मोलदोवा, पावणे तीन कोटी लोकसंख्या आणि ३३ हजार स्क्वेअर किलोमीटर भूगोल असलेला
छोटासा देश. युरोपियन युनियनमधला सर्वात गरीब देश म्हणून त्याची ओळख आहे. देश
सध्या राजकीय संकटातून जात आहे. हुकूमशाही प्रवृत्तीचा विरोध करत लोकशाही बचावसाठी
तरुणांनी पुढाकार घेतला आहे. रविवारी ६ डिसेंबरला तब्बल २०,००० जणांनी पार्लमेंट
परिसरात निदर्शने करत संसद बरखास्त करून अध्यक्षांना खुर्ची सोडण्याची मागणी केली.
गेले दोन आठवडे मोलदोवामध्ये राजकीय संघर्ष सुरू
आहे. पराभवानंतरही विद्यमान अध्यक्ष इगोर डोडॉन खुर्ची सोडत नाही. अद्यापही विधिमंडळ
त्यांच्या नियंत्रणाखाली आहे.
नोव्हेंबर महिन्यात झालेल्या सार्वत्रिक
निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. विरोधी पक्षातील नेत्या माईया सांडू यांना
तब्बल ५८ टक्के मते पडली. तर सत्ताधारी इगोर यांना केवळ ४२ टक्के मते मिळाली.
नव्या संसदेचे गठन २४ डिसेंबरला होणार आहे.
गेल्याच आठवड्यात संसदेचे सत्ता हस्तांतराचे
विधेयक मंजूर केले, ज्याला सत्ताधारी
पक्षातील सदस्यांनी संमती दर्शवली. घटनात्मक कोर्टाने अधिकृतपणे माईया सांडू
यांच्या विजयाची पुष्टी केली आहे. परंतु अध्यक्ष इगोर डोडॉन यांना मात्र हा पराभव
मान्य होत नाहीये.
रिफॉर्मिस्ट पॉलिटिशियन
मावळत्या अध्यक्षांनी नव्या अध्यक्षासाठी खुर्ची
रिकामी करावी व विधीमंडळाची सुत्रे त्यांच्याकडे द्यावी, अशी मागणी करत रविवारी राजधानी चिसिनौमध्ये
ठिकठिकाणी निदर्शने झाली. विजयी उमेदवार माईया सांडू यांनी या रॅंलींना उद्देशून
भाषणे केली.
विरोध प्रदर्शनात अध्यक्षांना आव्हान देत त्यांनी
म्हटले, “एक तर खुर्ची सोडा
किंवा नव्याने निवडणुका घ्या.” इगोर अस्थिरता निर्माण करू पहात आहेत असा आरोप करत त्यांनी म्हटले,
“देशाला आग लावावी, अनागोंदी भडकवावी, मोल्दोव्हाला आंतरराष्ट्रीय समूहाने अळगळीत
टाकावे अशी त्यांची इच्छा आहे.”
४८ वर्षीय माईया सांडू एक बँकर महिला आहेत.
वर्ल्ड बँकेत त्यांनी अर्थतज्ज्ञ म्हणून काम पाहिलं आहे. यापूर्वी पार्टी ऑफ एक्शन
अँड सॉलिडेटरी अर्थात ‘पीएस’ पक्षाच्या वतीने पंतप्रधान व शिक्षण मंत्री
म्हणून सरकारमध्ये काम केलं आहे. अल्पतामुळे २०१९ला त्यांची पंतप्रधानपदाची खुर्ची
सोडावी लागली. विद्यमान अध्यक्षांच्या त्या कठोर टीकाकार आहेत.
काम देशातील भ्रष्टाचाराविरोधात त्यांनी गेल्या
काही महिन्यापासून मोहीम उघडली आहे. चांगल्या दर्जाचे शिक्षण आणि बेरोजगारी रोखणे
यासाठी त्यांनी कॅम्पेन चालवलं आहे. युरोपियन युनियन समर्थक असलेल्या माईया
तरुणांमध्ये त्या चांगल्याच लोकप्रिय आहेत.
जागतिक बँकेच्या मदतीने विद्यार्थी व तरुणांना आर्थिक
सक्षमतेकडे घेऊन जाण्याचे आश्वासन त्यांनी दिलं आहे. निवडणुकीच्या प्रचार मोहीमेत
त्यांनी रोजगार आणि वाढता भ्रष्टाचार हाच मुद्दा केंद्रस्थानी ठेवला होता. ‘रिफॉर्मिस्ट पॉलिटिशियन’ म्हणून युरोपियन मीडियाने त्यांचा गौरव केला आहे.
वाचा : सुरक्षा कायद्यामुळे फ्रेंच तरुण भडकले
वाचा : रशियाची घटना दुरुस्ती की तानाशाहीला मान्यता!
रशियाचे हस्तक
राजकीय बदलांचे आवाहन स्वीकारून मोलदोवीयन जनतेने
त्यांना पाठिंबा दर्शवला. महिला व युवकांनी त्यांना भरभरून मतदान केले. मतपेटीतून
तब्बल ५७.७ टक्के मतदारांनी त्यांच्या बाजुने कौल दिला.
विद्यमान अध्यक्ष इगोर डोडॉन १६ वर्षापूर्वी हेड
ऑफ स्टेट म्हणून त्यांची थेट निवड़ करण्यात आली होती. २०१५ साली इगोरना एका मोठ्या
घोटाळ्यात खुर्ची गमवावी लागली. परंतु पुढे २०१६ला झालेल्या निवडणुकीत सोशालिस्ट
रिब्लिकन पक्षातर्फे अध्यक्षपदाचे उमेदावर म्हणून ते रिंगणात उतरले.
