जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पर्यावरण बचावचा सदेश देत मेक्सिको शहरात शेकडो लोकं नग्न अवस्थेत रस्त्यावर होती. ग्लोबल वार्मिंगचे वाढते धोके निदर्शनास आणून देणे या उद्देशाने ‘वर्ल्ड नेकेड राईड’ काढली गेली. जूनपासून मेक्सिको शहरातील ही तिसरी मोठी सायकल रॅली होती. ‘कार संस्कृतीचा निषेध’ असं घोषवाक्य असलेली ही मोहीम जगभरात वाढत आहे. शहरात डिझेल व पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांच्या वापर टाळवा, यासाठी ही जनजागृतीपर उपक्रम राबविला जात आहे.
शहर वाहतुकीसाठी इंधनावर चालणारी वाहने टाळून सायकलींचा वापर करावा, असा मेसेज या सायकल राईडमधून दिला जात आहे. #WorldNakedBikeRide (WNBR) नावाने सुरू झालेल्या या ट्रैण्डला जगभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. ट्विटर आणि फेसबुकच्या पलीकडे जाऊन या चळवळीने जनाआंदोलनाचं स्वरूप घेतलंय.
२००४ पासून कॅनडामधून सुरू झालेल्या या मोहिमेला आता जागतिक स्वरूप आलेलं आहे. चालू वर्षी या रॅलीचे १६वे एडिशन आहे. या श्रृंखलेत ही राईड अर्जेटिना आणि फिनलँडपासून दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडपर्यंत २० देशांमधील ७० शहरांमध्ये पोहोचणार आहे. या ‘नेकेट राईड’ या शहरात जाऊन इंधनावर चालणाऱ्या गाड्यांचा वापर टाळण्यासाठी जनजागृती करणार आहे.
९ जूनला मेक्सिको सिटीत एक भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यात शोकडो लोकं सामील झालेली होती. फोर्ब्जच्या मते शहरात रोज अंदाजे ८ दशलक्ष वाहने रस्त्यावर अडथळा निर्माण करतात. परिणामी सायकलस्वारांना विविध प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागतं. हे धोके लक्षात घेऊन जूनपासून मेक्सिको सिटीत राईड सुरू झालेल्या आहेत.
वाचा : ‘अनवॉन्टेट टच’ विरोधात रशियाची एना रस्त्यावर
स्त्री-पुरुष नग्नावस्थेत
वर्ल्ड नेकेड बाईक राईडमध्ये सहभागी होणारे स्त्री-पुरुष पूर्णत: नग्नावस्थेत असतात. जुलैमध्ये झालेल्या मेक्सिकोतील रॅलीत आंदोलकांवर काही ठिकाणी हल्ले झाले. त्यामुळे आयोजकांनी सहभाग घेणाऱ्यांना रॅलीच्या सुरुवातीला व शेवटी कपडे घालण्याची विनंती केली होती. पोलीस व सार्वजनिक स्थळांचे नियम लक्षात घेता, मेक्सिकोतील आंदोलकांनी शरीरावर पेंटिग्ज करून घेतली. शरीरावर झाडांची पाने, मुळ्या, फांद्या रंगवून वेगळ्या प्रकारे पर्यावरण बचावचा संदेश हे आंदोलक देत आहेत.
मेक्सिकोतील रॅलीत अनेक आंदोलक असेही होते ज्यांनी पूर्ण कपडे परिधान करून आपल्या कपड्यांवर पर्यावरण रक्षणाचे स्लोगन लिहिली होती. राईडमध्ये सामील होणारे बरेच लोक त्यांचे शरीर आणि त्यांच्या सायकली कल्पक पद्धतीने सजवतात. आर्ट डिझाईनने सजविलेल्या सायकली व शरीरावरील चित्रकला रस्त्यावर चलणाऱ्या लोकांचे लक्ष सहज वेधून घेतात. त्यामुळे रस्त्यावर चालणाऱ्या लोकांता राईडला जोरदार प्रोत्साहिन मिळतो. वाटसरुंचे लक्ष वळावे यासाठी वेगवेगळ्या रंगाचे व लक्षवेधी कपडे या आंदोलकांनी परिधान केलेली होती. काही रायडर्सनी चेहऱ्यांना लपवून मुखवटे घातले होते. तर काहींनी आपला चेहरा देशाच्या राष्ट्रध्वजासारखा पेंट केलेला होता.
