दहा वर्षाचा रोमियो कॉक्स लंडनच्या ट्रॅफल्गर चौकात पोहचला. त्याच्या चारी बाजूने बघ्याची गर्दी आहे. प्रत्येकजण त्याच्या साहसाचे कौतुक करत त्याचे स्वागत करत आहेत. तो गेली तीन महीने २,८०० किलोमीटरचा निरंतर पायी प्रवास करत होता. २० सप्टेंबरचा तो दिवस त्याच्यासाठी फार महत्त्वाचा होता. आजी रोज मेरीला भेटण्यासाठी तो फार आतूर होता. पण १४ दिवसांचा होम क्वारंटाईन अवधी पूर्ण केल्याशिवाय ते शक्य नव्हतं.
इटली ते लंडन त्याचा हा प्रवास अदभूत व रोमांचकारी आहे. या प्रवासाचा प्रत्येक क्षण व प्रसंग फोटो व वीडियो स्वरूपात त्याच्या वडिलांनी कैद केले आहेत. या आधारावर कॉक्सच्या या रोमांचकारी प्रवासाबद्दल जगभरात लिहिलं-बोललं जात आहे.
तरुणांनी सोशल मीडियावर कॉक्सच्या प्रवासाला समृद्ध करणारा अनुभव म्हणत चर्चा सुरू केली आहे. १० वर्षांचा कॉक्स रोमियो यूरोपमधील तरुणासाठी दीशादर्शक का ठरत आहे, याची कहाणी तशी रंजकच नव्हे तर अनुभवजन्यदेखील आहे.
न्यूज विकला लिहिलेल्या शब्दांकनात कॉक्स म्हणतो, ‘टाळेबंदीत फ्रान्सहून इटलीत चालत आलेली एक वयस्कर आजी पाहिली. मला वाटले, नातवांना भेटायला तिनं किती कष्ट भोगले, मग मी का हे करू शकत नाही.’
वाचा : बायगेल्मा का निघालीय 12,000 किलोमीटरच्या प्रवासाला?

असं केलं पूर्वनियोजन
कॉक्स बीबीसीला म्हणतो, ‘क्वारंटाइनमध्ये मला माझ्या आजीला भेटण्याची कल्पना सुचली, पण गुप्तपणे अगदी गाड्या, विमाने न वापरता.’ सहाजिकच कोरोना वायरसच्या लॉकडाऊनमुळे कॉक्सला वाहतूक व अन्य मार्गाने प्रवासावर निर्बंध होते. त्यामुळे आजीला भेटण्याची त्यांची उत्सुकता वाढत गेली. कुठल्याही परिस्थितीत कॉक्सला लंडनमध्ये राहत असलेल्या आपल्या आजी व अन्य नातेवाईकांना भेटायचे होते.
फोर्ब्स न्यूज या प्रवासावर भाष्य करताना म्हणतो, ‘वाहतुकीवर निर्बंध असल्यामुळे कॉक्सला प्रवास शक्य नव्हता. त्याने वडिलांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी नकार दिला. परंतु कॉक्स आपल्या धोरणावर ठाम असल्याने वडिलांनी त्याच्याबरोबर जाण्याचं कबूल केलं.’
कॉक्स फेसबुकच्या एका वीडियोत म्हणतो, ‘प्रवासाला निघण्याआधी सगळं प्लॅनिंग केलं. किचनमध्ये जाऊन तंबू लावण्याचा सराव केला, जे फारच मजेशीर होतं. निघण्याच्या आदल्या रात्री आमची पार्टी झाली. त्यात माझे सगळे मित्र आले. त्यांपैकी काहींनी आफ्रिकेतून पायी आणि बोटीने प्रवास केला होता.’
दोघांचं पहिलं डेस्टिनेशन मेसिना होतं. आईने कॉक्सला त्या दिशेने कॉक्सला चालत नेलं. निरोप देताना तिनं दोघांना लाखभर सूचना केल्या.

