‘टुलकिट’ प्रकरणातले वान्टेड तिघेजण कोण आहेत?


दिल्लीच्या सीमेवर तीन महिन्यापासून सुरू असेलेल्या शेतकरी आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत आहे. काही प्रतिष्ठित इंटरनॅशनल सेलिब्रिटींनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत जगाला अपील कली आहे की भारतातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे.

भारतातील भाजप सरकारने या कृती देशाच्या अंतर्गत बाबीत हस्तक्षेप म्हणटले आहे. जगात भारताची छवी खराब करण्यासाठी या सेलिब्रिटींना आयात केले, असा सरकारचा दावा आहे. सरकार समर्थित आय-टी सेलने आणखी काही दावे केले आहेत. त्यावरून सध्या भारतातील राजकारण चांगलच तापलेलं दिसतं.

ग्रेटा थनबर्ग नावाच्या एका पर्यावरण एक्टिविस्टवर गुन्हा दाखल केला आहे. शिवाय कोणाच्या मदतीने त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, याचा शोध घेऊन त्यांना गुन्हेगार ठरवले जात आहे. सरकराच्या या कृतीची देशभरातून टीका केली जात आहे. सरकारच्या दडपशाही धोरणांचा समाचार घेतला जात आहे.    

दिल्ली पोलिसांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या अनेक तरुणांच्या अटका केल्या आहेत. त्यात नवीन अटक दिशा ए. रवि या पर्यावरणवादी कार्यकर्तीची आहे. त्याशिवाय अन्य दोघेजण पोलिसांना वान्टेड आहेत. पोलिसांनी आणखी काहीजणांची नावे जाहिर केली. त्यापैकी शांतनु मुळूक हा बीडचा उच्चशिक्षित तरुण तर निकिता जेकब ही मुंबई हायकोर्टात प्रॅक्टिस करणारी तरुण तडफदार वकिल.

वाचा : बॉबी वाईन : युगांडामध्ये सत्तासंघर्षाचा युवा चेहरा

वाचा : थायलँडमध्ये लोकशाहीसाठी ‘बदक क्रांति’

वाचा : नव्या वर्षांतही जनसंघर्षाचा ट्रैंड कायम

दिशा ए रवि

दिशा ही पर्यावरण कार्यकर्ती. बंगळुरूमधील अनेक पर्यावरण बचाव आंदोलनात ती सक्रीय आहे. दोन-तीन वर्षापूर्वी झाडे वाचवण्याच्या मोहिमेतून ती एक चेहरा म्हणून पुढे आली. गेल्या चार-पाच वर्षांत स्थानिक पातळीवर तिने अनेक चळवळी राबवल्या.

बंगळुरूच्या माउंट कार्मेल कॉलेजमधून तिचे शिक्षण झाले. नेमकी किती व कुठले शिक्षण झाले, याबद्दल माहिती मिळू शकली नाही. आई-बापाची ती एकच मूल. शेतकरी कुटुंबात ती वाढलेली. पर्यावरण, जलसंधारण व अन्य विषयावर तिने अनेक लेख लिहिले आहेत. वोग सारख्या प्रतिष्ठित मासिकेने तिच्यावर प्रोफाइल केली होती. 2018 पासून ती सक्रियपणे पर्यावरणावर काम करते.

तरुण कार्यकर्ते, मानवी हक्क संघटना व आणि इतर अधिकारासंर्भात सहानुभूती बाळगणारे एक चळवळ्या गटांचा हा ग्रूप. शिवाय स्थानिक पतळीवर होणाऱ्या विविध आंदोलनात तिचा सहभाग हमखास असायचा.

22 वर्षीय दिशाची एक प्रामाणिक व कटिबद्ध संघटक म्हणून जनचळवळीत ओळख आहे. तिच्या सहकाऱ्याच्या मते तिने कधीही कायदा मोडला नाही किंवा कधीही असंविधानिक वर्तन केलेलं नाही. मित्रांच्या ग्रपूपमध्ये विनोदवीर म्हणून तिला बहुमान लाभला आहे.

बेंगलुरू सिटिजन मॅटर्सला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणते, आमचा हा ग्रूप म्हणजे आंदोलकांचा, घटनात्मक मार्गाने पर्यावरणावर काम करणारा. दर रविवारी, शुक्रवारी शहरातील रस्त्यावर सिग्नलला उभे राहून लोकांना वृक्षारोपण व पर्यावरणासंबंधी जनजागृती करतो.

