टेली मौलवी : गोदी मीडियाचे कंटेट क्रियेटर

माजवादी पक्षाच्या एका शिष्टमंडळाने २३ जुलै २०२५ला दिल्लीच्या संसद भवन परिसरातील मस्जिदला भेट दिली. त्यात पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, त्यांच्या पत्नी व खासदार डिंपल यादव होते. त्यांच्यासोबत इकरा हसन, धर्मेंद्र यादव, जियाउर्रहमान होते. हे सर्वजण लोकसभा सदस्य आहेत.

संसदेचं कामकाज संपवून सर्वजण बाहेर पडले व जवळच्या एका मस्जिदीत विसावा घेतला. मस्जिद पार्लमेंट स्ट्रीट परिसरात आहे. सपचे (रामपूर) खासदार मोहिबुल्ला नदवी या मस्जिदीचे इमाम आहेत. स्वाभाविक तेही या बैठकीत होते. बातम्या होत्या की, वर्तमान राजकारणावर तिथं चर्चा झाली. परंतु भाजप व संघ व त्यांच्या अन्य सहयोगी संघटनांना ही बैठक रुचली नाही.

संघ-भाजपच्या राजकीय नेत्यांना ही बैठक पचनी पडली नाही. त्यांनी या बैठकीला विरोध दर्शवला. या बैठकीवर सर्वप्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुस्लिम शाखेने आक्षेप नोंदवला. स्वाभाविक मस्जिदमध्ये राजकीय बैठक त्यांना नको होती. परंतु थेट बोलतील ते आरएसएसचे स्वयंसवेक कसले?

इतर संघ-भाजप नेत्यांनी ‘सप’वर धार्मिक स्थळी राजकीय बैठक आयोजित केल्याचा आरोप केला. तसेच, सप खासदार डिंपल यादव यांनी मस्जिदीत जातानात योग्य कपडे घातले नव्हते, अशीही टिप्पणी केली. यूपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर ट्विट करून सपवर निशाणा साधला. मौर्य ट्विटमध्ये लिहितात, “सपा के बहादुर श्री अखिलेश यादव मस्जिद गए, लेकिन सफ़ेद ‘जालीदार टोपी’ ले जाना भूल गए। अगर उन्हें ध्यान रखना ही था, तो उन्हें कब्ज़ा करने वाले समूह का पूरा ध्यान रखना चाहिए था।”

पढ़े : मुसलमान ‘टेली मुल्ला’ओं का बाइकॉट क्यूँ नही करते?

पढ़े : आरएसएस के मदरसे यानी सेक्युलर विचारों पर हमला!

पढ़े : अफसोस हुआ और मैंने रिपब्लिक से इस्तिफा दिया

भाजपच्या अल्पसंख्याक 

मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकींना डिंपल यादव यांचं मस्जिदमध्ये येणं आक्षेपार्ह वाटलं. त्यांनी त्यावर निर्बुद्धपणाचं (हिंदू महिला) विधान केलं. त्यांनी अभद्र टिप्पणी करत म्हटलं, “फोटोमध्ये डिंपल यादव ब्लाउज घालून बसल्या आहेत. त्यांची पाठ आणि पोट दिसत आहे. त्यांनी डोक्यावर दुपट्टा घेतलेला नव्हता.”

सिद्दिकी पुढे म्हणतात, “हे मस्जिदीतील आचारसंहितेविरुद्ध आहे. त्यामुळे जगभरातील इस्लामिक भावना दुखावतात. ...आम्ही त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करू.”

