लाळघोट्यांची शरणागती, बदनामी मुस्लिमांची !

काही व्हायरल व्हिडियोतून दिसतं की, काही मुस्लिम लोक बागेश्वर बाबाच्या तथाकथित हिंदू राष्ट्राचं समर्थन करत आहेत. ते मुसलमानांसारखी दिसतात. कारण त्यांनी टोप्या घातलेल्या आहेत. हे मुस्लिम आहेत, पण केवळ संघासाठी! कारण ते पूर्णवेळ संघाच्या शाखेसाठी काम करतात. त्यामुळे वरून आदेश आल्याप्रमाणे त्यांनी बागेश्वरकडे जाऊन त्याचं स्वागत केलं आहे. सूचनेप्रमाणे JSRच्या घोषणाही दिल्या आहेत.

धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वरच्या या पदयात्रेसंदर्भात इंटरनेटला दोन बातम्या आहेत. एक बातमी हिंदू राष्ट्राचे समर्थक मुसलमान असा आशयाची आहे. तर दुसरी बातमी बागेश्वरच्या विरोधात मुस्लिम राष्ट्रासाठी यात्रा ! बातमी वाचून किंवा त्याचे व्हिडियो पाहून अनेकांना वाटू शकतं की मुसलमान हिंदू राष्ट्राचे वाहक कसे? पण हे पूर्ण खरे नाही. कारण ही लोक संघ-भाजपचीच आहेत. हे मुस्लिम भाजप-संघाच्या शाखेसाठी काम करणारे आहेत. हे संघाचे लाळघोटे व भाजपचे पेड वर्कर आहेत. त्यांचे स्वयंसेवक आहेत.

या दोन्ही बातमीत केंद्रवर्ती असलेले मुस्लिम संघ-भाजप समर्थक आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मुस्लिम विंग मुस्लिम राष्ट्रीय मंचचे सदस्य आहेत. समर्थन करणारे व विरोध करणारे दोन्ही आरएसएसचे आहेत.

संघाचे स्वयंसेवक म्हटलं की ते त्यांच्या प्रत्येक दुष्प्रचाराचं समर्थन करणे ओघाने आलंच. कारण संघाचे मागास, बहुजन घटकातील स्वयंसेवक निर्बुद्ध सांगकाम्या, अंधभक्त आहेत. यात मुस्लिम दिसणारे वेगळे काढून ठेवता येत नाहीत. अशी मुसंघी जमात लोभ-लालसेपोटी देशभर वाढत आहे. ती दिसायला मुस्लिम असली तरी, भाजप-संघाची लाळघोटी जमात आहे. बागेश्वरला विरोध करणारी व त्याचं समर्थन करून फोटो व व्हिडियो टाकणारी हीच जमात आहे.

 



 संघाचे प्यादे

आरएसएसमधील मुस्लिम दिसणारी लोक मनाने नाही तर राजकीय कृती म्हणून संघाला शरण गेले आहेत. अनेक वेळा दिसते राजकीय भूमिका नव्हे तर संधी साधू वृत्तीतून ही मंडळी संघाच्या वळचणीला जाऊन बसली आहे. किरकोळ लाभ व लोभापोटी त्यांनी आपला आत्मा गहाण ठेवलेला असावा.

ही मंडळी निर्बुद्ध, कमी समज असलेले, राजकीय अर्थाने चमको आहे. त्यामुळे ते सुज्ञ असतील अशी शक्यता करणे बरोबर नाही. ते दाखवत असले तरी तेवढे ते हुशार नाहीत. त्यामुळे या लोकांना भविष्यातील संभावित धोके कळत नसावेत. 

या मंडळीच्या दर्शनी प्रतिकांचा आधार घेऊन संघ-भाजप मुस्लिमविरोधी बदनामी व चारित्रहननाचं सार्वत्रिकरण करत आहे. मुस्लिम फोबियाला बळकटी देत आहे. मुस्लिम विरोधी अमानवीकरणाचं सामान्यीकरण करत आहे. स्वाभाविक त्यांना ही कुरघोडी कळणार नाही. कारण ते संघाच्या शाखेत हिप्नोटाईझ झालेले आहेत. दुसरं असं की लोभ, लालसा व स्वार्थापोटी विवेक हरवून बसलेली ही जमात आहे.

संघ-भाजपने त्यांच्याकडून (मुसलमान) घेतलेली ही शरणागती आहे. या शरणागतीचा वापर बहुसांस्कृतिक मुसलमानांचं सामाजिक व सांस्कृतिक उद्ध्वस्तीकरण घडवून आणण्यासाठी केला जात आहे. उगाच मोहन भागवत वारंवार सांगत नाहीत की “ख्रिस्ती, मुसलमानांचे पूर्वज हिंदू होते.” आजच्या पुन्हा असी बातमी आली आहे. त्यात भागवत पुन्हा म्हणतात, “भारतातील प्रत्येकजण हिंदूच आहे. देशातील सर्व मुस्लिम आणि ख्रिश्चन समुदायातील पूर्वज हिंदू आहेत.”

