे त्याचा विरोध करीत राहीन. त्याचं काहीएक चालू देणार नाही.”

वाचा : अर्तुगल गाज़ी क्रुसेडप्रणित नृशंसतेची पार्श्वभूमी

वाचा : दहशतवाद आणि मुस्लिम प्रबोधनाची दिशा

यहुदी लोकांनी प्रेषितांचा कडाडून विरोध सुरू केला. मदीनेचे अन्सार यहुदी लोकांकडून प्रेषित वगैरेच्या गोष्टी ऐकत असत. प्रेषित मदिनेत आल्यावर स्वाभाविकच त्यांना यहुदी लोकांशी त्यांच्या बाबतीत चर्चा करावीशी वाटे. ते यहुदींना प्रेषितांच्या शिकवणींबाबत विचारत. यहुदी त्यांना सत्य सांगत नसत. त्यांचा गैरसमज व्हावा, ते संभ्रमात पडावेत अशा तऱ्हेच्या गोष्टी ते त्यांना सांगत. यहुदी लोकांनी दांभिक लोकांचा एक गट तयार केलेला होता.

ज्यू धर्मीयांचा धर्मग्रंथ तौराहमध्ये प्रेषितांच्या आगमनाचं भाकित आलं होतं.

ईश्वर तुमच्यासाठी तुमच्यामधूनच माझ्याप्रमाणे एक प्रेषित पाठवणार. तुम्ही त्याचं पालन करावं. त्याच्या मुखातून माझे शब्द निघतील. मी त्यास जे सांगेन तेच तो तुम्हाला सांगेल आणि माझा संदर्भ देऊन त्यानं माझ्या गोष्टी सांगितल्या तर जे त्याला नाकारतील मी त्यांचा हिशेब घेईन.” (तौराह, श्लोक-१८:१५-१९)

ख्रिस्ती धर्मग्रंथातदेखील प्रेषितांच्या आगमनाची सूचना दिलीय. येशू ख्रिस्त म्हणतात, “तो जगाचा सरदार असेल. सत्यतेच्या सर्व गोष्टी सांगेल. मार्ग दाखवील.त्या प्रेषिताचं नाव इंजीलमध्ये परिक्लोटास असं दिलय. याचा अर्थ ज्याची स्तुती केली जाईलम्हणजे मुहंमदअसा आहे.

यहुदी लोकांनी फक्त मुहंमद यांना प्रेषित म्हणून मान्य - करण्याचीच शपथ घेतली होती. एवढ्यावरच न थांबता त्यांनी त्यांच्या अनुयायांनीही त्यांचा विरोध करावा यासाठी प्रयत्न करू लागले. प्रेषितांच्या बाबतीत वेगवेगळे गैरसमज पसरवू लागले. ते लोकांना सांगत की सकाळ त्यांचा धर्म स्वीकारा आणि रात्री तो धुडकावून लावा. त्यांच्या अशा कृत्यांच सखोल आढावा कुरआनात आलेला आहे. त्याचा समाचार घेत अल्लाह म्हणतो : 

ग्रंथधारकांपैकी (यहुदींपैकी) काही लोकांनी तुम्हाला मार्गभ्रष्ट करण्याचा चंग बांधलाय, पण त्यांना हे कळत नाही की ते स्वत:लाच मार्गभ्रष्ट करताहेत. ग्रंथधारक लोकहो, तुम्ही साक्षी असतानादेखील अल्लाहची वचनं का नाकारता? ग्रंथधारक लोकांनो, तुम्ही सत्यावर असत्याचं आवरण का बरं घालता आणि जाणूनबुजून सत्य लपवता?” (कुरआन, ३:६९-७१)

अल्लाहला दिलेल्या शब्दांचा आणि वाहिलेल्या शपथांचा क्षुल्लक किंमतीत सौदा करतात.” (कुरआन, ३:७७)

यहुदी लोकांच्या या सगळ्या आटापिट्याचं कारण हे होतं की त्यांना बिगर यहुदी लोकांपैकी कोणी प्रेषित व्हावा हे मुळीच मान्य नव्हतं. त्यांना ते उम्मीम्हणजेच जेन्टाइल (चांडाळ) म्हणत असत.

तोच ज्यानं निरक्षर (ग्रंथहीन) लोकांत (उम्मी) त्यांच्यापैकीच एक प्रेषित पाठवला.” (कुरआन, ६२:२)

ज्यांना हेदेखील मान्य नव्हते की उम्मीलोकांना ग्रंथाची शिकवण द्यावी, त्याच उम्मीलोकांमधील (प्रेषित) त्यांना ग्रंथाच्या आयती वाचून दाखवतो.

(इफ्तिखार अहमद लिखित प्रेषित मुहंमद नवयुगाचे प्रणेते या पुस्तकातील एक प्रकरण)

सौजन्य : मायबोली प्रकाशन, मुंबई-२०१८

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: मदीनेतील ज्यू धर्मीयांचा अरबांशी संघर्ष
मदीनेतील ज्यू धर्मीयांचा अरबांशी संघर्ष
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiS9zRbDgua_ffHhTLAmQCLuGx62VsKkMdZGcKba7sv1a_2QvZf1FLpVqG7L6IrZMVgMIkVAc81GKc0hiKq14WaeMRX1pOA5G4dWLJ9neGdI8poNZRX4mr_uGjJ_dsjbAiUXcxC-wf77xNP/w640-h312/1606219243040818-0.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiS9zRbDgua_ffHhTLAmQCLuGx62VsKkMdZGcKba7sv1a_2QvZf1FLpVqG7L6IrZMVgMIkVAc81GKc0hiKq14WaeMRX1pOA5G4dWLJ9neGdI8poNZRX4mr_uGjJ_dsjbAiUXcxC-wf77xNP/s72-w640-c-h312/1606219243040818-0.png
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2020/11/blog-post_24.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2020/11/blog-post_24.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content