सिद्दीकी यांनी डिंपल यादव यांच्या पोशाखावर आक्षेप घेतला. त्यांनी ‘इंडिया टुडे’ला प्रतिक्रिया देताना म्हटलं, “मस्जिद में महिलाओं के बैठने के लिए अलग जगह होती है, लेकिन डिंपल यादव और अखिलेश वहाँ एक साथ बैठे थे। इसके अलावा, डिंपल यादव ने एक ब्लाउज पहना हुआ था जिसमें उनका पेट दिख रहा था। यह अर्धनग्न अवस्था है और मस्जिद के अंदर ऐसे कपड़े पहनने की अनुमति नहीं है।”

पार्लमेंट स्ट्रीट येथील मस्जिदीत सपच्या शिष्टमंडळाने भेट दिलेला हाच तो फोटो

पुढे सिद्दीकी मस्जिदचे इमाम मोहिबुल्लाह नदवी यांच्यावर घसरले. म्हणतात,मस्जिद चाय पीने की जगह नहीं है। जिस जगह अखिलेश यादव ने अपने सांसदों के साथ चाय पी और हंसी-मजाक किया, वह सपा सांसद मोहिबुल्लाह नदवी का घर नहीं, बल्कि अल्लाह का घर है। अल्लाह के घर में चाय-नाश्ते के साथ हंसी-मजाक नहीं होता, वहाँ सिर्फ़ और सिर्फ़ इबादत होती है।”

सिद्दीकी यांनी म्हटलं, “हे मस्जिदीच्या आचारसंहितेविरुद्ध आहे आणि जगभरातील इस्लामिक भावना दुखावणारं आहे. आम्ही त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करू. जर परिस्थिती अशीच राहिली, तर आम्हीसुद्धा त्याच मस्जिदीत एक बैठक आयोजित करू. ती बैठक राष्ट्रगीतानं सुरू होईल आणि राष्ट्रगीतानंच संपेल.”

एरवी संघ-भाजप मुस्लिमातील ज्या कडव्या विचारांवर दोषारोप करतो, त्यापेक्षा वेगळा सिद्दीकी यांनी मांडलेला नव्हता. अशा विधानामुळे संघाच्या वरीष्ठाकडून त्यांना शाबासकी नक्कीच मिळाली असेल. या द्वेषमोहिमेत भाजप-संघाच्या पे-रोलवर असलेल्या टेली मुल्लांनी अजून तेल ओतण्याचे काम केलं. त्यात प्रामुख्याने शहाबुद्दीन रजवी व साजिद रशिदी होते.

साजिद रशिदीने रिपब्लिक चॅनेलच्या डिबेट्समध्ये डिंपल यादव यांच्याविरोधात अश्लिल भाषेत टीका केली. म्हटलं, “मैं एक फोटो दिखाता हूं, जिसे देखकर शर्मा जाएंगे। मैं किसी का नाम नहीं लेता लेकिन सभी जानते हैं, जो मोहतरमा उनके साथ थीं वो तो अपने मुस्लिम पहनावे में थीं। उनका सिर ढका हुआ था। दूसरी मोहतरमा थीं डिंपल यादव। उनकी पीठ का फोटो देख लीजिए। नंगी बैठी हैं।”

दुसरे मुल्लाजी शहाबुद्दीन रजवी यांनीही अशाच प्रकारची अशोभनीय भाषा वापरली. म्हणतात, “सपा सांसद मोहिबुल्लाह नदवी ने जिस तरह मस्जिद में सपा नेताओं को बुलाकर बैठक की, वह शर्मनाक है। उन्हें समुदाय से माफी मांगनी चाहिए। डिंपल यादव ने इस बात का कतई ख्याल नहीं रखा कि हम कहा जा रहे है और कहां बैठे है।”

पुढे म्हणतात, “डिंपल यादव ने अपना सिर भी नहीं ढका था। साथ ही, उनका पहनावा इस्लामिक कल्चर तो छोड़िए, भारतीय कल्चर के भी खिलाफ था। …डिंपल यादव ने मस्जिद की तौहीन की है। डिम्पल यादव को मांफी मांगनी चाहिए। पूरे देश का मुसलमान उनसे नाराज है।”

मुसलमान दिसणाऱ्या या दोन दाढीधारी मुल्लांची भाषा आक्षेपार्ह होती. अंगभर परिधान केलेली साडी या मुल्लांना भारतीय संस्कृतीचा अपमान वाटतो. वास्तविक, हे दोन्ही मुल्ला भाजप-संघाशी संबंधित आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून अशी प्रतिगामी कथने मांडणे स्वाभाविक होतं. या वादग्रस्त वक्त्यावरून अनेकांनी दोघांवर टीका केली.  परिणामी उत्तर प्रदेशात राजकीय गदारोळ माजला.