या सांगण्यातून ते मुसलमानांना (व ख्रिश्चनांनाही) हिंदुत्वाच्या शरणागतीचे संदेश देत आहेत. शरणागतीला भाग पाडत आहेत. राजकीय हिंदुत्वाकडे खेचत आहेत. या कुरघोड्यांचा अर्थ व्यापक आहे. त्याचा अंतिम शेवट ब्राह्मण्यवादाची व ब्राह्मणी धर्माची गुलामी असा आहे.

याच सांस्कृतिक शरणागतीला लाथाडून दलित, पदलित धर्मांतरे करून मुसलमान (आणि ख्रिस्ती) झाली होती. ब्राह्मणी धर्माला, त्यांच्या धार्मिक वर्चस्ववादाला व चातुर्वर्ण्य व्यवस्थेला ठोकरून त्यांनी धर्मांतरे केली होती. पण ही वस्तुस्थिती मोहन भागवत सांगणार नाहीत.

पण संघ-भाजप पुन्हा एकदा रिवर्स शरणागती पत्करण्यास भाग पाडत आहे. अशा संधीसाधू मुसंघी मंडळींच्या लोळघोट्या धोरणामुळे ते यशस्वी ठरत आहेत. पण, ही कुरघोडी ला लाळघोट्या मंडळी कोण समजावून सांगेल?

पढ़े : मुसलमान ‘टेली मुल्ला’ओं का बाइकॉट क्यूँ नही करते?

पढ़े : आरएसएस के मदरसे यानी सेक्युलर विचारों पर हमला!

विरोधकही संघाचेच

बागेश्वरच्या हिंदू राष्ट्रासाठी काढलेल्या यात्रेला विरोध करमारेही संघाचेच आहेत. यात्रेच्या पहिल्या दिवशी साजिद रशिदी नावाच्या इसमाने बागेश्वरच्या यात्रेला विरोध दर्शवला. प्रतिक्रियेत तो म्हणाला, “मी ही मुस्लिम राष्ट्रासाठी यात्रा काढतो....” 

हा साजिद रशिदी मुस्लिम राष्ट्रीय मंचचा सक्रिय सदस्य व संघाचा स्वयंसेवक आहे. २७ सप्टेंबर २०२५ रोजी दिल्लीत जालेल्या संघाच्या कार्यक्र्माला त्याने हजेरी लावली होती. ‘मुस्लिम राष्ट्रीय मंच’ला २५ वर्, पूर्ण जाल्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम घेतला गेला. त्यानेच हा फोटो इंटरनेटला टाकला होता.

साजिद रशिदी गोदी मीडियावर मुस्लिमांचा प्रतिनिधी-प्रवक्ता म्हणून चर्चेत सामिल होतो. आपल्या नावाला जोडून तो ‘मौलाना’ हे उपनाम लावतो. त्याचे विरोधक त्याला ‘पाँच हजारी मौलाना’ म्हणतात. म्हणजे गोदी मीडियाकडून त्याला चर्चेत सामील होण्यासाठी ५ हजार रुपये मिळतात. हा साजिद रशिदी नावाचा आरएसएसचा माणूस बागेश्वरला खुलं आव्हान का देतोय, असं प्रश्न पडणे स्वाभविक आहे.

साजिद बागेश्वर आव्हान देऊन म्हणतो, “अशा पदयात्रांचा धर्माशी काहीही संबंध नाही, ही तीर्थयात्रा फक्त सोशल मीडियावर चमकण्यासाठी केली जाते.” त म्हणतो या यात्रेला उत्तर म्हणून ही मुस्लिम राष्ट्रासाठी यात्रा काढतो. त्याचं हे विधान गोदी मीडियाने बरच गाजवलं. या विधानावर सोशल मीडियावर त्याला व त्याला जोडून संबंध मुसलमानांना भरपूर शिव्या पडल्या. कारण तो भारतातील सबंध मुसलमानांचं प्रतिनिधित्व करतोय, असं गोदी मीडिया लोकांना पटवून देत होता. तो बागेश्वरला बरंच काही बोलला आहे. त्याची बातमी ९ नोव्हेबरला दिवसभर गाजत होती.

साजिद रशिदीचं विधान संबंध मुसलमानांचं म्हणून घेतलं गेलं. त्यात चुकीचंही काहीच नव्हतं. पण साजिद रसिदी हा संघाचाच चेहरा आहे, हे किती जणाना माहिती आहे? असे अनेक चेहरे घेऊन संघ समाजात वावरत असतो. त्यामुळे प्रत्येक मौलाना दिसणारा व्यक्ती मुसलमानांचा प्रतिनिधी असतो, असं समजणे गैर आहे.
 


