इजिप्तमध्ये राष्ट्राध्यक्ष अब्देल फतह अल सीसी यांना हटवण्याची
मागणी जोर धरत आहे. आठवडाभरापूर्वी सुरू झालेल्या या आंदोलनाने आता रोद्र रूप धारण
केलं असून अनेक तरुण सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. सहा वर्षांपासून सुरू असलेल्या
सीसी यांच्या निरंकुश सत्तेला उखडून टाकण्यासाठी इजिप्शियन पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत.
सरकारने विरोधकांचा बंदोबस्त करण्यासाठी धरपकड सुरू केली आहे. पण अटकेला न जुमानता
हजारो तरुण सरकारविरोधात संघटित होत आहेत.
2013च्या सत्ताबदलानंतर इजिप्तमध्ये सामान्य जनता आणि सरकार यांच्यामध्ये
संघर्ष सुरू आहे. इजिप्शियन नागरिकांना लष्करी सत्ता नको आहे. जनतेच्या विरोधाला डावलून
2018ला अब्देल फतह अल सीसी यांनी दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. लागलीच त्यांनी
राज्यघटनेत दुरुस्ती करून 2030 पर्यंत आपणच राष्ट्राध्यक्ष असू अशी तरतूद केली. विषेश
म्हणजे यासाठी त्यांनी सार्वमत घेतले. नागरिकांनी खाद्यान्न आणि रोख रकमेच्या मोबदल्यात
मतदानात भाग घेतला. तब्बल 88 टक्के लोकांनी सीसी यांच्या बाजूने मते दिली. सर्वांत
धक्कादायक म्हणजे हे सुरू असताना देशातील सर्वच विरोधी पक्षातील नेत्यांना अटक करण्यात
आली होती.
वाचा : सुदानी राज्यक्रांतीची नायिका
वाचा : रशियन कॉन्स्टिट्यूशन गर्ल
या घटनेनंतर सिव्हिल सोसायटीकडून राष्ट्राध्यक्ष अब्देल फतह अल सीसी
यांचा विरोध वाढत गेला. विरोध डालवून बंडखोरांना तुरुंगात टाकण्याचे धोरणे सरकारने
अवलंबिले.
सीसी यांच्यावर सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप इजिप्शियन नागरिक
करत आहे. सरकारी पैशाचा दुरुपयोग करून सीसी यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार केल्याचे
इजिप्शियन लोकांचे म्हणणे आहे. सीसी आपल्या राहण्यासाठी एक भव्य पॅलेस बांधत आहेत.
या प्रकल्पांवर सार्वजनिक निधी उधळला जात असून इजिप्शियन लोकांना अंधारात ठेवून हे
केले जात आहे
सप्टेंबरच्या सुरुवातीला मोहंमद अली नावाच्या एका व्यक्तीने स्पेनमधून
फेसबुकवर सरकारच्या या भ्रष्ट्राचाराचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यानंतर लागोपाठ
सरकारविरोधात पोस्टी टाकत त्याने हैशटॅग मोहीम सुरू केली. परिणामी २० सप्टेंबरला सरकारच्या
विरोधात प्रथमच मोठ्या संख्येने लोकं एकत्र आले. शुक्रवारच्या सामूहिक नमाजनंतर राजधानी
कैरोमध्ये शेकडो सरकारविरोधक व मानवी अधिकार कार्यकर्ते जमले. हळूहळू करत त्यात
बीबीसीच्या मते या बंडाचे प्रमुख कारण वाढती गरीबी आहे. 2010च्या
सत्तांतरानंतर देशातल्या परिस्थितीत काहीच बदल झाला नाही. उलट आर्थिक दारिद्र्यता वढल्याचे
बीबीसीने म्हटले आहे. गरीबीचा आकडेवारी देत बीबीसी म्हणते की
सरकारने विरोध मोडून काढण्यासाठी कैरोच्या तहरीर स्क्वेअरमध्ये मोठा
फौजफाटा तैनात केला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे
अटकेबद्दल सरकारचे प्रवक्ते काहीच माहिती देत नसल्यामुळे मानवी-हक्क
संघटना संताप व्यक्त करत आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या शेकडो जणांना एका कॅम्पमध्ये
ठेवले असून अटक झालेल्या लोकांचा काहीच थांगपत्ता लागत नसल्याचे या कार्यकर्त्यांनी
वॉल स्ट्रीट जर्नलला दिलेल्या प्रतिक्रेयत म्हटले आहे.
इंटरनेटवर देखरेख ठेवणाऱ्या नेटब्लॉक या संस्थने दिलेल्या महितीनुसार
फेसबुक मैसेंजर
राष्ट्राध्यक्ष सीसी संयुक्त राष्ट्राच्या दौऱ्यावर असताना इजिप्तमध्ये
हा भडका उडाला. वॉल स्ट्रीटच्या बातमीनुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पनी सीसींना
पाठिंबा दिला आहे. परिणामी इजिप्तचा हा विद्रोह रक्तरंजित होऊ शकतो
9 वर्षापूर्वी म्हणजे डिसेंबर 2009ला पूर्वीचे तानाशाह होस्नी मुबारक
यांची राजवट उलथून टाकण्यात आली होती. या विद्रोहाचे पडसाद संपूर्ण अरब राष्ट्रात पडले
होते. परिणामी
वाचा : सन्मान #MeToo कॅम्पेनचा
डिसेंबर 2010ला सत्तांतर झाल्यानंतर 2012ला मुस्लिम ब्रदरहूडचे मोहंमद मोर्सी यांना लोकांनी राष्ट्राध्यक्ष निवडून दिलं होतं. जनतेने निवडून दिलेले हे इजिप्तचे पहिले लोकशाही सरकार होते. मात्र वर्षभरातच लष्करने सगळी सत्ता ताब्यात घेतली. या सत्तांतरानंतर इजिप्तमध्ये लोकशाही समर्थकांनी मोर्चे व आंदोलने केली. राष्ट्रपती मोर्सींना पूर्ववत करण्याची मागणी अनेक दिवस सुरू होती. या चकमकीत हजारो इजिप्शियन मारले गेले. तर लाखो जखमी झाले. मोर्सी यांना अपदस्थ करून त्यांच्याच सरकारमध्ये संरक्षणमंत्री असलेले अब्दुल फतह अल-सीसी हे राष्ट्राध्यक्ष झाले.
राष्ट्रपती मोर्सी यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालवला. त्यांच्यावर
दहशतवादाला प्रोत्साहन देणे आणि सरकारची गुप्त माहिती कतर या देशाला दिल्याचा ठपका
ठेवण्यात आला. मोर्सी यांच्यासह मुस्लीम ब्रदरहूड या पक्षाच्या अनेक नेत्यांवर कट करणे
(सदरील लेख आजच्या लोकमतमध्ये प्रकाशित झालेला आहे.)
(सदरील लेख आजच्या लोकमतमध्ये प्रकाशित झालेला आहे.)
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com