"सर्वांनी संघटितरीत्या एकत्र येऊन काम केल्याने शांतता राखण्यासाठीची
पायाभूत जबाबदारी पूर्ण केली जाऊ शकते. एकाच्या प्रयत्नामुळे कामाची सुरुवात होते.
पण संघटितपणे ते केल्याने त्याला गती येते."
रिपब्लिक ऑफ काँगोच्या मेजर सेयनबोऊ डिऔफ या महिला पोलीस अधिकाऱ्यांचं
हे विधान आहे. ५ नोव्हेंबरला संयुक्त राष्ट्राकडून सर्वश्रेष्ठ महिला पोलीस
अधिकारी म्हणून त्यांचा गौरव केला जात असताना त्यांनी हे वाक्य उच्चारलं होतं.
मध्य आफ्रिकेतील कांगो देशात मेजर सेयनबोऊ डिऔफ सक्रिय आहेत. संयुक्त
राष्ट्राच्या बहुसंख्य महिला पोलीस अधिकाऱ्यांमधील त्या एक आहेत. पुरस्कारासंबंधीचं वत्त वाचताना मेजर
सेयनबोऊ यांचं असाधारण कर्तुत्व समोर येतं. शोषित महिलांसाठी त्यांनी केलेलं काम
अतुलनीय असं मानलं जातं. संयुक्त राष्ट्राकडून संचलित होणाऱ्या ‘यूएन न्यूज’ या वेबसाईटवर मेजर डिऔफ यांच्या कामाची पूर्ण प्रोफाइल दिलेली आहे.
निराधार व असहाय महिलांचा आवाज म्हणून त्यांना ओळखलं जातं. इतकंच नाही तर त्यांनी
महिला पोलीस अधिकाऱ्यांचं नेटवर्क तयार करून त्यांना ऐकमेकांशी जोडण्याचं
उल्लेखनीय काम केलं आहे.
वाचा: मोरक्कोत गर्भपातबंदी शिथिलतेची मागणी
मेजर डिऔफ यांनी लैंगिक अत्याचाराने त्रस्त झालेल्या स्त्रियांना केवळ आधार दिलेला नाही, तर अशा घटना रोखण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी व शाश्वत प्रयत्न केलेले आहेत. त्यांच्या या प्रयत्नांची दखल जागतिक मीडियाने घेतलेली आहे.
मेजर डिऔफ यांनी लैंगिक अत्याचाराने त्रस्त झालेल्या स्त्रियांना केवळ आधार दिलेला नाही, तर अशा घटना रोखण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी व शाश्वत प्रयत्न केलेले आहेत. त्यांच्या या प्रयत्नांची दखल जागतिक मीडियाने घेतलेली आहे.
मेजर डिऔफ यांनी पीडित महिलांना कणखर बनवून समाजात आत्मविश्वासाने
वावरण्याचं आत्मभान त्यांच्यामध्ये जागं केलं आहे. त्यांच्या या विशेष कामाचा गौरव संयुक्त राष्ट्राकडून करण्यात आलेला
आहे.
पूर्व अफ्रिकेतील सेनेगल राष्ट्रीय पोलीस यंत्रणेशी संबंध असणाऱ्या
मेजर डिऔफ या अशा टास्क फोर्सचं नेतृत्व करतात, जो काँगो रिपब्लिकमध्ये लैंगिक हिंसा आणि दुर्व्यवहार रोखण्यासाठी
प्रयत्नशील आहे. शिवाय त्या काँगोच्या महिला पोलीस नेटवर्कचं व्यवस्थापनदेखील
सांभाळतात. हे नेटवर्क कामकाज करणाऱ्या महिलांना सहाय्यता प्रदान करतो. तसेच
त्यांना सहकार्य व मदत मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे.
या पुरस्कारासाठी संयुक्त राष्ट्राच्या वेगवेगळ्या मिशन अंतर्गत
चालणाऱ्या जगभरातील ३० महिला पोलीस अधिकाऱ्यांचं नामांकन करण्यात आलं होतं. निवड
समितीने असाधारण कर्तृत्व गाजवणाऱ्या मेजर डिऔफ यांची निवड केली. निवड अधिकारी लुई
कारिल्हो यांनी मेजर डिऔफबद्दल म्हटलंय, "काँगो रिपब्लिकमध्ये संयुक्त राष्ट्र स्थिरता आणण्यासाठी प्रयत्नशील
आहे. या मिशन अंतर्गत लैंगिक हिंसेने पीडित स्त्रियांसाठी यूएन पोलीस महिला
नेटवर्क काम करत असतात. मेजर डिऔफ यांचं यातले काम उल्लेखनीय आहे. त्या संयुक्त
राष्ट्राच्या या बेसिक मुल्यांचे जिवंत व मुर्तीमंत उदाहरण आहेत."
