ग्वाटेमालात महिलांचा लैंगिक हिसेंविरोधात उद्रेक

ग्वाटेमालामध्ये राजकीय सुधारणेसाठी व्यापक जनचळवळ सुरू आहे. वाढता भ्रष्टाचार आणि रेप कल्चरचा विरोध, महिलांची सुरक्षा आणि अर्थसंकल्पात सामान्य माणसाचे हित सामिल करावे, अशा मागण्यांसाठी ही निदर्शने सुरू आहेत. गेल्या सहा आठवड्यापासून ग्वाटेमाला सिटीमधील राष्ट्रपती भवनासमोर तरुणांचे साखळी निदर्शने होत आहेत.

आंदोलकांनी राष्ट्राध्यक्ष अलेजान्ड्रो गियामाट्टेई यांच्या राजीनाम्यांची एकसूरी मागणी केली आहे. गुन्हेगारी कायदा दुरुस्त करावा, महिलांविरोधात होणारी लैगिंक हिंसा रोखावी; शिवाय राजकीय व प्रशासकीय कारभारात रचनात्मक बदल करण्याचा आग्रह केला आहे.

विद्यार्थी, तरुण, स्त्रीवादी व मानवी हक्क संघटना प्रतिकात्मक व सांकेतिक मोर्चे-निदर्शने करून आपल्या मूलभूत हक्काची मागणी करत आहेत. या चळवळीला व्यापक रूप देण्यासाठी अनेक संघटना अग्रेसर झाल्या आहेत.

ग्वाटेमाला सरकारने २१ नोव्हेंबरला बजेट बिल-२०२१ मंजूर केले. १२..8 अब्ज डॉलरच्या या बजेटमध्ये सरकारी अधिकारी व नेत्यासाठी विशेष आर्थिक तरतूद होती. तर मानवाधिकार संस्था, आरोग्यसेवा, शिक्षण आणि न्यायव्यवस्थेसाठी निधी कमी केला होता. नव्या बजेटमध्य़े सामान्य नागरिकांचे हक्क डावलून लोकप्रतिनिधीना अनेक सवलती प्रदान करण्यात आल्या होत्या.

वाचा : लैंगिक अत्याचाराच्या विरोधात मैक्सिकोत महिला अदृष्य

वाचा : अर्जेंटीनाचा गर्भपातकायदाविरोधी लढा

अर्थसंकल्प-२०२१ आणि बदललेल्या सरकारी धोरणाविरोधात देशात व्यापक निदर्शने सुरू झाली. २२ नोंव्हेबरला २००० तरुणांनी राष्ट्रपती भवनला घेराव घातला. दुसरीकडे राजधानी ग्वाटेमाला सिटीच्या रस्त्यावर तरुणांचे लोंढे उतरले. बघता-बघता संतप्त जमावाने सरकारी मालमत्तेची जाळपोळ, नासधूस सुरू केली. विद्यार्थ्यांच्या एका गटाने मोर्चाच्या वेळी काँग्रेसच्या इमारतीचा भाग पेटवून दिला.

कोविड रोगराईमुळे होरपळणाऱ्या ग्वाटेमालात तरुणांचा सरकारविरोधात भडका उडाला. अनेक ठिकाणी निदर्शक आणि पोलिसांत चकमक उडाली. पाच-सहा दिवस ग्वाटेमाला सिटीमध्ये हा संघर्ष सुरू होता. जनतेचा रोष व आक्रोष पाहता सरकारने वादग्रस्त बजेट रद्द केले. इथून सरकारविरोधाच्या ठिणगीतून एक व्यापक जनचळवळ उभी झाली.

सहा आठवडे उलटले ग्वाटेमालामध्ये महिला व तरुणांची आंदोलने अजूनही सुरू आहेत. ‘We are fed up’ अर्थात आम्ही वैतागलो आहोतअशी घोषणा देणारे आंदोलक राष्ट्राध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.

५ डिसेंबरला ग्वाटेमाला सिटीत स्त्रीवादी संघटना, एलजबीटी समुदाय, महिला व मुलींनी रेप कल्चरविरोधात मोर्चा काढला. लैंगिक हिंसेला रोखा आणि सुरक्षा पुरवा अशी आंदोलनाची प्रमुख मागणी होती.

