पॅरिसवरील हल्ल्यानंतर जगभरात आता आयसीसचा बंदोबस्त कसा करायचा याबाबत गांभीर्याने विचार सुरू झाला आहे. आयसीस या दहशतवादी संघटनेचा बंदोबस्त करण्याच्या घोषणा, फ्रान्सच्या बरोबरीने रशिया, अमेरिका आदी महासत्तांनीही केल्या आहेत. आयसीस ही अल् कायदासारखी दहशतवादी संघटना नाही. तो एक दहशतवादाला खतपाणी घालणारा देश आहे.
इराक आणि सिरियामधील एक मोठा भूप्रदेश आयसीसच्या ताब्यात आहे. इराकमध्ये कधीही नसलेली महासंहारक अस्त्रे (वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन) शोधण्यासाठी इराकवर अमेरिकेने युद्ध लादले. ही महासंहारक अस्त्रे इराकमध्ये नक्की कुठे लपवून ठेवलेली आहेत. त्यातून केवळ अमेरिकाच नव्हे तर संपूर्ण जग नष्ट होण्याचा धोका कसा आहे, यावर तेव्हा अमेरिकेतील अत्यंत प्रतिष्ठित वर्तमानपत्रांमधून रकानेच्या रकाने माहिती प्रसिद्ध व्हायची.
पुढे इराककडे ही महासंहारक अस्त्रे नाहीतच हे उघड झाल्यावर त्याबाबत ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने पहिल्या पानावर विशेष संपादकीय लिहून माफी मागितली होती. सांगण्याचा मुद्दा हा की, इराकला युद्धाच्या खाईत लोटल्यानंतर पुढे संपूर्ण खाडी देशांवर त्याचे परिणाम झाले. इराक तर पूर्णतः उद्ध्वस्त झाला. कोट्यवधी लोक परागंदा झाले. लाखो जण किड्या मुग्यांसारखे मारले गेले.
वाचा : ‘बेगुनाह’ कैद्यांची व्यथा
सद्दाम हुसेन हा हुकुमशहा होता. मात्र त्याच्या राजवटीत शिक्षण, आरोग्य आदी मुलभूत सोयी-सुविधा सर्वांसाठी समान व मोफत होत्या. स्त्रियांना अधिकार होते. इराकी स्त्रिया सर्व क्षेत्रांमध्ये कार्यरत होत्या. शेजारील अरब राष्ट्रांपेक्षा हे आशादायी चित्र होते. मात्र त्याच्या हुकुमशाही राजवटीतील अत्याचाराच्या विरोधात पाश्चिमात्य प्रसार माध्यमांनी अत्यंत भयंकर चित्र रंगविले. त्याच वेळी शेजारील सौदी अरेबिया हे अमेरिकेचे अंकित राष्ट्र त्यापेक्षाही भयंकर अत्याचार तेथील जनतेवर करते आहे. इस्लामच्या नावाखाली जगभरात वहाबी कट्टर पंथाला पोसते आहे, याकडे अमेरिका कायम डोळेझाक करत राहिली.
सद्दाम हा सुन्नी पंथीय होता. मात्र इराकधील
जनतेत शिया पंथीयांचे मोठे प्राबल्य. त्याचा फायदा उठविण्याचा अमेरिकेचा डाव होता.
त्यानुसार सद्दामची राजवट उलथवून लावल्यानंतर इराकच्या नाड्या या शिया पंथीयांच्या
हातात दिल्या गेल्या. हे सगळे होत असताना सद्दाम हुसेन त्याची बाथ पार्टी, त्याचे प्रशिक्षित सैन्य या कशाकडेही फारसे लक्ष
दिले गेले नाही.
