इजिप्तमध्ये नादिन अशरफ या तरुणीचे एक इन्स्टा अकाऊंट सध्या चर्चेत आहे. न्यूयॉर्क टाइम्स सारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्र समूहाने तिच्यावर दोन स्पेशल फिचर केले आहेत. एका बड्या मीडियाने स्टोरी केली म्हणजे काहीतरी विशेष नक्कीच आहे.
राजधानी कैरो शहरातील दक्षिण भागात राहणारी २२ वर्षीय
नादिन अशरफ फिलोसॉफीची रिसर्च स्टुडैंट आहे. अमेरिकन विद्यापीठात ती शिकते. जुलै महिन्यात
‘असॉल्ट
पोलीस’ नावाने
इन्स्टाग्राम अकाऊंट तिने सुरू केले. त्यावर पहिली पोस्ट केली, ती अशी “अहमद
बासम झाकी याने ज्या-ज्या मुलींना त्रास दिला, ब्लॅकमेल केले, मारहाण
केली, छेडछाड केली आणि बलात्कार केला त्यांनी मॅसेज करावे.”
काही तासातच बलात्कार केल्याचा दावा करणाऱ्या महिलांकडून अनेक
मेसेज आले. अहमदने केलेल्या सेक्युअल हरॅसमेंटच्या अनेक तक्रारी घेऊन पडत होत्या. स्क्रीन
शॉट, चॅट, मार्फ केलेले फोटो इत्यादी धडकत होते. लैंगिक हल्ल्याला बळी पडलेल्या अनेक
मुली भरभरून बोलत होत्या. आपल्या वेदना मांडत होत्या. वीडिओ, टेक्स्ट, मीम्सच्या माध्यमातून
तक्रारींचा ओघ सुरू होता.
संबंधित तक्रारी घेऊन ती पोलिसात गेली. पोलिसांनी
एक्शन घेण्यास टाळाटाळ केली. कारण, अहमद हा कैरो शहरातील बड्या उद्योगपती असामीचा मुलगा.
पैसा, रुबाब व ऐशोआरामात वाढलेला हा मस्तवाल तरुण. सोशल मीडियातून अल्पवयीन मुलींना
गाठायचा. त्यांच्यावर प्रभाव पाडायचा. भेटायला बोलवायचा. कोल्ड्रीक्स, कॉफीमध्ये गुंगीचे
ओषधं घालायचा.
वाचा : सुदानमध्ये अब्राहम अक्रॉड्सचा विरोध
कसे सुरू झाले कॅम्पेन?
न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणते,
“परिक्षेच्या आदल्या दिवशी
मी पेज सुरू केले. पहिल्याच दिवशी ३० मॅसेज आले. दिवसभर नोटिफिकेशन येत राहिले. परिक्षेत
असतानाही मला पेपरची कमी पण त्या मॅसेजेसची अधिक काळजी वाटायची.”
इजिप्शियन स्ट्रीट नावाचे वेबपोर्टलला दिलेल्या
मुलाखतीत नादिन म्हणते, “प्रत्येक तक्रारीत, असहायता, लाचारी, हिंसा व क्रूरता दिसून
आली. सुरुवातीला मला प्रचंड राग यायचा. अत्याचाराचे असंख्य मॅसेज डोक्यात गोंगाट करायचे.
काय होतेय काहीच कळत नव्हते. डोकं शांत ठेवून मी ठरवले की त्या पीडितांना भेटायचे.
एका निनावी ठिकाणी मी त्यांना भेटले. प्रत्येकांच्या कथा भयानक होत्या.”
तक्रार घेण्यात पोलिसांकडून
मिळत असलेल्या नकारानंतर नादिनने अनेक
सेलिब्रिटी, प्रतिष्ठित मान्यवर जोडून घेतले. अत्याचाराच्या असंख्य तक्रारी व दबावामुळे
पोलिसांना केस फाईल करण्यास भाग पडले. आठवडाभरातच अहमदला अटक झाली. काही दिवसातच खटला
कोर्टात. अल्पवयीन मुलींना धमकावणे, लैंगिक अत्याचार करणे असे गंभीर आरोप त्याच्यावर
ठेवण्यात आले. वायरल मीम्स, बातम्या, फॉलोअपमधून खटला चर्चेत आला.
