कामगार हक्कांसाठी जगभरात अनेक आंदोलने झाली. रशियन व फ्रेंच राज्यक्रांती याच लढ्याचे फलित होते. गेल्या अनेक शतकांपासून सुरू असलेला हा लढा अजूनही संपलेला नाही. अमेरिकेतील दोन महिला सिनेटरनी (खासदार) ‘रेज द वेज अक्ट-२०१९’ विधेयक मांडून कामगाराच्या प्रश्नांकडे जगाचे लक्ष वेधले आहे. विधेयक मांडून त्या शांत बसल्या नाहीत तर त्यांनी त्यासाठी अनोखा लढा उभारला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे जगभरात महिला कामगारांच्या समान वेतन अधिकारांवर चर्चा सुरू झाली आहे.
मे महिन्यात अमेरिकेच्या खासदार एलेक्जेंड्रिया ओकासियो-कॉर्टेज चक्क वेटरच्या रुपात एका मेक्सिकन हॉटेलात दिसल्या. त्यांनी न्यूयॉर्कमधील या हॉटेलमध्ये जाऊन वेटरसारखा ग्राहकांच्या टेबलावर पिज्जा सर्व्ह केला. ही अनोखी शक्कल त्यांनी हॉटेल कामगारांची सुरक्षा व पगार वाढीसाठी लढविली. यासाठी त्यांनी महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे ३१ तारीख निवडली. पगाराच्या दिवशी त्यांनी रेस्टॉरंट मालकांना कामगारांची व्यथा समजून घेण्याची गळ घातली. कामगारांना समान वेतन आयोग लागू करावा अशी मागणीही त्यांनी मालकांना केलेली आहे.
वाचा : दक्षिण कोरियाची 'एस्केप द कॉर्सेट' मोहीम
वाचा : क्राउन अॅक्ट : वर्णभेदी हिंसाविरोधात अमेरिकेचे पाऊल
या अनोख्या आंदोलनाच्या निमित्ताने अमेरिकेत ‘रेज द वेज अक्ट-२०१९’ म्हणजे किमान वेतनवृद्धी कायद्यावर चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेच्या कायद्यानुसार फास्ट फूड आउटलेट्स, कॉल सेंटर, थियटर, दुकान, सलून, रेस्त्रां आणि गॅरेजमधील कर्मचाऱ्यांना ५०० रुपये तासाला याप्रमाणे वेतन देण्याची मुभा आहे. पण रिपोर्ट्स असे आहेत की, हॉटेलमालक कर्मचाऱ्यांना तासाला १५० रुपये देतात. एलेक्जेंड्रिया यांचे मते दिडशे रुपये वेतन म्हणजे गुलामी आहे. वेटरला सन्मानार्थ पगार मिळाला पाहिजे, असं त्यांचं मत आहे. हॉटेलमालकांनी कर्मचाऱ्यांना तासाला २ डॉलर १३ सेन्स ($2.13) म्हणजे १००० रुपये द्यावेत, अशी एलेक्जेंड्रिया यांची मागणी आहे.
एलेक्जेंड्रिया यांनी अजून एका महत्त्वाच्या बाबींकडे रेस्टॉरंट मालकाचं लक्ष वेधलं. हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची हमी त्यांनी हॉटेल मालकाकडून घेतली. यासंदर्भात दि गार्डियनला दिलेल्या प्रतिक्रियेत त्या म्हणतात, “बहुतांश हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये महिला कर्मचाऱ्यांचा छळ केला जातो. अधिकचं काम करूनही त्यांना योग्य पगार दिला जात नाही. अन्य पुरुष सहकारी महिलांचे लैंगिक शोषणही करतात. रेस्टॉरंट मालकांनी ‘बी हर्ड एक्ट’ कायद्याअंतर्गत सुधारित सुरक्षा नियमावली जाहीर करावी.”
