सप्टेंबर महिन्यात गर्भपात बंदी कायद्यासंदर्भात
घडलेल्या दोन घटनांनी जगाचे लक्ष वेधले. पहिली घटना मोरोक्कोमधली होती. त्यात हजारा
रायसोनी नावाच्या एका महिला पत्रकाराला अवैध गर्भपात केल्याचे आरोप करत शिक्षा सुनावण्यात
आली.
दुसऱ्या घटनेत अमेरिकेतील जॉर्जिया राज्यात गर्भपाताचे नियम अधिक कठोर करणाऱ्या
‘हार्टबीट’ विधेयकामुळे वादळ उठले. या घटनांमुळे दोन्हीकडील
सामान्य लोक प्रभावित झाले आहेत. वेगवेगळ्या दृष्टिकोनातून या घटनांकडे पाहिले जात
आहे.
मोरक्को हे उत्तर अफ्रिकेतलं एक मुस्लिम
राष्ट्र. हजारा रायसोनी ही तिथली धडाडीची पत्रकार. सरकार व यंत्रणेविरोधात बातम्या
देण्यासाठी ती प्रसिद्ध आहे. या एका घटनेमुळे ती जगभरातील मीडियाच्या चर्चेच्या केंद्रस्थानी
आली.
28 वर्षीय हजारा अरबी वृत्तपत्र ‘अखबार अल यौम’मध्ये काम करते. ती
राजधानी राबत येथे तिच्या प्राध्यापक मंगेतरसोबत राहते. ऑगस्टमध्ये तिच्यावर पाळत ठेवून
तिला अटक करण्यात आली. गुन्हा काय तर ती मंगेतरसोबत स्त्रीरोगतज्ज्ञांच्या क्लिनिकमधून
बाहेर पडत होती.
वाचा : गर्भपात बंदीवरून पोलंड रस्त्यावर
वाचा : आर्यलँडमध्ये अबॉर्शन कायदा
अवैधरीत्या गर्भपात करणाऱ्या काही क्लिनिकवर
मोरक्कन सरकारची नजर होती. त्यात हजारा उपचारासाठी गेलेले ते क्लिनिक होतं. अटक केल्यानंतर
हजाराने तुरुंगातून पत्र लिहून सर्व आरोप खोटे व निराधार असल्याचे सांगितले. तिचे म्हणणे
होते की, तिची कधी गर्भधारणा झालीच नव्हती तर गर्भपात कसा करणार?
तिने सरकारी यंत्रणांवर
भेदभावाचा आरोप लावला आहे. ती म्हणते की, सरकार तिच्यावर नाराज आहे. कारण, ती अशा मीडिया
हाउसमध्ये काम करते जो सरकारविरोधी भूमिका घेतो व शासनाची टीका करतो. पत्रकारांवरील
दडपशाहीसाठी मला सरकारने अटक केल्याचे हजारा सांगते. तिच्या पत्रात तीने हे सरकार पत्रकारावर
भेदभाव करते असा आरोपही केलाय.
हजारा रायसोनी हिच्यावर अवैधरित्या गर्भपात
केल्याच्या खटला भरण्यात आला. या प्रकरणी 1 ऑक्टोबरला राजधानीमधील राबत कोर्टाने निर्णय
देत शिक्षा सुनावली. हजारा व तिच्या मंगेतरला एक वर्ष तर डॉक्टरला दोन वर्षाच्या शिक्षेचा
आदेश काढला. कोर्टाने नर्सला दोषी ठरवून तिला निलंबित केले.
कोर्टात खटल्याचा युक्तिवाद सुरू असताना
बचाव पक्षाच्या वकिलाने हजाराने गर्भपात केला नसल्याचा पुरावे दाखल केला. तसेच हजारा
रक्तात गुठळ्या आढळल्याने उपचार करत आहे, असे अनेक पुरावे दिले. परंतु कोर्टाने ते
मानन्यास नकार देत तिला दोषी ठरवत शिक्षा सुनावली.
