गेल्या सोमवारी त्यांच्याविरोधात देशात जोरदार आंदोलन
झालं. राजधानी लीमा शहरात हजारों युवकांनी रस्त्यावर येऊन ‘हा माझा
राष्ट्रपती नाही’, ‘मेरिनो माझे राष्ट्राध्यक्ष नाही’, अशा
घोषणा दिल्या. राजधानीसह पेरूच्या अन्य प्रमुख शहरात सरकारविरोधी आंदोलनाचे लोण पसरले.
देशभरातील नागरिक माजी राष्ट्रपती मार्टिन व्हिजकारा
(५७) यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर आले. विरोधकांनी कट व षडयंत्र रचून सत्तेत अराजकता
माजवली, असा आंदोलकांचा आरोप होता.
९ नोव्हेंबरला देशात वर्तमान राष्ट्रपती ‘मार्टिन व्हिजकारा’ यांच्याविरोधात महाभियोग चालवण्यात आलं. अनियंत्रित भ्रष्टाचार, कोरोना काळात पुरेशा आरोग्य सुविधा पुरवण्यास सरकार असमर्थ ठरले, असे विविध आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले.
वाचा : बेलारूसी तरुणांचा हुकूमशाहीविरोधात जयघोष
वाचा : रिपब्लिक ऑफ थायलँडसाठीचा लढा
सत्तारूढ राष्ट्रपतीला पदावरून हटविण्यासाठी १०५
मेंबर ऑफ काँग्रेसने म्हणजे खासदारांनी मतदान केलं. अविश्वास प्रस्ताव जिंकताच संसदेनं
वर्तमान राष्ट्रपती व्हिजकारा यांचे सर्व अधिकार काढून घेतले. विरोधी पक्षातील ज्येष्ठ
नेते या नात्याने मैनुअल मेरिनो यांची अंतरिम राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली.
निवडीनंतर मेरिनो यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या
संदेशात म्हटलं, “नियमांना अनुसरून अंतरिम राष्ट्रपती पद ग्रहण केलं
आहे. मलादेखील अन्य लोकांसारखे देशहित हवं आहे.”
या निवडीचा विरोध करत नव्या अध्यक्षांविरोधात हजारो
युवकांचं जनांदोलन उभं राहिलं. सोमवारी रात्रीतून देशभरात सरकारविरोधी मोर्चे, आंदोलनं, निदर्शनं
सुरू झाली.
आंदोलकांनी नव्या अध्यक्षांवर तख्तपालटाचा आरोप
केला, काँग्रेसने (खासदारांनी) सरकारविरोधातील षडयंत्रात
भाग घेतला, काँग्रेसनं घटनात्मक आदेशाचं उल्लंघन केलं, जनप्रिय
सरकारविरोधात हा कट आहे, जुने सरकार पुन्हा बहाल करावं, अशी
त्यांची मागणी होती. परंतु काळजीवाहू सरकारनं आंदोलकांना दाद न देता त्यांच्याविरोधात
सक्तीचं धोरण अवलंबलं.
दि गार्डियनच्या मते देशभरात सरकारविरोधी आंदोलनाचे
तीव्रता पहायला मिळत होती. अनेक ठिकाणी युवक व नागरिक रस्त्यावर येऊन नव्या अध्यक्षांविरोधात
घोषणा देत होते. थॉमसन रॉयटर्सच्या मते देशात ठिकठिकाणी नव्या राष्ट्रपतींच्या विरोधात
पोस्टर लावण्यात आले. काहींनी मेरिनोची तुलना घुसखोर म्हणत कोरोनाव्हायरसशी केली.
अपदस्थ राष्ट्रपतीच्या समर्थनार्थ प्रमुख शहरातील
बाजारपेठा बंद करण्यात आल्या. लीमा जिल्ह्यातील सगळीच आपली दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी
नव्या सरकारला आपला विरोध दर्शवला. सत्तेत नसलेल्या प्रमुख नेत्यांनी जनतेला पेरुव्हियन
लोकशाहीच्या बचावासाठी रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलं.
मंगळवार ते रविवार असे सहा दिवस हे आंदोलन सुरू
होतं. अल झजिराच्या मते अनेक ठिकाणी जाळपोळ झाली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी
ठिकठिकाणी बळाचा वपर केला. विरोधकांचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारने ठिकठिकाणी अतिरिक्त
कुमक पाठवली.
