एना दवग्लायुक नावाची विशीतली रशियन तरुणी, मेट्रो स्टेशन, फूटपाथ, बस स्टॉप, सिनेमा हॉल, रहदारीचे रस्ते इत्यादी ठिकाणी आपला मिनी स्कर्ट वर करून उभी राहते. स्टँडअप मोडमध्ये असलेली एना थोड्या वेळानं आपला स्कर्ट खाली करते, काही सेंकदाच्या ब्रेकनंतर ती पुन्हा स्कर्ट वर उचलते.
रस्त्यावरून येणारे-जाणारे प्रत्येकजण तिच्या अंतर्वस्त्राकडे पाहत आहेत. काही डोळे विस्फारून, तर अनेकांची चोरटी नजर एनाच्या अंतर्वस्त्रावर खिळलेली आहे. मुली व महिलांसह काही पुरूषही पाठमोरे होऊन तिला पाहत पुढे जात आहेत. तरुण मुलांच्या नजरा तिच्यावर रोखलेल्याच. काहीजण सावध होत एनाकडे पाहत आहेत, तर नाकं मुरडून पुढे जात आहेत.
वाचा : सन्मान #MeToo कॅम्पेनचा
वाचा : ब्राझीलमध्ये महिला जर्नलिस्टचा का होतोय लैंगिक छळ?
रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग शहरातील रहदारीच्या ठिकाणांसह पर्यटन स्थळांवर एना अशा अवस्थेत एकटीच उभी. शहरातील कुठलाही पब्लिक प्लेस तिनं सोडलेला नाहीये. ती असं का करतेय? असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. एक मिनट थांबा...!
तिचा प्रयोग पुरूषी भोगवादी विकृतीची लाज काढणारा आहे. बसला ना झटका..! होय हे खरंय. एनानं सार्वजनिक स्थळी महिला व मुलींना होणाऱ्या किळसवाण्या स्पर्शाविरोधात मोहिम उघडलीय.
चेहऱ्यावर त्रासिक भाव, निस्तेज मुद्रा, डोळ्यात राग, पांढरेफटक पडलेलं गाल अशा अवस्थेत एना सार्वजनिक स्थळी उभी राहते. लांबून पाहिलं तर मेणाचा पुतळा भासणारी एना पर्यटनस्थऴे, बसस्थानके, रेल्वे
सार्वजनिक स्थळी महिलांना होणाऱ्या अनैच्छिक स्पर्शाविरोधात एनानं एकटीनं मोहिम उघडली आहे. तिच्या या प्रयोगामुळे किळसवाणं स्पर्श करणाऱ्यांना माना तर खाली झाल्याच, पण सेंट पीटर्सबर्गमध्ये किळसवाणे स्पर्शही निम्म्यानं कमी झाल्याचं स्थानिक वेबपोर्टल म्हणतेय.
मेट्रो रेल्वे, बसेसमध्ये महिलांना अशा प्रकारच्या किळसवाण्या स्पर्शाला सामोरं जावं लागतं. सार्वजनिक स्वच्छतागृहात व चेंजिंग रुममध्ये मायक्रो कॅमेऱ्यातून मुलींचे आक्षेपार्ह फोटो काढले जातात. विविध ठिकाणी होणाऱ्या अशा प्रकारच्या ‘सेक्सुअल हरासमेंट’विरोधात एना दवग्लायुकने आंदोलन छेडलं आहे.
अनेकांना तिची मोहिम अश्लिल वाटू शकते. पण पांढरपेशी समुदायाच्या मनातली भोगवादी मानसिकता उघड करण्यासाठी तिचा हा प्रयोग यशस्वी झालाय. तिनं हा व्हिडिओ इन्ट्राग्राम, फेसबुक व यूट्यूबवर अपलोड केलाय. यूट्यूबवर 3,506,984 व्हिव्हर्सनी हा व्हिडिओ पाहिला आहे. एनाची ही मुद्रा पाहून अनेकांना ‘गिल्टी फील’ झाल्यशिवाय राहत नाही. हा व्हिडिओ पाहून प्रत्येकजण कन्फेशन मोडमध्ये जातो.
अनवॉन्टेट स्पर्शामुळे महिलांचे आरोग्य धोक्यात येत आहे. मुंबई लोकलमध्ये तब्बल 61 टक्के महिलांना अशा किळसवाण्या स्पर्शाला सामोरं जावं लागतं. फ्रान्समध्ये तर प्रत्येक दुसरी महिला अशा प्रकारच्या अनैच्छिक स्पर्शाला बळी पडली आहे. यासंदर्भात अनेक धक्कायदायक निरीक्षणे फ्रान्सच्या ‘दी लोकल’ या वेबसाईटवर देण्यात आली आहे. जानेवारीत दिल्ली हायकोर्टानं संमतीशिवाय महिलांना स्पर्श करणे गुन्हा ठरवला आहे. काही देशांनीही अशा प्रकाराच्या कृत्याला अपराध घोषित केलंय.
वाचा : डेन्मार्कमध्ये बुरखा बंदीविरोधात आंदोलन
वाचा: मोरक्कोत गर्भपातबंदी शिथिलतेची मागणी
भारतातच काय तर अनेक पाश्चिमात्त्य देशात ऑफीस आणि कामाच्या ठिकाणीही महिलांना अनैच्छिक स्पर्शाचा सामना करावा लागतो. अशा स्पर्शामुळे महिलांमध्ये मानसिक आजार उदभवत आहेत.
‘दी लाईव्ह सायन्स’ नावाच्या एका रिसर्च वेबसाईटनं अनैच्छिक स्पर्शामुळे महिलांना विविध आजाराची लगण झाल्याचं निरीक्षण नोंदवलंय. ज्यात डिप्रेशन, पोस्ट-स्ट्राइक डिसऑर्डर, ब्लड प्रेशर, अनिद्रा, मानदुखी आणि आत्महत्येला प्रवृत्त करणारी अनेक लक्षणे अशा प्रकारच्या पीडित महिलांमध्ये आढळत आहेत.
ऑक्टोबर 2017 मध्य़े ‘दी गार्डीयन’मध्ये ‘अनवॉन्टेट टच’ संदर्भात एक लेख प्रकाशित झालाय. गेल्या काही वर्षांत जगभरातील विविध शहरामध्ये सार्वजनिक स्थळी महिलांना अनैच्छिक स्पर्शाचे प्रमाण वाढल्याचं म्हटलं आहे.
एकिकडे लैंगिक अत्याचाराविरोधात ‘मीटू’ची मोहिम जगभराला वळसा घालत आहेत. लैंगिक अत्याचाराबद्दल उघडपणे बोललं जात आहे. पण अत्याचार काही कमी होताना दिसत नाही. अत्याचाराची वृत्ती पुरुषांच्या डोक्यात भिनली आहे. त्यामुळे लैंगिक गुन्हे कमी होण्याऐवजी वाढत आहेत. ही विकृत मानसिकता बदलण्यासाठी एनाचा उपक्रम फायदेशीर ठरू शकतो.
(हा लेख लोकमतच्या सखीमध्ये 14 |ऑगस्ट 2018ला प्रकाशित झालेला आहे.)
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com