'नेतन्याहू गो जेल' इस्रायलमध्ये हुकूमशाहीविरोधात एल्गार


स्रायली युवक गेल्या दोन महिन्यापासून पंतप्रधान बिन्यामिन नेतन्याहूच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर आहेत. गेल्या शनिवारी तब्बल 10,000 तरुणांनी पंतप्रधानच्या सरकारी निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. या आंदोलनामुळे राजधानी तेल अवीवला छावणीचं स्वरूप आलं. सरकारविरोधी आंदोलन दडपून टाकण्यासाठी पोलीस व सैन्याची अतिरक्त कुमक तैनात करण्यात आली आहे.
हा निषेध मार्च शक्तिशाली असल्याचं मत टाइम्स ऑफ इस्रायलने व्यक्त केलं आहे. गेल्या 10 वर्षांतली सर्वात मोठी लोक-चळवळ असल्याचं हे वृत्तपत्र म्हणते. शनिवारी राजधानीत दोन मोठी आंदोलने झाली. त्यात पहिलं पंतप्रधानाचा राजीनाम्यासाठी तर दूसरे होते, एका अल्पवयीन मुलीवर 20 जणांनी केलेल्या सामूहिक अत्याचाराच्या दोषींना शिक्षा देण्याची मागणी करणारे. दिवसभरात विविध ठिकाणी सुमारे 15,000 सरकारविरोधी प्रदर्शने झाली, असं हे वृत्तपत्र म्हणते.
वाचा : बेलारूसी तरुणांचा हुकूमशाहीविरोधात जयघोष
वाचा : रशियाची घटना दुरुस्ती की तानाशाहीला मान्यता!
घटनेचा निषेध करत शहरात दिवसभर आंदोलन सुरू होते. राजधानीतील महापालिकेबाहेर झालेल्या एका निषेध आंदोलनात लहान मुलांपासून तरुणी, महिला व वृद्धांचा समावेश होता. बलात्कारी संस्कृतीला पायबंद घालावा, अशी मागणी करत सर्वजण एकत्र आली. तरुण मुलींनी सरकारविरोधी घोषणा देत जुना कायदा बदलण्याची मागणी केली. 
इब्न गॅब्रियल स्ट्रीटवर झालेल्या एका मोर्चात ही चूक नाही, धोरण आहे,” आणि थांबा, पुरे, बलात्कारीला दोषी ठरवा.अशी फ्लेक्सबोर्ड तरुणींनी हातात घेऊन निषेध नोंदवला.
मोरन नावाची तरुणी यनेट न्यूजला म्हणते, “मी वक्ता किंवा कार्यकर्ता नाही. माझ्या आयुष्यातला हा पहिला निषेध आहे. मी कोणत्याही संस्थेचे प्रतिनिधित्व करीत नाही आणि आजच्या रात्रीचा हा एक वैयक्तिक मेळावा आहे, कारण आम्हाला आता अजून अधिक हल्ले किंवा बलात्कारांबद्दल ऐकायचे नाहीये
महापालिकेबाहेर झालेल्या निदर्शनात तेल अवीवचे उपमहापौर टिज्पी ब्रँड म्हणतात, “यंत्रणेच्या उदासीनतेमुळे एका अल्पवयीन मुलीचे आयुष्य नष्ट झालं. आम्हाला भाषा, पाठ्यपुस्तके आणि इतिहासातील पुस्तके - सर्वकाही बदलण्याची गरज आहे.
प्रामुख्याने, दोषींना शिक्षा द्यावा तसंच नवा कायदा करावा, अशी मागणी आंदोलक करत होते. महिलांवरील हिंसाचार, न्यायव्यवस्थेतील बदल आणि लैंगिक अत्याचार पीडितांना वैद्यकीय सहाय्य यासारख्या कार्यक्रमांसाठी अर्थसंकल्पात वाढ करण्याची मागणी निदर्शक करीत होते.
या एका घटनेमुळे संपूर्ण इस्रायल अस्वस्थ झाला आहे. राजकारण, समाजकारण आणि मल्टी नॅशनल कंपन्यावर त्याचा परिणाम झाला आहे. लोकांनी सामूहिकरित्या संप केला असून ते दोषींना शिक्षेची मागणी करत आहेत. एएफपी वृत्तसंस्थेनुसार नगरपालिका आणि मायक्रोसॉफ्टसह किमान 30 संस्था कंपन्यांनी आंदोलनात सहभाग घेतला असून सर्वांनी निषेधात सामील होण्यास आवाहन केले आहे.
