मैदानी खेळ कमी होणे किती धोक्याचे?


2018 साली युनिसेफचरखा संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझी निवड करत 50 हजार रुपयांचे संशोधनवृत्ती दिली होती. युनिसेफसाठी मी पाच-सहा संशोधनपर रिपोर्ट लिहिले होते. ते रिपोर्ट विविध ठिकाणी प्रकाशित झालेले आहे. त्या सर्व रिपोर्टचे नजरियावर संकलन करत आहे. त्यातला हा तिसरा रिपोर्ट..
दलत्या जीवनशैलीनं मैदानी खेळ सपुष्टात आणले तसे नानाविध आजारांना निमंत्रण मिळाले. आज प्रत्येकांकडे वेळेचा अभाव आहे. दहा ते सहाच्या शिफ्टमध्ये माणूस इतका गुंतला आहे की, त्याला दैनंदिन दीनचर्चा पार पाडण्याचीदेखील उसंत मिळत नाही. अशावेळी शरीराला व्यायाम मिळणारे खेळ कधी व कसे खेळावे असा प्रश्न असतो.
अनेकांच्या रोजच्या प्राधान्यक्रमात खेळणे हा प्रकार नसतो. बदललेल्या जीवनशैलीनं आमच्या दैनंदिन व्यवहारातून मैदानी खेळ आणि व्यायाम हिरावून घेतले, तशा आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. चार महिन्यापूर्वी म्हणजे सप्टेंबरमध्ये जागतिक आरोग्य सघटनेनं (डब्लुएचओ) जारी केलेल्या अहवालात भारतीय समाजात वाढणारे नैराश्य व आरोग्याच्या समस्यांवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अशावेळी वाढत जाणाऱ्या नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी पुन्हा मैदानी खेळाकडे वळा, असा सल्ला हेल्थ एक्सपर्ट व मानसोपचार तज्ज्ञाकडून दिला जात आहे. अवेळी जेवणे, खाण्याच्या पद्धतीत बदल, जंक फूडचे व्यसन, रसायनयुक्त भाज्या व फळे खाल्ल्यानं रक्ताचे व हृदयाचे आजार फोफावत आहेत. वाढत्या आरोग्याच्या समस्यामुळे निरोगी राहण्यासंदर्भात जागरुकता निर्माण करण्याची गरज झाली आहे.
धक्कादायक आंकडे
वर्ल्ड हेल्थ ऑरगनायझेशनच्या (डब्ल्युएचओ) रिपोर्टनुसार जगभरातील लोकांमध्ये ह्रदय रोगस्ट्रोक आणि कैंसर सारख्या आजारांचा धोका पहिल्यापेक्षा जास्त प्रमाणात वाढला आहे. संघटनेनं सप्टेंबर-२०१८ला जारी केलेल्या ‘इनसफिशिएन्ट फिजिकली क्टिव’ (शारीरिक स्वरुपात कमी सक्रिय) शीर्षकाच्या अहवालात १६८ देशांतून एकत्र केलेल्या आकडेवारीत ही बाब समोर आली आहे. संघटनेनं तब्बल १९ लाख लोकांशी चर्चा करून ही आकडेवारी जमवम्यात आलेली आहे. यातील सुमारे ७७ हजार भारतीय लोकांशी डब्लुएचओनं संवाद साधलेला आहे. संबधित अहवालात भारतीय लोक शारीरिक सृदढतेच्या बाबतीत चीनपाकिस्ताननेपाळ आणि म्यानमारपेक्षाही कमी प्रमाण क्टीव असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.
रिपोर्टनुसार भारतातील केवळ ३४ टक्के लोकं इनसफिशिएन्ट फिजिकली क्टिव आहेत. यापूर्वी २००१ साली अशा प्रकारचा सर्वे झालेला होता. तेव्हा ३२ टक्के लोकं इनसफिशिएन्ट फिजिकली क्टिव होते. डब्ल्युएचओच्या या नव्या आकडेवारीत भारतात आळशी लोकांची संख्या २ टक्क्यांनी वाढली आहे.