हिंदू राष्ट्रात कांदा-लसूण बंदी

या बागेश्वरने खजुराहो व आसपासच्या भागात कुठल्याही हॉटेलमध्ये कांदा, लसूण वर्ज्य केलं आहे. तिथं लोक घरातही कांदा-लसूण खात नाही असं म्हणतात. कारण ते मार्केटला मिळतच नाही. मोरल पोलिसिंगवाले कांदा-लसूण विकू देत नाहीत. परिसरातील प्रत्येक हॉटेल, रेस्टॉरंट व खानावळीत मोठ्या अक्षरात लिहून लावलं आहे की, येथे कांदा-लसूण टाकून पदार्थ बनवले जात नाहीत.

खजुराहोजवळ याने आपलं बस्तान बसवलं आहे. शासनाने मोदी कृपेने अख्ख गाव यास आंदण देऊन टाकलं आहे. तिथे दररोज शेकडो लोक भेट देतात. पैसे देतात. भेट देणाऱ्यामध्ये मागास जाति-प्रवर्गातील महिलांची संख्या मोठी आहे.

अशा भक्तांसाठी जवळच्या खजुराहो स्टेशनवर प्रत्येक गाडी थांबवली जाते. त्यांच्या थांब्याचा वेळाही वाढवल्या आहेत. चहावाला सांगत होता, इथं २० मिनिटे गाडी थांबेल. म्हटलं, इतका वेळ? तर तो म्हणाला, आता प्रत्येक गाडी इतकाच वेळ थांबते.

खजुराहोच्या प्रत्येक सार्वजनिक स्थळी, हॉटेल्स, रेस्टॉरंट, चहाच्या टपऱ्या, खानावळे, लॉज, दुकाने इत्यादी ठिकाणी याचे मोठे-मोठे फोटो लावलेले आहेत. काही रिकामटेकडी लोक नुसतच धामचं उदो-उदो करत फिरत असलेले दिसतात.

खजुराहो छोटसं शहर आहे. उद्योग-धंदे फारसे नाहीत. पर्यटन हाच व्यवसाय. तरी गोबरपट्ट्यातील अनेक तरुण इथं दिसतात. ऑटो, रिक्षा, टॅक्सी, पथारीवाले, मदतनीस म्हणून त्याचां वार दिसतो. काही गाईडच्या व्यवसायात आहेत. ते हिंदुत्वाचा इतिहास पर्यटकांना सांगत सुटतात. हॉटेलमध्ये काम करणारे बहुतांश भैय्ये आहेत. ते सर्वजण बागेश्वरचा मौखिक प्रचार राबवत असतात. बागेश्वरच्या नवा व्यवसायाचं प्रचार करतात.

खजुराहो स्टेशनवर उतराच एक टोळकं जवळ आलं. विचारलं, “बागेश्वर धाम जाना है ना.” म्हणालो, “नहीं.” ते सांगत सुटले, “भाई यहाँ आनेवाला हरएक बागेश्वर धाम जाता है, आप भी चलो... देख लो बहुत अच्छा बनाया हैं। बाबा के अच्छे से दर्शन करवा दूँगा..”

इथं बागेश्वरचा नवा व्यवसाय तेजीत सुरू आहे. तो स्त्रियांना रिकामा प्लॉट म्हणतो.. त्या प्लॉटवर कोणीही सहज कब्जा करू शकतो, असं त्याला वाटतं. गल्यात मंगळसूत्र नसलेली स्त्री त्याला रिकामा प्लॉट वाटते. महिलांविषयी तो खूपच किळसवाणं बोलत राहतो. त्याचे रिल्स पाहून हा किती बद्दड माणूस आहे असं सहज कळून जातं. दलित, मागास समुदायाविषयी देखील याची मतं वादग्रस्त आहेत. तो स्वतला सरकार म्हणतो. बागेश्वर सरकार नावाने त्याची प्रचारी यंत्रणा काम करते.

महाराष्ट्रातून त्याला पळवून लावलं होतं. कारण तो इथल्या लोकांची समर्पक उत्तरे देऊ शकला नाही. परिणामी त्याला स्टेज सोडून पळून जावं लागलं. भाजप सरकार पुरस्कृत हा बाबा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात याचं प्रस्थ स्वाभाविक वाढणार आहे.. तो प्रती आसाराम ठरू शकतो.

     

वाचा : चिकित्सा डॉ. आंबेडकरांच्या ‘मुस्लिमविरोधा’ची!