योगायोगाने ते विजयी झाले. तत्कालीन अध्यक्ष
निकोलो टिमोफी यांच्यावरील जनतेच्या नाराजीचा त्यांना फायदा झाला. रशिया समर्थक
म्हणून त्यांची ओळख आहे. रशियाच्या राजकीय धोरणांचा एक प्यादा म्हणून विरोधक
त्यांना पाहतात. सत्ताकाळात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले.
बीबीसीच्या मते, त्यांच्या कारकीर्दीत देशात बेरोजगारी वाढली,
लघुउद्योजकांचे हाल झाले, वाढत्या करामुळे सामान्य व्यापारी संकटात आले.
उच्च पातळीवरील भ्रष्टाचारामुळे लोकांच्या जीवनमानात लक्षणीय बदल घडून आला.
त्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांमध्ये तीव्र नाराजी पसरली. शिवाय रशियांच्या
इशाऱ्यावर काम करण्याचा भयंकर आरोप त्यांच्यावर आहे.
पूर्वी मोलदोवा सोवियत रशियाचा भाग होता. १९९१मध्ये सोवियतचे विघटन होऊन मोलदोवा स्वतंत्र देश म्हणून जन्मास आला. आज हा देश युरोपियन युनियनचा भाग आहे. इथे शेती अर्थव्यवस्थेचं प्रमुख साधन आहे. आजही मोलदोवावर रशियाचा प्रभाव आहे. शेजारी क्रिमिलिया व युक्रेनवर पुन्हा रशियांने ताबा मिळवला आहे. मोलदोवीयन जनतेला भीती आहे की आपला देश पुन्हा रशिया गिळंकृत करेल.
वाचा : नेतन्याहू गो जेल' इस्रायलमध्ये हुकूमशाहीविरोधात एल्गार
वाचा : सुदानमध्ये अब्राहम अक्रॉड्सचा विरोध
आम्ही देशाचे लोक
बीबीसीच्या मते, इगोर हे देशाचे पाचवे अध्यक्ष आहेत. त्यांनी निवडणूक
प्रचारादरम्यान, मोलदोवाचे युरोपियन
युनियनबरोबर सात वर्षांचे संबंध संपविण्याचा आणि आपल्या देशाला रशियाकडे
वळविण्याचे वचन दिलं होतं. शिवाय अनेक ठिकाणी निवडणूक प्रक्रियेत रशियाचा
हस्तेक्षपही दिसून आला. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी गेल्या डोडॉनसाठी
मतदानाची विनंती केली होती.
‘पीएस’ पक्षाच्या माईया सांडू ‘इयू’ समर्थक आहेत.
त्यांनी देशातील जनतेला आशादायी वातावरण दिलं. रशियांचे सैन्य हटवू, त्याच्या हुकूमशाहीपासून सुटका करू, असं आश्वासन दिलं. जनतेच्या अपेक्षा उंचावल्या आणि
लोकप्रिय उमेदवार म्हणून जनतेनं त्यांना निवडून आणलं. मतदानातून मोलदोवीयनांनी
इगोरविरोधात कौल दिला. देश रशियाला जोडणारे इगोर जनतेला नको आहेत.
परंतु इगोर डोडॉन पराभव मान्य करण्यास तयार
नाहीत. परिणामी मोलदोवीयन जनता रस्त्यावर उतरली आहे. जनतेने त्यांना थेट आव्हान
दिलं आहे. त्यांच्याविरोधात रविवारी देशात अनेक ठिकाणी मोर्चे, आंदोलने झाली. राजधानीत संसद भवनाच्या समोरील
चौकात निदर्शक जमले. आंदोलकांनी ‘आम्ही देशाचे लोक!’, ‘जू पार्लमेंट’ आणि ‘तुम्ही तुरूंगात जा’
अशा घोषणा दिल्या.
रॅलीला संबोधित करताना माईया सांडू यांनी आरोप
केला की, “इगोर डोडन यांना पराभव
स्वीकारण्याची इच्छा नाही. ते मुद्दामहून सर्व करत आहेत. गुप्तचर यंत्रणा ताब्यात
ठेवण्याची खेळी ते खेळत आहेत. शिवाय संसदीय अधिकार नियंत्रित ठेवण्याचे त्यांचे
उद्दिष्ट आहे.”
विरोधी पक्षाचा आरोप आहे की, रशियाच्या हस्तक्षेपामुळे मोलदोवामध्ये राजकीय
परिस्थिती चिघळली आहे. विशेष म्हणजे बेलारुसमधेयेही गेल्या तीन महिन्यापासून
पराभूत अध्यक्षाविरोधात आंदोलने सुरू आहेत. तिथले अध्यक्ष एलेक्झांडर लुकाशेंको
रशिया समर्थक असून त्यांना पुतीन यांचे पाठबळ लाभले आहे.
विशेष म्हणजे या दोन्ही देशात महिलांनीच हुकूमशाह शासक आणि रशियाला जेरीस आणले आहे. रशियाच्या हुकूमशाही वृत्तीमुळे ही दोन देश होरपळली जात आहेत. मात्र दोन्ही देशातील जनता हुकूमशाही शासकांना आव्हान देत त्यांच्याविरोधात एकवटली आहे.
कलीम अजीम, पुणे
(सदरील लेेख १० डिसेंबर २०२० रोजी लोकमतमध्ये प्रकाशित झालेला आहे)
जाता जाता :

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com