थायलँडमध्ये लोकशाहीसाठी ‘बदक क्रांति’

थायलँडमध्ये लोकशाही समर्थकांची चळवळ वर्षपूर्तीकडे वाटचाल करत आहे. ‘रेड शर्ट्स’ ते ‘डक रिवोल्युशन’ असा या चळवळीचा प्रवास राहिला आहे. हुकूमशाहीला अमान्य करत पूर्ण स्वरूपाची लोकशाही सत्ता प्रस्थापित व्हावी, अशी निदर्शकांची मागणी आहे.

फेब्रुवारीमध्ये रेड शर्टग्रुपने निदर्शने सुरू केली होती. पंतप्रधान प्रयुत्त चान-ओ-चायांनी खुर्ची सोडावी, अशी त्यांची मागणी होती. पंतप्रधानावर घटना बदलल्याचा व अपहार करून निवडणुका जिंकल्याचा आरोप आहे. त्यांच्या विरोधात दोन महिने आंदोलन सुरू होते. सक्तीच्या लॉकडाऊनमुळे निदर्शने बंद पडली.

कोरोना वायरसची तीव्रता कमी होताच ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा चळवळ आकाराला आली. फिजिकल डिस्टेंसिंगसह सरकारविरोधात अनेक तरुणांचे गट रस्त्यावर उतरले. हळुहळू जनसमुदाय वाढत गेला आणि चळवळीला भव्य-दिव्य स्वरूप प्राप्त झाले.

विद्यार्थी, व्यापारी, तरुण, महिला, वृद्ध व राजेशाही समर्थक गट सर्वच पंतप्रधान विरोधात एकवटले. पाच महिन्यापासून आंदोलने, मोर्चे, निदर्शने सुरू आहेत. सरकारने निदर्शकांचा बंदोबस्त करण्यात कुठलीही कसर सोडली नाही. इतकेच काय तर आणीबाणीदेखील लादली. परंतु तरुणांचे लोंढे मात्र देशभर टिय्या मांडूनच होते.

वाचा :  रिपब्लिक ऑफ थायलँडसाठीचा लढा

वाचा : नव्या वर्षांतही जनसंघर्षाचा ट्रैंड कायम

निदर्शकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणे व त्यांना अटक करण्याचे धोरण सरकारने अवलंबवले. जगाचे लक्ष वेधण्यासाठी निदर्शक वेगवेगळे प्रयोग करत आहेत. सप्टेंबरमध्ये काळ्या-निळ्या छत्र्या घेऊन राजधानी ब्लॉक करण्यात आली. डिसेंबरमध्ये प्लास्टिकचे बदके घेऊन रस्ते ब्लॉक केले. तर गेल्या आठवड्यात लाल रंगाचे शर्ट घालून निदर्शकांनी लक्ष वेधले.

लाल शर्ट आणि पिवळ्या रंगाच्या बदकांचा प्रतिकात्मक वापर करत सरकारविरोधी आंदोलन सुरू आहेत. देशातील विविध शहरात पिवळ्या आकाराचे खेळणीतले बदक रस्त्यावर सोडण्यात आले आहेत. राजधानी बँकाक सध्या लहान-मोठ्या आकारांच्या अनेक बदकांनी गजबजून गेली आहे.

सुरुवातीला पोलिसांचा हल्ला, रासायनिक पाण्याच्या मारा व अश्रू धुरापासून संरक्षक ढाली म्हणून मोठ्या आकाराचे बदक आंदोलक स्थळी आणले गेले. उद्देश सफल होत असल्याचं लक्षात येताच निदर्शकांनी त्याचा प्रतिक म्हणून वापर सुरू केला.

सध्या निदर्शकांनी राजधानीत विविध आंदोलनस्थळी पिवळ्या बदकांची आरास मांडली आहे. बाजारात, ऑफिसात, घरात, रस्त्यावर, कचऱ्यात, गटारीत, खिशाच्या पेनाला, टोपीला, मास्कला जिकडेतिकडे बदक. टोप्या, कपडे, खेळणीत बदक दिसतोय. आंदोलकांच्या मते, ही बदके गंभीर मूड हलके करण्यास मदत करतात

एका निदर्शनास सामिल झालेला २९ वर्षीय रत्तिकरन सेहोर बदकाबाबत म्हणतो, “आमचा निषेध मोर्चा तणावमुक्त आणि सर्जनशील कल्पनांनी परिपूर्ण व्हावा अशी इच्छा आहे. जो आम्हाला शांततेत निषेध करण्यास प्रवृत्त करतो. निदर्शनात हिंसाचाराची इच्छा होऊ नये अशी आमची इच्छा असते. बदकांमुळे सर्व काही शांत आणि मवाळ दिसण्यास मदत होते.

