सिमोन बाइल हिचा ‘यूएस जिमनास्टिक्स चँपियनशिप’मध्ये परिधान केलेला ड्रेस खास होता. तिनं ‘टील’ कलरमधील लाईट शेडनं हा ड्रेस परिदान केलेला होता. सिमोननं हा ड्रेस आपल्या त्या सहकाऱ्यांना अर्पण केला आहे, ज्या जिमनास्ट डॉक्टरच्या लैंगिक शोषणाला त्या बळी पडल्या होत्या.
पीडित मैत्रिणींच्या पाठिशी सिमोन समक्षमपणे उभी राहिली. इतकच नाही तर तिनं त्या क्रूर डॉक्टरच्या निशेधार्थ जागतिक पातलीवर जनसमर्थनही गोळा केलं. मीटू मोहिमेनंतर लैंगिक शोषणाविरोधात हे सर्वात मोठं यश मानलं जात आहे.
सिमोन पाच वेळा नॅशनल चँपियनशिप विजेती आहे. तिनं रियो ओलंपिक्समध्ये ४ स्वर्ण पदक जिंकले आहेत. सिमोन सर्व प्रकारच्या जिमनास्टमध्ये एक्सपर्ट आहे. फ्लोर एक्सरसाइज़, बॅलेंस बीम, वॉल्ट आणि अनईवन बार्स अशा जिमनास्टच्या विविध खेळात तिला प्राविण्य आहे. सिमोनची सहकारी प्लेअर रैचलनं सर्वप्रथम कोच नासरविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार केली होती. यानंतर अनेक महिला खेळाडूंनी पुढे येत लॉरेन्सविरोधात तशीच तक्रार दाखल केली. एक-एक करत तब्बल १५६ महिला खेळाडू डॉक्टरविरोधात उभ्या ठाकल्या.
वाचा : सेरेनाच्या कॅटसूटमुळे का निर्माण झाला वाद
वाचा : व्हिनसचा पराभव करणारी १५ वर्षीय कोको
तक्रारीवरून लॉरेन्सला अटक झाली. अमेरिकेत खटला सुरू असताना त्यानं १० मुलींचे लैंगिक शोषण केल्याची कबुली दिली. पण ज्यावेळी सर्वच १५६ मुली कोर्टात आल्या त्यावेळी लॉरेन्सचा क्रूर गुन्हा उघड झाला. सुनावणी सुरू असताना लॉरेन्स नासर मान खाली घालून निमूटपणे बसला होता.
लॉरेन्सला शिक्षा देण्यात न्यायाधिश रोजलिन अक्विलिना यांची भूमिका महत्त्वाची होती. लिहंगम सर्किट कोर्टाच्या महिला न्यायाधिशांच्या मते लॉरेन्सला केवळ शिक्षा देऊन उपयोग नव्हतं तर त्याच्या गुन्ह्याला सर्वासमक्ष आणणे गरजेचे होतं. त्यानुसार त्यांनी त्या सर्व १५६ मुलींचे स्टेटमेंट नोंदवून घेतलं.
जिमनास्ट डॉक्टर लॉरेन्सला कोर्टानं लौंगिक गुन्ह्याला दोषी ठरवत ३० जूनला तब्बल १७५ वर्षांची शिक्षा सुनावली. या शिक्षेमुळे जगभरातील स्पोर्ट्स ट्रेनिंग अकेडमीत खळबळ माजली. लॉरेन्स अमेरिकी जिमनास्टिक्ससाठी तयार केलेल्या डॉक्टर टीमचा भाग होता. लॉरेन्स या ठिकाणी महिला खेळाडूंचा इलाज करण्याच्या निमित्ताने लैंगिक शोषण करत होता. खेळाडूंना डॉक्टरकडून अत्याचार होतेय हे कळत होतं, मात्र हेच लैंगिक शोषण आहे हे उमजत नव्हतं.