डब्लुएचओच्या मते शारीरिक दुर्लबलेमुळे जगभरातील तब्बल दीड कोटी तरुणांवर सहा प्रकारच्या गभीर आजाराचा धोका वाढला आहे. यात कार्डियोवेस्कुलर डिसीजहाइपरटेंशनटाइप-२ डायबिटीजब्रेस्ट व आतड्य़ांचा कैंसर आणि डिमेंशिया सारख्या आजारांचा सामावेश आहे. भारतात सरासरी पुरुषांच्या तुलनेत महिला कमी क्टिव आहेत. मध्यप्रदेशराजस्थानबिहारमहाराष्ट्रउत्तर प्रदेशपश्चिम बंगालसामकर्नाटक आणि तमिलनाडुसह बऱ्याच राज्यातील लोकांना या डब्लुएचओनं सर्वेक्षणात सामील करून घेतलं होतं. अहवालात मैदानी खेळाचा अभाव व व्यायाम नसल्याने या समस्या उद्भवलेल्याचं कारण देण्यात आलं आहे.
खाण्याच्या पद्धती बदलल्याने व रसायनयुक्त भाजीपाल्यामुळे भारतीय समाजात नवे आजार बळावले आहेत. याबद्दल अनेकदा प्रसारमाध्यमातून धक्कादायक अहवाल प्रसिद्ध होतात. आजारांचे दुसरे एक कारण भारतीय मीडियाने नोंदवलंय ते म्हणजे  व्यायाम व खेळाच्या अभावामुळे भारतीय लोकांमध्ये आजारांना निमंत्रण मिळते.
सदृढ व निरोगी आरोग्यासाठी भारतीय संस्कृतीमध्ये मैदानी खेळ, योगा व व्यायामाला महत्व दिलेले आहे. मैदानी खेळामुळे जीवनातील व्यथा व चिंता विसरण्यास मदत होते. त्यातून मानवी मन ताजेतवाणे होऊन अधिक क्रियाशील होते. ताण-तणाव व कामाचा क्षीण घालवण्यासाठी व्यायाम अधिक फायदेशीर ठरतो. खेळांत शरीराला भरपूर व्यायाम मिळतो त्यामुळे शरीर मजबूत व बळकट होते. खेळांमुळे मनोधैर्यसंयम, एकाग्रता व खिलाडू वृत्ती जोपासली जाते. संघटनात्मक खेळामुळे सहकार्याची वृत्तीसंघभावना व नेतृत्वगुण यांना चालना मिळते.
विविध दृष्टिकोनांतून विचार केल्यास खेळाचे अनेक प्रकार पडतात. खेळांची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन सामान्यतः त्यांचे ढोबळमानाने दोन प्रकार पडतात. त्यात बैठे खेळ व मैदानी असे खेळ आहेत. बैठे खेळ म्हणजे घरात किंवा एकाजागी बसून खेळले जाणारे खेळ. उदा.पत्त्यांचे खेळबुद्धिबळकॅरम इत्यादी. तर मैदानी खेळात बॅडमिंटनक्रिकेट, टेनिसखो-खो, व्हॉलिबॉलबास्केटबॉल असे आधुनिक तर विट्टी-दांडू, कबड्डी, पोहणे, लपंडाव, धावणे, गोळाफेकथाळीफेक यांसारखे ग्रामीण खेळ येतात.
प्राचीन काळात महत्व
इतिहासाची पाने चाळली तर असे दिसून येईल की, ग्रीक संस्कृतीने जगाला विविध खेळ दिलेले आहेत. तसंच त्या खेळाला विस्तारित स्वरुपही या युनानी लोकांनीच दिले. आठव्या शतकात ग्रीक देशात खेळाला सुरुवात झाली. ऑलम्पिक खेळाचं पहिलं अधिकृत आयोजन इसवीसन पूर्व ७७६ काळात ग्रीकमध्ये झालं. तर शेवटचं आयोजन इस ३९४ मध्ये झालं.