लोकशाहीचे प्रतिक म्हणून ओळख मिळालेल्या बदकांना थायलँडमध्ये तेजी आली आहे. टोप्या आणि किचेन म्हणूनही बदकांचा वापर सुरू आहे. दि गार्डियनने यावर एक फोटो स्टोरी केली आहे. लेखात बदकांचे मार्केट व त्याला मिळालेल्या लोकप्रियतेवर विशेष लक्ष देण्यात आलं आहे.

वाचा :‘मोलदोवा’मध्ये लोकशाही समर्थकांचा हल्लाबोल

वाचा : नेतन्याहू गो जेल' इस्रायलमध्ये हुकूमशाहीविरोधात एल्गार 

गार्डियनच्या मते लहान मुलांच्या खेळणीत असलेला हा बदक आता एक शोपीस झाला आहे. हॉलमध्ये, कार्यक्रमस्थळी शोभेची वस्तू म्हणून त्याने जागा मिळवली. वृत्तपत्राने बदकांना क्रांतिचं प्रतिक संबोधलं आहे.

निदर्शक बदकाचा पोशाख परिधान करून आंदोलनस्थळी जमतात. पोलिसांचे हल्ले रोखण्यासाठी बदक पुढे करतात. लाठ्या-काठ्यापासून बचाव करण्यासाठी बदक व त्याने सुशोभित केलेले हेलमेट वापरतात.

एशिया टाइम्सच्या मते थायलँडच्या तरुणांनी सुरू केलेली ही डक रिवोल्युशननिर्णायक ठरू शकते. या कथित बदकांचे अनेक फोटो, वीडियो आणि मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत असून हैशटॅग वापरून ट्रैंड केलं जात आहे.

जकार्ता टाइम्सच्या मते ही बदके घोषणा आणि पोस्टरचे काम करत आहेत. गेली महिनाभर सरकारी कार्यालये, बँकेबाहेर पाच-पाच फुटाची बदके दिसून येत होती. पोलीस व प्रशासनाने अशी हजारों बदके हटवली आहेत. तरीही रोजच रस्त्यावर बदकांची रिघ दिसून येते.

जकार्ता टाइम्स म्हणते, यापूर्वीही निषेध व्यक्त करण्यासाठी बदकांचा वापर केलेला आहे. २०१३मध्ये हाँगकाँगच्या एका नदीत मोठ्या आकाराची बदके सोडण्यात आली होती. प्रदूषणाची समस्येकडे लक्ष वेधण्यासाठीचा हा प्रयोग होता. त्यावरून बराच वाद झाला. १९८९ साली चीनच्या तुतियामेन चौकातील क्रांतिकारी आंदोलनात खेळणीतल्या बदकांचा वापर झाला. त्यानंतर सरकारने असा बदकांवर बंदी आणली. इंटरनेट सर्चवरदेखील ही बंदी लागू होती

२०१६ साली ब्राझीलमध्ये एका आंदोलनात रबरी बदके आणली गेली. सरकारी धोरणांचा विरोध व आर्थिक मंदीला अधोरेखित करण्यासाठी त्याचा वापर झाला. बदकाच्या गतीने अर्थव्यवस्था चालू आहे, असा त्यातून अर्थबोध केला गेला.

वाचा : बेलारूसी तरुणांचा हुकूमशाहीविरोधात जयघोष

वाचा : पेरू देशात प्रो-डेमोक्रॅसी आंदोलन

२०१७ मध्ये रशियामध्ये बदक निषेधाचे प्रतीक म्हणून पुढे आली. पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव यांच्याकडे लक्झरी बंगला होता. त्यात असलेल्या तलावात बदकांसाठी खास घर होते. पंतप्रधानांच्या विरोधी गटाने बदकांचा निषेध म्हणून वापर केला होता.