वाचा : काय आहे फ्रान्सची 'यलो वेस्ट' मूवमेंट?
असा सुरु झाली सफर
असा सुरु झाली सफर
पिता-पुत्र २४ जूनला इटली - सिसिलीहून नेपल्सला जाणारी बोट घेऊन निघाले. पुढे सायकलवरून त्यांचा लांबचा प्रवास सुरू झाला. रोज पहाटे साडेचार वाजता उठून प्रवास सुरू होई. कॅन्टरबरीहून रोमला जोडणाऱ्या फ्रान्सिजेना मार्गावर ही जोडी दिवसाला सुमारे २० किलोमीटर प्रवास करीत.
जिथे रात्र होईल तिथे त्यांचा मुक्काम होई. अनेकदा त्यांनी निरभ्र चांदण्याच्या खाली जंगलात तळ ठोकला. प्रवासात वसतिगृहे आणि कॉन्व्हेंटमध्येदेखील मुक्काम पडला. कॉक्स म्हणतो, ‘आम्ही तारे आणि झाडांखाली कुठेही झोपायचो. ते खरोखरच चांगले दिवस होते.’
वडिल सोबत असले तरी त्याचा हा प्रवास तसा सोपा नव्हता. सुरुवातीला तो बाबांच्या नेहमीच्या काळजी वाटण्याच्या धोरणाला पुरता वैतागला होता. ‘त्यांच्या सतत सूचना असायच्या. पण प्रवासात आम्ही अधिक जवळ आलो. ते युद्धक्षेत्रातील पत्रकार आहेत, त्यामुळे मला वाटतं ते माझ्याबरोबर असण्याचा एक चांगला निर्णय होता.’
हा प्रवास साधा नव्हता. प्रवासात गाढव, घोडा, मिळेल ते वाहनावर बॅगा सांभाळत बसावं लागायचं. न्यूज विक म्हणते, प्रवासात रानडुकर आणि आक्रमक जंगली कुत्र्यांनी दोघांचा पाठलाग केला, त्यांना हुसकावून लावण्यासाठी अनेक शर्थी कराव्या लागल्या.
वाचा : सन्मान #MeToo कॅम्पेनचा

चार देश ओलांडले
तब्बल ९३ दिवस ते रस्त्यावर प्रवास करत होते. या दरम्यान दोघांनी इटली ते इग्लंड दरम्यान ४ देश ओलांडले. ५ ऑक्टोबरला कॉक्स होम क्वारंटाईन पूर्ण करून आजीला भेटला. या दिवशी मीडिया प्रतिनिधी दोघांच्या भावमुद्रा टिपण्यासाठी आतूर होते. या बहुप्रतिक्षित भेटीचा एक वीडियो रोमियो बिग जर्नी होम या त्याच्या फेसबुक पेजवर अपलोड केला आहे. गळाभेट होताना आजी-नातवाच्या भावना शब्दातित होत्या.
कॉक्सचे वडिल फिल कॉक्स व्यवसायाने पत्रकार व माहितीपट दिग्दर्शक आहेत. ते एका सेवाभावी संस्थेसाठी समाजकार्य करतात. मुलाच्या धाडसाचे कौतुक म्हणून त्यांनी त्याच्यासोबत प्रवास करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मते या प्रवासात एक महत्त्वाचा संदेश आहे.
पिता-पुत्रांना अचानक लागलेल्या लॉकडाऊनमुळे निर्वासितांनी केलेल्या वेदनादायी पायपीटीवर प्रकाश टाकायचा होता. निर्वासितांसोबत झालेल्या भेटीचे त्यांनी सोशल मीडियावर डॉक्युमेंटेशन केलं आहे.
बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणतात, ‘मी कॅलिस येथील आमच्या वसतिगृहात एका टेकड्यांवरून जात होतो. मी पाहिले की एक सुदानी मुलगा जो कॅलिसहून लंडनकडे त्याच्या कुटुंबाकडे जाण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याला परवानगी नव्हती. कुटुंबाला भेटणं किती अन्यायकारक आहे, असं त्यावेळी मला जाणवलं.’
प्रवासात कॉक्स आणि त्याच्या वडिलांनी ‘रेफ्युजी एज्युकेशन अक्रॉस कॉन्फ्लिक्ट्स ट्रस्ट’साठी चॅरिटीची रक्कम गोळा केली. कोविड संसर्गरोगाच्या काळात निर्वासित, मजूर, विद्यार्थी, कामगारांना मदत म्हणून ते हा निधी संकलित करत होते.
कॉक्स म्हणतो. "मला घाना येथील मुलांना डिजिटल शिक्षणासाठी मदत करायची आहे, आम्ही त्यासाठी निधी उभारण्याचा प्रयत्न करत आहोत." दि सन म्हणतो, स्थानिक भागातील निर्वासित आणि वंचित मुलांसाठी ओषधी गोळ्या आणि वायफाय कनेक्शन उपलब्ध करण्यासाठी कॉक्सने या प्रवासात ११,००० पौंड उभे केले आहेत.
वाचा : बालिकांच्या जीवावर उठणार हा सोमालियन कायदा!

