दक्षिण कोरियाची प्रसिद्ध पॉप स्टार सुलीने वयाच्या
२५व्या वर्षी जगातून निरोप घेतला. सुली केवळ
इन्स्टा सेलिब्रिटी नव्हती तर एक फेमिनिस्ट चळवळीची अशी बंडखोर तरुणी होती,
जिने कोरियाच्या भांडवलवादी उद्योगाच्या नाकी नऊ आणले होते. त्यामुळे सहाजिकच तिच्या
मृत्युने दक्षिण आशिया राष्ट्रातील तिच्या फॉलोअर्समध्ये हळहळ व्यक्त होत आहे. तिच्या
जगभरातील फॉलोअर्स सुलीला #RestInPeaceSulli हैशटैग वापरून श्रद्धांजली देत आहेत.
कमी वयात कुणाला मृत्यू आला की हळहळ होतेच. पण मरणाऱ्या व्यक्तीचे कर्तुत्व मोठे असेल तर तिच्यावर मृत्युलेख लिहिले जातात. १८ ऑक्टोबरला बीबीसीने सुलीवर एक दीर्घ मृत्युलेख लिहिला. शिवाय अन्य आघाडीच्या मीडिया हाऊसनेदेखील सुलीवर लेख लिहिले. सुलीच्या आत्महत्येची बातमी शॉकिंग होती. एक बंडखोर स्त्री म्हणून सुलीला अल्पावधीत प्रसिद्धी मिळाली होती. के पॉप या म्यूझीक इंडस्ट्रीशी सुली जोडलेली होती. तिच्या सुगम आवाजाच्या मोहिनीने कोट्यवधी लोकांना जगण्याची उर्मी मिळाली होती.
वाचा : दोन महिला वैज्ञानिकांचे ऐतिहासिक स्पेसवॉक
प्रशिक्षणार्थी पासून प्रसिद्ध पॉपस्टारपर्यंतचा
तिचा प्रवास रंजक आहे. २९ मार्च १९९४ला जन्मलेल्या सुलीचे खरे नाव ‘चोई
जिन-री’ होतं. २००५ला तिने एस.एम. इंटरटेंमेंट कंपनीसाठी
ऑडिशन दिलं होतं. त्यावेळी ती फक्त ११ वर्षांची होती. तिला कोरियातील सर्वात मोठ्या
म्यूझीक कंपनीत ट्रेनर म्हणून काम मिळालं.
२००९ला तिला के पॉप या कंपनीत मुलींच्या ग्रुपमध्ये
गायनाची संधी मिळाली. अल्पावधीत पाच सदस्यांच्या गटाचा पहिला अल्बम ‘पिनोचिओ’ रिलीज
झाला. काहीच दिवसात तो कोरियन संगीत चार्टमध्ये प्रथम स्थानावर आला आणि अशा रीतीने
सुली के-पॉप गर्ल ग्रुपची एक मोठी सिंगर बनली. २०१०यूएस फेस्टिव्हलमध्ये या बॅंडने
आपल्या गायनाची जादू दाखवली. त्यानंतर या ग्रुपची ओळख जगाला झाली.
सुली के पॉप ग्रुपमध्ये पहिलीच
स्वतंत्र विचाराची तरुणी होती. बीबीसीच्या मते, अनेकदा ग्रुपमधील सहकारी मित्रासोबत
तिचा वाद होत असे. सहकारी मित्रांसोबत झालेल्या वादानंतर फ्रस्टेड होऊन तिने वर्षभरानंतर
हा ग्रुप सोडला. याबद्दल तिने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत म्हटले होते "माझ्याबद्दल
पसरवल्या गेलेल्या संभ्रमित आणि खोट्या अफवांमुळे मला शारीरिक आणि मानसिक त्रास होत
आहे."
बँड सोडल्यानंतर ती अक्टिंग क्षेत्राकडे
वळली. सुलीने टीव्हीमध्ये काम सुरू केलं. २०१२ मध्ये टेलीव्हीजन शो ‘टू द
ब्यूटीफुल यू’च्या भूमिकेसाठी तिला न्यू स्टार अवॉर्डदेखील
प्राप्त झाला. फॅशन किंग (२०१४) आणि
रियल (२०१७) या सिनेमातही ती
झळकली.