२१ वर्षीय अहमदने सोशल मीडियाच्या माध्यमातून सहा
महिलांशी संपर्क साधल्याची कबुली कोर्टात दिली. मुलींकडून फोटो मिळवत त्यांना धमकावले असेही तो
म्हणाला. सरकारी वकिलांनी त्याच्यावर किमान तीन महिलांविरुद्ध लैंगिक हल्ला केल्याचा
आरोप ठेवला.
इकडे इन्स्टाच्या ‘असॉल्ट पोलीस’ अकाऊंटच्या लोकप्रियतेत वाढ होत होती. आठवडाभरात ७० हजार फॉलोव्हर्स झाले. अनेकजणी आपापल्या भयकथा सांगत होत्या. सगळ्यांच्या कथा भयानक, हिंसक व क्रूरतेच्या सीमा पार करणाऱ्या होत्या. अहमदच्या निमित्ताने इजिप्शियन महिलांनी कौटुंबिक हिंसा, बलात्कार आणि वैयक्तिक हल्ल्याविरोधात मौन तोडले होते.
वाचा : ब्राझीलमध्ये महिला जर्नलिस्टचा का होतोय लैंगिक छळ?
विकृत रेप कल्चर
या एकूण प्रकरणावर इजिप्शियन लेखिका ‘सलमा अल-वार्धेनी’ यांनी
बीबीसीवर गेल्या आठवड्यात एक लेख लिहिला. त्या म्हणतात, “इजिप्तमध्ये माझ्या ओळखीच्या प्रत्येक स्त्रीकडे
लैंगिक छळ, हल्ला किंवा बलात्काराची कहाणी आहे. या देशात
स्त्रियांसाठी कपड्यांची स्टाईल निवडण्यास कमी पर्याय आहेत पण प्रत्येक स्त्री स्वत:च्या संरक्षणाविषयी अनेक पर्याय राखून असते.”
लेखात रोथा बेगम म्हणतात, ”या देशात
तुम्ही बलात्काराची तक्रार करण्यासाठी किंवा साक्षीदार म्हणून पुढे आलात तर तुम्हालाच
अटक होण्याचा धोका अधिक आहे.”
न्यूयॉर्क टाइम्सनं दोन
विशेष लेख लिहून इजिप्तमधील विकृत रेप कल्चरवर प्रकाश टाकला आहे. एका लेखात
नादिन म्हणते, “मला लढण्याची प्रेरणा घरातून
मिळाली. माझे आई-वडिल २०११ साली होस्नी मुबारक यांच्या सत्तेविरोधात रस्त्यावर उतरले.
त्यावेळी मी लहान असले तरी जे काही सुरू आहे ते कळत होते. कमी वयात मी सार्वजनिक आयुष्य,
चळवळ व लोकलढे पाहिले. आजही सत्ताधाऱ्याविरोधात आमचा संघर्ष सुरू आहे. मी पीडित महिलांना
बोलते करू शकले याचे समाधान वाटते.”
इजिप्शियन पुरुषी मानसिकतेविरोधात बीबीसीच्या लेखात सलमा यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांच्या मते, “आता स्त्रिया आणि मुली मौन तोडत आहेत, त्यांच्या हल्ल्याच्या कहाण्या सोशल मीडियावर शेअर करत आहेत, एकमेकांना सक्षम करत आहेत आणि न्यायाची मागणी करत आहेत.”
वाचा : लैंगिक अत्याचाराला रोखणारी यूएन पोलीसविमेन
वाचा : फेमिनिस्ट चळवळीची स्टार सुलीचा एकाकी अंत
असा झाला बदल
अहमदचा खटला सुरू असताना
सरकारने जुलैमध्ये तडकाफडकी लैंगिक अत्याचारासंबधी कायदेशीर सहकार्य करणारे एक विधेयक
मांडले. अल अझहर या प्रतिष्ठित विद्यापीठाने महिलांच्या लढ्याला प्रोत्साहन देणारे एक निवेदन प्रसिद्ध केले. त्यात
म्हटले “मौनामुळे मानवी समाजाला धोका निर्माण झाला आहे,
हे मानवी हक्काचे उल्लंघन आहे.”
न्यूयॉर्क टाइम्स म्हणते
की, हे निवेदन शहरातील प्रत्येक मस्जिदीत वाचून दाखवण्यात आले. “स्त्रियांची वेषभूषा काहीही असो, त्यातून त्यांच्या
गोपनीयता, स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठेवर हल्ला करण्याचे कारण
ठरू शकत नाही." असा त्यात संदेश होता.