जसे अमिरिकी सैन्य ही सगळी वाट लावून इराकमधून बाहेर पडले तसे हे
सुन्नी पंथीय बाथ पक्षाचे कार्यकर्ते व सद्दामच्या काळातील सैन्याधिकारी यांच्या
माध्यमातून आयसीस उभी राहिली. शेजारील सिरियामध्येही अमेरिका करत असलेल्या
हस्तक्षेपामुळे तेथील जनता व एकंदरच आखाती देशात अमेरिकेच्या विरोधात प्रचंड
वातावरण निर्मिती सुरू झाली होती. त्याचा आयसीसने फायदा उचलला.
परदेशी व विशेषतः
गोऱ्यांचे अपहरण करून त्यांच्या शिरच्छेदाचे सत्र सुरू करून आयसीस अचानक
प्रकाशझोतात यायला सुरुवात झाली. दरम्यानच्या काळात अल कायदा व आयसीस यांच्यात
टोकाचे मतभेद सुरू झाले.
कुठल्याही देशांचा भूभाग हातात घेऊन इस्लामी
कट्टरतावादाची पाळं मूळं जगभरात घट्ट रोवता येणार नाहीत, अशी अल कायदाची धारणा होती. तर आयसीसच्या
निमित्ताने पुन्हा एकदा खिलाफतची सुरुवात होत असल्याचे आयसीसचे म्हणणे होते. या
दोघांमधील मतभेद इतके टोकाला गेले होते, की काही काळ एकमेकांच्या समर्थकांचे मुडदेही पाडण्यापर्यंत या संघटना
गेल्याची वृत्ते होती. मात्र पॅरिस हल्ल्यानंतर दहशतवादाचा अभ्यास करणाऱ्या
तज्ज्ञांना अल कायदा व आयसीस या दोन संघटनांचे सूत जुळले असावे, असे आता वाटू लागले आहे. कारण परदेशी भूमीवर जाऊन
आत्मघातकी हल्ला करण्याची निती व तंत्र दोन्हींबाबत आयसीस मागे होती. त्यामुळेच या
मागे कुठे ना कुठे अल कायदाचा हात असल्याचे काही तज्ज्ञांना वाटते आहे.
असो. आयसीस काय किंवा अल कायदा काय या दोन्हींचा
मूळ पुरुष हा शेवटी अमेरिकाच आहे. बिन लादेनचे तर अख्खे खानदानच अमेरिकी
कंपन्यांची कंत्राटे घेणारे. अफगाणिस्तानात सोव्हिएत युनियनचा लाल झेंडा फडकू नये
म्हणून तालीबानला पाकिस्तानमधील झिया राजवटीच्या माध्यमातून शस्त्रास्त्रे आणि
डॉलर्स पुरविण्याचे काम अमेरिकेने उघड उघड केले होते.
अगदी सिल्व्हस्टर
स्टॅलेनच्या ‘रॅम्बो’ सिनेमातदेखील स्टॅलेन या तालीबानींना मदत करताना
दाखविला आहे. हा सिनेमा आजही एचबीओवर लागला असता अनेक लोक तो चवीने पाहतात. मात्र
हा अमेरिकी सैनिक तालीबान्यांना का मदत करतोय याचा विचार करीत नाहीत. आयसीसची
निर्मितीदेखील अमेरिकी व पाश्चिमात्य राष्ट्रांच्या आखाती देशांबाबतच्या
धोरणांमुळेच झाली.
आखाती देशांमध्ये लोकशाहीची बिजे रूजू नयेत, तिथे सौद घराण्यासारख्यांची सत्ता रहावी व जनता
मध्य युगीन कायद्यांमध्येच पिचत पडावी हेच अमेरिकेचे धोरण राहिले आहे.