फ्रायडे फॉर फ्यूचर इंडियानामक मोहिमेची ती संस्थापक आहे. ही संघटना तशी स्वीडीश. 150 देशात यांचे युनिट्स आहेत. पर्यावणविद् ग्रेटा थनबर्ग ही याच कॅम्पेनचा एक स्वीडिश चेहरा आहे. दिशा भारतातील युनिट्समध्ये कार्यरत आहे. 2018ला ज्यावेळी ग्रेटा जगभरात चर्चेला आली त्यावेळी दिशा या कॅम्पेन भारतीय कॉर्डिनेटर आहे.

देशातील पर्यावरणाचा हानीसंदर्भात ती अधिकच सतर्क होती. दि गार्डियनला दिलेल्या प्रतिक्रियेत ती म्हणते, आम्ही फक्त आपल्या भविष्यासाठी लढा देत नाही तर आपल्या वर्तमान परिस्थितीसाठीदेखील लढत आहोत. आम्ही, सर्वाधिक पीडित लोकांमध्ये हवामानासंबंधी  चर्चात्मक  बदल घडवून आणणार आहोत. सरकारच्या नफ्यासाठी नव्हे तर जनतेसाठी फायदेशीर ठरणाऱ्या पुनर्प्राप्ती योजनेचे नेतृत्व करणार आहोत.

पर्यावरण संदर्भात जनजागृती व भाषणे देण्यासाठी तिने परदेशवाऱ्या देखील केलेल्या आहेत. पर्यावरणावर काम करत असताना तिने मांसाहार सोडला. पूर्णपणे शाकाहारी झाली. मानवी अन्नासाठी प्राण्याची हत्या करणे, हे तिला मान्य नव्हते. दुधापासून उत्पादित करणाऱ्या एका वीगन दूध नावाच्या स्टार्ट अप कंपनीत ती काम करते. घरात कमवणारी ती एकटीच सदस्य आहे.

बंगळुरू शहरातील रस्ता रुंदीकरणात झाडे कापण्यात येणार होती. ही झाडे कापू नये, अशी जाहिर भूमिका घेतली. त्यासाठी लोकसमर्थन मिळवण्यासाठी दिशानेसह्याची मोहिमही राबवली. दर शुक्रवारी शहरातील शालेय विद्यार्थी, सर्व पर्यावरणवादी कार्यकर्त्यांची एक बैठक होते. बऱ्याचदा विविध देशातील प्रतिनिधी ऑनलाइनमार्फेत त्यात सामील होतात. बैठकीत देशातील व राज्यातील, जगातील पर्यावरणविषयक समस्यांवर चर्चा व दिशानिर्देश तयार केले जातात.

वाचा : सुदानमध्ये अब्राहम अक्रॉड्सचा विरोध

वाचा : भूकबळीला रोखण्यासाठी कॅथरिन नकालेंबे अग्रेसर

वाचा : बालिकांच्या जीवावर उठणार हा सोमालियन कायदा!

वकिल असणारी निकिता

निकिता जेकब मुंबई हायकोर्ट प्रॅक्टिस करणारी वकिल. मुंबईतील एका ख्रिश्चन कुटुंबात ती जन्मलेली. राजकीयदृष्या सजग व तडफदार असे तिचे व्यक्तिमत्व. 30 वर्षीय निकिताने 2014 साली पुण्यातील आयएलएस लॉ कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. त्यानंतर तिने मुंबई हायकोर्टात प्रॅक्टिसला सुरुवात केली.

सोशल मीडियावरुन वायरल झालेल्या तिच्या ट्विटर अकाउंटच्या स्क्रीन शॉटवरून कळते की, पर्यावरण चळवळीत तिला रस आहे. कुठल्याही राजकीय पक्षाशी ती संबंधित नाही, असे तिने आपल्याबद्दल लिहिले आहे. कोर्टात फक्त नागरी प्रकरणे ती हाताळते. कोर्टातील तिच्या सहकाऱ्यांच्या मते पर्यावरण संदर्भात ती अधिक सजग असते.

निकिता सामाजिक न्याय आणि पर्यावरण संरक्षण प्रकरणी आवाज उठवणारी कार्यकर्ती आहे. ती स्वत:ला लेखिका आणि गायक म्हणून इंट्रोड्यूस करते. फोटोग्राफी व कुकींग तिचे छंद आहेत.