उपरोक्त मांडलेल्या सर्वांच्या अशोभनीय टिप्पणीला भाजपच्या तमाम आयटी सेल संचलित शेकडों वेबसाईट, लाखों सोशल मीडिया पेजेस, कोट्यवधी व्हॉट्सएप ग्रुप, शेकडागणिक गोदी मीडियातून भरपूर प्रसिद्धी दिली गेली. भाजपसमर्थक एएनआय सारख्या वृत्तसंस्थेने त्याला भारतभर गाजवलं. दिमतीला अन्य वृत्तसंस्थाही होत्या. क्रिया-प्रतिक्रियांना जागा देऊन हा किरकोळ मुद्दा हिंदू मुस्लिम असा सजवला गेला. गोदी मीडियाकृपेने गेली आठवडाभर हा विषय ज्वलंत ठेवला गेला आहे. तो मौलवी किंवा मुल्ला देशातील मुसलमान आहे, असं चित्र रंगवत संबंध समाजाला झोडपलं जात आहे.

वाचा : ‘बाप्तिस्मा ते धर्मांतर’ : आंबेडकरी जाणिवांचे स्वकथन

वाचा : पक्षपाती मीडिया आणि अविश्वासी (?) न्यायसंस्था

वाचा : लॉकडाऊन डायरी : फेक नरेशन आणि मुस्लिम

धर्मवादी राजकारण 

पोसणाऱ्या संघ-भाजपच्या नेत्यांनी अशी विधाने करणं नवल नव्हतं. टोकाचा मुस्लिम व इस्लामद्वेष करणाऱ्या संघ-भाजपने सांगकाम्या मुस्लिम जवळ ठेवले आहे. परंतु व्यापक कारस्थानाचा भाग म्हणून त्यांनाही धर्मवादी राजकारणात गुरफटून ठेवलं आहे. त्यामुळे स्वाभाविक हे शरणागत मुस्लिम अधिकाधिक हट्टी भूमिका घेताना दिसतात. त्यामुळे या सर्वांची टिप्पणी संघाच्या मूळ भूमिकेपेक्षा वेगळी करून पाहता येत नाही.

भाजपच्या धर्मांध राजकारणाचे भोंगा झालेले हे हिंदुत्व विचारांचे वाहक मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी नाहीत. मुसलमानांच्या अमानवीकरणाच्या प्रक्रियेला हातभार लावणारे हे टेली मुल्ला तर अजिबात समाजाचे प्रतिनिधी ठरू शकत नाहीत. साजिद रशीदीला टीवी डिबेट्सच्या विंडोमध्ये ‘ऑल इंडिया इमाम असोसिएशन’ नामक संघटनेचा अध्यक्ष म्हटलं जातं. तर शहाबुद्दीन रजवी बरेलवी ‘ऑल इंडिया मुस्लिम जमात’चे राष्ट्रीय अध्यक्ष असं लिहिण्यात येतं. हे दोघेही स्वतला इमाममौलाना म्हणवून घेतात.

हे दोघेही दाढीधारी मुल्ला वादग्रस्त व आक्षेपार्ह भाषणासाठी प्रसिद्ध आहेत. ते सतत भाजप-संघ-हिदुत्ववादी संघटनांना पाहिजे तसं बोलत असतात. त्यांना अनुकूल विधाने करतात.

