राजकीय अस्थिरतेचा सामना करत असलेल्या सुदानमध्ये
अखेर नागरिकांची सत्ता स्थापन झालीय. २१ ऑगस्टचा दिवस सुदानवासीयांसाठी खऱ्या अर्थाने
लोकशाही उत्सवाचा होता. तब्बल पाच महिन्यांपासून सुदानवासी लोकशाही सरकार अमलात आणण्याची
मागणी करत होते. सत्तांतर होऊनही सैन्याने सरकार ताब्यात घेतल्याचा ते विरोध करत होते.
त्याच्या लढ्याला अखेर यश आलं. अनेक महिने राजकीय अनिश्चितता आणि हिंसाचारानंतर सुदानी
नागरिक लोकशाही उत्सव साजरा करत आहेत.
अब्दल्ला हमदोक यांनी गेल्या बुधवारी सुदानच्या
अंतरिम पंतप्रधान पदाची शपथ घेतली. लोकशाही समर्थक व लष्कराच्या सार्वभौम परिषदेच्या
वतीने हमदोक यांची सर्वसंमतीने निवड करण्यात आली. सहा नागरिक आणि पाच सैनिकांचा समावेश
असलेली ही परिषद निवडणुका होईपर्यंत सुदानचा राज्यकारभार पाहणार आहे. समझोत्यानुसार
पंतप्रधान आणि लष्कराची ट्रान्झिशल मिलिटरी कौन्सिल संयुक्तपणे सुदानची सत्ता सांभाळणार
आहेत.
वाचा : इराकी तरुणांचा लोकशाही लढा
63 वर्षीय हमदोक प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आहेत.
ते इथोपिया येथे संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने आर्थिक धोरणे तयार करण्याचं काम पाहतात.
लष्कर आणि आंदोलक यांच्या संयुक्त मंत्रिमंडळाच्या वतीने हमदोक यांनी राजधानी खार्टूममध्ये
पंतप्रधान पदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर त्यांनी सुदानची अर्थव्यवस्था सक्षम करण्याची
घोषणा केली आहे.
सार्वभौम परिषदेतील एकूण ११ सदस्यांनी शपथ घेतली.
गृह व संरक्षण मंत्री वगळता हमदोक यांना २० सदस्यीय मंत्रिमंडळ नामित करावे लागणार
आहे. त्यासाठी त्यांच्याजवळ २१ दिवसांचा कालावधी आहे. दोन पक्षात झालेल्या या वाटाघाटीत
२१ महिने लष्कर आणि १८ महिने लोकशाही समर्थक नेते सत्ता सांभाळणार आहे. जनरल अब्दुल
फताह अल-बुरहान यांनी ट्रान्झिशल मिलिटरी कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे.
ते २१ महिन्यांपर्यंत परिषदेचे नेतृत्व करतील, त्यानंतर
लोकशाही चळवळीद्वारे नियुक्त केलेले नागरी नेते अब्दुल्ला हमदोक पुढच्या १८ महिन्यांपर्यंत पदभार स्वीकारणार आहेत.
एप्रिलमध्ये सुदानमध्ये नागरिकांनी रस्त्यावर यऊन
३० वर्षापासून सत्तेला चिकटून असलेल्या ओमर अल बशरची सत्ता उथवून टाकली होती. सैन्याचे
ज्येष्ठ अधिकारी असलेले ओमर अल बशर ३० वर्षांपासून सुदानचे स्वयंघोषित राष्ट्रपती होते.
सैन्य सरकारच्या कार्यकाळात सुदान विविध संकटांना सामोरे जात होता. बेरोजगारी, वाढती
महागाई, अन्न-धान्याचा तुटवडा, इंधन दरवाढ इत्यादी समस्यांनी सुदानवासी त्रस्त झालेले
होते. डिसेंबर २०१८पासून देशात महागाईविरोधात जनतेचा उद्रेक सुरू होता. २०१९ येता ही
ठिणगी ज्वाळा बनून सैन्य सरकारवर तुटून पडली.
वाचा : लोकशाहीहक्कासाठी इराणचा भडका
वाचा : इजिप्शियन दुसऱ्या क्रांतीकडे
सामान्य लोकांनी रस्त्यावर येऊन सैन्य शासनाचा विरोध
केला. एप्रिलमध्ये सरकारविरोधी आंदोलनात लहान मुले, तरुण, वृद्ध आणि सरकारी कर्मचारी
सामील झाले. तब्बल पाच दिवस चाललेल्या या आंदोलनाला यश आले. जनाआंदोलनाच्या रेट्यामुळे
राष्ट्रपती ओमर अल बशर यांनी अखेर राजीनामा दिला. जनतेने आंदोत्सव साजरा केला. पण त्याच्या
आनंदात लष्कराने विरजन घातले. नव्या सैन्य प्रमुखांनी सुदानची सत्ता ताब्यात घेतली.
इतकेच नाही तर जनतेची लोकशाही सत्तेची मागणी धुडकावून लावत आंदोलकांवर अन्वावित अत्याचार
सुरू केले.
ऑगस्ट येता शेकडो लोकशाही समर्थकांना सुदानी सैन्याच्या
उत्तरी कारवाईत मृत्युमुखी पडले. जूनमध्ये सैन्याकडून झालेल्या सामूहिक नरसंहारात तब्बल
१२० लोकशाही समर्थक लोकांनी ठार करून त्यांना खार्टूमच्या नील नदीत फेकण्यात आले. बीबीसीने
याबाबत खुलासा करून ही घटना जगासमोर आणली. ऑगस्टच्या सुरुवातीलाच ४ विद्यार्थ्यांचे
मृतदेह राजधानीत आढळले होते. गेल्या 18 महिन्यापासून सुदानमध्ये लोकशाही सत्तेची मागणी
सुरू आहे. सरकार व जनता यांच्या वेळेवेळी झालेल्या संघर्षात नेमकी किती लोकं मारली
गेली, याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध झालेली नाही. पण बीबीसी व अल जझिराच्या रिपोर्ट्चा
आधा3र घेतला हा मृतांचा आकडा २५० पेक्षा अधिक झालेला आहे.
सुदानवासीयांनी अखेर सैन्य शासकांना गुडघे टेकण्यास
भाग पाडलं असले तरी भविष्यात धोक्याची घंटा कायम असणार आहे. कारण वाटाघाटीनुसार प्रथम
सैन्य शासक सत्तेवर राहणार असून नंतरच्या टर्ममध्ये लोकशाही समर्थकांना सत्तेचा लाभ
मिळणार आहे. दोन गटांची मिळून तयार झालेली सार्वभौम परिषद सरकार आणि कायदेमंडळावर देखरेख
करणार आहे. त्यामुळे धोका अजून पूर्णपणे टळलेला नाही. भूतकाळातील उदाहरणे पाहिले तर
अशी सत्ता विभागणी व राज्यक्रांत्या फसल्याची अनेक उदाहरणे आहेत. इजिप्त, लिबिय़ा, यमन
ही उदाहरणे अलीकडची आहे. त्यामुळे सुदानवासीयासाठी लोकशाही युगाची सुरुवात झाली असली
तर लोकशाही कायम राखण्याचं आव्हान कायम आहे.
(सदरील लेख 29 ऑगस्ट 2019च्या लोकमतमध्ये प्रकाशित झालेला आहे)
जाता जाता
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com