दूसरीकडे त्याचदिवशी काही पोलीस अधिकारी एका ज्येष्ठ महिलेचा विनयभंग करत असल्याचा एक वीडियो वायरल झाला. एका निषेध मोर्चात एक ज्येष्ठ महिला सरकारविरोधी घोषणा देत आहे, दोन पोलीस तिच्या छातीवर दोन हातांनी जोरदार दणका देत ढकलून देतात. महिलेचा आक्रोश बघून पुन्हा ते तिचा हात मुलीच्या हातातून सोडवत फरफटत घेऊन जाताना दिसत आहे. पंतप्रधान नेतन्याहू यांच्या राजीनाम्य़ाची मागणी करणाऱ्या निषेध मार्चातला हा वीडियो होता.
या वायरल वीडियोवरून सध्या इस्रायलचं राजकारण चांगलंच तापलं आहे. नागरिकांनी पोलिसांना व सरकारला निर्दयी म्हणत कारवाईची मागणी केली आहे. या घटनेवरून प्रथमच सोशल मीडियावरून पोलिसांना लक्ष्य केलं जात आहे.
पंतप्रधान बिन्यामिन नेतन्याहूंवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सुरू आहे. याच मुद्द्यावरून शनिवारी पंतप्रधान निवासाबाहेर भलंमोठं आंदोलन झालं. या विकली प्रोटेस्ट मार्चमध्ये तब्बल 10 हजार तरुण सामिल झाले होते. गेल्या दोन महिन्यापासून जेरुशलेम आणि तेल अवीवमध्ये ही आंदोलने सुरू आहेत. हजारो युवक आंदोलनाचे नेतृत्व करत असून सत्ताबदलांची मशाल त्यांनी हातात घेतली आहे.
बालफौर स्ट्रीट म्हणजे पंतप्रधानाच्या निवासस्थानाजवळ निदर्शकांनी ठिय्या मांडला असून देशभरातून युवक त्यात सामिल होत आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम, भाषणे आणि मेळावे भरवून सरकारचा निषेध केला जात आहे. पंतप्रधान नेतन्याहू करप्ट असून त्यांनी तात्काळ खुर्ची रिकामी करावी, अशी त्यांची मागणी आहे.
शनिवारी या विकली आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीही तरुणांचे हजारो गट इथे एकत्र आले. विशेष म्हणजे या आंदोलनात नेतन्याहू सरकारमधील माजी संरक्षण मंत्री यालोन हजर होते. ते म्हणाले, “या महत्त्वाच्या आणि न्यायप्रदर्शनात मी पूर्णपणे तुमच्या (आंदोलक)बरोबर आहे.मागच्या आठवड्यातही यालोन यांनी आंदोलनस्थळी हजेरी लावली होती.
रात्री उशीरा पोलिसांनी मेळावा बेकायदा ठरवत लाठीहल्ला केला. हायकोर्टाच्या संरक्षण देण्याच्या आदेशाला न जुमानता निदर्शकांना मरहाण झाली. पोलिसाकडून सर्व ताकदीचा वापर करण्याची धमकी दिली. आंदोलक आणि पोलीस यांच्यात मोठी चकमक झाली. पोलिसांनी शहरातील बेन मैमन स्ट्रीटवर बंदी घातली. दुसरीकडे पॅरिस चौक बंद करून तिथूनही आंदोलकांना पिटाळून लावले.
सरकार समर्थक गटांनीदेखील आंदोलकावर हल्ले केले. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. पाण्याचा मारा, अश्रूधूर सोडण्यात आले. त्यात अनेकजण जखमी झाले. तर 7 जणांना अटक झाली. टाइम्स ऑफ इस्रायलच्या मते आत्तापर्यतची ही सर्वात मोठी चकमक होती.
विरोधी पक्षनेते यश अतीद यांनी सरकारच्या वर्तनावर जाहीर टीका केली. देशभरातून घटनेच्या निषेधार्थ प्रतिक्रिया येत आहेत. तरुणांचे हे आंदोलन ऐतिहासिक आहे, असं दि गार्डियन म्हणतो. टाइम्स ऑफ इस्रायलनेदेखील या आंदोलनाला प्रभावशाली म्हटलं आहे.
वाचा : जेरुसलेम: नेत्यानाहू विरुद्ध ट्रम्प
वाचा : मोदींचे इस्रायल प्रेम आणि युद्धाची चाहूल
काय आहे प्रकरण?
