
४३ वर्षीय अबी अहमद २०१८ पासून इथोपियाचे पंतप्रधान
आहेत. देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार असा, जाहीरनामा त्यांनी निवडणुकीवेळी
जनतेला दिला होता. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत दोन दशकांपासून सुरू असलेल्या संघर्षाला
‘शांती वार्ता’ करून विराम लावू
असा महत्वाचा मुद्दा त्यांनी उचलून धरला. याच मुद्द्यावर ते निवडून आले. सत्ता ताब्यात
घेतल्याच्या वर्षभरातच त्यांनी दीर्घकालीन संघर्षावर निर्णायक तोडगा काढला.
१९९३ला इथोपियाची फाळणी होऊन त्यातून ‘इरिट्रिया’ हा
देश तयार झाला होता. भौगोलिक विभागणीवरून दोन्ही देशात त्यावेळपासून सीमा वाद सुरू
होता. इरिट्रियाने सीमावर्ती भागात असलेल्या बाडमे या परिसरावर आपला हक्क सांगितला.
संयुक्त राष्ट्रानेदेखील इरिट्रियाचा हक्क मान्य केले. मात्र इथोपियाने तो भाग इरिट्रियाला
देण्यास नकार दिला. १९९८नंतर या संघर्षाने सशस्त्र लढ्याचे रूप घेतले. दोन्ही देशात
तब्बल २२ वर्षे हे युद्ध चालले. न्यूज एजन्सी रॉयटरच्या मते या युद्धात दोन्हीकडचे
तब्बल ७० लाख लोक मृत्युमुखी पडले.
हे दोन्ही राष्ट्र जगातले सर्वात गरीब देश मानले
जातात. २ दशकाच्या युद्धामुळे दोन्ही देश आर्थिक अडचणीत आले. मात्र, शांतता समझोता
होऊ शकला नाही. सन २०००मध्ये इथोपियाने इरिट्रियाबरोबर शांतता करार केला. दोन्ही देशात
आर्थिक घडी बसवण्यासाठी या कराराचा उद्देश होता. परंतु कराराची पूर्णपणे अंमलबजावणी
होत नव्हती. दोन्ही देशात संघर्ष ‘जैसे थे’ अवस्थेत होता. ज्यांचा
परिणाम इथोपियाच्या अर्थव्यवस्थेवर होत होता. सततच्या युद्धामुळे स्थानिक नागरिकांमध्ये
शत्रुत्व व वैरभावना निर्माण होत होती. अनेक तरुण बंडखोर होऊन सरकारविरोधात लढत होती.
जून २०१८ला, पंतप्रधान अबी अहमद
यांच्या नेतृत्वात ‘इथिओपियन पीपल्स रेव्होल्यूशनरी डेमोक्रॅटिक
फ्रंट’ची सत्ता इथोपियात आली. अहमद यांनी वर्षभरातच वादग्रस्त
परिसर ताब्यात घेऊन इरिट्रियाच्या स्वाधीन केला. दोन दशकापासून सुरू असलेला संघर्ष
व युद्ध अखेर २०१८ला शांत झाला. अबी अहमद यांनी आपले आश्वासन पूर्ण करून दोन्ही देशात
शांतता प्रस्थापित करण्याचा धाडसी निर्णय घेतला.
अबी अहमद यांचा जन्म दक्षिण इथियोपियाच्या जिमा
जोन शहरात १९७६ साली झाला. त्यांचे वडील मुस्लीम तर आई ख्रिश्चन होती. अबी अहमद आई-वडिलांचे
तेरावे मुल आहेत. एमबीए, कॉम्प्युटर सायन्स, इत्यादी अशा अनेक विषयात त्यांनी पदव्युत्तर
प्राविण्य मिळवले आहे. विषेश म्हणजे आदिस अबाबा विद्यापीठातून त्यांनी ‘शांतता
आणि सुरक्षा’ विषयावर पीएचडी मिळवली आहे. अबी अहमद हे
इथोपियाचे नेल्सन मंडेला म्हणून प्रसिद्ध आहेत. अनेक वर्षे मंडेला यांचा फोटो असलेला
टी-शर्ट घालत होते. अबी अहमद सरकारचे गुप्तहेर अधिकारी असताना इरिट्रियाविरोधात युद्धात
त्यांनी सहभाग घेतला होता. त्याचवेळी त्यांनी हा संघर्ष चर्चेतून सुटू शकतो, असे मत
मांडले होते. २०१० साली त्यांनी राजकारणात प्रवेश करत ‘ओरोमो
डेमोक्रॅटिक फ्रंट’चे सदस्यत्व घेतले. शांततावादी, स्वातंत्र्यतावादी
आणि लोकशाहीवादी अशी त्यांची प्रतिमा आहे.
इथियोपियात १९९५ पासून चार पक्षाच्या संयुक्त आघाडीचे
सरकार आहे. ज्याला ‘राज्य निर्देशित
आर्थिक विकास आणि व्यापक सामाजिक नियंत्रण’ असे म्हटले जाते.
अनेक वर्षे एकहाती सत्ता असल्याने देशात सरकारची मनमानी सुरू होती. २०१५ साली बहुमताची
सत्ता स्थापन होताच सरकारने मीडियाच्या स्वातंत्र्यावर निर्बंध लादले. विरोधी पक्षाच्या
नेत्यांना वेगवेगळ्या आरोपात तुरुंगात डांबले होते.
२०१८ साली इथोपियात सत्तानंतर होऊन अबी अहमद यांचे सरकार सत्तेत आले. नव्या सरकारने हजारोंच्या संख्येत राजकीय कैद्याची सुटका केली. निर्वासित असंतुष्टांना देशात परत बोलावले. त्यांना सरकारमध्ये महत्त्वाची पदे देऊ केली. महिलांनादेखील ५० टक्के मंत्रिपदे देऊन योग्य सन्मान दिला.
वाचा : दक्षिण कोरियाची 'एस्केप द कॉर्सेट' मोहीम
अबी अहमद यांच्या अतुलनीय कामाची पावती म्हणून ११
ऑक्टोबरला नोबेल समितीने अबी अहमद यांचे नाव शांततेच्या नोबलसाठी जाहीर केले. आपली
भूमिका मांडताना समिती म्हणते, “अबी यांनी शेजारी इरिट्रिया राष्ट्राशी
असलेला सीमा वाद संपुष्टात आणल्याच्या निर्णायक प्रयत्नामुळे त्यांना सम्मानित करण्यात
येत आहे. हा पुरस्कार पूर्व आणि उत्तरी आफ़्रिकी देशात आणि इथियोपियामध्ये शांतता प्रस्थापित
करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या प्रत्येकासाठी आहे.”
अबी अहमद यांना मिळालेल्या सन्मानामुळे आफ्रिकन देशातील संघर्षाला विराम लागून तिथे आर्थिक विकासाची प्रक्रिया सुरू होण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया अनेक मान्यवरांनी दिली आहे. अबी अहमद यांच्यासारखे प्रयत्न मध्य-आशियायी देशात व्हायला हवे. तिथे सामान्य जनता शांततेच्या वातावरणात आणि निर्भयपणे जगण्याची आस घेऊन आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मोठ्या आशेने पाहात आहे. त्यांची हाक सर्वांनी त्या-त्या देशातील राष्ट्रप्रमुखांनी ऐकायला हवी.

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना , घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड होत आहे. उदाहरणार्थ , ...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com