बॉबी वाईन : युगांडामध्ये सत्तासंघर्षाचा युवा चेहरा


पूर्व आफ्रिकेतील युगांडा देशात सध्या दोन व्यक्ती चांगलेच चर्चेत आहेत. ३५ वर्षीय युवा नेता आणि ७६ वर्षीय वृद्ध. दोघांमुळे देशात राजकीय अनागोंदी माजली आहे. एक राष्ट्रपती पदाचा उमेदवार तर दुसरा वर्तमान राष्ट्रपती आहे. गेली पाच टर्म राष्ट्राध्यक्ष असलेले येवेरी मुसेवेनी यांच्याकडून युवा नेते बॉबी वाईन सत्ता खेचू पहात आहेत.

शनिवारी सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आला. बॉबी दोन नंबरवर राहिले. वर्तमान राष्ट्रपतीकडून त्यांचा निसटता पराभव झाला.

राष्ट्रपतीला ५९ तर प्रमुख विरोधी उमेदवार बॉबी यांना ३४ टक्के मते पडली. जनप्रिय असलेल्या बॉबींनी निकाल मान्य करण्यास नकार दिला आहे. एनबीएस न्यूजच्या मते बॉबींनी निवडणुकीत मोठ्या विजयाचा दावा केला आहे. गंभीर धोक्याची चाहुल हेरून राष्ट्रपतींनी प्रतिस्पर्धी उमेदवाराला हाऊस अरेस्ट केलं आहे.

सरकारने मतमोजणीत घोटाळा करून निकाल आपल्या बाजूने करून घेतले, असा बॉबी वाईन यांचा आरोप आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाकडे त्यांनी देशातील सत्तासंघर्षाचा तिढ़ा सोडवावा, अशी मागणी केली आहे. तुर्त त्यांना नजरकैद केलं आहे. आपल्या व पत्नीच्या जिविताला धोका असल्याचं सांगत त्यांनी जगाला मदतीची याचना केली आहे.

साधारण व जेमतेम शरीरयष्टीच्या या व्यक्तीने अवघ्या जगाचे लक्ष आपल्याकडे वळवून घेतले आहे. त्यामुळे युगांडा सत्तासंघर्षाची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते.


Everyone including media and my party officials are restricted from accessing me. @ZaakeFrancis was arrested outside my gate as he made his way to my house, he was badly beaten by soldiers. He is now in Rubaga hospital.
(ADMIN)— BOBI WINE (@HEBobiwine) January 17, 2021

शनिवारी आणि रविवारी राजधानी कंपालामध्ये बॉबी समर्थक रस्त्यावर उतरले. आपल्या नेत्याला मुक्त करण्याची मागणी केली. रॉयटर्सच्या मते पोलीस आणि आंदोलकात जोरदार संघर्ष झाला. निवडणूक व निकालादरम्यान झालेल्या संघर्षात ५४ तरुणांचा जीव गेला आहे.

गार्डियनच्या मते राजधानी कंपाला येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाय राष्ट्रपती भवनलादेखील मोठा फौजफाटा लावण्यात आला आहे. हिंसेची शक्यता पाहता सुरक्षा व्यवस्था चोख केली आहे. जवान सतत पेट्रोलिंग करत आहेत.




कोण आहेत बॉबी?

उच्चविद्याविभूषित असलेले बॉबी वाइन यांना जन्म राजधानी कंपालाच्या झोपडपट्टीत झाला. त्यांचं वास्तविक नाव रॉबर्ट क्यगुल्यानी सेसेंटामु आहे. समाजविज्ञान आणि संगीतशास्त्रात त्यांनी उच्चशिक्षण घेतलं आहे. कॉलेजवयात त्यांनी अनेक संघर्षमय कविता रचल्या.

आपल्या कविता त्यांनी सार्वजनिकरित्या सादर केल्या. त्यातून ते कवि आणि गायक म्हणून नावारुपास आले. प्रतिभेच्या जोरावर ते लोकप्रिय व प्रसिद्ध पॉप सिंगर झाले. लोकप्रश्न मांडल्याने अल्पावधीत देशात त्यांना अफाट पॉप्युलॅरिटी लाभली. तरुणाईचे ते लाडके झाले.

वेल सेटेल करिअर सोडून त्यांनी एकाएकी राजकारणात एंट्री घेतली. एकहाती सत्ता, बेरोजगारी व सततच्या गृहयुद्धाला कंटाळलेल्या आपल्या पिढीचे प्रश्न सोडवण्याचा चंग बांधला. २०१७ साली पहिल्याच प्रयत्नात प्रचंड बहुमताने ते निवडून आले.

त्याच वर्षी त्यांनी २०२१च्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सहभागी होण्याची घोषणा करून टाकली. विरोधी नेता व खासदार म्हणून संसदेत वेळोवेळी त्यांनी सरकारच्या एकतर्फी भूमिकेचा समाचार घेतला. सरकारच्या ध्येय-धोरणाचा पर्दाफाश केला. दोन वर्षात ते ‘घेटो प्रेसिडेंट’ म्हणून प्रचंड लोकप्रिय झाले.