समृद्ध करणारा अनुभव
कॉक्ससाठी हा प्रवास म्हणजे समृद्ध करणारा अनुभव होता. त्याचे वडिल म्हणतात, त्याला खूप काही शिकायला मिळाले. त्याला निर्वासित मुलांच्या वस्तुस्थितीची जाणीव झाली. त्यांच्या सुरक्षेबद्दल तो आता काळजी करत आहे. त्यानं त्यांच्याबरोबर फुटबॉल खेळला. निर्वासितांच्या अनेक भयंकर कथा त्याने आपल्या कानांनी ऐकल्या आहेत.
कॉक्स न्यूज विकला लिहितो, ‘एकदा शॉर्टकट म्हणून बाबांनी एका जंगलातून मला नेलं. तिथं काही कुत्री आमच्या मागावर लागली. पुन्हा कुत्र्यांचा सामना करावा लागेल हे आमच्या लक्षात नव्हतं. बाबांना काळजी वाटत होती आणि मला शूर व्हायचं होतं. आम्ही ओरडलो आणि किंचाळलो आणि बाबांची पिशवी फाटली. आम्ही आईला न सांगायचं ठरवलं आणि यापुढे कधीही शॉर्टकट वापरायचं नाही असं ठरवलं.’
कॉक्सचा हा प्रवास संभ्रमित व अनिर्णायक तरुणाईसाठी एक महत्त्वाचा संदेश देणारा आहे, असं कॉक्सचे वडिल म्हणतात. अनेक यूरोपीयन मीडियानं कॉक्सवर विशेष स्टोरी प्रकाशित केली आहे. सर्वांनी कॉक्सच्या कुटुंबप्रेमावर भाष्य केलं आहे.
लॉकडाऊनमध्ये प्रवास, स्थलांतर व तत्सम वेदनांच्या अनेक कथा जगभरात गेल्या सहा महिन्यापासून प्रकाशित होत आहेत. त्यात कॉक्स रोमियोची कथा विशेष महत्त्वाची वाटते. ज्या यूरोपीयन समाजात दिवसेंदिवस कुटुंब, नाते संबंधातील दुरावा वाढत आहे, अशावेळी कॉक्सची कथा प्रेरणादायी वाटते.
नात्याला महत्त्व देणारा हा प्रवास कॉक्सचे आयुष्य समृद्ध करून गेला. हा प्रवास त्याच्या मनात शोषित, पीडित व वंचिताबद्दल कणव निर्माण करतोय. त्यामुळे कोविडच्या असंख्य वेदनादायी कथांमध्ये कॉक्सची कथा प्रेरणा व उर्जा देणारी आहे.

(सदरील लेख ८ ऑक्टोबर २०२०च्या लोकमतच्या ऑक्सिजनमध्ये प्रकाशित झालेला आहे)

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com