गोदी मीडियाच्या न्यूज चॅनेलवर हे दोघेही नियमित दिसतात. कर्मठ, कट्टर, हेकेखोर, हिंसक, धर्मांध, स्थितिप्रिय, साचेबद्ध, आधुनिक विचारांचे विरोधक, अतिरेकी अशी मुसलमानांची प्रतिमा ते चर्चेत सादर करत असतात. ‘आम्ही’ मांडलेल्या मुसलमानांचे ‘आम्ही स्वयघोषित’ प्रतिनिधी आहोत, त्यामुळे आम्हाला चॅनेल बोलावतो, असाही दावा ते करतात. त्यांचे टीकाकार म्हणतात की, भारतातील ५ इमामही त्यांच्यासोबत नाहीत.

साजिद रशिदी व शहाबुद्दीन रजवीचे भाजप-संघाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबतचे अनेक फोटो सार्वजनिक आहेत. दि वायर’च्या संपादिका आरफा खानम शेरवानी साजिद रशिदीवर टीका करताना म्हणतात, “यह व्यक्ति भाजपा का समर्थन करता है और भाजपा उसका समर्थन करती है। इनके व्हॉट्सएप की डीपी पर नरेंद्र मोदी के साथ इनकी तस्वीर हैं। यह व्यक्ति बाकायदा बीजेपी का समर्थन कर रहा है। हो सकता है बीजेपी का या कांग्रेस का कोई भी नेता या कोई भी मामूली आदमी समर्थन कर सकता है। लेकिन अगर उस पार्टी का नेता उसको प्रमोट करें तो आप समझ लीजिए कि जो समर्थन है वह दोनों तरफ से है।” (दि वायर, यू ट्यूब, २८ जुलै २०२५)

शहाबुद्दीन रज़वी व साजिद रशिदीच्या त्या वक्तव्याचा अनेक मुस्लिम पत्रकार, संपादक, कार्यकर्ते, अभ्यासक, सोशल मीडिया इन्फ्लूसर, भाष्यकार व विचारवंतानी निषेध दर्शवत प्रचंड विरोध केला. शहाबुद्दीन रज़वी व साजिद रशिदीच्या त्या वक्तव्याचा अनेक मुस्लिम पत्रकार, संपादक, कार्यकर्ते, अभ्यासक, सोशल मीडिया इन्फ्लूसर, भाष्यकार व विचारवंतानी निषेध दर्शवत प्रचंड विरोध केला. खासदार इकरा हसन यांनी साजिद रशिदीविरोधात कारवाईची मागणी केली. म्हणतात, “महिलाविरोधी विचार असलेल्या अशा लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला पाहिजे, ते धार्मिक नेते नाहीत, ते कोणत्याही धर्माचे ठेकेदार नाहीत.”

सप खासदार झिया उर्रहमान बर्क यांनी या वादाला निराधार म्हटलं. सांगतात, “मस्जिदीत कोणतीही राजकीय बैठक झाली नाही. संसदेत किंवा खासदारांच्या निवासस्थानी बैठका घेण्यासाठी जागा नाही का? ते मस्जिदीत बैठका का घेतील?”

खासदार इमरान मसूद यांनीही भाजपच्या या टीकेला लज्जास्पद ठरविताना, “मस्जिदीचे इमामदेखील खासदार आहेत. ते मस्जिदीत बसले, तर काय हरकत आहे? भाजपला लाज वाटली पाहिजे. डिंपल यादव भारतीय संस्कृतीनुसार पोशाख करतात. भाजप नेत्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडलं आहे. ते महिलांचा अपमान करतात.”

आठवडाभर हा मुद्दा गाजत आहे. दरम्यानच्या काळात समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी साजिद रशिदी विरोधात एफआयआर दाखल केला. भारतीय दंड संहितेच्या कलम ७९, १९६, १९७, २९९, ३५२, ३५३ आणि आयटी कायद्याच्या कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. कार्यकर्त्यांनी कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली. त्याच्याविरुद्ध झालेल्या निषेध आंदोलनात मुस्लिम पुरुष व महिला मोठ्या संख्येने दिसल्या.