बीबीसीच्या मते २०१८ साली त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. राष्ट्रपतीच्या इशाऱ्यावर हल्ला झाला, असा आरोप त्यावेळी झाला. हल्ल्यात त्यांचा ड्रायवर मारला गेला. जख्मी अवस्थेत त्यांना अटक करून मिलिट्री हॉस्पिटलला पाठवण्यात आलं. तुरुंगात वाईट पद्धतीने छळण्यात आलं. त्यांच्याविरोधात देशद्रोहाचे आरोप केले गेले.

त्यांच्या अटकेचा देशभरात निषेध झाला. तरुणांनी मोठ्या संख्येने मोर्चे व आंदोलने केली. अनेक दिवस युगांडामध्ये निदर्शने सुरू होती. परिणामी सरकारने खासदार बॉबींची सुटका केली.

एनबीएस न्यूजच्या मते बॉबी यांना राजकारणातून बाहेर करण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या अनेक समर्थकांची हत्या झाली. त्यांच्याविरोधात पुन्हा-पुन्हा सरकारी अकुंश ठेवण्यात आला. अशा परिस्थितीतही ते खचून गेले नाही.




निवडणुकीत राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून ‘नॅशनल यूनिटी प्लेटफॉर्म’ पक्षाकडून ते रिंगणात उतरले. रोजगार, आरोग्य, शिक्षण, स्वच्छ पाणी आणि समान न्याय इत्यादी मुद्दे घेऊन त्यांनी भाषणे दिली. प्रचार मोहिमेत गाणी सादर करून तरुणांना आकर्षित केलं. देशभर प्रचार करून सरकारच्या अपयश निदर्शनास आणले.

जनतेत निवडणुकीचा प्रचंड उत्साह होता. दि गार्डियन, बीबीसी, न्यूयॉर्क टाइम्स, अल जझिरानं मतदाराच्या उत्साहाचे अनेक स्पेशल कवरेज देणारे अनेक स्टोरी प्रकाशित केल्या आहेत. गार्डियनच्या मते निवडणुकीत बॉबींनी राष्ट्रपतीला कडवे आव्हान दिले. बहुतेक तरुण मतदारांनी बॉबींच्या विकासाच्या धोरणांना पाठिंबा दर्शवला. प्रचार मोहिमात त्यांना अफाट लोकप्रियता लाभली.

अल जझिराच्या मते राष्ट्रपतीने त्यांना रोखण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न केले. विरोधी उमेदवारांवर हल्ले झाले. हिंसा झाली. बॉबींची लोकप्रियता पाहता, त्यांच्याविरोधात अप्रचार राबविला गेला. परिणामी ट्विटर व फेसबुकने सरकार समर्थित अकाउंट बंद केलं.

तात्काळ प्रतिक्रिया म्हणून सरकारनं संपूर्ण इंटरनेटच बंद करून टाकलं. मतदानाच्या दोन दिवस आधी सरकारनं राजधानीतील इंटरनेट व लाइट पूर्णपणे बंद केली. तरीही मतदाराने आपल्या प्रिय उमेदवारासाठी भरभरून मतदान केलं.

१४ जानेवारीला मतमोजणी झाली त्यावेळी चित्र उलटेच होतं. निवडणूक आयोगाच्या मते बॉबींना केवळ ३.४ मीलियन तर राष्ट्रपती मुसेवेनी यांना तब्बल ५.६ मीलियन मते पडली. आयोगाने राष्ट्रपतीला बहुमत देऊन विजयी घोषित केलं.

बॉबी व त्यांच्या समर्थकांना हा पक्षपाती निकाल मान्य नाही. त्यामुळे त्यांनी निवडणुका पुन्हा घेण्याची मागणी केली आहे. युगांडामध्ये ८० टक्के लोकसंख्या ३५ वर्षापेक्षा कमी आहे. परंतु हे तरुण एका ७६ वर्षीय वृद्धाला का निवडून देतील? असा प्रश्न विरोधी पक्ष व तरुणांचे गट उपस्थित करत आहेत.




तीन दशकापासून एकच राष्ट्रपती

माजी सैन्य अधिकारी असलेले मुसेवेनी १९८६ साली सशस्त्र विद्रोहाच्या बळावर सत्तेवर आले. त्यांनी सैन्य कार्यवाहीत क्रूर हुकूमशहा इदी अमीन आणि मिल्टन ओबोटची सत्ता उलथवून टाकली. त्यानंतर अद्याप म्हणजे गेली ३५ वर्ष एकहाती सत्तेची सूत्रे त्यांच्याकडे आहेत.

बीबीसीच्या मते सत्तेचं केंद्रीकरण करण्यासाठी त्यांनी इतर प्रशासकीय संस्था व इतर बलस्थाने कमकुवत केली. न्याययंत्रणा व एकूण प्रशासनावर त्यांची घट्ट पकड आहे. मीडियावर वचक बसविला. सरकारविरोधी पत्रकारांना तुरुंगात टाकले. उरलेल्या मीडियाला हाताशी धरलं.