वाचा : आरएसएस आणि वर्तमान राजकारण

दोन चेहरे

बागेश्वरच्या यात्रेचं स्वागत करणारे आणि त्याचप्रमाणे विरोध करणारेही राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रतिनिधी आहेत. समर्थन व विरोध एकाच वेळी कसा? अर्थाच मुसलमानांचे अमानवीकरण व हिंदुत्व शरमागतीचे हे दोन नमूने आहेत. थेट संघाला किंवा भाजपला विरोध केला तर संबंध मुसलमानांना लक्ष्य केलं जातं. कारण मीडिया त्याला मुसलमांनांचा प्रतिनिधी म्हणूनच प्रचारित करीत असतो. मुसलमानांच्या राक्षसीकरणाच्या व्यापक मोहिमेचा भाग म्हणून मीडिया विरोधकाला जागा व प्रसिद्धी देत असते.

समर्थकांना प्रसिद्धी देण्यामागची भूमिका हिंदुत्वाला शरणागती असा आहे. भाजपच्या हिंदू राष्ट्राला मान्यता मिळवण्याचं हे पाखंडी धोरण आहे. असे अनेक पाखंडी लोक संघाकडे आहेत. माझ्या फेसबुकच्या संपर्क यादीत असे अनेक भाजप-संघाचे मुस्लिम नेते आहेत. ते संघाच्या प्रत्येक मुस्लिमविरोधी धोरणाचे समर्थक आहेत. ते सतत काँग्रेसला, विरोधी पक्षांना आमि मुसलमानांना शिवीगाळ करत असतात.

ही मंडळी बागेश्वरच्या स्वागताचे फोटो-व्हिडिओ टाकत आहे. त्यांनी टाकलेल्या व्हिडियोत दिसतं एक बसभरून दाढीवाले मुस्लिम या यात्रेत सहभागी झालेले आहेत. सर्वजण बागेश्वरचा जयजयकार करत आहेत. काही जय हिंदू राष्ट्राचा जयजयकार करताना दिसतात. ही लोक सतत JSRच्या घोषणा देत आहेत.

त्यामुळे पुन्हा स्पष्ट करावं लागतं की, ही मंडळी मुस्लिम दिसत असली तरी भारतीय मुसलमांनाशी त्यांचा काहीएक संबध नाही. ते संघ-भाजपचे स्वयसेवक व अंध समर्थक आहेत. त्यामुळे त्यांना इतर भारतीय मुसलमानांशी जोडणं अवास्तव आहे.

वर म्हटल्याप्रमाणे बागेश्वरच्या हिंदू राष्ट्राच्या कल्पनेत कांदा-लसूण खाणं वर्ज्य आहे. त्याचं प्रात्यक्षिक खजुराहो व आसपास मी पाहून आलोय. त्यामुळे अशा राष्ट्राचं ज्याला कौतुक आहे, त्यांनी आताच तशी मानसिक तयारी करून ठेवावी. त्यात संघ-भाजप समर्तक मुसलमानही येतात. त्यांनी घरात बेगमांना आत्ताच सांगून ठेवावं की भाजीत लसू-कांदा टाकू नको.

कलीम अज़ीम, पुणे

१० नोव्हेंबर २०२५

मेल : kalimazim2@gmail.com

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,50,इस्लाम,41,किताब,26,जगभर,131,पत्रव्यवहार,4,राजनीति,307,व्यक्ती,25,संकलन,65,समाज,267,साहित्य,80,सिनेमा,22,हिंदी,55,
ltr
item
नजरिया: लाळघोट्यांची शरणागती, बदनामी मुस्लिमांची !
लाळघोट्यांची शरणागती, बदनामी मुस्लिमांची !
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgQm_ipiSQvQnHyN8EQ8sphAk7Asbh8uGxSdpbtCmYpZd7h6owCh_4h5nr6Xd8lIzniuy2-gAyFkKsDZxGDbGG2GY1tp6me1VBZ8l0gEMRhIszPnvcs9660zYNbcjgGrGZu4vNy-pcD9Q_m0tEpQAPpW4HJOSgNJwOxaffgbT9HSjUn91ZAlD78X8z14r2-/w640-h360/581262713_1416602773803926_7899113204778923365_n.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgQm_ipiSQvQnHyN8EQ8sphAk7Asbh8uGxSdpbtCmYpZd7h6owCh_4h5nr6Xd8lIzniuy2-gAyFkKsDZxGDbGG2GY1tp6me1VBZ8l0gEMRhIszPnvcs9660zYNbcjgGrGZu4vNy-pcD9Q_m0tEpQAPpW4HJOSgNJwOxaffgbT9HSjUn91ZAlD78X8z14r2-/s72-w640-c-h360/581262713_1416602773803926_7899113204778923365_n.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2025/11/blog-post.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2025/11/blog-post.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content