अविसीना (इ.स. ९८०-१०३७) यांनी लिहिलेले वैद्यकीय ग्रंथ, विश्वकोश युरोपच्या विद्यापीठांत अगदी सतराव्या शतकापर्यंत पाठ्यपुस्तक आणि संदर्भग्रंथ म्हणून अभ्यासले जात होते. अविसीना नाव हे लॅटीन रूप आहे. त्यांचे खरे नाव अबु अली अल हुसेन इब्न अब्दुल्ला इब्न अल हसन इब्न अली इब्न सीना होते.
या नावाचे छोटे रूप इब्न सीना म्हणून प्रसिद्ध आहे. मध्ययुगातील हा मुस्लिम मनुष्य प्रकांड पंडित होता. इतिहास संशोधक यांचा गौरव अरिस्टॉटलला मागे टाकणारा तत्त्ववेत्ता म्हणूनही करतात. वैद्यकशास्त्र, खगोलशास्त्र, तत्त्वज्ञान अशा कैक क्षेत्रात ते पारंगत होते.
आजच्या मुस्लिम समाजाची विशेषतः भारतीय मुस्लिम समाजाची स्थिती पाहिली तर ज्ञान व संशोधनकार्याशी यांचा काहीएक संबंध नाही, असेच खात्रीपूर्वक वाटते. उजवी मंडळी तसे छातीठोकपणे सांगतही असतात. पण, मध्ययुगीन मुस्लिम संशोधक-शास्त्रज्ञांची प्रचंड मोठी मांदियाळी आहे. उदा. जब्बार इब्न हय्यान. लटीन नाव जेबर. अबू युसूफ अल किंदी (अल किंदूस), हुनैन इब्न इशाक (ज्युन्निटीयस), जाबित इब्न कुरेश, गणितज्ज्ञ अल ख्वारिज्मी (अलगोरिथ), मुहम्मद अल राज़ी (ऱ्हाझेस), अबू नस्र अल फराबी (अलफराबीयस), अबू हसन अल मसुदी, अबु अली अल हयशम (अलहेझन), अबू रेहान अल बैरूनी, अब्दूल कासीम अल माजरिती, अबू हामीद मोहम्मद अल गज़ाली (अलगॅजेल), रहेमान अल खाझिनी, अबू अल फज़ उमर खय्याम, अबू अल वाहीद मोहम्मद इब्न रश्द (अवेरॉस), नसिरूद्दीन अल तुसी, कुतबुद्दीन अल शिराजी, अब्दूल रहेमान इब्न खल्दून इत्यादी इत्यादी इत्यादी.
वाचा : इस्लामशिवाय जग कसे असते ?
दहाव्या शतकातील इब्न नदीम यांच्या अल फेहरिस्त (यादी) या ग्रंथात सुमारे चार हजार प्रमुख मुस्लिम शास्त्रज्ञ व इतर विद्वानांची नावे दिली आहेत. तर इब्न खल्लिकन यांच्या वफियात अल अआयुन व अनबाअ अबनाअ अल जमान या सात खंडातील चरित्रात्मककोशात शास्त्रज्ञ व विद्वानांच्या वैयक्तिक माहितीसह संशोधन क्षेत्र व कार्य याचे तपशील दिले आहेत.
मध्ययुगीन मुस्लिम स्पेनमधील प्रसिद्ध कोरदोबा येथे १७ विद्यापीठे, ७० सार्वजनिक ग्रंथालये आणि लाखो पुस्तके होती. अशीच स्थिती बगदाद, दमिश्क, निशापूर आदी शिक्षण केंद्रांची होती.
या मुस्लिम शास्त्रज्ञ व विद्वानांनी भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र, गणित, तत्त्वज्ञान, भूगोल, भूशास्त्र, इतिहास, कला, साहित्य अशा सर्व विद्याशाखांमध्ये लक्षणीय योगदान दिले. हे कसे काय घडले , असा आश्चर्यात, कोड्यात टाकणारा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. इतिहास संशोधकांनी याची उत्तरे शोधली आहेत.
संशोधक म्हणतात, आरंभीच्या मुस्लिमांध्ये ज्ञानाची भूक इस्लाने म्हणजेच कुरआनाने निर्माण केली. अल्लाहाने ज्ञान मिळवणे पुरुष आणि स्त्रियांवर बंधनकारक केले. तसेच आसपासच्या, जमिनीखालच्या आणि आकाशातील वस्तूंचे निरीक्षण करण्याचा, त्यापासून शिकण्याचा आदेशही दिला. त्यामुळे मुस्लिमांध्ये ज्ञान मिळवण्याची प्रवृत्ती निर्माण झाली. ज्ञानार्जनाची मोठी लाट आली. धर्माने जिज्ञासेला चालना दिल्याने संशोधन सुरू झाले.
कुरआने हेही सांगितले की, जगतील सर्व माणसे एका आदमची लेकरे आहेत. या संकल्पनेने मुस्लिमांसाठी वंशाच्या, भाषेच्या मर्यादा आणि भौगोलिक सीमा काल्पनिक ठरवल्या. सर्व संस्कृती व अभिसंस्कृतींकडून (सिव्हिलायझेशन) ज्ञान मिळवण्याची, त्यात स्वतःच्या आकलानाने, संशोधनाने भर घालत ज्ञानसागर वाढवण्याची काम सुरू झाले.
