लॉकडाऊनमुळे जॉब लॉसचा सामना करत असलेल्या लाखों इंडोनेशियन तरुणांना एका कायद्यामुळे रोजगार जाण्याची भिती आहे. ५ ऑक्टोबरला पास झालेल्या ‘जॉब क्रिएशन लॉ’ विधेयकाचा गेल्या महिन्याभरापासून विरोध सुरू आहे.
गेल्या आठवड्यात इंडोनेशियात विद्यार्थ्यांचे भले मोठे आंदोलन झाले. विविध शहरात हजारों तरुणांनी कायद्याचा विरोध करत सहभाग घेतला. आंदोलकांना वाटते की, हा कायदा नव्या रोजगाराची निर्मिती करणार नसून तो आहे त्या नोकऱ्या हिरावून घेणार आहे. श्रमिकांना वाटते की हा कायदा त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करतो. स्थानिक व्यापाऱ्यांना भिती आहे की, व्यवसायावर त्याचा परिणाम होईल.
जकार्ता पोस्टच्या मते, ‘जॉब क्रिएशन’ कायद्यात सरकारने परदेशी गुंतवणूकदारासाठी अमाप सवलती जाहिर केल्या आहेत. कायदे व नियम शिथिल केले आहेत. त्यांच्यासाठी कररचनेत बदल केला आहे. परदेशी व्यवसायिकांना उद्योग करण्यासाठी विशेष पॅकेज देऊ केले आहे. शिवाय कंत्राटी कामगारांसाठी मर्यादा निश्चित केली आहे. बिझनेस रँकिंगमध्ये इंडोनेशियाची भूमिका सुधारण्याचे आश्वासन सरकारने दिले होते, त्याचा एक भाग म्हणून हा कायदा आणण्यात आला आहे.
वाचा : रिपब्लिक ऑफ थायलँडसाठीचा लढा
स्थानिक श्रमिक आणि तरुणांनी ‘आधुनिक गुलामगिरीचे प्रकार’ म्हणत कायद्याचा विरोध करत आहेत. शिवाय तो तात्काळ मागे घेण्याची मागणीदेखील त्यांनी केली. परदेशी उद्योजकांना सवलती देण्यापेक्षा देशाअंतर्गत लघु उद्योगाला संजिवनी द्यावी, नव्या उद्योगाला चालना द्यावी, विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण कराव्या, अशी इंडोनेशियन युवकांची मागणी आहे.
कायद्याला विरोध करत २ नोव्हेंबरला राजधानी जकार्तामध्ये मोठा जनसमुदाय राष्ट्रपती भवनपुढे एकत्र आला. श्रमिक कामगार, विद्यापीठ व शाळकरी विद्यार्थ्यानी कायदा मागे घेण्याची मागणी करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. मोर्चा शांततेत सुरू असताना अचानक त्याला हिंसक वळण लागले. काही संतप्त तरुणांनी सोडा वाटरच्या बाटल्या आणि दगड राष्ट्रपती भवनच्या दिशेने फेकले.
पोलिसांनी प्रतिकार करत विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला केला. त्यांना पांगविण्याचा प्रयत्न केला. अश्रूधूरांच्या नळकांड्या फोडल्याने परिसरात धुरांचे लोट पसरले. परंतु आंदोलकांनी आपली जागा सोडली नाही. बराच वेळ पोलीस आणि आंदोलकांत संघर्ष सुरू होता. या झटापटीत अनेक निदर्शक किरकोळ जखमी झाले. आंदोलनांच्या वेळी राष्ट्रपती जोको विडोडो भवनमध्ये उपस्थित नव्हते.
न्यूयॉर्क टाइम्सच्या मते शहरात अन्य ठिकाणी झालेल्या विरोध निदर्शनात काही आंदोलकांनी रात्रीच्या वेळी एका मेट्रो शेल्टर पेटवून दिले. आगीचे लोट इतके भयंकर होते की, सबंध परिसर ऑरेंज रंगाने प्रकाशमय झाला होता. काही सिनेमा थियटरलादेखील पेटवून देण्यात आले. इतकेच नाही तर सरकारी कार्यलयांनादेखील लक्ष्य करण्यात आले.
जकार्ता पोस्टच्या मते, आंदोलक शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर ठाण मांडून होते. देशातील विविध भागातून हजारों तरुण सरकारविरोधी मोर्चात सामिल झाले. अनेक ठिकाणी मोर्चांना हिंसक वळण लागले. इंडोनेशियाचे सुरक्षा मंत्री मुहंमद महफूद यांनी सरकारी मालमत्तेची नुकसान करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली.
कोरोना संकट व त्यात बेरोजगारीचे आव्हान या दोहोंत इंडोनेशिया भरडला जात आहे. कोरोनामुळे देशात १४,००० पेक्षा जास्त नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. चालू वर्षी देशाची अर्थव्यवस्था 20 वर्षांत प्रथमच मंदीत गेली आहे. अशावेळी सरकारने अर्थचक्र गतीमान करण्यासाठी नवे रोजगार निर्मिती करणे अपेक्षित होते. असे न करता, सरकारने परदेशी उद्योजकांसाठी पॅकेज देऊन स्थानिकांना दुय्यम वागणूक दिली, असा आरोप कामगार संघटनांनी केला आहे.
यापूर्वी ९ ऑक्टोबरला देशात प्रचंड मोठा मोर्चा निघाला होता. जकार्ता, जावासह प्रमुख शहरात ठिकठिकाणी हजारों तरुणांनी एकत्र येत कायद्याचा विरोध केला. ‘जॉब क्रिएशन लॉ’ मागे घेण्यासाठी देशभरातून अनेक कांमगार संघटना, विद्यार्थी व श्रमिकांनी सरकारला निवेदने दिली होती. परंतु मागण्याकडे दुर्लक्ष केल्याने पुन्हा आंदोलन करण्यात आले. हा मोर्चा मात्र निर्णायक ठरला.
श्रमिक आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आले. देशव्यापी विरोध प्रदर्शनानंतर सरकारने विधेयकात दुरुस्ती करण्याची ग्वाही दिली आहे. ५ नोव्हेंबरला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर कायद्याचा दुरुस्ती मसूदा तयार करण्यासाठी राष्ट्रपतींनी मान्यता दिली.
सरकारने कायद्यात त्रुटी असल्याचे मान्य केले. यासंबंधी एक सविस्तर निवेदन राज्य सचिवालयाच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्या आले आहे. जॉब क्रिएशन कायद्याचे पुनरावलोकन करून सदोष अंतिम मसुदा तयार होईल, शिवाय त्यातील त्रुटी दूर करू, अशी ग्वाही सरकारने दिली आहे.
जॉब क्रिएशन कायद्याचा सुधारित मसुदा कसा असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरकारने मागण्याकडे दुर्लक्ष केल्यास पुन्हा मोठे आंदोलन छेडू असा इशारा कामगार संघटना आणि विद्यार्थ्यांनी दिला आहे.
(सदरील लेख १२ नोव्हेंबर २०२०च्या लोकमत-ऑक्सीजनमध्ये प्रकाशित झालेला आहे)
जाता जाता
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com