न्यूयॉर्क टाइम्स म्हणते की मस्जिदीत इमाननी वाचलेले
हे निवदेन क्रांतिकारी ठरले. त्यातून पीडित स्त्रियांना व्यक्त होण्याचा, पुरुषांविरोधात
बंड करण्याचा आत्मविश्वास प्राप्त झाला. बीबीसी म्हणते छेडछाडीच्या बळी ठरलेल्या स्त्रियांसाठी
‘असॉल्ट पोलीस’ एक टर्निंग
पॉइंट ठरले.
चळवळीला लीड करणारी प्रतिष्ठित
ब्लॉगर व सेलिब्रिटी सबाह खोदिर बीबीसीला म्हणते, “२०१७ साली जगभरात मीटू
चळवळ सुरू झाली. पण आमच्या देशात अत्याचारित
महिला काहीच बोलत नव्हत्या. आज त्या नुसत्या बोलत नाहीत तर आम्ही प्रशासनावर दबाव टाकण्यात
यशस्वी झालो आहोत.”
न्यूयॉर्क टाइम्सच्या मते, देशात कायदेशीर व्यवस्था
असूनही, कुटुंबांकडून स्त्रियांना छळवणूक मिळते. तथाकथित
‘ऑनर किलिंग’ अजूनही घडत असले तरी इजिप्तच्या स्त्रिया आणि मुली
पूर्वीपेक्षा अधिक बिनधास्तपणे बोलत आहेत.”
बीबीसीच्या मते, “इजिप्तमध्ये कौटुंबिक हिंसाचाराचे
प्रमाण अधिक आढळते. २०१३ साली संयुक्त
राष्ट्रसंघाच्या स्त्रियांनी केलेल्या एका अभ्यासात असे सूचवण्यात आले की, ९९ टक्के
इजिप्शियन स्त्रियांचा शाब्दिक किंवा शारीरिक छळ करण्यात आला होता.” पोलीस अधिकारी मारहाणीचे
गुन्हे नोंदवायला तयार नाहीत, असेही अहवालात नोंदवण्यात आले होते.
वाचा : लैंगिक छळाला समर्पित सिमोनचा ड्रेस
वाचा : सन्मान #MeToo कॅम्पेनचा
‘असॉल्ट पोलीस’ बनले इंधन
बीबीसी म्हणते, अहमदचे
प्रकरण इजिप्त देशात ‘फेमिनिस्ट रिवोल्यूशन’साठी इंधन म्हणून कामाला
आली. असॉल्ट पोलीस अकाऊंटवर
अनेक मीम्स, स्लोगन व हैशटैग पहायला मिळतात. #endthesilence #assaultpolice
#MeTooEgypt
हैशटैग, मीम्सची धूम अकाऊंटवर आहे.
असॉल्ट पोलीस या इन्स्टा अकाउंटचे सध्या २,००,०००
पेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे. मीडिया रिपोर्टच्या मते,
इजिप्तमधील स्त्रियांसाठी हे प्रमाण जास्त आहे,
त्यामुळे सध्याची ही चळवळ अधिक उल्लेखनीय
बनते.
या एका हायप्रोफाइल प्रकरणानंतर इजिप्तमधील लैंगिक
शोषणाला बळी पडलेल्यांच्या अनेक कथा प्रकाशित होत आहेत. न्यूयॉर्क टाइम्सने काही धक्कादायक
कथा मांडल्या आहेत. पीडितांनी नाव न छापण्याच्या अटीवर सार्वजनमिक ठिकाणी होत असलेले
घृणास्पद स्पर्श, डोळ्यांनी घोरण्याचे प्रसंग नोंदवले आहेत.
इन्स्टा पेजवर पोस्ट होणाऱे अनुभव वेदनादायी आहेत.
अनेक मुली, महिला कायद्यात सुधारणांची मागणी करत आहेत. तक्रारीतून पुरुषी मानसिकतेत
बदलांची मागणी जोमाने पुढे आलेली दिसते. तसेच जागतिक पातळीवर होत असलेल्या स्त्रियाविरोधात
लैंगिक छळाचे प्रकार थांबवण्याची मागणी करत आहेत.
(सदरील लेख ५ नोव्हेबर २०२०च्या लोकमतमध्ये प्रकाशित झालेला आहे)
जाता जाता

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com