प्राचीन काळी युनानी युद्धवीर विरंगुळा म्हणून विविध खेळ खेळत असत. नंतरच्या काळात त्याचा विकास होत गेला. सुरुवातीच्या काळात धावणे, बॉक्सिंग, कुस्ती आणि रथांची रेस सैनिक प्रशिक्षणाचे भाग होते. यात उत्तम प्रदर्शन करणाऱ्या प्रतिभागींना वार्षिक खेळ स्पर्धेत खेळण्याची संधी मिळत असे. १२०० वर्षांपूर्वी याच देशानं त्यांच्या पारंपरिक खेळाला आधुनिक स्वरुप देत ऑलंम्पिकची सुरुवात केली. पहिला ऑलंम्पिक खेळ १९८६ साली खेळला गेला. ग्रीकची राजधानी अथेन्समध्ये या खेळाचं आयोजन करण्यात आलं होतं. ऑलंम्पिया नावाच्या पर्वतावर खेळल्या गेलेल्या या खेळाला ‘ऑलम्पिक’ नाव पडलं.
भारतातही प्राचीन काळात धनुर्विद्या, कुस्तीरथांच्या व घोड्यांच्या शर्यती इत्यादी खेळ प्रचलित होते. भारताप्रमाणे ईजिप्तचीनजपान इत्यादी देशांतही शिकार, पत्त्यांचे खेळ, शतरंज यांसारखे खेळ पुरातनकाळापासून रूढ होते. भारतात आजही ग्रामीण भागात विटीदांडूखो-खो, हुतूतूगोट्यालगोरीसुरपारंब्यालपंडाव, भातुकलीकुस्ती असे भरपूर खेळ खेळले जातात.
गेल्या काही वर्षात प्रचलित खेळ जसे, क्रिकेटबुद्धिबळकराटेटेबल टेनिसफुटबालहॉकीनेमबाजी आदी आधुनिक खेळांना ग्लॅमर आलेलं आहे. गेल्या पन्नास वर्षांत प्रतिष्ठा म्हणून स्पोर्ट्स क्षेत्र पुढे आला आहे. पारंपरिक चौकटीतून बाहेर येऊन ‘स्टेटस’ म्हणून खेळ हा प्रकार मिरवला जात आहे. खेळाला व्यावसायिक स्वरुप प्राप्त झाल्याने त्याचे महत्व वाढले. अनेक कॉर्पोरेट्स कंपन्या या खेळाच्या मार्केटिंग बाजारात दाखल झाल्या. कंपन्यांनी जागतिक कीर्तीचे खेळाडू तयार करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. या लाटेनं अनेक नवे खेळ ते खेळणाऱ्या खेळाडूंना मुख्य प्रवाहात आणलं.
व्यावसायिक खेळामुळे सामान्य वर्गांमध्ये खेळाची ओढ निर्माण झाली. खेळाच्या देवाण-घेवाण प्रक्रियेतून विविध देशांचे निरनिराळे खेळ खेळले जात आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेटला एकहाती लोकप्रियता लाभली होती. आता विविध ऑलंम्पिक खेळाचं महत्व जनसामान्याला पटलं आहे. सामान्यामध्ये ऑलंम्पिक खेळाप्रति आकर्षण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे एका मोठ्या वर्गाने खेळाला हेल्दी आरोग्यासाठी सप्रमाण मानून त्याचा व्यक्तिगत विकास केलेला आहे. त्यातूनच आज शहरी व निमशहरी भागात अनेक स्पोर्टस क्लब स्थापन झालेले आहेत.
शरीर ही आपली संपत्ती आहे. त्याची योग्य देखरेख करणे आपली जबाबदारी बनते. नियमित व्यायाम करुन शरीराची निगा राखायची असते. प्रत्येकांनी व्यायाम हा दैनंदिन जीवनाचा भाग बनविला पाहिजे. विविध शारीरिक हालचाली व खेळांमुळे शरीर सदृढ बनते. खेळामुळे शरीराचा चांगला व्यायाम होतो. स्नायू बळकट होतात. रक्तपुरवठ्यामध्ये नियमीतता येते. शरीरातील अतिरिक्त चरबी नाहीसी होते. त्यामुळे शरीराचा चांगला व्यायाम होण्यासाठी मैदानी खेळाला महत्व आले.
आरोग्याच्या दृष्टीने मैदानी खेळ फायद्याचे असतात. फुटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल आदी खेळामुळे स्नायूंचा चांगला व्यायाम होतो. नियमीत व्यायाम केल्यामुळे मानसिकशारिरिकभावनिक संतुलन कायम राहते. शरीराची जडणघडण दोन्ही बाजूंनी चांगली होते. शरीर प्रमाणबद्ध व सौष्ठवपूर्ण दिसू लागते.
