चालू वर्षांत तीन मंगलयान अंतराळात जाणार आहेत. त्यातला एक दुबईचा असेल. यूएईच्या या ‘होप मिशन’ डिप्टी प्रोजेक्ट मैनेजर एक 33 वर्षीय तरुणी आहे. सारा अल् अमिरी असं तिचं नाव. दुबईची यूथ आयकॉन असलेली ही युवती जगासाठी अविश्वसनीय असणाऱ्या एका मोहिमेची प्रमुख म्हणून काम करत आहे.
भारत, अमेरिका, रशिया आणि यूरोपनंतर मंगळ ग्रहावर जाणारा दुबई चौथा देश आहे. त्यातही अरब देशात अंतराळात जाणारा दुबई पहिलाच असेल. या मंगलयान मिशनची सर्व जबाबदारी सारा अमिरी या स्पेस सांयटिस्ट तरुणीकडे आहे. महिलांसंदर्भात परंपरावादी विचारांचा पुरस्कार करणारा व चंगळवादाचा जागतिक बाजार उभा करणारा एक देश म्हणून दुबईची ओळख आहे. या अरब देशाने एका तरुणीवर एवढी मोठी जबाबदारी सोपवणे, जगभरात चर्चा विषय झाला आहे.
या घटनेला बहुतेक यूरोपियन मीडियाने विशेष कव्हरेज दिलं आहे. स्पेस डॉट कॉम या वेबसाईटने सर्व मुस्लिम देशासाठी ही एक प्रेरणादायी प्रसंग असल्याचं म्हटलं आहे. खलिज टाइम्सने या मोहिमेला खलोगशास्त्रात अरबाचे नाव पुनर्प्रस्थापित करणारी घटना म्हटलं आहे.
अमिरातीज विमेन केलेल्या स्पेशल कव्हरेजवरून सारा यांची प्रोफाइल कळते. 1987 साली जन्मलेल्या साराला शालेय वयापासून स्पेस सायन्सची आवड होती. त्यांनी शारजाहमधील अमिराती यूनिवर्सिटीमधून कंप्यूटर सायन्समध्ये डिग्री मिळवली आहे. त्यांनी स्पेस सायन्समध्ये करिअर निवडले. विशेष म्हणजे त्यावेळी दुबईमध्ये कुठलाही खगोल कार्यक्रम नव्हता.
खलिज टाइम्स म्हणते की, व्यवयासाने स्पेस वैज्ञानिक असलेल्या सारा यांनी सॉफ्टवेयर इंजीनियर म्हणून काम केलं आहे. शिवाय दुबई स्थित मुहंमद बिन राशिद स्पेस सेंटरमध्ये इंजीनियर म्हणूनही सेवा दिली आहे. इथूनच त्यांची 2017 साली कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याकडे एडवान्स्ड सायन्स मंत्रालय सोपवण्यात आलं. मंत्रिमंडळात सामील असलेल्या नऊ महिलांमध्ये कमी वयाच्या सारा एकमेव होत्या.
मंत्रिपदानंतर बहुप्रतिष्ठित टेड टॉकने त्यांना मंगलयान मोहिमेवर बोलण्यास आमंत्रित केलं. त्या कार्यक्रमात त्यांनी उच्चारलेलं एक विधान फार महत्त्वाचं आहे. त्या म्हणतात, “विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विचार करता, हा विचार पुढे येतो की, आपल्याला ज्ञान-आधारित अर्थव्यवस्थेकडे जाण्याची गरज आहे. या अर्थव्यवस्थेचा पाया सायन्स व टेक्नॉलॉजी असून त्याची निर्मिती करणे आपल्याला आवश्यक आहे. सरकारी क्षेत्र हे एक कोनशिलेचा दगड आहे. अशा संशोधनासाठी ती अर्थशक्ती म्हणून काम करू शकते.”
दुबईत स्पेस सेंटरची स्थापना झाली त्यावेळी कुठला ठोस कार्यक्रम सरकारकडे नव्हता. 2014 साली सेंटरने स्पेस कार्यक्रम घोषित केला. सहाजिकच त्या प्रकल्पासाठी सारा यांची निव़ड करण्यात आली.