एलेक्जेंड्रिया खासदार होण्यापूर्वी बारटेंडर होत्या. हॉटेल कामगारांचे दु:ख माहीत असल्याचं त्यांनी गार्डियनला म्हटलं आहे. नोकरी करताना त्यांच्यावर सहकार्यांनी लैंगिक अत्याचार केल्याचेही त्यांनी आपल्या निवदेनात सांगितलं. रेस्त्रा असोसिएशनने पगार वाढीची त्यांची मागणी मान्य करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे एलेक्जेंड्रिया यांना वाटतं की, या ‘रेज द वेज अक्ट-२०१९’ या विधेयकावर अमेरिकन संसदेत चर्चा होण्याची गरज आहे. त्यासाठी त्या आघाडी उघणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. एक दिवसासाठी वेटर व बारटेंडर झाल्याचा हा व्हीडिओ त्यांनी आपल्या ट्विटर हँडलला टाकला आहे. हा व्हीडिओ तब्बल अडीच लाख लोकांनी पाहिला असून सुमारे २८ हजार लोकांनी त्यावर प्रतिक्रिया देऊन त्यांना पाठिंबा दिला आहे.
दुसरीकडे, भारतीय वंशाच्या अन्य सीनेटर कमला हॅरिस यांनीदेखील महिलांना मिळणाऱ्या कमी पगाराचा मुद्दा संसदेत उचलला आहे. त्यांनी यासंदर्भात अमेरिकन संसदेत एक प्रस्ताव दाखल केला आहे. त्यांनी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना समान वेतन देण्याची मागणी केली आहे. जर एखादी कंपनी महिलांना पुरुषाऐवढा पगार देण्याच्या बाबतीत भेदभाव करत असेल तर सरकारने त्यावर आर्थिक दंड लावला पाहिजे, असेही हॅरीस यांनी सरकारला सांगितलं आहे.
वाचा : कॅनडात सेक्युलर विधेयकाचा वाद
वाचा : काय आहे फ्रान्सची 'यलो वेस्ट' मूवमेंट?
हॅरीस यांनी अशी मागणी केली आहे की, महिला कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीपूर्वीच कंपन्यांनी 'इक्वल सैलरी सर्टिफिकेट' जारी करून पगाराची धोरणावली तयार करावी. सैलरी संदर्भात कंपन्यांना दिलेली सवलत सरकारने रद्द करावी, असे त्यांनी संसदेला म्हटलं आहे. कमी वेतन देणाऱ्या कंपन्याविरोधात खटले दाखल करावेत, असंही हॅरीस यांनी महिलांना बजावलं आहे.
पुरुष कर्मचाऱ्यांच्या तुलनेत महिलांना कमी पगार दिला जातो. हा भेदभाव दूर करून पगार समपातळीवर आणावा अशी मागणी जगभरात सुरू आहे. गेल्या वर्षीं लंडनमध्ये बीबीसी या जगप्रसिद्ध मीडिया हाऊसमध्ये महिला कर्मचाऱ्यांनी समान वेतनासाठी ‘जेंडर पे गॅप’ मोहीम सुरू केली होती. त्यासाठी बीबीसी विमेननी आपल्या पदाचा राजीनामादेखील दिला होता. त्यानंतर ब्रिटनच्या अनेक कंपन्यामध्ये समान वेतनासाठी महिलांनी लढा उभा केला होता.
ब्रिटनच्या काही स्वंयसेवी संस्थानी समान वेतनावर आधारित सवेक्षणही प्रसिद्ध केलं होतं. त्यातलं स्कॉटिश ट्रेडस युनियन काँग्रेसचा सर्व्हे खूप गाजला त्या सर्वेक्षणात लहान-मोठ्या अनेक कंपन्या व दुकानात महिला कर्मचाऱ्यांना वेतन पुरुषांच्या तुलनेत फार कमी दिलं जात आहे, असं निरिक्षण नोंदवलं होतं.
जगभरात ‘जेंडर पे गॅप’ दूर करण्याची मोहीम आता तीव्र झाली आहे. अमेरिकेच्या महिला खासदारांनी हा विषय संसदेत मांडल्याने हा विषय प्रशासकीय पातळीवर चर्चेला आला आहे. जगभरातून या महिला खासदारांना पाटिंबा मिळत असून सोशल मीडियावर युजर्झनी #RaiseTheWage मोहीम सुरू केलेली आहे. त्यामुळे भविष्यात हा लढा अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
(हा लेख लोकमतच्या ऑक्सिजनमध्ये 20 जून 2019ला प्रकाशित झालेला आहे.)
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com