नियमीत धावण्याने पायांचे स्नायू बळकट होतात. धावण्याने शरीराच्या पूर्ण हालचाली होतात. त्यातून चालण्याची गती वाढते, चालण्यातला वाकडेपणा जातो. शरीर बॅलेन्सिंग होते. धावण्याने शरीरात चपळता येते. नियमीत व्यायाम खेळामुळे कार्यक्षमता वाढीस लागते. चांगल्या आरोग्यासाठी खेळातून शारीरिक श्रमाला महत्व आले. नियमित व्यायाम करून घाम गाळणे दैनंदिन नीत्यकार्य झालेले आहे. आरोग्याला हितकारक म्हणून व्यायामाला अनेकांनी जोपासलं आहे.
बदलत्या जीवनशैलीचे परिणाम
वाढते शहरीकरण व बदलत्या जीवनशैलीमुळे मैदानी खेळ लयास जाण्याच्या मार्गावर आहेत. धकाधकीच्या काळात शारीरिक कष्ट उपसण्याचं सगळ्यांनी सोडून दिलं आहे. कोणतीही गोष्ट अलीकडे सहज साध्य होते, त्यामुळे चालण्याचे प्रकार थांबले आहेत. दुसरीकडे शहरात मैदाने कमी होत आहेत, दुसरीकडे वेळेच्या अभावाने मैदानी खेळ दीनचर्येतून गायब झालेले आहेत. त्याजागी बैठ्या खेळाचे चलन वाढले. त्यातही फक्त कम्प्युटर व मोबाईलवर आधारित खेळाचं चलन फोफवत आहे. ऑनलाईन व्हिडिओ गेम्स, मोबाईल गेम्सकॉम्पुटर गेम्स आमच्या जीवनाचा अनिभाज्य बाग बनला आहे. पूर्वी विरंगुळा म्हणून खेळ खेळलं जात असे, पण मोबाईल गेम डिक्शन (लागण) म्हणून खेळावंच लागतं, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
आधुनिक प्रकारच्या या बैठ्या खेळामुळे नव-नव्या आजारांना आमंत्रण मिळालं आहे. कॅरम व बुद्धिबळ वगळता इतर खेळांमुळे साहजिकच आयोग्यावर आघात केला. मोबाईल व कॉम्प्युटर आधारित खेळामुळे आपसातील संवाद संपुष्टात आलेला आहे. तसंच शारीरिक हालचालीदेखील कमी झालेल्या आहेत. त्यातून आळशीपणा पण वाढला आहे. अनिद्रासारख्या भयंकर आजार आज प्रत्येकामध्ये बळावला आहे. इलेक्ट्रॉनिक गॅझेटच्या अति वापरामुळे एकाग्रतेचा अभाव तरुणामध्ये दिसून येत आहे. त्याचा विपरित परिणाम म्हणून शारीरिक तसेच मानसिक ताण येतो. सेलफोनमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅगनेटिक रेडिएशनचा सर्वात वाईट परिणाम आपल्या ब्रेनवर होतो. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार गॅझेटच्या अतिरेकी वापरामुळे ब्रेन ट्युमर होण्याची शक्यता दाट असतो. रेडिएशनमुळे शरीराच्या तापमानात अतिरिक्त वाढ होतेत्याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतो.
वाचा : लेबनानने का लावला होता सोशल मीडियावर टॅक्स?
वाचा : कोरोना संकट : व्हर्च्युअल मार्केट घेणार स्पॅनिश तरुणांची परीक्षा 
एका संशोधनातून हे सिद्ध झालं आहे की, रात्री उशीरापर्यंत संगणक व मोबाईलवर बसल्यामुळे झोपेचा सरासरी वेळ कमी झाला आहे. सकाळी ऑफीससाठी लवकर उठायचे असल्यामुळे कितीही राक्षी उशीरा झोपले तरी सकाळी उठावेच लागते. दुसरीकडे उठण्याच्या दडपणातून जागरणाचा प्रमाण वाढलं आहे. म्हणजे तंत्रज्ञानानं आमची शांत झोप हिरावून घेतली आहे. झोपेचे प्रमाणही कमी झालंय. शरीराला पुरेशी झोप नसल्याने चीडचीड, राग, डोकेदुखी, मळमळ होणे, उलट्या, भूक न लागणे, पोट साफ न होणे इत्यादी आजार बळावले आहेत.