वाचा : कोरोना : फेक नरेशन आणि मुस्लिम

पढे : जिवघेणा कोण? कोरोना की मराठी मीडिया

धर्मवादी जाळं

वादळाच्या प्रतिक्रियेतील एका कथनात साजिद रशिदीने ‘नंगा’ शब्द इतकं आपत्तिजनक नाही, असं निर्लज्जपणे म्हटलं. तर शहाबुद्दीन रज़वी यानेही मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे, असा शेरा दिला.

याउलट दारुल उलूम फिरंगी महालचे प्रवक्ते मौलाना सुफियान निज़ामी यांनी अत्यंत समंजस्य प्रतिक्रिया दिली. म्हणतात, “मजहब-ए-इस्लाम में मस्जिद में जाने पर किसी मजहब को पाबंदी नहीं है। मस्जिद अल्लाह का घर है। इसलिए, अल्लाह के बंदों को अल्लाह के घर में जाने से रोकना, यह किसी को भी हक नहीं है। लिहाजा शरई नुक्ते नजर से कोई भी कबाहत (दुसवारी) नहीं है।”

पुढे निज़ामी म्हणतात, “तमाम मजहबी रहनुमा एक-दूसरे के धार्मिक स्थलों पर जाते रहे हैं। सियासी रहनुमा भी जाते रहे हैं। राष्ट्रपति महोदया भी मस्जिद में जा चुकी है। पीएम मोदी भी कई मस्जिदों में जा चुके हैं।”

या प्रकरणाला राजकीय रंग देणं चुकीचं असल्याचं मत निज़ामी व्यक्त करतात. डोक्यावर पदर नव्हता, या टीकेचा समाचार घेताना ते म्हणतात, “सिर पर पल्लू होना और न होना ये नमाज़ के लिए जरूरी है। डिंपल यादव नमाज़ पढ़ने के लिए नहीं गई थीं। जो नमाज़ पढ़ने जाएगा, वह सिर पर पल्लू रखेगा। …अगर कोई मस्जिद में जाएगा तो बैठककर हाल-चाल लेगा ही।”

खरं तर, यापूर्वीही या दोन्ही टेली मुल्लांनी स्त्रियांविरोधात आक्षेपार्ह भाषेचा वापर केलेला आहे. त्यामुळे वेळोवेळी त्यांना मुसलमानांकडून प्रचंड विरोधाला सामोरं जावं लागलं. काहींनी रशिदीला पाँच हजारी मुल्ला(याला प्रत्येक टिव्ही डिबेट्समधून पाच हजाराचं मानधन मिळते, असं सांगितलं जातं) अशी बिरुदावली देत त्याविरोधात जनजागरण केलं होतं. तरीही निर्लज्जपणे अशा प्रकारची विधाने तो सातत्याने करीत असतो.

व्हायरल झालेल्या फोटोवर प्रतिक्रिया देताना डिंपल यादव म्हणाल्या, “जे बोललं जात आहे तसं काहीही नाही. समाजवादी पक्षाचे खासदार इमाम नदवीजी यांनी आम्हाला बोलावलं होतं म्हणून आम्ही गेलो. भाजपा याबाबत गैरसमज पसरवत आहे. आम्ही कुठल्याही बैठकीसाठी गेलो नव्हतो. भाजप हे सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी बोलत आहे. सरकारला जनतेशी संबंधित मुद्द्यांवर बोलणं टाळायचं आहे.”

त्याचप्रमाणे अखिलेश यादव यांनीही प्रत्युत्तर देत भाजपावर राजकीय फायद्यासाठी धर्माचा वापर शस्त्र म्हणून केल्याचा आरोप केला. याबाबत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “मी तुमचे आभार मानतो; पण तुम्हीदेखील भाजपच्या जाळ्यात अडकला आहात. मला फक्त एकच बाब माहीत आहे ती म्हणजे श्रद्धा लोकांना एकत्र करते; मग त्यांचा धर्म कोणताही असो. कुठलीही श्रद्धा लोकांना एकत्र आणते आणि भाजपाला नेमकं हेच खटकतं. त्यांना एकता नको आहे.” 