रॅलीत सहभागी होण्याची अट अगदी साधी आहे. आपल्या शरीरावर पेंट करून किंवा रंगीबेरंगी कपड्यांनी सजवून, शरीरावर स्लोगन लिहून पूर्णनग्न, अर्धनग्न किंवा फॅन्सी ड्रेसमधील कुठलाही व्यक्ती या रॅलीत सामील होऊ शकतो. प्रत्येक शहरात होणाऱ्या अशा राईडला प्रसारमाध्यमे मोठ्या प्रमाणात कव्हरेज देतात, अशावेळी अपघातही होतात. त्यामुळे वर्ल्ड नेकेड बाईक राईडने अनेक प्रकारची दक्षता आता घेण्यास सुरुवात केलेली आहे. वर्ल्ड नेकेड बाईक राईडने आपल्या जगभरातील राईडची माहिती आपल्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिली आहे. शिवाय आगामी कालात होणाऱ्या रॅलीची माहितीदेखील worldnakedbikeride.org या साईटवर दिलेली आहे.
वाचा : सन्मान #MeToo कॅम्पेनचा
पर्यावरणाकडे लक्ष वेधण्यासाठी
ग्रेट ब्रिटन आणि अमेरिकेत दरवर्षी सर्वाधिक संख्येने अशा प्रकारच्या राईड केल्या जात आहेत. WNBRच्या मते या दोन शहरात पादाचाऱ्यांची सुरक्षा हा महत्वाचा विषय म्हणून पुढे आलेला आहे. रस्त्यावर पायी चालणारा इथे स्वत:ला असुरक्षित समजतो. त्यामुळे स्थानिक लोकांनी इथे वेगळेवेगले प्रयोगही केले आहेत.
जगात नग्न होऊन निषेध नोंदवण्याचे अनेक प्रकार होत आहेत. काही वेळा मानवी नैतिकतेला दोषी ठरवत नग्नता प्रदर्शित केली जाते, तर अनेकवेळा दृष्कृत्याचा निषेध नोंदवायचा म्हणून आंदोलक आपली वस्त्र उतरवतात. ढासळत्या पर्यावरणाकडे लक्ष वेधण्यासाठी नग्न होण्याचे प्रकार तसे जुनेच आहेत. तरीही सभ्य म्हणवला जाणारा समाज जागा होत नाही, त्यामुळे त्या बिकट परिस्थितीकडे लक्ष वेधण्याच्या दृष्टीने वारंवार वस्त्राचा त्याग करून आंदोलक समाजाला जागे करण्याचा प्रयत्न करतात.
वाढत्या वाहनांमुळे रस्ते आक्रसत आहेत. जगातील कुठल्याही शहरात पायी चालणे आता अवघड होत चालले आहे. त्यामुळे सायकलस्वारांना रस्त्यावर हक्काची जागा मिळावी अशीही मागणी ‘वर्ल्ड नेकेड बाईक राईड’ या मोहिमेतून केली जात आहे. वाढते प्रदूषण ही जगाला भेडसावणारी मोठी समस्या आहे. पर्यावरणाच्या असमतोलाकडे लक्ष दिले नाही तर एकेदिवशी पृथ्वी नष्ट होईल. त्यामुळे शक्य होईल तेवढे हवेचं व ध्वनीचं प्रदूषण टाळून पर्यावरण जतन करणे सर्वच नागरिकांचे कर्तव्य आहे.
(हा लेख लोकमतच्या ऑक्सीजनमध्ये 8 ऑगस्ट 2019ला प्रकाशित झालेला आहे.)
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com