इलेक्ट्रॉनिक गॅझेटच्या अती वापरामुळे आलेल्या आजारांबद्दल जागतिक स्तरावर गंभीर चर्चा सुरू आहे. जगभरात हा आजार चिंतेचा विषय म्हणून पुढे येत आहे. सतत मोबाईल खेळणे हा मानसिक आजार असल्यानं संशोधन जागतिक आयोग्य संघटनेनं जून २०१८मध्ये जारी केलं आहे. संघटनेनं जाहीर केलेल्या इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसिजेस म्हणजे जागतिक स्तरावरील आजारांचे प्रमाण यामध्ये ऑनलाईन गेम खेळण्याच्या व्यसनला एक मानसिक आजार म्हटले आहे. सतत गेम खेळल्यामुळे आयुष्यातील इतर प्राधान्याच्या व महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत असल्याचे या अहवालामध्ये म्हणण्यात आलं आहे. नव्या आजाराची काही लक्षणे वर्ल्ड हेल्थ ऑरगनायजेशननं या अहवालात जारी केलेली आहेत.
डब्लूएचओच्या २०११च्या अन्य अहवालानुसार भारत नैराश्यग्रस्त माणसांचा देश झालेला आहे. भारतातील डॉक्टरांच्या वर्ल्ड असोसिएशन ऑफ सोशल साइकिएट्री संघटनेने हा अहवाल स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यांच्या मते भारतात मानसिक आजारांचा इलाज करणारे डॉक्टर आणि पुरेसा सुविधांचा अभाव आहे. याचा दुसरा अर्थ असा होतो की, भारतात मानसिक रोगी वाढत आहेत.
डब्ल्यूएचओनं आपल्या रिपोर्टमध्ये वेगवेगळ्या उत्पन्न गटाच्या १८ देशातील ९० हजार लोकांशी चर्चा केली होती. या रिपोर्टनुसार १० सर्वांत जास्त उत्पन्न मिळवणाऱ्या देशात ताण आणि नैराश्याचे सरासरी वय १४.६ टक्के होते. तर आठ मध्यम आणि कमी उत्पन्न असणाऱ्या देशात हे आकडे सरासरी ११.१ टक्के आहेत. २०११च्या जुलै महहिन्यात जारी झालेल्या या अहवालात भारतात ९ टक्के लोकांचे आयुष्य  ताण व नैराश्याने ग्रासलेले आहे. भारतीय लोकांमध्ये मेजर डिप्रेसिव एपिसोड्स सर्वांत जास्त म्हणजे ३५.९ टक्के आहेत. चीनमध्ये हेच आकडे १२ टक्के होते.
डब्ल्यूएचओच्या आकडेवारीनुसार भारतात नैराश्यग्रस्त लोकांची संख्या सतत वाढत आहे. आरोग्य तज्ज्ञाच्या मते हा रेशो रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे. जर वेळेच काही उपाययोजना केल्या नाही निराश लोकांचे वय सरासरी कमी होऊन ३० वर्षांपर्यंत येऊन पोहोचेल, असी भीती या अहवालातून व्यक्त करण्यात आलेली आहे.
भारत सरकारने १९८२ साली राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू केला होता. हा प्रयोग मानसिक रोगींची वाढती संख्या आणि त्यांच्यावर उपचाराच्या साधनांचा अभाव यासाठी सुरू करण्यात आला होता. परंतु मनोचिकित्सकांच्या कमतरतेमुळे याचा चांगला उपयोग होऊ शकला नाही. तज्ज्ञांच्या मते या संकटापासून बचाव करण्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे.
भारतात प्रत्येक १० लाख व्यक्तीमागे फक्त ३.५ मनोचिकित्सक आहेत. यामुळेदेखी समस्या वाढत आहेत. डबलुएचओच्या मते बरेचशे डॉक्टर शहरात राहतात. ग्रामीण व शहरी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था फारच वाईट आहे. परिणामी ग्रामीण निमशहरी भागात राहणाऱ्या नैरास्यग्रस्त व्यक्तींना योग्य उपचार मिळू शकत नाही.