गल्फ न्यूजच्या मते कालांतराने मंगलयान पाठवण्याची कल्पना सारा आणि त्यांच्या टीमने मांडली. संस्थेकडे पुरेसे तंत्रज्ञान नसल्याने ते आयात करणे जिकिरीचं होतं. सेंटरने भूमिका घेतली की तंत्रज्ञान विकत घेणार नाही. संस्थेचं म्हणणं होतं की, ते इथंच तयार करावं. ही जबाबदारी सारा अमिरी व त्यांच्या टीमनं स्वीकारली.
सहा वर्षे अथक परिश्रमातून हे ‘मिशन’ पूर्ण झालं. सारा म्हणतात, त्याप्रमाणे त्या आणि त्यांची टीम रोज 12 तास काम करत होती. संपूर्णत: मानवरहित असलेल्या रॉकेटचं नाव ‘अल-अमल’ म्हणजे उमेद असं आहे. 14 जुलैला सारा यांची बहुप्रतिक्षित स्वप्न आकाशात झेपावण्यासठी सज्ज होतं. परंतु खराब हवामानामुळे ते दोन दिवसासाठी पुढे ढकलले गेले. 16 जुलैला देखील पाऊस आणि जोरदार वारा यामुळे पुन्हा मिशन होप अंतराळात कूच करू शकलं नाही.
स्पेस डॉट कॉमच्या मते, हे बहुचर्चित यान मंगळावर हवामान आणि वातावरणाचा अभ्यास करणार आहे. शिवाय हायड्रोजन आणि ऑक्सीजनचादेखील शोध घेणार आहे. होप रॉकेटचं वजन 1500 किलोपेक्षा जास्त आहे. यानाच्या एका बाजूला बसविलेलं इन्स्टुमेंट त्याला अंतराळ घेऊन जाणार आहे. ज्यात हाय रिझोल्यूशन कॅमेरा, मार्स अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रोमीटर (ईएमयूएस), इमेजिंग स्पेक्ट्रोग्राफ, एमिरेट्स मार्स इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमीटर (ईएमआयआरएस) आणि एफटीआयआर स्कॅनिंग स्पेक्ट्रोमीटर बसवण्यात आलॆ आहे.
सारा म्हणतात, अंतराळात 50 कोटी किलोमीटरचा प्रवास करण्यास या रॉकेटला सात महिने लागणार आहेत. 2021 साली फेब्रुवारीत ‘मिशन होप’ आपल्या कक्षेत जाऊन निश्चित कामाला सुरुवात करेल. ज्यात धुलीकण आणि ओझोनचा अभ्यास प्रमुख कार्य आहे. जापानच्या तनेगाशिमा बेटावरून हे रॉकेट अंतराळात कूच करणार आहे.
अवकाश कार्यक्रम व यानांचे उत्पादन व डिझाईनचा दुबईकडे क्षुल्लक अनुभव आहे. अशावेळी हा देश मंगलयान मोहीम राबवणाऱ्या बलाढ्य भारत, अमेरिका आणि रशियाची बरोबरी करू पाहतोय. सारा व त्यांच्या टीमच्या प्रयत्नातून प्रत्यक्षात आलेलं दुबईचं स्वप्न जगभरात चर्चेचा विषय बनला आहे.
बीबीसीच्या मते मिशन ‘होप’चे प्रोजेक्ट डायरेक्टर ओमरान शराफ़ यांना या मोहिमेतील येणाऱ्या अडथड्यांचा अंदाज आहे. पण सर्व धोके पत्करून देशासाठी इतिहास रचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ते म्हणतात, “हा एक रिसर्च आणि डेवलपमेंट मिशन आहे. आणि हो यात अपयशही येऊ शकते. परंतु एक राष्ट्र म्हणून यशस्वी होण्यास अपयश पर्याय असू शकत नाही. यूएई या मिशनमुळे जी क्षमता पदरात पाडून घेणार आहे, त्यातून देशाला जे ज्ञान मिळेल, ते आमच्यासाठी महत्त्वाचं आहे.”