२००५ पर्यंत राष्ट्रपतीला तिसऱ्यांदा अध्यक्षपदाची निवडणूक लढविता येत नसे. परंतु तीनदा घटनादुरुस्ती करून मुसेवेनी यांनी ही तरतूद करून घेतली. वाढत्या वयातही त्यांना निवडणूक लढण्याची मुभा मिळाली. यावर संसदेत बराच वादही झाला.

बीबीसीच्या मते त्यांच्या कारर्कीर्दीत विरोधी नेत्याच्या हत्या झाल्या. विरोधक संपल्याने सहाजिकच त्यांची खूर्ची अधिक मजबूत झाली. २००१ पासून प्रत्येक निवडणुकीत पक्षपाताचे आरोप होत आहेत. अनेक वाद कोर्टात गेले. पण निकाल शून्य.

कम्युनिस्ट विचारसरणी मानणारे मुसेवेनी स्वत:ला विकासपुरुष म्हणतात. मुक्तिदाता आणि शांततेचा प्रतीक म्हणून सादर करतात. त्यांच्या कार्यकाळात समर्थक मीडिया इंडस्ट्री वेगाने वाढली. शेकडों खासगी रेडियो स्टेशन्स, टीवी चॅनेल, वृत्तपत्रे आणि न्यूज़ वेबसाइट्स फोफावल्या.

यूवेरी मुसेवेनी यांच्या तीन दशकांच्या कार्यकाळात देशात शांतता व भरभराट आली, असं मानणारा एक गट आहे. तर बेरोजगारी व पक्षपात वाढल्याचे बहुसंख्याकाचं म्हणणं आहे. मुसेवेनी यांची केंद्रीय सत्ता देशाला विनाशाकडे घेऊन जात आहे, असा समाजसेवी संघटना, सिविल सोसायटी आणि विरोधकांचा आरोप आहे.

मुसेवेनी यांच्या एकहाती कारभाराला अनेकदा विरोध झाला, टीका झाली. परंतु राष्ट्रपतींनी प्रत्येक तक्रार मुळापासून उपटून काढली. सरकारच्या या वृत्तीचा तरुण आणि विद्यार्थ्यामध्ये प्रचंड रोष आहे. कारण दरवर्षी बेरोजगाराची मोठी फौज कॉलेज व शिक्षण संस्थेमधून निघते. त्यांना हाताला काम नाही. तरुणांच्या या गटाने सत्ताबदलाची स्वप्न पाहिली.

परंतु झालं नेमकं उलटंच. म्हणतात ना हुकूमशाह सत्तेला मुंगळ्यासारखे चिकटून राहतात. अगदी तसेच वर्तमान राष्ट्रपतींनादेखील सत्तेचा मोह सुटत नाही. सत्ता निसटून जाण्याच्या भितीतून त्यांनी बॉबी वाइन यांना नजरकैद केलं आहे.

निवडणूक आयोगाने बॉबींचे पक्षपाताचे आरोप फेटाळून लावत बाजू मांडण्याची संधी दिली आहे. जोपर्यंत इंटरनेट सुरू होत नाही, तोपर्यंत मला बाजू मांडता येणार नाही, असा खुलासा विरोधी उमेदवार बॉबी वाइन यांनी केला आहे. इंटरनेट सुरू करण्याची त्यांनी मागणी केली आहे. तर दुसरीकडे सत्तासंघर्ष सोडवावा, अशी याचना त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे केली आहे.

कलीम अजीम, पुणे

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,50,इस्लाम,41,किताब,26,जगभर,131,पत्रव्यवहार,4,राजनीति,307,व्यक्ती,25,संकलन,65,समाज,267,साहित्य,80,सिनेमा,22,हिंदी,55,
ltr
item
नजरिया: बॉबी वाईन : युगांडामध्ये सत्तासंघर्षाचा युवा चेहरा
बॉबी वाईन : युगांडामध्ये सत्तासंघर्षाचा युवा चेहरा
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhit4ce8gUZ91Ayz8RwgSIfBzu0NEDOqnaduW-BvWtCOUyM3xZ0KLsHKwyfzh5Dh8jWXe5p1y7w4t4IxfB-ohdKbGFmqpzqXmNjBXo_5Cxpp7frUuwqSuZhU1zhQSlFLKwF-TQNe3otVSOI/w640-h426/Bobi+Wine.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhit4ce8gUZ91Ayz8RwgSIfBzu0NEDOqnaduW-BvWtCOUyM3xZ0KLsHKwyfzh5Dh8jWXe5p1y7w4t4IxfB-ohdKbGFmqpzqXmNjBXo_5Cxpp7frUuwqSuZhU1zhQSlFLKwF-TQNe3otVSOI/s72-w640-c-h426/Bobi+Wine.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2021/01/blog-post_21.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2021/01/blog-post_21.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content