जागतिक आरोग्य सघटनेच्या (डब्ल्युएचओ) एका अन्य अहवालात भारतीयात नैराश्यामुळे अकाली अपंगत्व येण्याचे प्रमाण वाढले आहे. २०१५ पर्यंत जगभरात नैराश्य ग्रसित रोगींची संख्या ३२.२ कोटी होती. डब्ल्युएचओने याला धोक्याची घंटा म्हणत मानसिक आरोग्यासंदर्भात पारंपरिक दृष्टिकोन बदलण्याची गरज व्यक्त केली होती. संयुक्त राष्ट्राने जारी केलेले हेच आकडे ३० कोटी होते. संयुक्त राष्ट्राच्या मते गेल्या १० वर्षांत या संख्येत १८ टक्के वाढ झालेली आहे.
भारतात वाढणाऱ्या प्रदूषणाला घेऊन गेल्या वर्षी ९ डिसेंबरला इंडियन एक्सप्रेसमध्ये एक बातमी प्रकाशित झाली होती. त्यानुसार भारताने जर डब्लुएचओच्या मानकांचे पालन केले नाही तर इथले लोकं केवळ नऊ वर्षापर्यत जिवंत राहू शकतात. आणि जर मानकांचे पालन केले तर फक्त सहा वर्ष जिवंत राहू शकतात. त्यातही कोलकाता आणि मुंबईचे लोकं ३.५ वर्ष जिवंत राहू शकतात. २०१४ आणि २०१५ है वर्ष दिल्ली जगातील सर्वांत जास्त प्रदूषित शहर होतं. डब्लुएचओच्या मानकांनुसार Particulate matter (PM) चा छर्थी स्वीकारल्या जाव्यात. या प्रयोगाने वायू प्रदूषणाचा स्तर 70 ते 20 µg/m3 कमी केल्याने होणाऱ्या मृत्यूची सरासरी कमी केली जाऊ शकते.
आरोग्य मासिक ‘द लांसेटच्या मते दर वर्षी  वायू प्रदूषणामुळे १० लाखांपेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू होतो. २०११च्या आकडेववारीनुसार मासिकाने फेब्रुवारी २०१८मध्ये आपली धक्कादायक आकडेवारी जारी केली. त्यात असं म्हटले आहे की, जलवायू परिवर्तनामुळे ‘मानवीय आरोग्यावर त्याचा सर्वांत जास्त धोकादायक परिणाम होऊ शकतो. मासिकाच्या मते जगातील अवेळी होणाऱ्या मृत्युमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आहे. ‘द लांसेटच्या मते जगभरात वायू प्रदूषणमुळे दररोज १८ हजार लोकं मरतात.
वाचा : इराणी महिलांचा स्टेडिअम प्रवेशाचा लढा
वाचा : व्हिनसचा पराभव करणारी १५ वर्षीय कोको
उपाययोजना
सप्टेंबर-२०१८ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेनं एक अहवाल जारी केला होता, यात भारतातील तब्बल ३४ लोकं निरोगी राहण्यासाठी पुरेसा व्यायाम करत नाही असा खुलासा करण्यात आला होता. अहवालाच्या मते जागतिक पातळीवर तब्बल १.४ अब्ज लोकांमध्ये पर्याप्त शारीरिक हालचाली न केल्यामुळे गंभीर आजारांचा धोका बळावला आहे. या रिपोर्टमध्ये असंही सांगण्यात आलेलं आहे की, २००१ नंतर या परिस्थितीत कुठलाही बदल झालेला नाही. व्यायामाच्या कमतरतेमुळे हृदय रोगटाइप-२ मधुमेहडिमेंशिया आणि कैंसर सारखे आजारांचा धोका वाढू शकतो, असेही या अहवालात सांगण्यात आलेलं आहे.
हार्ट केयर फाउंडेशन (एचसीएफआई)च्या मतेएकाच ठिकाणी जास्त वेळ बसून राहण्याच्या सवयीने आरोग्यावर नकारात्मक परिणाम पडत आहे, जी लोकं बैठे म्हणजे डेस्कचे जॉब करतात, खुर्चीवर बसून आपलं जास्तीत-जास्त काम उरकतात अशा लोकांमध्ये हा धोका जास्त आढळून येत आहे.