ग्रीक, लॅटीन, संस्कृती, फारसी आदी ग्रंथांतून अरबीत भाषांतरे होऊ लागली. ख्रिस्ती मुलत्त्ववाद्यांनी तिसऱ्या-चौथ्या शतकात उद्ध्वस्त केलेला ज्ञानाचा ग्रीक वारसा मुस्लिमांनी जपला.
असे असेल तर मुस्लिम समाज ज्ञानापासून पराड़मुख का झाला? इ.स. १४९०मध्ये फर्डिनांडने दक्षिण स्पेन जिंकल्यानंतर विज्ञानावरील लाखो अरबी ग्रंथ जाळण्यात आले. मंगोलांनी वैभवशाली बगदाद, दमिश्क अशी शहरे उद्ध्वस्त केले.
तेथील ग्रंथालये जाळली. याचे चिंतन करताना अल गझाली आणि नंतरच्या मध्ययुगीन संशोधकांनी असा निष्कर्ष काढला की मुस्लिम हे इस्लामपासून दूर गेल्याने हा विध्वंस झाला आणि हळूहळू मुस्लिम विद्वानांनी लौकिक ज्ञान व संशोधनातून काढता पाय घेतला आणि स्वतःला पारलौलिक ज्ञानापुरते बंदिस्त करून घेतले.
मध्ययुगीन मुस्लिम शास्त्रज्ञ इस्लामपासून दूर झाले होते असे अजिबात नाही. उलट ते इस्लामच्या जास्त जवळ होते. ते धर्मपरायण, पापभिरू होते. कुरआनाच्या प्रकाशात ज्ञानमार्गावर वाटचाल करणारे होते. विज्ञान व धर्म हातात हात घालून वाटचाल करू शकतो. विज्ञानामुळे धार्मिक श्रद्धेला बाधा येत नाही, असे त्यांनी कृतीतून दाखवून देत भरीव योगदान दिले.
मुस्लिमांच्या शिक्षण केंद्रांत शिकण्यासाठी युरोपच्या कानाकोपऱ्यातून ख्रिस्ती लोक येऊ लागले. याने युरोपच्या पुनर्जागरणाला चालना दिली. युरोपीयन लोक पुन्हा ग्रीक वारशाकडे वळले व त्यातून आधुनिक युरोपचा जन्म झाला.
युरोपवरील मुस्लिम जीवनाचा प्रभाव सांगताना प्रसिद्ध संशोधिका रोझ डब्ल्यू. लेन त्यांच्या इस्लाम अण्ड द डिस्कव्हरी ऑफ फ्रीडम ग्रंथात लिहितात ...
‘परतणाऱ्या क्रुसेडर योद्ध्यांनी त्यांच्यासोबत ‘सद्गृहस्थ’ ही संकल्पना युरोपमध्ये आणली. ती यापूर्वी युरोपीयन लोकांना कधीच माहीत नव्हती. सारासीन (सिरियन व नंतर विस्तार होऊन अरब व मुस्लिमांना संबोधला जाणारा हीन अर्थाचा शब्द) अभिसंस्कृतीवर आक्रमण करेपर्यंत त्यांना माहीतच नव्हते की बलवान असण्यासाठी रानटी असणे गरजेचे नाही. सारासीन जेव्हा लढत तेव्हा ते उत्तम लढवय्ये असत; पण ते क्रूर नसत. ते कैद्यांचा छळ करत नसत. जखमी सैनिकांना ठार करत नसत. त्यांच्या स्वतःच्या देशांत ते ख्रिस्ती लोकांना छळत नसत. ते शूर होते; पण सभ्य होते. ते आदरणीय होते; ते सत्यवादी होते. ते दिला शब्द पाळणारे होते.’
ही इस्लामी चारित्र्याची गुणवैशिष्ट्ये पहिल्यांदा शिक्षित इटालीयन लोकांना भावली. ते पूर्वेकडील मुस्लिमांच्या संपर्कात येणारे पहिले युरोपीयन होते. मुस्लिमांचा हा ठसा कवटाळत ब्रिटिशांनी तो स्वतःवर उमटवून घेतला.
लेन पुढे म्हणतात ... ‘तो प्रभाव अजूनही ब्रिटिश राज्यकर्त्या वर्गातील स्त्री-पुरुषांच्या रूपात मानवजातीतील बहुधा सर्वोन्नत वर्ग निर्माण करत आहे. तोच आदर्शविचार सर्वांगीण अमेरिकन जीवन व्यापून आहे. या पुसट लक्षणांवरून एखादी अमेरिकन व्यक्ती काही अंदाज बांधू शकेल की इटालीयन लोक कोणत्या लोकांशी व्यवहार करून स्वतःला व युरोपला जागे करत होते... ’
रोझबाईंनी केलेले हे मुस्लामंचे वर्णन परीकथेतील नाही. तसे असेल तर मनात प्रश्न निर्माण होतो. आपण असे आहोत का?
(हयातमहंमद पठाण यांचा हा लेख आजच्या दिव्य मराठीत प्रकाशित झाला आहे)
लेखकाचा मेल : hayat.hp@gmail.com
जाता जाता
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com