एकदा जेनिफर नावाची एक व्हॉलीबॉल प्लेअर त्याच्याकडे ट्रीटमेंटला आली. जेनिफरला डॉक्टरनं सांगितलं की गुप्तांगाच्या शेजारी दाबणे त्याच्या ट्रीटमेंटचा भाग आहे. जेनिफरला ही ट्रिटमेंट असहज वाटली. पण तिनं प्रतिकार केला नाही, कारण तिला आपल्या करिअरच्या मार्गात थांबा नको होता, अशाप्रकारे अनेक महिला खेळाडू डॉक्टरच्या शोषणाच्या बळी पडत गेल्या. विशेष म्हणजे पोलखोल होऊ नये म्हणून डॉक्टरनं प्रत्येक खेळाडूंना मानसिकरित्या ब्लॅकमेल केलं होतं. पण रचैलनं डॉक्टर लॉरेन्सचा ठामपणे विरोध केला व अखेर त्याचा गुन्हा उघड झाला. केवळ सात दिवसांच्या सुनावणीत कोर्टानं लॉरेन्सला १७५ वर्षांची शिक्षा ठोठावली.
ऑगस्टमध्ये झालेल्या यूएस चँपियनशिपच्या फायनलमध्ये सिमोननं विशिष्ट रंगाचा ड्रेस परिधान करत लॉरेन्सच्या लैंगिक शोषणविरोधात उभी राहिली. ‘दि गार्डियन’ला दिलेल्या मुलाखतीत तिनं आपल्या ड्रेसच्या रहस्याचा पडदा उघडला. ‘हा रंग माझ्या सहकाऱ्यांना समर्पित करत आहे, मी त्यांच्यासोबत आहे, मला वाटतेय की हा रंग विशिष्ट आहे, हा रंग आम्हाला एकत्रित ठेवतो’
स्पोर्टस क्षेत्रात महिला खेलाडूंचे लैंगिक शोषण होणे ही काही नवीन गोष्ट नाही. प्रत्येकवेळी करिअरच्या भितीनं पीडित खेळाडू गप्प राहतात. त्यामुळे संबधितांचे डाव साधला जातो. दोन महिन्यापूरवी भारतात अॅथलिटमध्ये सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या हिमा दासनं आपल्या कोचविरोधात जूनमध्ये अशी तक्रार दाखल केली होती.
‘अॅथलिटिक्स बिझनेस’च्या माहितीप्रमाणे जगभरात महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाची बाब सर्वात मोठी समस्या म्हणून पुढे येत आहे. १९८४च्या सुवर्ण पदक विजेत्या अॅथलिट नैन्सी हॉग्शेड हा लेख लिहिला आहे. यात लग्न झालेल्या महिला खेळाडूंची व्यथा नैन्सी यांनी मांडली आहे. कोचच्या शोषणामुळे अनेक प्लेअरचं घटस्फोट झाल्याची आकडेवारी त्यांनी दिली आहे.
डिसेंबर २०१७मध्ये न्यूयॉर्क टाईम्सनं लॉरेन्स नासरनं केलेल्या बाल खेळाडूंच्या लैंगिक शोषणावर एक स्वतंत्र लेख प्रकाशित केला होता. त्यात लॉरेन्ससारख्या अनेक लोकांची यादी एनटीनं दिली होती. आत्ता लॉरेन्सला सुनावलेल्या शिक्षेनंतर अशाच प्रकारची अजून एक न्यूज स्टोरी न्यूयॉर्क टाईम्सनं प्रकाशित केली आहे. लॉरेन्स नासरच्या शिक्षेनंतर अनेक न्यूज वेबसाईटनं स्पोर्ट्स इंडस्ट्रीत फोफावणाऱ्या लैंगिक शोषणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
(हा लेख लोकमतच्या सखीमध्ये 2 ऑक्टोंबर 2018ला प्रकाशित झालेला आहे.)
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“ फा तिमा शेख जोतीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम कर चुकी हैं। जब जोतीराव-सावित्रीमाई को उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा और उन...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“ फा तिमा शेख जोतीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम कर चुकी हैं। जब जोतीराव-सावित्रीमाई को उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा और उन...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
बी ते 9 जनवरी को गूगल ने फ़ातिमा शेख पर डूडल बनाकर उन्हें 191 वें जन्मदिन की बधाइयां पेश की। जिसके बाद देशभर में बधाइयों का सिलसिला चला। ...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com