दिवसेंदिवस कामाचा वाढता व्याप वाढतो आहे, अशा परिस्थितीत आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. संगणकावर काम करणाऱ्या व्यक्तींनी आपल्या कामाच्या वेळा ठरवून घेतल्या पाहिजेत. सतत कॉम्पयुटरला चिकटून बसण्यापेक्षा थोडसं उठ-बस केलेली बरी. संगणकाच्या रेडिएशनमुळे डोळ्यांना व पाठीला कायमस्वरुपी इजा होऊ शकते, असं संशोधनातून सिद्ध झालं आहे. त्यामुळे वेळीच काळजी घेतलेली बरी. कॉम्प्युटरवर सलग बसण्यापेक्षा थोडसं खंड देऊन बैठक मारली पाहिजे. मधून-मधून चहा व तोंडावर पाणी मारण्यासाठी उठलं पाहिजे. थोडसं बाहेर जाऊन लांबपर्यंत फेरफटका मारला पाहिजे. स्क्रीन व डोळ्यांमधील अंतर, बसण्याची जागा याचा एक ठराविक निमय बनवावा.
ऑफीसमध्ये काम करताना मध्यंतरात काही वेळ कॉम्प्युटर बंद करावा. जेवणानंतर थोडसी शतपावली करावी. या वेळेत बुद्धिबळाचा एखादा डाव खेळण्यात हरकत नाही. तसंच बॉलला जमीनीवर आदळून खेळावं. जागा असेल तर बॅडमिंटनचा एखादा डाव खेळावा. या खेळानंतर काम सुरू केल्यानंतर कार्यक्षमता दुपट्टीने वाढेल. अंगात तरतरी येईल. ताण हलका होऊन उत्साह येईल.
दैनंदिन व्यवहारातून थोडासा वेळ काढून छोटे-छोटे मैदानी खेळ खेळता येऊ शकतात. रात्री जेवणानंतर व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, टेनिस खेळता येऊ शकते. काही वेळ चालण्यानेसुद्धा बराच फरक पडू शकतो. असे प्रयोग मुंबईतील अनेक कॉर्पोरेट्स कंपन्यामध्ये सुरू झालेला आहे, या प्रयोगानंतर तिथली कार्यक्षमता वाढल्याचे वृत्त प्रसारमाध्यमामध्ये वाचनात आलं होतं.
सकाळी नियमित लवकर उठणे व आपल्या नित्यक्रमाला लागणे ही चांगली सवय आहे. झोपेतून उठून थोडसं दोन-एक किलोमिटर पायी चालणे आरोग्याच्या दृष्टीने हितावह होऊ शकते. तासभर चालण्याने दिवसभर उत्साह कायम राहतो. सकाळची स्वच्छ हवा शरीराला लाभदायी असते. त्यामुळे नित्यक्रमाने ही सवय लावून घेतली पाहिजे.
हार्ट केयर फाउंडेशनच्या मते आहारामध्ये बदल केल्यानेदेखील बराच फरक पडू शकतो. रोजच्या अन्नामध्ये एकदलीय धान्य, फळे आणि भाजीपाल्याचा सामावेश केला पाहिजे. रेशेदार अन्नामुळे दीर्घकाळापर्यंत तुमचे पोट भरल्यासारखे वाटेल. जितके शक्य असेल तेवढं प्रोसेस्ड आणि रिफाइंड अन्न टाळावे, असाही सल्ला हार्ट केयर फाऊंडेशननं दिलेला आहे. अधिक प्रमाणात मद्यसेवन वजन वाढण्यास कारणीभूत ठरते, त्यामुळे मद्यप्राशन टाळावे. मद्य रक्तदाब आणि ट्राइग्लिसराइडची पातळी वाढवू शकते. हार्ट केयर फाउंडेशनच्या मते पुरुषांनी रोज दोन पैग तर महिलांनी एका पैगवर मद्य सेवन थांबावे. धूम्रपान केल्याने मधुमेहाची शक्यता दुपटीने वाढते, त्यामुळे ही सवय शक्यतो सोडावी असा सल्ला हार्ट केयर फाउंडेशनने दिलेला आहे.