बीबीसीच्या मते पंतप्रधान नेतन्याहूवर तीन प्रकारचे गंभीर आरोप आहेत. पहिला, फ्रॉड आणि विश्वास गमावणे. सकारात्मक कव्हरेजच्या मोबदल्यात मीडियाला सहाय्य करणे. दूसरा, परराष्ट्र संबंधात विदेशी नेत्याकडून महागडे सिगार आणि शैंपेनचे बॉटेल्स बक्षिस मिळवणे. आरोप आहे की, पावरफुल उद्योजकांनी आपल्या बाजूने काम केल्याच्या मोबदल्यात त्यांना ही बक्षीसे दिली आहेत. तिसरा आरोप टेलिकॉम कंपन्याकडून बेनामी लाच घेतल्याचा आहे.
सध्या त्यांच्यावर इस्रायलच्या सर्वोच्च कोर्टात भ्रष्टाचाराचा खटला सुरू आहे. गंभीर गुन्हे दाखल असताना पंतप्रधानपद बळकावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. विशेष म्हणजे 2008 साली पूर्वीचे पंतप्रधान एहुद ओल्मर्ट यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यावेळी त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत लिकुड पक्षाचे नेतन्याहू पंतप्रधान म्हणून निवडले गेले.
2009 पासून ते या पदावर आहेत. यापूर्वी ते 1996-1999 या काळात पंतप्रधान होते. चालू वर्षी झालेल्या निवडणुकीत ते पराभूत झाले. त्रिशंकू परिस्थिती असल्याने कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नव्हते. दोन महिन्याच्या चर्चा, तडजोडीतून त्यांनी आपले राजकीय प्रतिस्पर्धी बेनी गैंट्ज यांच्यासोबत समझोता करत अखेर पंतप्रधानपदाची खुर्ची मिळवली.
नेतन्याहू उजव्या विचारांचे मानले जातात. धर्मसंरक्षक चेहरा म्हणून त्यांनी गेल्या 10 वर्षात मोठी लोकप्रियता मिळवली आहे. ज्यू राष्ट्रवादी असल्याने त्यांचे कोट्यवधी अंधभक्त आहेत, असे अरबी मीडिया म्हणतो. देशातील लोकशाही व शांततावादी गट त्यांना हुकूमशाह मानतात. धर्माचा वापर करून त्यांनी देशातील तरुणाईत द्वेश, हिंसा आणि सुडाची भावना भरली, असे लोकशाही समर्थक गटांना वाटते. धर्माचे नाव घेऊन लाखो पॅलेस्टिनींची त्यांनी हत्या घडवली, असेही त्यांच्यावर आरोप आहेत.
असा निर्दयी हुकूमशाह देशाला नको म्हणत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. दुसरीकडे उजवे गट त्यांच्या समर्थनात मोहीम चालवत आहेत. गेल्या महिन्यात पंतप्रधानाच्या यायर नेतान्याहूया 28 वर्षीय मुलाने विरोधी आंदोलने करणाऱ्या तरुणांची नावे, मोबाईल नंबर व पत्ते सोशल मीडियावर टाकले. त्यातून सरकार विरोधकांना ट्रोल करणे सुरू झाले. घरी येऊन धमकावणे, बलात्कार व ठार करण्याची धमकी देणे, विविध प्रकारे ट्रोलर्सनी छळण्याच्या तक्रारी निदर्शकाकडून स्थानिक पोलिसात दाखल झाल्या आहेत.
प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले आणि न्यायालयाने नावांची यादी सोशल मीडियावरून काढून टाकण्याचे आदेश यायरला दिले. विषेश म्हणजे नुकतेच त्याने हिंदू देवतांची विटंबना केल्याप्रकरणी वडिलांच्या सांगण्यावरून माफी मागितली आहे. यायर नेतन्याहूवर सरकार विरोधकांना छळणे, त्रास दिल्याचे आरोप आहेत.
यूएई कराराला विरोध
आंदोलकांनी यूएई आणि इस्रायल समझौत्याला विश्वासघात म्हटले आहे. या कराराच्या तिसऱ्या दिवशी जेरुशलेम आणि तेल अवीवमध्ये मोठे आंदोलन झाले. ज्यू शेख’, ‘भाकरी नाही पण दुबईला उड्डाणअसे फ्लेक्स घेऊन अनेक तरुण पंतप्रधानाच्या निवासस्थानाबाहेर जमले होते. युद्ध नको, आम्हाला शांतता हवी, अशा मागण्या निदर्शक करत होते. या करारातून नेतन्याहू यांना राजकीय प्रोत्साहन मिळू शकेल अशी भीती आंदोलकांना वाटते.