या प्रतिकात्मक मोर्चाची थीम ‘Virgin of the Struggle’ अशी होती. मोर्चात सामील झालेली क्रिस्टीना वलेन्झुएला हिने लक्षवेधी पेहराव केला होता. भ्रष्टाचाराविरूद्ध झालेल्या मागच्या निषेध मोर्चात तिने मुलींचे नेतृत्व केले होते. सरकारविरोधी संघर्षाचा आयकॉनिक चेहरा झालेल्या क्रिस्टीनाने या मोर्चात हिरवा बुरखा, निळा मुखवटा आणि केशरी शाल परिधान केली होती.

तिच्या हातात असलेल्या निषेधाच्या प्लेकार्डवर चिकटलेल्या छोट्या कपड्याच्या बाहुल्या लक्ष वेधून घेत होत्या. त्यावर लिहिले होते राष्ट्रपती आपण राजीनामा द्यावा’. अल जझिराला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले, “भ्रष्टाचार सुरूच आहे आणि आणखी वाईट पद्धतीने तो होतो आहे. लोक पुन्हा उठले आहेत."

दर आठवड्याला होणारी ही सांकेतिक निदर्शने बलात्कार संस्कृती व लैंगिक हिसेंला रोखण्याची मागणी करत आहेत. तरुण मुली आयकॉन झालेल्या या चळवळीची घोषणा “A Rapist in Your Path”  म्हणजे आपल्या मार्गात एक बलात्कारीअशी आहे.

वाचा : आर्यलँडमध्ये अबॉर्शन कायदा

वाचा : मोरक्कोत गर्भपातबंदी शिथिलतेची मागणी

एका निदर्शनादरम्यान ग्वाटेमाला सिटीच्या रहिवासी ५० वर्षीय रहिवासी अँजेला गुझमन म्हणतात, “त्यांनी (सरकारने) देशाच्या फायद्यासाठी कधीही कायदे पारित केले नाहीत. आम्ही येथे अध्यक्ष आणि त्यांचे मंत्रिमंडळ हटवण्यासाठी आलो आहोत. ते लोकांसाठी काम करत नाहीत.

ग्वाटेमाला हा लॅटीन अमेरिकन देश. मीडिया रिपोर्ट सांगतात की, दरवर्षी इथल्या प्रांतात वर्णभेदी व लैंगिक हिंसाचाराचे विक्रमी गुन्हे घडतात. मेक्सिको देश अशा गुन्ह्यासाठी नेहमी चर्चेत असतो. ग्वाटेमालामध्ये अशा प्रकारच्या गुन्ह्याचा चढता आलेख. ग्वाटेमालामध्ये एलजीबीटी समुदायाविरोधात लक्ष्यकेंद्री हल्ल्यात वाढ झाली आहे.

2021च्या अर्थसंकल्पात महिला सुरक्षा आणि मानवी हक्कासाठीची धोरणे असमाधानकारक होती. मानवी हक्काच्या लोकपाल कार्यालयाकडे एलजीबीटीआयक्यू अधिकारांच्या रक्षणाची जबाबदारी आहे. गेल्या शनिवारी ग्वाटेमाला सिटीच्या मध्यवर्ती प्लाझामध्ये झालेल्या एका निदर्शनात ३० वर्षीय ट्रान्सजेंडर वेलास्केज म्हणते, “आताच्या बजेटमध्ये आमचे अस्तित्वच नाही.

अल जझिराच्या मते, चालू वर्षी ग्वाटेमाला सिटीत १८ ट्रान्सजेंडरचा बळी गेला आहे,  तर गेल्या चार वर्षांत एकूण ८९ जणांचा मृत्यू झाला आहे. वेलास्केजचा आरोप आहे की, “बहुतेक लोकांसाठी लैंगिक वासना शमवण्यासाठी एकमेव पर्याय म्हणून आम्हाला सोडून देण्यात आलेले आहे. लिंग आधारित भेदभाव नेहमीचाच झाला असून रोजगाराच्या बहुतेक संधींमधून आम्हाला वगळले आहे.