एका कायदाविषयक फर्मसोबत ती काम करते. ही फर्म मुंबई हायकोर्टात नागरी व दिवाणी दावे स्वीकारण्याचे काम करते. दिल्ली पोलिसांनी दावा केलेला आहे की, ती आम आदमी पक्षाशी संबंधित आहे. परंतु पक्षाच्या मुंबई प्रवक्त्या प्रीती शर्मा मेनन यांनी आपशी तिचा कुठलाही संबंध नसल्याचे जाहिर केले.

दिल्ली सायबर सेलने निकिताची सोशल मीडिया अकाउंट ब्लॉक केलेली आहेत. निकिताचे नातेवाईक व मित्रांच्या मते तिने काही दिवसापूर्वी तक्रार केली होती, तिच्या सोशल मीडिया प्रोफाइलचा ट्रोलर्सकडून गैरवापर केला जात आहे. दिल्ली पोलिसांना बहुचर्चित टुलकिट प्रकरणात ती वान्टेड आहे, पोलिसांच्या मते ती दिशा ए. रवि सारखी टुलकिटची एडिटर आहे.

वाचा : सोमालियाची पॅशनेट ब्रॉडकास्टर नैलाह

वाचा : अला सलाह: सुदानी राज्यक्रांतीची नायिका

वाचा :‘मोलदोवा’मध्ये लोकशाही समर्थकांचा हल्लाबोल

शेतकरी शांतनू

दिल्ली पोलिसांचा दावा आहे की, बीडचा शांतनू मुळूक हादेखील टुलकिटचा एक एडिटर आहे. शांतनू हा उच्चशिक्षित तरूण आहे. बीडमधील एका शेतकरी कुटुंबात त्याचा जन्म झालेला आहे. शांतनू बी. ई. मॅकेनिक आहे. तसेच अमेरिकेत एमएसची पदवी त्याने घेतली आहे.

अमेरिकेत असताना त्याने नोकरी केली. दोन वर्षापूर्वी तो भारतात परतला होता. त्याला ओळखणाऱ्या बीडच्या काही मित्रांच्या मते इथे आल्यानंतर त्याने इन्व्हायरमेंट सायन्समध्ये शिक्षण घेतले. औरंगाबादमध्ये एका कंपनीत काही दिवस नोकरी केल्यानंतर तो पुण्यात आला. पुण्यात पर्यावरण संवर्धनासंदर्भात एका संघटनेत तो काम करत होता. त्याचा चुलतभाऊ एक राजकीय पक्षाचा जिल्हा पदाधिकारी आहे.

शांतनूच्या कुटुंबाला ओळखणाऱ्या काही जणांच्या मते त्याचे आई-वडिल शेतकरी आहेत. बीड शहरात राजकीय वर्तुळात त्यांचा वावर आहे. त्याच्या वडिलांच्या मते शांतनू पर्यावरण एक्टिविस्ट आहे. शहरातील डोंगर, वृक्ष तोडीच्या विरोधात तो होता. शेतकरी आंदोलनाला त्याने पाठिंबा दिला होता.

दिल्ली पोलिसांच्या मते शांतनू पुण्यात राहतो. पोलिसांचा दावा आहे की, तो पुण्यातील एसआर चॅप्टर संघटनेत कार्यरत आहे. त्याच्या बीडच्या मित्रांच्या मते, आंदोलन-चळवळी करणाऱ्या घरात त्याचा जन्म झाला असल्याने तो पट्टीचा कार्यकर्ता आहे. केंद्र सरकारच्या शेतीविषयक धोरणासंदर्भात तो नाराज होता. शेतकरी आत्महत्या हा त्याच्या चिंतेचा विषय. जल संधारण व वृक्ष संगोपनाच्या बाबतीत तो नेहमी सांगत. पर्यावरण संबंधी अनेक संघटनांमध्ये त्याच्या मताला आदर आहे.

