“आम्ही कामगार म्हणून जॉब मार्केटमध्ये
प्रवेश करणार आहोत. पण हा बाजार आमच्याबरोबर काय करेल, याबद्दल मी सध्या
काही सांगू शकत नाही. आज कोणताही घटक आमच्या भवितव्याबद्दल बोलताना का दिसत नाही?”
26 वर्षाची मॅड्रीड निवासी नीरेया गोमेझ स्पॅनिश सरकारला हा
प्रश्न विचारत आहे. प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या वलेन्सिया युनिव्हर्सिटीमधून तिनं
इकॉनॉमिक्सची पदवी घेतली आहे. सध्या ती पॉलिटेक्निकमध्ये पीएच.डी करत असून तिसऱ्या
वर्षांत आहे. नीरेयाला पडलेला हा प्रश्न जवळपास 6.5 दशलक्ष यूरोपीय तरुणांचे प्रतिनिधित्व
करतो.
आर्थिक मंदीची चाहुल
गेल्या तीन महिन्यांपासून यूरोपीय देशांना कोविड-19 रोगराईचा
भयंकर विळखा पडला आहे. इटली व स्पेन हे दोन देश संकटाच्या गर्तेत पुरती अडकली आहेत.
त्यात येऊ घातलेल्या जागतिक मंदीमुळे यूरोपचं कंबरडं मोडणार असं चित्र निर्माण झालं
आहे. elpais.com या वेबसाईटवर या संदर्भात एक विशेष रिपोर्ताज प्रकाशित झालेला
आहे. स्पेनच नव्हे तर सबंध यूरोप भविष्यात भयंकर आर्थिक संकटाला सामोरा जाईल अशी शक्यता
यात वर्तवण्यात आलेली आहे.
संबंधित रिपोर्टमध्ये अनेक धक्कादायक निरिक्षणे नोंदवण्यात आलेली
आहे. त्याचा आधार घेऊन आपण पुढची सगळी चर्चा करत आहोत. हा अहवाल सांगतो की कोरोना व्हायरस
व लॉकडाऊन काळात आज बहुसंख्य स्पेनियर्ड्स तरुणांना बेरोजगारीचं संकट छळत आहे. येणारा
काळ जॉब मार्केटमध्ये नवं तंत्र व नवे नियम विकसित करणारा असेल. तात्पुरते करार, नो डेजिगनेशन, कामाचे तास कमी, त्यावर आधारित सैलरी
व नोकऱ्यातील अनिश्चितता हे घटक शक्यतो येणाऱ्या काळात स्पॅनिश तरुणांच्या माथी मारले
जातील.
सीएनबीसीने देखील अशाच प्रकारचा एक रिपोर्ट जारी केला आहे. त्यात
म्हटलं आहे की, स्पेनमधील येणारी पिढी नोकरी व जॉब टिकवून ठेवणे, नवी उमेद आणि स्वप्न
पाहण्याच्या पात्रतेची नसेल. एल्पैस वेबसाईटवर तरुणांईपुढील नवी आव्हाने कशी असतील
यासंदर्भात काही लेख प्रकाशित करण्यात आलेले आहेत. बहुतेकांचा सूर हा यूरोपमध्ये बेरोजगारीची
अनियंत्रित लाट निर्माण करणारा असेल असाच आहे.
कोरोनाच्या संकटाआधीच स्पेनमध्ये बेरोजगारीचा दर 30 टक्के होता.
त्यात आता सहाजिकच वाढ होणार आहे. नवी आकडेवारी सांगते की, एप्रिलमध्ये 25 ते
29 वर्षे वयोगटातील बेरोजगारी 13.1 टक्क्यांने वाढली. रिपोर्ट सांगतो की लॉकडाऊन काळात
35 वर्षांखालील निम्या तरुणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. येत्या काळात यात अजून वाढ
होण्याची शक्यता आहे.
सेटल होण्यात अडथडे
कन्सल्टिंग फर्म सीईपीआर पॉलिसीचा अंदाज सांगतो की, सध्या स्पेनमध्ये
24.4 टक्के वर्क फ्रॉम होम सुरू आहे. पण येणाऱ्या काळात ही टक्केवारी 43 टक्क्यापर्यत
वाढू शकते. एल्पैसचा हा अहवाल सांगतो की भविष्यात बरेचसे सेक्टर डिटन्स जॉब सुरू करतील.
स्टॅनफोर्ड विद्यापीठातील प्राध्यापक डेव्हिड ग्रस्की या स्थितीला, अन्यायाची नवी लाट
असल्याचं मानतात.
पेपर्स ऑफ स्पॅनिश इकॉनॉमी या रिसर्च जर्नलने प्रकाशित केलेला
अहवाल सांगतो की, स्पॅनिश तरूण 35 ते 40 वयोगटात लग्न व नवं घर घेऊन
सेटल होतात. कोरोनामुळे ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, त्यांचं सरासरी वय
याच वयोगटातलं आहे. सांख्यिकी विश्लेषण करणाऱ्या कॅक्साबँक रिसर्चचा एक रिपोर्ट सांगतो
की, हातातली नोकरी गेल्यानं या तरुणांची स्वप्ने मावळली असून त्यांच्यात
नवी उमेद उरली नाहीये. अर्थात आयुष्यात नवं काहीतरी सुरू करण्याची त्यांची मानसिक स्थिती
राहिलेली नाही.