वाचा :‘मोलदोवा’मध्ये लोकशाही समर्थकांचा हल्लाबोल

वाचा : गर्भपात बंदीवरून पोलंड रस्त्यावर

मीडिया रिपोर्टचा आधार घेतल्यास दिसते की, ग्वाटेमालामध्ये स्त्रियांना सतत भेदभावाचा सामना करावा लागतो. जवळपास अर्ध्या रहिवाशांचा इतिहास वंशविद्वेषाच्या विकृत हिंसाचाराशी जोडला गेला आहे.

बजेट बिलविरोधात उडालेला हाहाकार मूलभूत राजकीय सुधारणांसाठी आग्रही झाला आहे. सामाजिक वर्तन व महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची मागणी करत आहे. दर शनिवारी ग्वाटेमालामध्ये होणाऱ्या या सांकेतिक प्रोटेस्ट मार्चला निवडक माध्यमांनी प्रसिद्धी दिली असली तरी तो बेदखल झालेला नाही.

रॉयटर्स न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, ग्वाटेमाला सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की, “राष्ट्रपती सर्वसमावेशक संवादासाठी पूर्णपणे तयार आहेत. परंतु आंदोलकांचा आरोप आहे की ते चर्चेपासून पळ काढत आहेत.

ग्वाटेमालातील महिलांनी राष्ट्रपती भवनाबाहेर ठिय्या मांडला आहे. इथे उपस्थित असलेल्या मरिना रॉड्रिग्ज यांनी अल जझीराला सांगितले, “येथे बरेच भेदभाव आणि वंशभेद आहेत. ही पुरुषप्रधान, वर्गवादी आणि वर्णद्वेषाची व्यवस्था अवमान करते आणि गुन्हेगार ठरवते.

रॉड्रिग्ज सरकारतर्फे स्थापित झालेल्या संवाद समितीतील महिला नेत्यांपैकी एक आहेत. त्या म्हणतात,  आम्हाला आता घाबरायची गरज नाही. आम्ही आता संघटित झालो आहोत, परंतु राष्ट्रपती आपले म्हणणे ऐकत नसल्यामुळे आम्हाला आणखी एक होणे आवश्यक आहे.

२२ वर्षीय विद्यार्थिनी मारिया फर्नांड साल्दाना म्हणते, “आम्ही कंटाळलो आहोत. ते फक्त त्यांच्या फायद्यासाठी पैसे (टॅक्स) घेतात आणि सामान्य लोकांसाठी काहीही करत नाहीत."

लॅटिन अमेरिकन देशात आपूर्वीही महिलांनी लैंगिक हिंसेविरोधात संघटितपणे लढा दिलेला आहे. ग्वाटेमालामध्ये आता प्रतिकात्मक रूपाने का होईना जनचळवळ उभी राहत आहे. नव्या वर्षी ही मागणी आणखीन जोर धरणार आहे.

कलीम अजीम, पुणे

(सदरील लेख लोकमतच्या २४ डिसेंबर २०२०च्या अंकात प्रकाशित झालेला आहे)

जाता जाता :

पेरू देशात प्रो-डेमोक्रॅसी आंदोलन

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,38,किताब,24,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,297,व्यक्ती,21,संकलन,61,समाज,258,साहित्य,77,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: ग्वाटेमालात महिलांचा लैंगिक हिसेंविरोधात उद्रेक
ग्वाटेमालात महिलांचा लैंगिक हिसेंविरोधात उद्रेक
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgKZM9QL31c3jPyH0ajcUwxlVDCh3roJKajvdpBRkk4O5_0CLEsTH4zOQs93VL9a0P7L0IuX6ZOBDioEO16yarVGDi568-jU67OxUxyFO87V3Vd5nmwUN8vrRaE7VE9-QnJs9jL-uvnyYVp/w640-h426/Untitled.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgKZM9QL31c3jPyH0ajcUwxlVDCh3roJKajvdpBRkk4O5_0CLEsTH4zOQs93VL9a0P7L0IuX6ZOBDioEO16yarVGDi568-jU67OxUxyFO87V3Vd5nmwUN8vrRaE7VE9-QnJs9jL-uvnyYVp/s72-w640-c-h426/Untitled.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2020/12/blog-post_24.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2020/12/blog-post_24.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content