आयसीसकडे आज रणगाडे, विमानवेधी तोफा, अत्याधुनिक स्वयंचलित बंदुका, मिसाईल्स वगैरे मुबलक प्रमाणात आहेत. हा साठा
त्यांच्याकडे येतो कसा, उद्ध्वस्त झालेल्या
इराक आणि सिरियामध्ये तर याचे कारखाने नाहीत. आयसीसच्या ताब्यात असलेल्या
भूप्रदेशात तेलाचे मोठ्ठाले साठे आहेत. हे तेल आयसीस काळ्या बाजारात विकत असते. हे
तेल घेणाऱ्या कंपन्या कोण आहेत, कोणत्या देशातल्या आहेत, त्यातून लाखो कोटी रुपयांचा फायदा कसा कमवत आहेत, याबाबत ग्रॅहॅम फूलर या एके काळी सीआयए या
अमेरिकी हेर खात्यात काम करणाऱ्या लेखकाने विस्तृत लिखाण केले आहे.
सांगण्याचा
मुद्दा हा की एका बाजूला विकसित राष्ट्रांमधील ऊर्जेची प्रचंड भूक भागविण्यासाठी
आखाती देशांमधील तेलावर डोळा असलेली राष्ट्रे त्या देशांमध्ये कट्टर धार्मिक
संघटना कशा प्रबळ होतील हे पाहत आहेत. परिणामतः जगातील निष्पाप लोकांना त्याचे
परिणाम भोगावे लागत आहेत.
दुसरीकडे मुस्लिम धर्मामध्ये जगभरात ज्या विविध प्रथा
परंपरा आहेत, त्या मोडित निघून
एका वहाबी पंथीय इस्लामचा बोलबोला व्हावा यासाठी सौदी अरेबियासारखे देश जगभरातील
कट्टर इस्लामला पोसत आहेत. अशा वेळी सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती, बुल्ले शहा, निजामुद्दीन अवलीया यांच्या मार्गाने जाणाऱ्यांवर
मोठी जबाबदारी आहे. दुसरीकडे इस्लाममध्ये आधुनिकता आणण्याचा प्रयत्न करण्याची
जबाबदारीही जगभरातील प्रगतीशील मुस्लिमांवर आहे.
जगातील प्रत्येक धर्मियांमध्ये
नास्तिकतेला थारा नसला तरी नास्तिकांना जगण्याची जागा आहे. मुसलमानांमध्ये नेमकी
तीच नाही. हमिद दलवाईंसारख्या विचारवंताची बाजू घेण्याची हिंमत आजही अनेक डावे
विचारवंत करत नाहीत, त्याचे कारण दलवाई
यांनी थेट अल्लाचे अस्तित्व अमान्य करण्यामागेच आहे.
नास्तिकता अमान्य असणे हा
देव-धर्म मानणाऱ्यांचा अधिकार आहे. मात्र नास्तिकाचे विचार अमान्य करूनही त्याला
ते मांडण्याचा अधिकार आधुनिक युगात मुसलमानांना ख्रिस्ती, ज्यू, हिंदू धर्मियांप्रमाणे मान्य करावाच लागेल.
सांप्रतच्या काळात व
भविष्यात इस्लाममधील मुख्य लढाई हीच असेल. ज्या महाराष्ट्रातील मौलाना मौदुदींच्या
राजकीय इस्लामच्या विचारधारेच्या आधारावर आज जगभरातील कट्टर इस्लामी संघटना हातात
शस्त्र घेऊन उभ्या राहिल्या आहेत, त्याच महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेल्या हमिद दलवाईंच्या विचारधारेमध्येच
त्याचा बिमोड कसा करावा याचे उत्तर आहे. ते आज ना उद्या जगभरातील प्रगतीशील
मुसलमानांना जाहिररित्या सांगावे लागेल. तसेच मानवी प्रगतीसाठीचा लढा हा प्राचीन
कल्पनांऐवजी भौतिक आधारावर उभा करण्यासाठी जगभरातील श्रमिकांशी जोडून घ्यावी
लागेल. हेच खरे दहशतवादावर उत्तर ठरू शकते.
(ज्येष्ठ पत्रकार समर खडस यांचा हा लेख २३ नोव्हेंबर २०१५ला महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रकाशित झालेला आहे)
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com