२९ जुलै २०२५ रोजी एका प्राइमटाईम चर्चेनंतर औपचारिक गप्पांमध्ये समाजवादी पक्षाच्या कुलदीप भाटी नावाच्या एका प्रवक्त्याने साजिद रशिदीला स्टुडियोत बदडलं. मारहाणीचा हा व्हिडियो वायरल केला. अनेकांनी हा व्हीडियो पाहून रशिदीची खिल्ली उडवली. यापूर्वी अनेकदा रशिदीने चर्चेत महिलाविरोधात अभद्र भाषा वापरली परिणामी सहभागी महिला प्रवक्त्यांनी त्याला चोप दिलेला आहे.

ऑक्टोबर, २०२४मध्ये एका डिबेट शोमध्ये रशिदीने हिंदू धर्माविरुद्ध आपत्तीजनक टिप्पणी केली होती. म्हणाला होता, “हिंदू जिसे देवी कहते हैं, उसी का रेप करते हैं।” त्याने वक्फ संशोधन वियेधकाचे उघड समर्थन केलं होतं.

शहाबुद्दीन रज़वीनेही वक्फ संशोधन विधेयेकाचं समर्थन केलं आहे. त्याने योगा इव्हेंटला पाठिंबा दिला होता. भाजपने रमजान महिन्यात सुरू केलेल्या मुसलमानांसाठी मोफत रेशन वितरण योजनेच्या सौगात ए मोदी उपक्रमाचं कौतुक केलं होतं.

तथाकिथत अखिल भारतीय संघटनेचे बरेच मुल्ला गोदी मीडियाच्या पे-रोलवर आहेत. मोदी मीडियाने त्यांना मुस्लिमांचे प्रतिनिधी घोषित केलं आहे. म्हणजे भारतीय मुस्लिम समाजाने त्यांना आपले प्रतिनिधित्व दिलेलं नाही. ते केवळ टेली म्हणजेच टेलिव्हीजनवरील मुल्ला आहेत. गोदी मीडियाच्या दृष्टीने ते केवळ त्यांच्यासाठीचे ड़िजिटल कंटेट क्रियटर्स आहे. म्हणजेच मीडिया त्यांना कंटेट क्रियेटर मानतो. ही लोकं मोदी मीडियासाठी (प्रचंड खपणारा) वादग्रस्त, आक्षेपार्ह, आक्रमक कंटेट तयार करून देतात.

टेली मुल्लांचं प्रतिनिधित्व

पढे : 'कैराना पलायन' पर NHRC की रिपोर्ट संदेह के घेरे में

भारतातील विविध प्रदेशात राहणाऱ्या मुसलमानांनी या टेली मुल्लांचं प्रतिनिधित्व कधीही स्वीकारलं नव्हतं. त्यांना प्रतिनिधी पदावर नियुक्त केलं नव्हतं. ते गोदी मीडियाघोषित प्रतिनिधी आहेत. अशा स्थितीत मुसलमानासारखं दिसणाऱ्या व मुस्लिम नाव धारण करणाऱ्या मुल्लांना उघडं करणं गरजेचं होऊन जातं. राजकीय वर्चस्व निर्माण करण्यासाठी समाजाला वेठीस धरणाऱ्या, शत्रु गटाशी हात मिळवणी करणाऱ्या, पापभिरू मुसलमानांचे चारित्र्यहनन व विकृत प्रतिमा निर्मिती करणाऱ्या कंटेट क्रियटर टेली मुल्लांचा निषेध करावा तेवढा कमी आहे.