सारा या प्रोजेक्टला घेऊन फार उत्सहित आहेत, खलिज टाइम्सला दिलेल्या प्रतिक्रियेत त्या म्हणतात, “हे मिशन पूर्ण करण्यात प्रचंड अडचणी आल्या. परंतु आम्हाला यातून खूप काही शिकता आलं. मिशन होप दुबईतील तरुणासाठी एक महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट असेल. यातून त्यांना संशोधनासाठी बाहेर पडण्याची संधी मिळेल. आता आमच्या देशातही अंतराळ व त्याच्या कथा सागितल्या जातील.”
सारा म्हणतात, “मिशन होपमध्ये सामिल होणं माझ्यासाठी प्रतिष्ठेची आणि अभिमानाची बाब आहे.” त्यांनी जगाला आठवण करून दिली की, “अरबी मुस्लिमांनी हजार वर्षांपूर्वी खगोलशास्त्रात अतुलनीय योगदान दिलेलं आहे. त्यात हा आमचा छोटासा प्रयत्न आहे.”
वास्तविक, फार्मसी, गणित, तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान या ज्ञानपरंपराशिवाय खगोलशास्त्रातही अरबांचे मोठे कर्तृत्व राहिलेलं आहे. अल जझिरा व टाइमलाईन सीरीजने यावर महत्त्वाच्या डॉक्युमेंटरी जारी केलेल्या आहेत. इतिहास सांगतो की, मध्ययुगात यूरोपमधील विविध भाषेमधील ज्ञानभांडार अरबांनी आपल्या भाषेत नेलं. तिथून ते प्रमुख भाषांमध्ये आलं.
विशेष म्हणजे दुबईच्या या मार्स मिशन मोहिमेतील 150 वैज्ञानिकात 34 टक्के महिला आहेत. याबाबत सारा म्हणतात, “ही महत्वाची बाब आहे की या मिशनच्या लीडरशिपमध्ये पुरुष आणि महिलांना बरोबरीचे स्थान आहे. आम्हा महिलांसाठी हे काम उत्साह वाढवणारं होतं. आमचा हा प्रकल्प त्या महिलांसाठी दिशादर्शक आहे, ज्या भविष्यात काहीतरी करण्याचा मानस बाळगून आहेत.”
मंगळ ग्रहाची सफर जगभरातील मानवासाठी कल्पनाविश्वाचा विषय राहिलेला आहे. प्रत्येकजण तिथं जाण्याचं स्वप्न रंगवत असतो. काही टूरिस्ट कंपन्यांनी प्रलोभनं देऊन या ग्रहाची सफर घडविणारे स्पेशल पॅकेजही घोषित केले होते. म्हणतात, मंगळ ग्रहावर धुळीचे पर्वत, वाळवंट, ज्वालामुखी आणि खोल खड्डे आहेत. इथे पाऊस पडत नाही. संथ वारे वाहतात. ऑक्सीजनची कमतरता आहे. पण बर्फाचे प्रमाण अधिक आहे. टूरीस्ट कंपन्यांनी इथे तुम्ही स्कीइंग करू शकता, असा पद्धतीने मार्केटिंग केले होते.
चालू वर्षात तीन मंगलयान आपल्या अवकाश सफरीवर निघणार आहेत, त्यातले एक दुबईचे हे ‘होप मिशन’ आहे. गेल्यावर्षी नासाने मंगळ ग्रहावर जाणाऱ्या इच्छुकांची नावे जगभरातून मागवली होती. त्यात तब्बल 24 लाख नावे जमा झाली. त्यात 1 लाख 38 हजार भारतीय होते. ही नावे एका मायक्रोचिपमध्ये कोरून मंगळ ग्रहावर पाठवली जाणार आहेत. शिवाय नासा त्या इच्छुकांना वर्च्युअल बोर्डीग पासही देणार आहे. जे मंगलयानाचा संपूर्ण कार्यक्रम पाहू शकतील.
वर्च्युअल का होईना सामान्य मानवाची मंगळ ग्रहावर जाण्याची कल्पना प्रत्यक्षात येणार आहे. पण इथं जाणाऱ्या काही ठराविक देशाच्या यादीत दुबई आपलं नाव समाविष्ट करू पाहत आहे. त्यांच्या या प्रयत्नासाठी शुभेच्छा...
(संबंधित लेख आज 30 जुलैच्या लोकमत ऑक्सीजनमध्ये प्रकाशित झालेला आहे)
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com