हजाराच्या वकिलाने हा निकाल
अत्याचाराच्या श्रेणीत मोडतो, अशी प्रतिक्रिया देत आतंरराष्ट्रीय मापदंडाना ध्वस्त
केल्याचा आरोप केला आहे. निकालाला सर्वोच्च कोर्टात आव्हान देणार, असेही ते म्हणाले.
तर
दुसरीकडे देशात हजाराच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरली आहेत.
हजारा
व तिच्या मंगेतरला अटक केल्यापासून मोरक्कन नागरिक सरकारच्या या घटनेचा निषेध करत ‘फ्री हजारा’ मोहीम राबवत आहेत. अमनेस्टी इंटरनॅशनल व ह्यूमन राईट्स वॉच या आंतरराष्ट्रीय
पातळीवरील मानवी हक्क संघटनांनी या घटनेचा निषेध केला असून तिच्या सुटकेची मागणी केली आहे.
कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर मोरक्कन
लोक अजून आक्रमक झाली आहेत. लोकांनी रस्त्यावर येत हजाराच्या समर्थनार्थ आंदोलने सुरू
केली आहेत. सप्टेंबर महिन्यात दोन मोठी आंदोलने झाली. येत्या काळात अशी आंदोलने अजून
होती, असा इशारा ट्विटरवरून देण्यात आला आहे.
हजाराच्या निमित्ताने मोरक्कोत गर्भपात
बंदी कायदा शिथिल करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. हजारो लोकांनी रस्त्यावर
येत गर्भपात हक्काचे समर्थन सुरू केले आहे. सुरक्षित गर्भपात हा प्रत्येक स्त्रिचा
मूलभूत हक्क असल्याचे ते म्हणत आहेत.
मोरक्कोत आईचा जीव धोक्यात असेल किंवा
लैंगिक अत्याचारातून स्त्री गर्भवती रहिल्यास सुरक्षित गर्भपाताला परवानगी आहे. पण
याशिवाय अन्य गुंतागुंतीच्या प्रकरणात ती परवानगी द्यावी असे मोरक्कन नागरिकांची जुनी
मागणी आहे. त्याला सरकार व परंपरावाद्यांनी या मागणीला सतत विरोध दर्शवला आहे.
दुसरीकडे अमेरिकेसह युरोप खंडात सुरक्षित
गर्भपाताची मागणी जोर धरत आहे. अमेरिकेत जॉर्जिया राज्यात 6 आठवड्यानंतर गर्भपाताला
परवानगी नाकारणारा ‘हार्टबीट बिल’ हा कायदा नुकताच लागू झालेला आहे. अमेरिकेतील
50 राज्यात गर्भपात बंदीचा कठोर कायदा अमलात आहे. हे नियम शिथिल करावे अशी मागणी करत
जॉर्जियामध्ये लोक रस्त्यावर उतरली होती. सुरक्षित गर्भपाताच्या हक्काच्या लढ्याला
अमेरिकेत दोन शतकाचा दीर्घ इतिहास आहे. हार्टबीट विधेयकानंतर अमेरिकेमध्ये सुरक्षित
गर्भपाताचा हक्क मागणाऱ्या व्यापक चळवळीची आखणी सुरू असल्याचे दि गार्डियन वृत्तपत्राने
म्हटले आहे.
हार्टबीट विधेयकानंतर अमेरिकेत सुरक्षित गर्भपात संदर्भात तीव्र आंदोलन छेडण्यात आलं होतं. मीटू चळवळीत सामील असलेली अलिसा मिलानो या अभिनेत्री सेक्स स्ट्राईक करण्याचा अमेरिकन महिलांना सल्ला दिला होता. जोपर्ंयत महिलांच्या अधिकारांची ही मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत कुणीही स्त्रीने पुरुषाला जवळ येऊ देऊ नये, असा ट्विट तिनं केला होता.
कलीम अजीम, पुणे
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com