हा अहवाल पुढे सांगतो की, उरलेल्या नोकऱ्यांत 10 ते
12 टक्क्यांपर्यंत पगारात घट होईल. तसंच 2008 ते 2016च्या तुलनेत 20 ते 24 वयोगटातील
तरुणाईच्या उत्पनातही 15 टक्क्यांनी घट होईल.
ज्येष्ठ मंडळींनी आमच्या नोकऱ्या खाल्ल्या स्पेनियर्ड्स तरुणांची
ही जूनी तक्रार आहे. पण नवं संकट ज्ये,ठ नागरिकांवर नवीन कररचना लादू शकतो. नव्या कामगार
कायद्यामुळे नोकरदारावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रकारच्या टॅक्स प्रणालीत लक्षणीय
वाढ होईल. एक तर पगार कपात त्यात करांचा वाढता बोझा यामुळे त्यांना नोकरी टिकवून ठेवणे
अशक्य होईल. पेंशनधारकांनादेखील कपातीचं भय हमखास असणार आहे.
लेबर मार्केट संकटात
2006-08च्या मंदीनंतर नोकरीत आलेला तरुण वर्ग आता चाळीशीच्या
घरात आहे. तो जॉब मार्केटमधून बाहेर पडल्यास नवे तरुण बदलणाऱ्या लेबर मार्केटमध्ये
येईल. या पिढीला पहिल्या 10 वर्षात साडे सहा टक्के पगार कपातीला सामोरं जावं लागेल.
त्यांच्याकडे नोकरी टिकण्याची शाश्वती पूर्वीपेक्षा फार कमी असेल. तसंच स्वतंत्रपणे
जगणं, नवं घर व लग्न त्यांच्या आवाक्याबाहेर असेल. त्याचप्रमाणे अशा
जोडप्यांना अपत्य जन्मास घालणेदेखील परवडणारे नसेल.
दूसरीकडे नवं घर घेणं शक्य न झाल्याने रियल इस्टेट व्यवसाय संकटात
येईल. उपलब्ध परिस्थितीत सयुंक्त कुटुंब पद्धतीशिवाय पर्याय नसेल. त्यातून कौटुंबिक
वाद व हिंसाचार घडतील, हेदेखील नाकारता येत नाही. न्यूयॉर्कच्या सिटी युनिव्हर्सिटीच्या
प्राध्यापिका नूरिया रॉड्रॅगिझच्या मते या सर्वांचे दुष्परिणाम 10 वर्षे टिकून राहू
शकतात.
एक सकारात्मक बाब या रिसर्चमधून पुढे आली आहे, ती म्हणजे नव्या लेबर
मार्कटमध्ये 15 ते 24 वर्षे वयोगटातील 70 दशलक्ष रोजगार निर्माण होऊ शकतात. पण वरील
सगळ्या अटी-शर्थी त्यांना अलिखितपणे लागू असतील हे नव्यानं सागायची गरज नाही. तज्ज्ञ
सांगतात की, कोरानानंतरचा काळ व कॉर्पोरेट व्यवस्था असे जॉब डिझाइन करेल
ज्यात तरुण व्यक्ती स्थिर राहू शकणार नाही. त्याच्याकडे नावाला नोकरी आहे पण ती तात्पुरत्या
स्वरूपाचीच असेल. थोडक्यात काय तर यूरोपमध्ये नव्या पिढीला आर्थिक सुरक्षा कधीच लाभणार
नाही, अशी सोय ही नवी व्यवस्था तयार करू पाहत आहे. शिवाय जे तरुण स्वतंत्र
व्यवसाय करू पाहत आहेत त्यांच्यासाठी हा बाजार तग धरून ठेवणारा असणार नाही, हेदेखील वेगळं सांगायची
गरज नाही.
व्हर्च्युअल बाजाराचा काळ
कोरोना संकट आणि लॉकडाउन काळातील वेगवेगळे अभ्यास, निरिक्षण व संशोधनातून
एक समान सूत्र बाहेर येत आहे, ते म्हणजे कोराना नंतरचा काळ हा व्हर्च्युअल मार्केटिंग
व बाजाराचा असेल. शिक्षण प्रणालीपासून ते उद्योग-धंदे, व्यवसाय व व्यापाराची
रचना लक्षणीयरीत्या बदलणार आहे. वर्क फ्रॉम होमची नवी पद्धत नव्या संकटाला व आव्हानला
घेऊन येणार आहे.
नोकरी कपातीचं संकट जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा असेल.
त्यातून तडजोड, अडचणी, अनिश्चितता, नैराश्य व त्यातून उदभवणारी
नवी विदारक अवस्था आ वासून उभी आहे. त्यात कोण व कसा तग धरू शकेल हे येणारा काळ ठरवेलच.
मानवी स्वभाव हा फारच चिवट असतो. माणूस प्रचंड आशावादी असतो.
कोरोना संकटात त्याची जगण्याची तडफड व उमेद आपण पाहतोच आहे. विशेषत: तरूण तडजोड स्वीकारणारे
व लवचिक असतात. त्यामुळे या गंभीर परिस्थितीतून ते नक्कीच तावून-सुलाखून बाहेर पडतील, अशी अपेक्षा करूया.
(सदरील लेख लोकमतमध्ये 'स्पेनचं तारुण्य का विचारतंय, जगायचं कसं?' या शीर्षकाखाली प्रकाशित झालेला आहे)
Twiter@kalimajeem
FB/Kalim Ajeem
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com