नियमित व्यायाम करणे ही देखील चांगली सवय आहे. वेळ नसल्याचं कारण देत आपण व्यायाम टाळतो. पण दहा मिनटांचा व्यायाम तुमच्या शरीरासाठी लाभकारी ठरतो. त्यामुळे दैंनिदन व्यवहारातून दहा मिनिटे सहज काढता येतात. यो वेळात छोटासा मैदानी खेळ किंवा योगा केल्यास शरीराला लाभकारी ठरू शकतो. सकाळी किंवा सध्याकाळी व्यायामासाठी वेळ राखीव ठेवता येऊ शकतो. कुठेही असाप्रवासात, ऑफीस, घरी, अंथरुणावर तिथे छोटीशी व्यायामक्रिया सहज पार पाडता येऊ शकते.
आपल्याकडे वेळ भरपूर असतो. पण आळस आपल्याला वेळेचे कारण पुढे करायला भाग पाडतो. दिवसभराचा वेळ कसा खर्च केला याची उजळणी केली तर आपल्याला दिसून येईल की, आपण किती अमूल्य वेळ फालतू कामात वाया घालवला आहे. दिवसभरात आपण बराचसा वेळ वाया घालतो. त्या वेळेत महत्त्वाची काम करून उरलेला वेळ व्यायामासाठी वापरता येऊ शकतो.
दिवसभरात किमान दोन किलोमीटर पायी चालणे आयोग्याच्या दृष्टीने हिताचे आहे. आपले वाहन कामाच्या ठिकाणपासून लांब पार्क करता येऊ शकते. परत जाण्यासाठी लांबचा बस स्टॉप निवडता येऊ शकतो. बाजारात खरेदी करताना गाडी एका ठिकाणी पार्क करून फिरता येऊ शकते. जवळच्या ठिकाणी कामासाठी जाताना गाडीची गरज शक्यतो भासत नाही, तिथे सायकलीचा वापरदेखील करता येऊ शकतो.
राज्य व स्थानिक सरकारने महानगरात सायकल स्टॅण्ड उभे केले आहेत. त्या वापराविना धुळखात पडल्या आहेत. त्याचा वापर केला जाऊ शकतो. सायकलींची संख्या वाढली तर सायकल ट्रॅक तयार केले जाऊ शकतात. सायकलीचा प्रवास सदृढ आरोग्य देऊ शकतो तर प्रदूषण कमी होऊ पर्यावरणाचे जतनही केले जाऊ शकते. छोट्या मैदानी खेळाला दैनंदिन सवय करून घेतली पाहिजे. आधुनिक शिक्षणशास्त्र व आरोग्यशास्त्रात खेळाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त जालेले आहे. सदृढ व निरोगी आरोग्याचे एक महत्त्वाचे अंग म्हणून खेळांचा विकास झालेला आहे. खेळातून विरंगुळा मिळतो. त्याबरोबरच शरीरास व्यायाम मिळून मन आणि शरीर प्रसन्न व कार्यक्षम बनते. म्हणूनच खेळांना व्यक्तिगत व सामाजिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

(17, डिसेंबर 2018  रोजी अक्षरनामावर प्रकाशित झालेला रिपोर्ट)

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,42,इस्लाम,37,किताब,15,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,271,व्यक्ती,4,संकलन,61,समाज,222,साहित्य,68,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: मैदानी खेळ कमी होणे किती धोक्याचे?
मैदानी खेळ कमी होणे किती धोक्याचे?
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiUHh2-jFubrPXsIZHhjRc3SoojqZrX1OJM7IdV354woQjmUVCNGCO0EOnmVHfLFBFni3830TQoSkUZNOCgEAX_HpV8KdYqC2Cv9nzUl8c1yu_rd6q4JtlWM7FOVnICx1x05uHNFWLE3qMV/s640/mn76611.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiUHh2-jFubrPXsIZHhjRc3SoojqZrX1OJM7IdV354woQjmUVCNGCO0EOnmVHfLFBFni3830TQoSkUZNOCgEAX_HpV8KdYqC2Cv9nzUl8c1yu_rd6q4JtlWM7FOVnICx1x05uHNFWLE3qMV/s72-c/mn76611.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2018/09/blog-post_17.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2018/09/blog-post_17.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content