वाचा : नेतन्याहू गो जेल' इस्रायलमध्ये हुकूमशाहीविरोधात एल्गार

वाचा :‘मोलदोवा’मध्ये लोकशाही समर्थकांचा हल्लाबोल

वाचा : कोरोना संकट : व्हर्च्युअल मार्केट घेणार स्पॅनिश तरुणांची परीक्षा

सरकारचा आरोप

टुलकिट प्रकरणात दिल्ली पोलिसांना हवे असलेले निकिता व शांतनू सध्या कुठे आहेत, हे त्यांच्या कुटुंबियांना माहीत नाही. केंद्र सरकारच्या पर्यावरणविषयक धोरणासंदर्भात थेट टीका केल्याने त्यांच्यावर पाळत ठेवली जात होती. या सबंध चर्चेत फ्रायडे फॉर फ्यूचर इंडिया केंद्रस्थानी आहे. संघटनेच्या वेबसाइटवरून कळते की, क्लायमेट चेंज व पर्यावरण रक्षणाच्या संदर्भात शांतता व अहिंसक मार्गाने प्रयत्नशील राहणे, हे या मोहिमेचे उद्दिष्टे आहे.

सहा महिन्यापूर्वी ही वेबसाइट व संबंधित कॅम्पेन चालवणारे केंद्र सरकारच्या रडावर आले. फ्रायडे फॉर फ्यूचर या संघटनेनं केंद्र सरकारने मार्च 2020ला जारी केलेल्या इन्वहायरमेंट इम्पैक्ट एसेसमेंट, (EIA) अधिसूचनेला विरोध दर्शवत एकाच अनेक मेल पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांना पाठवली होती. त्यानंतर जुलै 2020मध्ये सरकारने फ्रायडे फॉर फ्यूचर वेबसाईला ब्लॉक करण्याचे निर्देश दिल्ली पोलिसांना दिले होते.

जावडेकर यांनी दिल्ली पोलिसांना निर्देश दिला की, फ्रायडे फॉर फ्यूचरवेबसाइटला ब्लॉक करा आणि याच्या संचालकांवर दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत कार्रवाई करा. या संदर्भात दिल्ली पोलिसांनी 7 जुलै 2020ला काढलेल्या एका नोटिशीत पोलिसांनी दावा केला आहे की, या वेबसाइटवर अनेक आक्षेपार्ह बाबी आहेत, जी देशाच्या सार्वभौमिकतेला नुकसानकारक आहेत.

भाजप सरकारने पर्यावरण संदर्भातले असे अनेक निर्णय घेतले आहेत, ज्यावरून बराच गदारोळ माजलेला आहे. या निर्णयाविरोधात अनेक ठिकाणी आंदोलने व मोर्चे काढली गेली. सरकारी धोरणांना विरोध केला म्हणून देशात अनेक सामाजिक कार्यकर्ते, संघटना व त्यांच्या समर्थकांना अटक केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून या अटका  होत आहेत. सरकारने असंतुष्ट आवाज दाबण्यासाठी देशद्रोहाला एक सधन म्हणून वापर केला आहे. सरकारच्या या कृतीचा अनेक स्तरातून तीव्र निषेध कला जात आहे.

(सदरील लेख 18 फेब्रुवारी 2021च्या लोकमत ऑक्सिजनमध्ये संपादित स्वरूपात प्रकाशित झालेला आहे. त्याचा हा पूर्ण भाग.)

कलीम अजीम, पुणे

मेल-kalimazim2@gmail.com

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,38,किताब,24,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,297,व्यक्ती,21,संकलन,61,समाज,258,साहित्य,77,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: ‘टुलकिट’ प्रकरणातले वान्टेड तिघेजण कोण आहेत?
‘टुलकिट’ प्रकरणातले वान्टेड तिघेजण कोण आहेत?
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjhqfjynCBT34LetOmRXkmG9BXlcV0jR_AROhPziKmZ5yaSp8UkFgqxRBA8VYFPMNzYv9AuJPJQs-iUzdHxFJ7v_pthrLiRH9h4Y2jQMUl_LoP7ezMwA5bOIgoFFdCXoA3Ax_V5Gip_aCmW/w640-h400/thequint_2021-02_ca729f34-3c4c-464f-bc1c-8d0a4b233995_bigstory_eng_9.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjhqfjynCBT34LetOmRXkmG9BXlcV0jR_AROhPziKmZ5yaSp8UkFgqxRBA8VYFPMNzYv9AuJPJQs-iUzdHxFJ7v_pthrLiRH9h4Y2jQMUl_LoP7ezMwA5bOIgoFFdCXoA3Ax_V5Gip_aCmW/s72-w640-c-h400/thequint_2021-02_ca729f34-3c4c-464f-bc1c-8d0a4b233995_bigstory_eng_9.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2021/02/blog-post.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2021/02/blog-post.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content