तरुणांपुढे जॉब सांभाळणे व बेरोजगारी मोठे
आव्हान आहे. सर्विस सेक्टरचे कंबरडे मोडल्याने स्पेन, नेपाळ, रशिया, इराक, ब्रिटेनसह
अनेक देशात बेरजोगार तरुणांचे आंदोलने पुन्हा उभी राहू शकतात.
ब्रिटेन आणि अमेरिका अजूनही धोकादायक अवस्थेतून
जात आहेत. कोरोनाची नवे वर्जन आल्याने अनेक दोन्ही देशांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना
केल्या आहेत. जगभरात अनेक ठिकाणी कोरोनापेक्षा राजकीय व सामाजिक संकटेदेखील मोठी आहेत.
अमेरिकेत ‘ब्लॅक लाईव्ज मॅटर’ चळवळ आता निर्णायक टप्प्यावर आली आहे.
पराभूत झालेल्या ट्रम्प समर्थकांचा रोष अजूनही सुरुच आहे. दोन महीने झाली पण अजूनही ट्रम्प पराभव स्वीकारू शकले नाहीत. परिणामी विविध खेळी ते खेळत आहेत. तर ब्रिटेनमध्ये ब्रेग्झिटचा मुद्दा नव्या वर्षातही पंतप्रधान बोरिस जॉनसनची परिक्षा घेणार आहे.
वाचा : ग्वाटेमालात महिलांचा लैंगिक हिसेंविरोधात उद्रेक
वाचा : अर्जेंटीनाचा गर्भपातकायदाविरोधी लढा
वाचा :‘मोलदोवा’मध्ये लोकशाही समर्थकांचा हल्लाबोल
हाँगकाँगमध्ये गेल्या दोन वर्षापासून चीनच्या
हुकूमशाही प्रवृत्तीविरोधात लोकशाही समर्थकांचा लढा सुरू आहे. कोरोना संकटाच्या वेळी
जीवाची पर्वा न करता अनेक तरुण चीनविरोधात रस्त्यावर आहेत. जोपर्यत चीन मागे हटत नाही
तोपर्यंत स्वायत्तेचा संघर्ष सुरूच राहील, असा संकेत तिथल्या तरुण आंदोलकांनी दिला
आहे. थायलंडही लोकशाही प्रस्थापनेची हाक देत आहे.
चीनमध्ये कोरोना संकटातून सावरणे व उईगर
मुस्लिमांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन रोखणं, हे दोन आव्हाने आहेत. कोरोना वॉरीयरची
हत्या व उईगर छळवणुकीचा प्रश्न आंतरराष्ट्रीय मुद्दा झालेला आहे, त्यामुळे चीनची सुटका
अशक्य आहे.
इराणमध्ये अमेरिकेचा आर्थिक बहिष्कार आता
रोद्र रूप धारण करत आहे. अणू कार्यक्रम इराणी नागरिकांना नको आहे. पण हट्टी सरकार माघार
घ्यायला तयार नाही. या संघर्षात अनेकाचा जीव जात आहे. येत्या काळात हा मुद्दा अधिक
विदारक होऊ शकतो.
अगदी हीच परिस्थिती इराकमध्ये आहे. गेल्या
१० वर्षापासून इथले तरुण लोकशाही हक्काचा लढा लढत आहेत. नव्या चालू वर्षातही हा तिढा
सुटेल, असं दिसत नाही. अफगाणमध्ये तालिबानींचा सत्ताप्रवेश स्थानिकांना अमान्य आहे.
तरीही अमेरिकेने हुसकावून लावलेल्या तालिबानींना पुन्हा सत्ता देण्यासाठी बोलणी सुरू
ठेवली आहे. परिणामी चालू वर्षांतही तालिबानी व दहशतवाद ही दोन आव्हाने अफगाणींची परिक्षा
घेणार.
वाचा : सुरक्षा कायद्यामुळे फ्रेंच तरुण भडकले
वाचा : सुदानमध्ये अब्राहम अक्रॉड्सचा विरोध
वाचा : नेतन्याहू गो जेल' इस्रायलमध्ये हुकूमशाहीविरोधात एल्गार
अरब स्प्रिंगला १० वर्ष पूर्ण झाली, परंतु
अजूनही इजिप्त, येमेन, सिरिया व लिबियामध्ये राजकीय परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. अल जझिराने या विषयावर एक मोठी श्रृंखला प्रकाशित
केली आहे. त्यात म्हटले आहे की, लाखों लोकांचा मृत्यु झाला तरी मध्य-पूर्वेत सत्तासंघर्ष
सुटण्याची चिन्हे दिसत नाहीये. दुसरीकडे मुस्लिम राष्ट्रात इस्रायलच्या ‘अब्राहम अक्रॉड्स’ संदर्भात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
इस्रायलने दुबई, जॉर्डन, बहरिन, सुडान इत्यादी
देशांकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. मात्र अन्य मुस्लिम राष्ट्रे या कराराचा विरोध
करत आहेत. एकीकडे इस्रायल पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर अन्य मुस्लिम देशांशी शांतता करार
करत आहे तर दुसरीकडे मात्र पॅलेस्टिनी नागरिकांवर बॉम्ब वर्षाव करत आहे.