टाइम्स ऑफ इस्रायलने रिपोर्ट केलेल्या एका वृत्तात, 33 वर्षीय रान लेवी म्हणते, “अर्थातच मी शांततेचे स्वागत करते, आणि तसे झाले याचा मला आनंद आहे. परंतु हे लक्षात ठेवावे की आमच्या पंतप्रधानांवर भ्रष्टाचाराचे तीन गंभीर आरोप आहेत. शांततेचा हा प्रयत्न भ्रष्टाचारातून मुक्त करू शकत नाही.
या वृत्तात ब्लॅक फ्लॅगया भ्रष्टाचारविरोधी गटाची प्रतिक्रिया आहे. तो म्हणतो, “इस्रायल आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील मुत्सद्दी संबंध नसून अमेरिकेची दलाली आहे.आंदोलक म्हणतात, हा शांती प्रस्ताव भ्रष्टाचाराचे डाग पुसून काढू शकत नाही. तसंच तो मूळ उद्दिष्टावरून आमचे लक्ष विचलित करू शकत नाही.
निषेध संयोजकांपैकी एक असलेल्या 26 वर्षीय दाना अब्राहम म्हणतो, “ते आमचा निषेध प्रत्येक प्रकारे मोडून काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण आम्ही थांबणार नाहीत.इस्त्रायली लेखक आणि विचारवंत मीर शालेव म्हणतात, “न्यायाधीशांच्या निर्णयाव्यतिरिक्त, इतिहासाचा निकालदेखील तुमची वाट पाहत आहे. तो (इतिहास) तुमचा न्याय करेल, फक्त लाचखोरी, फसवणूक आणि विश्वास भंग केल्याबद्दलच नव्हे तर शून्य कृती, शून्य मूल्ये, स्वार्थीपणा या गोष्टींसाठीही तुमची विभागणी होईल. तुम्ही खोटे बोललात, तुम्ही फूट पाडता, तुम्ही वाया गेला आहात आता घरी जा.
बालफोरच्या निषेध आंदोलनात प्रथमच सामील झालेला 43 वर्षीय व्यक्ती यानिव आदिर म्हणतात, “राईट विंग संबंधित चिन्हावर मी तीनदा मतदान केले. आता मला त्रास होतो आहे, कारण मी हे सरकार निवडलेल्या लोकांचा एक भाग आहे.
विशेष म्हणजे, नेतन्याहू यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. इस्रायलच्या शहरात सोशल मीडियावर व निषेध मेळाव्यात गुन्हेगार मंत्रीआणि तुरूंगात जाअसे बॅनर चिकटले आहेत. येणाऱ्या काळात इस्रायली तरुणाईंचा लोकशाही हक्कासाठीचा हा संघर्ष किती तग धरेल, हे तुर्तास सांगता येणार नाही. इस्रायली तरुणाईंचा लोकशाही बचावच्या लढ्याला जगभरातून पाठिबा मिळत आहे.

(सदरील लेेख 27 ऑगस्ट 2020 रोजी लोकमतमध्ये  प्रकाशित झालेला आहे)

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,37,किताब,24,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,292,व्यक्ती,17,संकलन,61,समाज,246,साहित्य,77,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: 'नेतन्याहू गो जेल' इस्रायलमध्ये हुकूमशाहीविरोधात एल्गार
'नेतन्याहू गो जेल' इस्रायलमध्ये हुकूमशाहीविरोधात एल्गार
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgmRFLDs-Z_nInOt7fY0XoGjA3T_Zx_0urPrMVgXHTz3xKeno4OQWC6GhtKzfgGiH7G8a5BulzrElOQNbgg11cpdls6HhloGOSeNA_Evlku3t7PkNXCadBHZjHeqUyf8giemqH_fVuCiX8v/s1600/F200821OF09-640x400.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgmRFLDs-Z_nInOt7fY0XoGjA3T_Zx_0urPrMVgXHTz3xKeno4OQWC6GhtKzfgGiH7G8a5BulzrElOQNbgg11cpdls6HhloGOSeNA_Evlku3t7PkNXCadBHZjHeqUyf8giemqH_fVuCiX8v/s72-c/F200821OF09-640x400.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2020/08/blog-post_27.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2020/08/blog-post_27.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content