अखेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वेबसाईटने स्टेडिअममध्ये दाखल होऊन आनंदोत्सव साजरा करणाऱ्या अनेक महिलांचे हजारो फोटो प्रकाशित केले आहेत. अनेक वृत्तसंस्थानी या घटनेवर थेट प्रक्षेपण करून विषेश कव्हरेज दिले. सोशल मीडियावर या ऐतिहासिक क्षणाचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. फोटोतील महिला व लहान मुलींच्या चेहऱ्यावरील आनंद लक्षणीय व उत्साहवर्धक होता.
१० ऑक्टोबर म्हणजे, मागच्या गुरुवारी राजधानी तेहरानच्या आझादी स्टेडिअममध्ये हजारो महिला दाखल झाल्या. ८० हजारांची बैठक क्षमता असलेल्या या स्टेडिअममध्ये चोहीकडे महिलाच महिला दिसत होत्या. रंगबिरंगी कपडे परिधान करून, आपले चेहरे रंगवून, कलरफूल केशरचना केलेल्या हजारो महिला खेळ मैदानात दिसत होत्या. प्रत्येकांच्या हातात व खांद्यावर इराणचा राष्ट्रीय होता.
बुधवारपासूनच फुलबॉल सामन्याचे तिकिटे खरेदी करण्यासाठी महिलांच्या रांगा स्टेडिअमबाहेर दिसत होत्या. बीबीसीच्या वृत्तानुसार तब्बल ३५०० महिलांनी तिकिटे खरेदी केली. मोठ्या संख्येने स्त्रिया व लहान मुलींनी स्टेडिअममध्ये प्रवेश करून ईराण विरुद्ध कंबोडिया या फुटबॉल मॅचचा आनंद घेतला. २०२२ साली होणाऱ्या फीफा वर्ल्ड कपसाठी हा क्वालिफायर सामना खेळला जात होता.
इराणमध्ये सुमारे चार दशकापासून महिला
प्रेक्षकांना फुटबॉल व अन्य क्रीडासामने स्टेडियममध्ये जाऊन बघण्यास बंदी होती. १९७९
साली इराणमध्ये खोमेणी यांच्या नेतृत्वाखाली राजकीय क्रांती घडून आली. ईरानचे शासक
शाह मुहंमद रजा पहेलवी यांना पदच्युत करून खोमेनी यांनी ‘धार्मिक
प्रजसत्ताक’ इराणची स्थापना केली. याला इस्लामिक
रिव्होल्यूशन म्हटले जाते. या घटनेनंतर इराणमध्ये सामाजिक, राजकीय व धार्मिक
सुधारणांच्या नावाखाली अनेक निर्बंध लादण्यात आले. त्यातले बरेचसे निर्बंध
महिलांसाठीच लागू होते.
महिलांना बुरखा सक्तीसह अनेक बंधने टाकण्यात
आली. या बंदीअंतर्गतच महिलांना स्पोर्ट्स स्टेडिअममध्ये जाऊन खेळ बघण्यास कायद्याने
प्रतिबंध करण्यात आला. ही बंदी झुगारण्यासाठी ४० वर्षांपासून लढा सुरू होता. या
लढ्याचा इतिहास फार जुना आहे. निषेध मोर्चे, आंदोलने व निदर्शने करून महिलांनी
सरकारला हे नियम शिथिल करण्याची मागणी केली होती.
सोदी सरकारने महिलांसाठी विविध कार्यक्षेत्रे
खुली केल्यानंतर इराणमध्ये स्त्रियांच्या हक्काच्या विविध लढ्यांना बळ प्राप्त
झाले. सौदी सरकारने ड्राईव्हिंग, सिनेमा, मल्टिनॅशनल कॉर्पोरेट कंपन्या, खेळ, एअरहोस्टेस
इत्यादी क्षेत्रे स्त्रियांसाठी खुली केली आहेत. पूर्वी या सर्वच क्षेत्रात
महिलांना काम करण्यास बंदी होती. ‘व्हिजन २०३०’ या
आर्थिक विकासाच्या धोरणातून हा क्रांतिकारी बदल सौदीने स्वीकारला. इस्लामिक देशात
सौदीचे अनुकरण करण्याची प्रथा आहे. त्यामुळे त्याचे पडसाद साहजिकच अन्य मुस्लिम
देशात उमटत आहेत.
गेल्या २ वर्षांपासून इराणमध्ये स्थानिक
महिलांनी विविध मूलभूत हक्कासाठी बंडाचा पवित्रा घेतल्याचे दिसून येते. गेल्या
वर्षी एप्रिलमध्ये ५ मुलींनी नकली दाढी-मिशा लावून पुरुषांचे वेषांतर करत फुटबॉल
स्टेडिअममध्ये प्रवेश केला होता. इराणी सरकारविरोधातला हा प्रतीकात्मक निषेध होता.