थायलँडमध्ये लोकशाही समर्थक चळवळीत बदके नियोजितरित्या आलेली नाही. ती अगदी सहज व अपघाताने आली. बदकांना पुढ़े करून तरुण आंदोलक प्रशासकीय सुधारणा घडवून आणण्याची मागणी करत आहेत. गेल्या बुधवारी बँकॉकमध्ये तीव्र आंदोलन झालं. पोलीस व निदर्शकांत झालेल्या धुमश्चक्रीत ६ जणांना गोळ्या लागल्या. तर अनेकजण गंभीर जखमी झाले. अश्रूधुरामुळे अनेकांच्या डोळ्यांना इजा झाली.

गेल्या वर्षभरात पोलिसांच्या हल्ल्यात ९० पेक्षा जास्त निदर्शकांचा मृत्यू झाला आहे. तर दोन हजारपेक्षा अधिक जखमी झाले. बुधवारी राजधानी बँकाकमध्ये रेड शर्ट्सग्रूप पुन्हा अवतरला. त्यामुळे लोकशाही मोहिमेला आणखीन गती आली.

थायलँडमध्ये २०१४ साली तख्तपालट झाले. सैन्य प्रमुख असलेले प्रयुत्त चान-ओ-चायांनी सत्ता ताब्यात घेतली. २०१९मध्ये निवडणुका झाल्या. मतमोजणीत अपहार करून सत्तेवर आल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. वर्तमान सरकारवर सैन्याची पकड अधिक आहे. सैन्याच्या मर्जीनुसार शासन चालते, असाही आरोप होतो. त्यात भर म्हणून राजेशाहीचा सरकारमध्ये हस्तक्षेप संतापाला अधिक तीव्र करत आहे.

किंग पूमीपोन अदून्यदेतगादीवर होते. त्यांचं २०१६ साली निधन झालं. त्यानंतर वाचिरालोंगकोन राजगादीवर आले. किंग पूमीपोनयांच्या निधनानंतर सैन्याने नवी घटना तयार केली. लष्कराने लोकशाही बहालीनंतरही सैन्याकडे सत्तेचे सूत्र असतील, अशी तरतूद करून घेतली.

बीबीसी थाई सेवेच्या मते सद्यस्थितीत राजपरिवारदेखील सैन्य सरकारवर नाराज आहे. राजगादीला सैन्याचा अधिकचा हस्तेक्षप मान्य नाही. २०१९ला सार्वत्रिक निवडणुका झाल्या. विरोधी पक्ष असेलल्या पेउ थाईला बहुमत मिळाले. परंतु सत्ताधारी पलांग प्रयुत्त पार्टीने शक्तीच्या बळावर सत्ता पुन्हा ताब्यात घेतली. सत्तेत येताच सरकारने विरोधी पक्षाची नाकेबंदी करून टाकली. या घटनेनंतर देशात लोकशाही समर्थक गटाकडून तीव्र स्वरूपाची आंदोलनं सुरू आहेत.

निदर्शक व सरकार तडजोड स्वीकारण्यास तयार नाहीत. सरकार मागण्या मान्य करत नाहीत तर आंदोलक मागे हटण्यास तयार नाही. या पार्श्वभूमीवर लोकशाही-समर्थक व सरकारमधील हा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे.

कलीम अजीम, पुणे

(सदरील लेख १४ जानेवारी २०२१च्या लोकमतमध्ये प्रकाशित झालेला आहे.)

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,53,इस्लाम,43,किताब,26,जगभर,132,पत्रव्यवहार,4,राजनीति,309,व्यक्ती,26,संकलन,65,समाज,271,साहित्य,80,सिनेमा,22,हिंदी,55,
ltr
item
नजरिया: थायलँडमध्ये लोकशाहीसाठी ‘बदक क्रांति’
थायलँडमध्ये लोकशाहीसाठी ‘बदक क्रांति’
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjTvcpKStush7DFi1OWYyMjf4yBFSKonThDRAiw-0bXKYnAZb5xKD9yBi0Qi-4qhFALQaM9RvEqEmjCHTajVNw-YjqxfvhTB8GuPIprQUEfy8NcEcrmw_e5W7rs_ACr5kCl_PZO_hA1FPS6/w640-h384/3452.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjTvcpKStush7DFi1OWYyMjf4yBFSKonThDRAiw-0bXKYnAZb5xKD9yBi0Qi-4qhFALQaM9RvEqEmjCHTajVNw-YjqxfvhTB8GuPIprQUEfy8NcEcrmw_e5W7rs_ACr5kCl_PZO_hA1FPS6/s72-w640-c-h384/3452.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2021/01/blog-post_14.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2021/01/blog-post_14.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content