सरते वर्ष जगात सर्वांसाठी त्रासदायक ठरले. पण युगांडाच्या डॉ. कॅथरिनसाठी हे वर्ष मात्र लाभदायक व प्रचंड उर्जा देणारे ठरले.
आफ्रिका खंड उपासमारी
व अन्न तुटवड्यासाठी ‘वर्ल्ड हेल्थ ऑरगनायजेशन’च्या देखरेखीत असतो. इथला अन्न
तुटवडा कमी करण्यासाठी प्रा. कॅथरिन नकालेंबे या महिलेने बहुमूल्य काम केले आहे. त्यासाठी
त्यांना मानाचा असा २०२०चा ‘आफ्रिका फुड प्राईज’ प्राप्त झाला आहे.
कॅथरिन उपग्रह डेटाचा
उपयोग शेती व हवामानाच्या अभ्यासासाठी करतात. त्यांनी पीक पद्धतीवर देखरेख ठेवण्यासाठी
रिमोट सेन्सिंग टूल्स तयार केले आहे. या उपकरणाच्या माध्यमातून त्यांनी डेटा बॅक तयार
केली आहे. ज्यात आफ्रिका खंडातील अनेक देशांमधील शेतीचे, पीकाचे
माती, धान्याचे, तणाचे फोटो, वीडियो साठवले आहेत. त्यासाठी त्यांची एक मोठी यंत्रणा काम करते.
वाचा : ग्वाटेमालात महिलांचा लैंगिक हिसेंविरोधात उद्रेक
वाचा :‘मोलदोवा’मध्ये लोकशाही समर्थकांचा हल्लाबोल
एका उपकरणातून उपलब्ध
झालेला हा डेटा वापरुन मोठ्या प्रमाणावर जमिनीवर नजर ठेवणे शक्य होणार आहे. एका उपग्रहाच्या
माध्यमातून शेती व शेतजमीनीवर देखरेख ठेवणारे हे इन्स्टुमेंट आहे. हे साधन माती व पीक
परिक्षणही करते. शिवाय भूकंप व भूस्खलन सारख्या आपत्तीची पूर्वकल्पना देते.
डॉ. कॅथरिन म्हणाल्या, “जमीनीवर
नजर ठेवून उपग्रहात अशी माहिती घेतली गेली आहे जी पीके, शेतजमीन,
जंगले आणि पाण्यात भेद करण्यास मदत करू शकतील. सॅटेलाइट मॉनिटरींगद्वारे
जमीनीवर लक्ष ठेवले जाणार आहे. हे यंत्र कीड किंवा रोगाच्या बाबतीत योग्य वेळी हस्तक्षेप
करेल.”
कोरडवाहू शेतीसाठी क्रांतिकारी
असलेले हे उपकरण पावसाचा अचूक अंदाज सांगते. पावसाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांना पेरणीची
योग्य वेळ सांगते. एका अर्थाने हे उपकरण पुढचे किती दिवस पाऊस पडणार आहे की नाही, याचा
अचूक अंदाज सांगते. त्यातून पेरणी रोखणे शक्य होईल व बियाणे व श्रम वाया जाणार नाही.
हवामान, माती
व शेतीची पीकवारी तपासणारे हे उपकरण आहे. नासा सारख्या संस्थेने कॅथरिनच्या या कामाची
व इन्स्टुमेंटची दखल घेतली आहे. या उपकरणाला यंदाचा ‘आफ्रिका
फुड प्राईज सन्मान’ लाभला आहे.
डॉ. कॅथरिन नकालेंबे अमेरिकेतील
मेरीलँड युनिव्हर्सिटीच्या भौगोलिक विज्ञान विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत. त्या
‘नासा हार्वेस्ट आफ्रिका प्रोग्राम’च्या डायरेक्टर आहेत.
कॅथरिन मूळच्या युगांडाच्या
निवासी आहेत. आफ्रिका खंडासाठी फुड सिक्युरिटी प्रोग्रमवर ते काम करतात. आपल्या कार्याबद्दल
त्या म्हणतात,
“मला विश्वास आहे की, आम्ही संपूर्ण खंडात शाश्वत
अन्न प्रणाली साध्य करण्यासाठी या प्रणालीचा मोठ्या प्रमाणात उपयोग करू शकतो.”
वाचा : सुरक्षा कायद्यामुळे फ्रेंच तरुण भडकले
वाचा : सुदानमध्ये अब्राहम अक्रॉड्सचा विरोध
कॅथरिन रिमोट सेन्सिंग
टूल्स आणि डेटाचे प्रशिक्षण आयोजित करतात. त्यांचे नेतृत्व करतात. कृषी निर्णय घेण्याच्या
प्रक्रियेवर राष्ट्रीय मंत्रालयांसोबत काम करतात. पीकावरील संभाव्य संकट टाळण्यासाठी
पुढाकार घेतात. त्यांच्या प्रयत्नांचा भाग म्हणून मंत्रालयाने अशी कृषीविषयक धोरणे
आणि कार्यक्रम तयार केले गेले आहेत. ज्यामुळे अन्नटंचाईच्या दुष्परिणामांविरूद्ध शेतकऱ्यांना
मदत होते. सामान्य लोकांनादेखील त्याचा फायदा होतो.