वेगवेगळ्या चॅनलवर तिने अनेक रिअलिटी शो मध्ये सहभाग नोंदवला. चालू वर्षात तिचा एक टीवी शो खूप गाजला. ज्यात तिने ऑनलाईन ट्रोलिंग झालेल्या आणि हेट कैंपेनच्या बळी ठरलेल्या सिलेब्रिटींच्या मुलाखती घेतल्या होत्या. सुली सोशल मीडियावर प्रचंड अक्टीव्ह होती. इन्स्टावर तिचे ५० लाख फॉलोअर्स होते. अनेक विषयावर ती बेधडकपणे बोलत असे.
गेल्या महिन्यात तिने कोरियात ‘नो ब्रा’ चळवळ सुरू केली होती. पुरुषांच्या इच्छेप्रमाणे महिलांनी वेशभूषा का कराव्या असा तिचा युक्तिवाद होता. पुरुषांच्या इच्छेसाठी आम्ही अंतवस्त्रे का घालावी, आम्ही ती नाकारतो म्हणत तिने एक अनोखी चळवळ सुरू केली होती. तिला दक्षिण कोरियातून भरपूर प्रतिसाद मिळाला. इन्स्टाग्रामवर सुरू केलेली ही चळवळ ट्विटर व फेसबुकवर कोरियन रस्त्य़ावर आली होती.
गेल्यावर्षी कोरियात ‘एस्केपद कॉर्सेट’ आणि लेडिज वॉशरूमधील गुप्त कॅमेऱ्याविरोधात मोठी चळवळ सुरू झाली होती. यातही सुलीचा सहभाग होता. मेकअप साहित्य आणि साधनांचा त्याग करणारी ही मोहीम जगभरात चर्चेचा विषय झाली होती. त्याच्याच जोडीला ‘नो ब्रा’ चळवळ सुरू झाली.
या दोन्ही चळवळीने कोरियाचे सौंदर्य प्रसाधने बनविणाऱ्या कंपन्यावर संक्रांत आली होती. त्यामुळे सुली हेट कॅम्पेनची बळी ठरली होती. या अनोख्या मोहिमेमुळे तिच्यावर अनेक लांच्छने लावली गेली. तिला ट्रोल करण्यात आलं. कॉर्पोरेट कंपन्यांच्या एजेंटानी तिला ट्रोल केलं असावे, अशी शक्यता तिच्या काही फॉलोअर्सनी व्यक्त केली आहे.
तिच्या बेधुंद वागणुकीमुळे हा त्रास होत असल्याचे तिच्या काही जवळच्या मित्रांनी सांगितलं आहे. कोरिया टाईम्स या वृत्तपत्राने म्हटले आहे. कोरिया हेरॉल्ड या अग्रणी दैनिकाने सुली ऑनलाईन ट्रोलिंगची बळी भरली असावी, अशी शक्यता वर्तवली आहे. बीबीसीच्या मते सुलीच्या मृतदेहाजवळ एक सुसाईट नोट मिळाली.
वाचा : दक्षिण कोरियातील महिला ठरल्या स्पाय कॅमेऱ्याच्या बळी
वाचा : जपानी कॉर्पोरेट कंपन्याची चष्माबंदी
परंतु पोलिसांनी त्याबाबत काहीच माहिती दिली नसल्याचे वृत्तात बीबीसी सांगते. सुलीच्या जवळच्या मित्रांनी इस्टावर लिहिले आहे की सुली डिसऑर्डर होता. पण ती आत्महत्या करेल असं त्यांनाही वाटलं नव्हतं. काहींही सुलीचा मृत्यु दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. तर काहींनी सुलीच्या निधनावर विश्वास नसल्याचं म्हटलं आहे.
बीबीसीच्या मते सुलीचा मॅनेजर तिला १३ ऑक्टोबरच्या रात्रीपासून पोन लावत होता. परंतु तिच्यासी कॉनटैक्ट होत नव्हतं. ज्यावेळी तो घरी पोहोचला त्यावेळी सील घरात मृतावस्थेत आढळली.
(सदरील लेख आजच्या लोकमतमध्ये प्रकाशित झालेला आहे)वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com