वाचा : नेतन्याहू गो जेल' इस्रायलमध्ये हुकूमशाहीविरोधात एल्गार
वाचा : सुदानमध्ये अब्राहम अक्रॉड्सचा विरोध
पोलीस रबरच्या गोळ्या आणि टीअर्सचा वापर करत होते.
गेली सहा दिवस निदर्शक व पोलीस यांच्यामध्ये चकमक सुरू होती. गार्डियन म्हणते, पोलिसांनी
निदर्शकांना ढाली आणि चाकूच्या दांडक्यांनी मारहाण केली.
ह्यूमन राइट वॉच या मानवी हक्क संघटनेच्या मते, विरोध
प्रदर्शनात पोलिसी बळामुळे १०० पेक्षा अधिक आंदोलक जखमी झाले असून ४१ जण बेपत्ता झाले.
तर दोन जणांचा मृत्यू झाला.
शनिवारी झालेल्या दोघांच्या मृत्युनंतर सरकारवर
राजीनाम्याचा दवाब वाढला. रविवारी नवनियुक्त राष्ट्रपती मैनुअल मेरिनो यांनी अखेर आपल्या
पदाचा राजीनामा दिला.
मेरिनो ‘पॉप्युलर एक्शन’ या उजव्या राजकीय पक्षाचे नेते आहेत. त्यांचा
पक्ष संसेदत विरोधी बाकावर बसतो. त्यांनी यापूर्वी सप्टेंबरमध्ये सरकारविरोधात अविश्वास
प्रस्तावाचा अयशस्वी प्रयत्न केला होता. १८ सप्टेंबरला झालेल्या या मतदानात त्यांना
बहुमतासाठी ८७ मतांचा आकडा गाठता आला नव्हता.
पण दोन महिन्यांनी मात्र त्यांनी सत्ताधारी पक्षातील
खासदारांना विश्वासात घेत राष्ट्रपती व्हिजकारा यांना हटविण्यासाठी तब्बल १०५ मते गोळा
केली.
मार्टिन व्हिजकारा ‘पेरुव्हियन
फॉर चेंज’ या राजकीय पक्षाचे लोकप्रिय राष्ट्राध्यक्ष आहेत.
देशात येत्या एप्रिलला सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यातही व्हिजकारा यांच्या
बाजुने मतदारांचा कौल राहणार आहे, असे सर्वे प्रकाशित झालेले आहेत.
मीडिया रिपोर्ट्स सांगतात की, लोकशाही
व कल्याणकारी धोरणांसाठी ते प्रसिद्ध आहेत. सार्वजनिक हित डोळ्यासमोर ठेवून त्यांनी
विविध योजना राबविल्या आहेत. भ्रष्टाचारविरोधी मोहिमेवर नजर ठेवली. ज्यामुळे राजकीय
उलथापालथ होऊन काँग्रेसमध्ये वारंवार संघर्ष झाला.
दुसरीकडे येत्या निवडणुकीतही सत्तेची सुत्र आपल्याकडे
येणार नाही, अशी भिती विरोधकांना वाटते. त्यातून तख्तपालटाचा
खट रचला गेला, असा पेरुवियन नागरिकांचा आरोप आहे.
याउलट विरोधकांनी सरकारवर अनियंत्रित भ्रष्टाचाराचा
ठपका ठेवला आहे. विशेष म्हणजे एप्रिलमध्ये डाव्या पक्षाचे दोनदा राष्ट्राध्यक्ष राहिलेल्या
‘एलन
गार्सिया’ यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराच्या
आरोपांची चौकशी सुरू होती. चौकशीसाठी पोलीस घरी येताच त्यांनी आपल्या बंदुकीने स्वतला
शूट करून घेतलं.
व्हिजकारा यांचे देशाच्या कारभारावर लक्ष नाहीये.
त्यामुळे त्यांनी सरकार सोडावे, असा विरोधकांचा आरोप आहे. पण देशातील जनतेचा व्हिजकारा
यांना पाठिंबा आहे.
आपल्या आवडीच्या राष्ट्राध्यक्षांना खुर्चीवरून
पायउतार करणे, जनतेच्या रोषाला कारणीभूत ठरले. त्यातून सहा दिवसांची
सत्ता उपभोगलेल्या मैनुअल मेरिनो यांना अखेर खुर्ची सोडावी लागली. पुढे काय होईल, या संदर्भात
अनिश्चितता असली तरी तुर्त पेरुवियन नागरिकांच्या लढ्याला यश आलं असं म्हणता येईल.
(सदरील लेख १९ नोव्हेंबर २०२०च्या लोकमत-ऑक्सिजनमध्ये प्रकाशित झालेला आहे)
जाता जाता

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com