इस्रायलच्या या हिंसक वृत्तीचा इस्लामिक
देशात निषेध सुरू आहे. तुर्कस्थान वगळता अजून कुठलाही देश उघडपणे इस्रायलच्या विरोधात
आला नाहीये. परंतु सर्वांचे म्हणणे एकच की, इस्रायलशी हल्ले रोखणे, जेरुसलेम व मस्जिद
अक्साच्या मुद्द्यावर सशर्त चर्चा करावी. त्याचवेळी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहूंना
आपल्याच देशात प्रचंड विरोधाचा सामना करावा लागत आहे.
वर्षभरापासून त्यांची खुर्ची संकटात आहे.
परंतु त्यांनी आपले राजकीय वजन वापरून खुर्ची सोडायला नकार दिला आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे
गंभीर आरोप आहेत. भ्रष्ट पंतप्रधान शांतता समझोता कसा करू शकतात, असा प्रश्न तिथले
तरूण नेतन्याहूंना विचारत आहेत. त्यामुळे येत्या काळात कोरोना संकट तिथे दुय्यम तर
राजकीय अस्थिरता मोठा प्रश्न म्हणून पुढे येऊ शकतो.
वाचा : बेलारूसी तरुणांचा हुकूमशाहीविरोधात जयघोष
वाचा : पेरू देशात प्रो-डेमोक्रॅसी आंदोलन
वाचा : रिपब्लिक ऑफ थायलँडसाठीचा लढा
बेलारूस व पेरुमध्ये आपल्याच राष्ट्राध्यक्षांच्या
होऊ पाहणाऱ्या शियन मांडलिकत्वाविरोधात तिथली तरुणाई उभी ठाकली आहे. पारदर्शी निवडणुका
घ्याव्यात अशी त्यांची मागणी आहे. रशियाचा हस्तक्षेप दोन्ही देशाला मान्य नाही, साम्राज्यवादी
रशियाला लांब ठेवावे अशी दोन्हीकडील सिविल सोसायटीची मागणी आहे. येणाऱ्या काळात रशियाचा
हस्तक्षेप वाढण्याची शक्यता आहे. परिणामी राजकीय अस्थिरता व संघर्षाचे वातावरण कायम
राहू शकते.
रशियाच्या हस्तक्षेपीमुळे आर्मिनिया युद्धखोर
झाला आहे. परिणामी आर्मेनिया-अजरबैजान दोघांतील सीमावाद चिघळला. युद्धे झाले. अजरबैजानचा
वादस्ग्रस्त भाग आर्मेनियाला सोडावा लागला. परंतु तिथला संघर्ष अजून संपला नाही. रशिया
विरुद्ध तुर्की असा राजकीय वर्चस्ववादाच्या पेचप्रसंगात ही दोन्ही छोटी देश भरडली जातील,
अशी शक्यता भविष्यात कायम आहे.
इथोपियात युद्धपरिस्थिती काही फारशी बदलली
नाही. इथोपियाचे राष्ट्राध्यक्ष अबी अहमदला सीमा भागाचा तिढा सोडविल्यामुळे शांततेचे
नोबेल प्राप्त झाले होते. आता त्यांनीच स्वसंरक्षणार्थ इरिट्रियाविरोधात युद्ध पुकारले
आहे. परिणामी स्थलांतरितांचा प्रश्न मोठा झाला आहे.
वाचा : इंडोनेशियात नोकऱ्यांसाठी तरुणांचे आंदोलन
वाचा : हाँगकाँगमध्ये चीनविरोधात तरुणांचा उद्रेक
वाचा : इजिप्शियन दुसऱ्या क्रांतीकडे
पोलंडमध्ये अबॉर्शन एक्ट रद्द करावा तर
ग्वाटेमाला मेक्सिको उत्तर अमेरिकी देशात लैंगिक हल्ले रोखण्यासाठी चनचळवळी सुरुच आहे.
तरुणाईंच्या पुढाकारने चालू वर्षातही हा संघर्ष कायम राहील, अशी शक्यता आहे. तर फ्रांसमध्ये
इस्लामफोबिया व सुरक्षा कायद्याचा प्रश्न अधिक गंभीर होईल. शिवाय महागाई व इंधन दरवाढीचा
विरोध अजूनही प्रतिकात्मक स्वरुपात फ्रेंच तरुणांनी सुरू ठेवला आहे.
कोरोना संकटाशी दोन हात करण्यात अनेक देश अपयशी ठरले. परिणामी प्रचंड जीवित व वित्तहानी झाली. त्यातून अनेक ठिकाणी राजकीय संकटे उद्भवली आहेत. रखडलेले शिक्षण, गमावलेल्या नोकऱ्या, बेरोजगारी त्यातून बदललेली आर्थिक व सामाजिक परिस्थितीने बिकट प्रश्न उभे केले आहेत. त्यामुळे युवकांचा सत्तेविरोधात रोष चालू वर्षांतही कायम राहील.
कलीम अजीम, पुणे
(सदरील लेख ७ जानेवारी २०२१च्या लोकमतमध्ये प्रकाशित झालेला आहे)
जाता जाता :
* भूकबळीला रोखण्यासाठी कॅथरिन नकालेंबे अग्रेसर

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com