नंतर त्या मुलींना अटक करण्यात येऊन त्यांच्यावर खटला भरण्यात आला.
वाचा : इराकचा लोकशाही लढा
गेल्या ऑगस्ट महिन्यात एका २३ वर्षीय सहर
खोडयारी नावाच्या कॉम्प्युटर इंजिनिअर तरुणीने निळी केशरचना करून लपून स्टेडिअममध्ये
प्रवेश मिळवला होता. सुरक्षा रक्षकांने तिला ताब्यात घेतले. तिच्यावर कायदा
मोडल्याचा खटला भरण्यात आला. सुनावणी सुरू असतानाच शिक्षेच्या भीतीने तिने स्वतला
आग लावून जाळून घेतले. सात दिवसाच्या उपचारानंतर तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सहर नावाच्या ब्लू गर्लच्या मृत्युनंतर
आंतरराष्ट्रीय पातळीवर या धक्कादायक प्रकाराचे पडसाद उमटले. जगभरात या घटनेबद्दल
संताप व्यक्त केला जात होता. फुटबॉलप्रेमींने सोशल नेटवर्किंगवर #BlueGirl हा हॅशटॅग वापरुन सहरला श्रद्धांजली अर्पण
केली. त्याचबरोबर इराण सरकारने कायदे बदलण्याच्या मागणीची मोहीम सुरू झाली.
अॅम्नेस्टी इंटरनॅशनल, ह्यूमन राइट वॉच या
मानवी हक्क संघटनांनी ब्लू गर्लच्या मृत्युचा निषेध नोंदवला. स्पॅनिश फुटबॉल स्लब,
बार्सिलोना क्लब, चेल्सी क्लब आदी फुटबॉल संघाने या घटनेवर आक्रोश व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय
फुटबॉल महासंघाने (फिफा) एक पत्रक जारी करून इराणच्या नियमांवर आक्षेप नोंदवले
होते. इतकेच नाही तर हे कठोर कायदे बदलण्याचा आदेशही काढला होता.
महिनाभरातच इराण सरकारने महिलांसाठी स्पोर्ट्स
स्टेडिअमच्या प्रवेशासंबधी नियम शिथिल केले. इराणी सरकारला स्त्रियांच्या
लोकचळवळीपुढे झुकावे लागले. या घोषणेनंतर इराणी महिलांनी जल्लोष साजरा केला.
इराणीयन महिलांच्या ४ दशकाच्या लढ्याला यश आले. याबद्दल अल जझिरा या वृत्तसंस्थेला
एका मुलीनी दिलेली प्रतिक्रिया खूप बोलकी होती. फुटबॉल पत्रकार असलेली राहा
म्हणते, ‘‘मला विश्वासच बसत नाही की मी आता थेट
स्टेडिअममधून लाईव्ह करू शकेल. मीडियात काम करणाऱ्या मुलींना तर आनंद झालेला आहे,
पण त्यापेक्षाही मोठा आनंद सामान्य मुलींना झालेला असून तो शब्दातीत आहे.’'
विशेष म्हणजे सरकारने गुरुवारी झालेल्या
सामन्यासाठी तब्बल १५० महिला पोलिसांची नियुक्ती केली होती. त्या महिला पोलिसांसाठीदेखील
हा वेगळा अनुभव असल्याचे त्यांनी बीबीसीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.
गेल्या काही वर्षांपासून इराण हा देश विविध
कारणासाठी सतत चर्चेत असतो. ऑलंम्पिक खेळात इराणी महिला खेळाडूंचे स्थान रेखांकित
झालेले आहे. फुटबॉल व कबड्डीसारख्या खेळात इराणी महिला नाव जागतिक किर्तीस्थानी
आलेले आहे. रनिंग, स्विमिंग, रग्बी, टेनिस, नेमबाजी, तिरंदाजी, स्कीइंग इत्यादी खेळात
इराणी स्त्रिया विषेश प्राविण्य मिळवणाऱ्या ठरल्या आहेत. अशा काळात महिलांना स्टेडिअममध्ये
जाऊन खेळ बघण्याला बंदी असणे सयुंक्तिक नव्हती. ४० वर्षांनंतर का होईना अखेर ती
बंदी उठवण्यात आली आहे.
कलीम अजीम, पुणे
मेल-kalimazim2@gmail.com
(सदरील लेख 17 ऑक्टोबर 2018च्या लोकमतमध्ये प्रकाशित झालेला आहे)

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना , घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड होत आहे. उदाहरणार्थ , ...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com