धर्मवादी राजकारण पोसणाऱ्या संघ-भाजप समर्थक नेत्यांनी वादग्रस्त विधाने करणं नवल नाही. तो मुस्लिमांना प्रतिगामी, कर्मठ, कट्टर व धर्मांध अशी बिरुदावली लावतो. परंतु मुस्लिमांनी कर्मठ धार्मिक राहावं, अशी त्यांची इच्छा असते. कारण मुसलमान आधुनिक विचारांचा झाला तर संघाचं द्वेषकारण संपुष्टात येईल. त्यामुळे संघ मुसलमानांना अधिकाधिक प्रतिगामी, कट्टर, धार्मिक हट्टाग्रही, अधिकाधिक मूलतत्ववादी घडविण्याचा आटापिटा करतो. 

मुस्लिम समाज विज्ञानवादी, विवेकवादी, सुधारणावादी व आधुनिक झाला तर संघाचं दुकान बंद पडेल. त्यामुळे मुसलमान जितका मूलभूततावादी व धर्मकेंद्री असेल, तेवढ्या अधिक गतीने संघाला बहुसंख्याक वर्ग-घटकात आपलं विस्तारीकरण करता येईल. या उक्तीप्रमाणे संघ मुसलमानांच्या धर्मकेंद्री राजकारणाला समर्थन, पाठबळ, शह व अर्थसाहाय्य देत असते. याच प्रक्रियेचा भाग म्हणून संघाने आपल्या मुस्लिम विंगला इस्लाम धर्माचे तज्ज्ञ म्हणून प्रचारित केले आहे.

मुसलमानांना अधिकाधिक कर्मठ व धर्मवादी करण्याच्या व्यापक प्रक्रियेचा भाग म्हणून संघाने मदरसे सुरू केले आहेत. त्याचप्रमाणे धर्मालये, अभ्यास वर्ग, शिबिरे, परिसंवादातून धार्मिक वाद उभे करणे व त्याला जोडून इस्लाममध्ये अधिक्षेप करण्याचे धडे दिले जातात.

टोकाचा मुस्लिम व इस्लाम विरोध करणाऱ्या संघ-भाजपने मुस्लिम नेतृत्व जवळ बाळगलं आहे. परंतु व्यापक कारस्थानाचा भाग म्हणून या नेतृत्वालाही धर्मकेंद्री राजकारणात गुरफटून ठेवलं आहे. त्यामुळे स्वाभाविक हे नेतृत्व अधिकाधिक धर्मांध भूमिका घेताना दिसतो. उपरोक्त टेली मुल्लांची हेकेखोर मांडणी, हट्टाग्रह, विद्वेषी भाषा, अभद्र टिप्पणी संघाच्या मूळ भूमिकेतून वेगळी करून पाहता येत नाही.

कलीम अज़ीम, पुणे

३० जुलै २०२५

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,38,किताब,24,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,297,व्यक्ती,21,संकलन,61,समाज,258,साहित्य,77,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: टेली मौलवी : गोदी मीडियाचे कंटेट क्रियेटर
टेली मौलवी : गोदी मीडियाचे कंटेट क्रियेटर
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh24pkfNeZl1tM1w5agqf5EB9iSvWxmJdU0QF-FbczCvWmQRUHKwiCjLB48amVYaAfCMQ39uyowtcbE2Xml1L3P1e385WK9jrvbRmJ3d00Undcd4fS3ZRyYBIIqL5MvusJBzkQjbugayckVTlLvFt9JB6PLus1pw-4ScOC_XuVTYD6wStRAfJuw_SwT-36Y/w640-h324/Sajid%20Rashidi.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh24pkfNeZl1tM1w5agqf5EB9iSvWxmJdU0QF-FbczCvWmQRUHKwiCjLB48amVYaAfCMQ39uyowtcbE2Xml1L3P1e385WK9jrvbRmJ3d00Undcd4fS3ZRyYBIIqL5MvusJBzkQjbugayckVTlLvFt9JB6PLus1pw-4ScOC_XuVTYD6wStRAfJuw_SwT-36Y/s72-w640-c-h324/Sajid%20Rashidi.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2025/07/blog-post_30.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2025/07/blog-post_30.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content