२०११साली संयुक्त राष्ट्राने सर्वश्रेष्ठ महिला पोलीस अधिकार्यांचा
सन्मानित करण्यासाठी पुरस्कार सुरू केले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघात या
पुरस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
जगभरात शांतता प्रस्थापित करण्याच्या वेगवेगळ्या प्रयत्नाला
प्रोत्साहन म्हणून संयुक्त राष्ट्राकडून हा सन्मान दिला जातो. पुरस्कारातून त्या
त्या कामाचा गौरव तथा त्याचे स्वरूप समजून घेऊन व्यक्तीला व कामाला प्रोत्साहित
केलं जातं. विशेष म्हणजे हे पुरस्कार स्त्रियांसाठी असून त्यातून महिलांचे सक्षमीकरण
व सशक्तीकरण महिलांचे सक्षमीकरण व सशक्तीकरण करण्याचे महत्त्वपूर्ण काम संयुक्त
राष्ट्राकडून केलं जातं
वाचा : अबी अहमद इथियोपियाचे मंडेला
पुरस्कार सोहळ्यासाठी संयुक्त राष्ट्र मुख्यालयात जगभरातील प्रतिनीधींची उपस्थिती होती. तसेच यूएन पोलीस प्रमुख आणि १४ शांति रक्षा अभियानाचे संयोजक, विशेषज्ञ आणि अधिकाऱ्यांची हजेरी होती.
पुरस्कार सोहळ्यासाठी संयुक्त राष्ट्र मुख्यालयात जगभरातील प्रतिनीधींची उपस्थिती होती. तसेच यूएन पोलीस प्रमुख आणि १४ शांति रक्षा अभियानाचे संयोजक, विशेषज्ञ आणि अधिकाऱ्यांची हजेरी होती.
यूएन शांतिरक्षा अभियानांच्या प्रमुख जियन पियर लैकरोईक्स यांच्या मते
या महिला पोलीस अधिकारी असाधारण असून आपल्या विशेष कर्तृत्वाची छाप सोडणाऱ्या
आहेत. या अधिकारी लैंगिक अत्याचार पीडितांबद्दल विशिष्ट दष्टिकोन प्रदान करतात.
इतकेच नाही तर यजमान देशातील सरकारी संस्थाने आणि स्थानिक समुदायामध्ये प्रत्येक
स्तरावर संपर्क साधून त्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतात."
पुरस्काराच्या वितरण प्रसंगी शांतिरक्षा अभियानाचे प्रमुखांनी मेजर
डिऔफ यांचं कर्तृत्वाची गाथा वाचून दाखवली. ते म्हणाले, "मेजर डिऔफ यांच्या प्रयत्नामुळे वर्ष
२०१८मध्ये एकही लैंगिक अत्याचाराची नोंद झालेली नाही. यापूर्वी २०१६ ते २०१७ मध्ये
अशा प्रकारच्या अत्याचाराचे १४० प्रकरणे समोर आली होती."
मेजर डिऔफ गेल्या अनेक वर्षांपासून संयुक्त राष्ट्र अंतर्गत चालणाऱ्या
विविध अभियानात काम करत आहेत आहेत. त्या दारफूरमध्ये संयुक्त राष्ट्र व आफ्रिकी
युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने चालणाऱ्या मिशनमध्येदेखील सक्रिय होत्या.
त्यांनी माली देशात संयुक्त राष्ट्राच्या स्थिरता मिशन अंतर्गत उल्लेखनीय काम
केलेलं आहे आहे. ज्यात दुर्व्यवहार व आर्थिक सहायता संबंधी मुद्द्यांवर संबंधी
मुद्द्यांवर त्यांनी विशेष असं कार्य केलंय.
मेजर डिऔफ यांनी पूर्व अफ्रिकेतील सेनेगल राष्ट्रीय पोलीसमध्ये ३३
वर्षांपासून कार्यरत आहेत. संयुक्त राष्ट्राच्या शांतता अभियानात सेनेगल पोलीसचं
काम महत्वाचं मानलं जातं. सेनेगलचे तब्बल १० हजार पोलीस अधिकारी यूएनसाठी
आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता आणि सुरक्षा मिशन अंतर्गत सेवा प्रदान करतात.
संयुक्त राष्ट्रासाठी सर्वात जास्त पोलिसी सेवा देणाऱ्या शीर्ष ५ देशात पूर्व
अफ्रिकेतील सेनेगलचा समावेश होतो.
सध्या संयुक्त राष्ट्रात सध्या १४०० महिला पोलीस अधिकारी कार्यरत
आहेत. ज्या जगभरात सक्रिय आहेत. वर्ष २०२८पर्यंत संयुक्त राष्ट्र महिला पोलीस
अधिकाऱ्यांची संख्या ३० टक्क्यांपर्यंत वाढवणार आहे.
कलीम अजीम
(सदरील लेख आजच्या लोकमतमध्ये प्रकाशित झालेला आहे)
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com