एका कृष्णवर्णीय महिलेला
प्रतिष्ठेचा सन्मान प्राप्त होणे, संबंध आफ्रिका खंडासाठी गौरवाची बाब असल्याचे
त्यांनी म्हटले आहे. “मला या क्षेत्रात अधिक काळ्या स्त्रिया
पाहायच्या आहेत," असे त्यांनी बीबीसीला म्हटले आहे. बीबीसीने
त्यांच्यावर एक स्पेशल फिचर केले आहे. त्यात त्यांनी युगांडा ते अमेरिकेपर्यंतचा सगळा
प्रवास कथन केला आहे.
युनिव्हर्सिटीमधील त्यांच्या
सहकारी डीन ग्रेग बॉल म्हणाल्या, “तिचे कार्य भुकेल्यांना थेट अन्न पुरवते,
शेती कामगार आणि व्यवसायांना सामर्थ्य देते आणि पर्यावरणाचे रक्षण करते.
त्यांनी आमच्या कॉलेजमार्फत जगाच्या मोठ्या आव्हानांचे समाधान शोधण्याचे ध्येय ठेवले
आहे.”
गेल्या सप्टेंबर महिन्यात
त्यांना प्रा. कॅथरिन यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. आपल्या या कार्याबद्दल
त्या म्हणतात,
“पीएचडी प्रोग्राममुळे मला रिमोट सेन्सिंगमध्ये जाण्याची परवानगी मिळाली,
पण मुख्य म्हणजे मला युगांडा आणि (आफ्रिका) खंडात येऊन काम करण्याची
मुभा आहे.”
स्पोर्ट सायन्समध्ये रस
असणाऱ्या कॅथरिन नकालेंबे अपघाताने पर्यावरण शास्त्राकडे आल्या. दोन जुळ्या मुलांची
आई असणाऱ्या कॅथरिन एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आहे. मेरीलँड युनिव्हर्सिटीच्या
वेबसाईटवरील एका विशेष लेखात त्यांची सबकुछ माहिती देण्यात आलेली आहे. शिवाय त्यांच्या
गौरवास्पद कार्याचे महत्त्वदेखील कथन करण्यात आलेले आहे.
या लेखात त्यांनी आपल्या
कार्याचे श्रेय सहकारी व आई-वडिलांना दिले आहे. त्यांचे पीएचडीचे सल्लागार प्रा. चेरिस
जस्टिस म्हणतात,
“कॅथरीनने मला स्पष्ट केले होते की आफ्रिकेतील समाजाच्या सर्वांगीण गरजा
भागविण्यासाठी तिला ज्ञान व कौशल्य मिळवायचे आहे. आपल्या ध्येयासाठी ती कटिबद्ध राहिली
आहे.”
वाचा : सलिमा मजारी : अफगाण कलेक्टरमुळे १२५ तालिबानी शरण
वाचा : लेडी पोलीस फैजा नवाजने वकिलाला घातल्या बेड्या
युनिव्हर्सिटीचा लेख म्हणतो, “या संशोधनातून
ईशान्य युगांडामधील दुष्काळाच्या परिणामांवर नजर ठेवली आहे. या प्रकल्पामुळे या प्रदेशातील
370,000 हून अधिक लोकांना आधार मिळाला आणि युगांडाच्या सरकारी संसाधनांचे जतन झाले.”
उपग्रहामार्फत संकलित
केलेला डेटा मोठी संपत्ती असल्याचे कॅथरिन मानतात. “हा डेटा बर्याच काळापासून
केलेल्या कामांची ओळख आहे.” त्यांच्या मते या डेटाचे महत्त्व प्रचंड आहे. पुरस्कारात मिळालेली $100,000 ही रक्कम त्या आफ्रिकेच्या कृषी
अजेंडावर नियंत्रण ठेवणार्या धोरणावर खर्च करू इच्छितात.
कॅथरीन आफ्रिका खंडासाठी एक अद्भुत रोल मॉडेल आहेत. त्यांच्यामध्ये आपल्या कामाबद्दल प्रचंड उत्साह आहे. आपल्या भौगोलिक संरचनेत मूलभूत बदल करण्याचे धाडस त्यांनी स्वीकारले आहे. नव्या वर्षी त्यांचे हे काम फुलत व डुलत होत राहो, हीच सदिच्छा..
कलीम अजीम, पुणे
जाता जाता
* पाकिस्तानच्या दोन महिला वेटलिफ्टर

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com