सौंदर्य शाश्वत व निरंतर असतं, फक्त त्याला शोधण्याची दूरदृष्टी तुमच्याकडे हवी असते, एकदा ती प्राप्त झाली की मग तुमची दृष्टी कुठेही तुम्हाला अद्भूत सौंदर्य दाखवते. अशी सौदर्यदृष्टी प्राप्त झाल्यास थक्क करणारी दृष्य प्रतिमा तुम्हाला सहजतेनं टिपता येतात, त्यानजरेत साठवता येऊ शकतात. आजूबाजूला घडत असलेल्या अनेक गोष्टी तुम्हाला विशिष्ट्य उदिष्ट प्राप्त करण्याची प्रेरणा बनू शकते.
या लेखात आपण अशाच एका वेगळ्या सौंदर्यशास्त्राबद्दल जाणून घेणार आहोत. पंचविशीत असलेली ‘इना मकोशी’ पश्चिम आफ्रिकेत विचलित करणारं सौंदर्य टिपण्यासाठी प्रसिद्ध आहे. असह्य वास वदुर्गंधी येणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून ती सौंदर्य शोधते. इना मकोशीच्या या सौदर्य शोधण्याच्या गाथेला तिनं प्रदूषणमुक्तीची जोड दिली आहे.
पश्चिम आफ्रिकेतील ‘सेनेगल’या लहानशा बेटीय देशात इना मकोशी ‘फॅशन फोटोग्राफर’ म्हणून कार्यरत आहे. इना मॉडेलिंग फोटोग्राफीसाठी पश्चिम आफ्रिकन उपखंडात प्रसिद्ध आहे. इना फोटोग्राफीसाठी पारंपारिक सुंदर बॅकग्राऊंड व फोरग्राऊंडचा वापर करत नाही, तर ती मॉडेल्सचे फोटो टिपण्यासाठी कचऱ्याचे ढीग, दुर्गंध येणारे समुद्र किनारे, गटारी, नाल्या, विषारी धूर ओकणाऱ्या चिमण्या बॅकग्राऊंडसाठी वापरते.
वाचा : इराणच्या स्टेडियममध्ये दाढ़ी मिशावाल्या मुलीसुंदर मॉडेल्स अक्षरश: कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर बसून तिच्यकडे फोटो काढून घेतात. फूड रॅपर्स, प्लास्टिक पिशव्या, कागदं आणि चिंध्यामुळं काळा व मळकट झालेला समुद्र किनारा तिला फोटोच्या बॅकग्राऊंडसाठी हवा असतो. टायरचे तुकडे, तुंबलेल्या गटारी, रस्त्यावर वाहणाऱ्या घाण पाण्यात फोर्टफोलिओ करून घेण्यासाठी इना मकोशीकडे सुंदर मॉडेल्सच्या रांगा असतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं का बरं बुवा? घाणीत का बरं त्या सुंदर मॉडेल्स फोटो काढून घेत असतील.! याचं उत्तर सोप्पं आहे. इना सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्या लोकांच्या लाजा काढण्यासाठी हा उपक्रम करते.
नागरिकांना स्वच्छतेचं धडे देण्यासाठी तिनं हा अनोखा मार्ग शोधून काढला आहे. सार्वजनिक परिसर स्वच्छ, निरोगी व प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी इना मकोशी हा गांधीगिरीचा मार्ग अवलंबला. चार वर्षापूर्वी म्हणजे 2014 साली तिची प्रदूषणमुक्तीची चळवळ सुरू झाली. एकदा समुद्र किनाऱ्याचा फेरफटका मारताना तिचं लक्ष तिथल्या घाणीकडे गेले.
या असह्य घाणीकडे लोकांचं लक्ष वेधण्यासाठी तिनं घाणीत मॉडेल फोटोग्राफी करण्याचं ठरवलं. या उपक्रमासाठी तिनं सेनेगलमधील पिकाईन व डार्कर शहरातील समुद्र किनाऱ्याची निवड केली. वास येणाऱ्या घाणीत मॉडेल्सना बसवून तिनं अनेक फोटो काढले. ‘फोटोशूट’नंतर एक्झीबिशन व सोशल मीडियातून हे विचलित करणारे फोटो प्रसारित झाले. असे फोटो पाहताच डार्करमध्ये एकच खळबळ उडाली.
दोन आठवड्यात स्थानिकांकडून डार्करच्या समुद्र किनाऱ्यावरील तुंबलेला कचरा हटवायला सुरुवात झाली. इनाच्या काही ‘डर्टी पिक्चर’मुळे हा क्रांतीकारक बदल घडला होता.
इना मकोशीचे हे अनोखे चिमटे सर्वांना बोचले. लोकांमध्ये स्वच्छतेच्या बाबतीत झालेला बदल पाहून तिला बळ मिळालं. तिचा हा साधा प्रयत्न आज तिची प्रेरणा झाली आहे. इना मकोशी पश्चिम आफ्रिकेतील उपखंडात डर्टी पिक्चर फोटोग्राफी करत फिरत आहे. मॉरिटॉनिया, माली आणि गुयाना या उपखंडात इनामकोशी ‘सोशल सेलेब्रिटी’म्हणून लोकप्रीय आहे.
इन्स्ट्रा, ट्रम्बलर, इन प्रिंट अशा सोशल साईटवर तिचे लाखो फॉलोव्हर्स
आहेत. सोशल साईट्सवरून ती सतत विविध देशातील ‘डर्टी पिक्चर’ अपलोड करत असते.
तिच्या प्रदषणमुक्तीच्या चळवळीची दखल बीबीसीनं घेतल्यानं ती जगभरात पोहचली आहे.
जगभरात वायू प्रदूषण व हवामान बदलावर चिंता व्यक्त केली जात आहे. समुद्राचे प्रदूषण व वाढणारी पाण्याची पातळी जगभरात चिंतेचा विषय बनली आहे. हे प्रदूषण कमी करण्यासाठी कार्बन वायुचं उत्सर्जन कमी करण्याची गरज आहे, पण भारतासह कुठल्याच राष्ट्राचं कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर एकमत होत नाहीये.
अशा अवस्थेत जागतिक तापमानवाढ विदारक रुप धारण करत आहे.
कुठलाही देश चूक स्वीकारून ती दुरुस्त करायला तयार नाही, अशा
परिस्थितीत इना मकोशीचा छोटासा प्रयन सर्व राष्ट्रांना धडा आहे.
(सदरील लेख लोकमतच्या 27 फेब्रुवारी 2018च्या अंकात प्रकाशित झालेला आहे.)
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com