जर्मनीत तरुणांना संविधानिक संरक्षण

कोरोना रोगराईची दूसरी लाट तरुण आणि किशोरवयीन वयोगटातील युवक-युवतींवर अधिक परिणाम करणारी असेल, अशी भिती जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केली आहे. यूरोपमध्ये अशी काही उदाहरणं समोर आली आहेत, ज्यात तरुणांवर कोरोना संक्रमणाची विघातक परिणाम दिसून आला आहे.

या पार्श्वभूमीवर जर्मनीतील तरुण व किशोरवयीन मुलासंदर्भात दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यासंबंधी चर्चा सुरू आहे. पहिलं तर १६ वर्षांच्या मुलांना मतदानाचा हक्क देण्यात यावा. दुसरं म्हणजे, किशोरवयीन मुलांना घटनात्मक सरंक्षण मिळवून द्यावं.

१६ वर्षांच्या मुलांना निर्णय प्रक्रियेत सामिल करून घेण्यासाठी त्यांना मतदानाचा हक्क प्रदान करावा, अशी मागणी जर्मनीत जोर धरत आहे. मीडिया रिपोर्टचा संदर्भ घेतल्यास असं लक्षात येईल की ही मागणी गेल्या सहा दशकापासून सुरू आहे. परंतु आता त्यावर निर्णायक तोडगा काढला जाईल, असे रिपोर्ट्स आहेत.

वाचा : कोलंबियात पोलिसांविरोधात हाहाकार का उडाला? 

वाचा:  का होतायत अण्टी कोरोना प्रोटेस्ट?

यूरोपमधील १६-१८ वयोगटातील युवकांची सामाजिक आकलन क्षमता वाढली आहे, शिवाय त्यांना आर्थिक स्वावलंबन व राजकीय भान प्राप्त झालं आहे, त्यामुळे त्यांना निर्णय प्रक्रियेत सामिल करून घ्यावं, अशा सूचना आहेत. त्यासाठी ग्रेटा थुनबर्ग आणि मलाला यूसुफजाई यांच्या अलौकिक क्षमतांचा दाखला दिला जात आहे.

कोरोना संकटकाळी किशोरवयीन गटांनी सूचनांचे पालन करत संयमित कृती कार्यक्रम राबविला. शिवाय कोरोना वॉरियर म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी दखलपात्र होती. हा घटक सामाजिक, राजकीय जीवनात अधिक सजग होऊन आपलं योगदान देत आहे, असं सांगितलं जात आहे. 

जर्मनीतील प्रतिष्ठित माध्यम समूह 'डायच्च वेले'ने यासंबंधी विशेष रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. त्यात म्हटलं आहे, एक तृतियांश युवकांचं म्हणणं आहे की, सामाजिक मुद्द्यावर ते सक्रिय आहेत आणि वेगवेगळ्या संघटनांसमवेत काम करतात. 

युवकांवर करण्यात आलेल्या 'शेल सर्वेक्षणा'त सामील १५ से २५ वयोगटातील ४० टक्के युवक राजकारणाला अविश्वासी मानतात. मात्र ६० टक्के युवक राजकीय विषय व निर्णय प्रक्रियेत रूची असल्याचं सांगतात.

वाचा : बेलारूसी तरुणांचा हुकूमशाहीविरोधात जयघोष

मतदानाचं वय कमी करण्याचे समर्थक म्हणतात, १६ वर्षाच्या वयात युवक राजकीय निर्णय घेण्यात समर्थ होतात. जर्मनीत १६व्या वयात युवक माध्यमिक शिक्षा म्हणजे दहावी पूर्ण करतात. त्यानंतर अनेक वोकेशनल ट्रेनिंग कोर्स करून बहुतेक नवयुवक-नवयुवती आर्थिक सक्षमीकरण प्राप्त करून घेतात.

मतदानाचे वय कमी करण्यासंबंधी अजून एक वेगळा तर्क दिला जात आहे, तो म्हणजे घटते वयोमान व लोकसंख्येत होणारे बदल. वृद्धांची संख्या वाढत असून निर्णय प्रक्रिया व कृती कार्यक्रमात त्यांचं योगदान नगण्य स्परूपाचं असतं. बहुतेक निर्णय वृद्धांच्या अनुषंगानेच घेतले जातात. परिणामी युवकांच्या भविष्यकालीन तरतूदीसंदर्भात फारसं काही घडत नाही. युवकांना निर्णय प्रक्रियेत सामिल करून घेतल्यास त्यांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून विचार केला जाईल, असाही विचार मांडला जात आहे.

अजून एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेत आहे; तो म्हणजे वोकेशनल ट्रेनिंग किंवा नोकरी करणारे नवयुवक टॅक्स भरतात, त्यामुळे सरकारी निर्णय प्रक्रियेत त्यांना वाटा मिळणे त्यांचा अधिकार आहे. बहुतेक अभ्यासक मानतात की, किशोरवयीन मुलांना मतदार केल्यास राजकारण प्रभावित होईल व राजकीय नेते त्यांच्या प्रश्नांवर लक्ष देतील. 

याशिवाय अजून बरेचसे तर्क व मुद्दे देण्यात आलेले आहेत. त्यानुसार राजकीय. समज वाढेल, विशिष्ट राजकीय मतप्रणाली तयार होईल, स्कूल संपताच त्यांना समाजाच्या कनेक्टिवीटीद्वारे व्यावहारिक ज्ञान मिळू शकेल. त्यातून जबाबदार नागरिक बनण्याची प्रक्रियेला गती येईल व या सर्वांमधून लोकशाहीला बळकटी मिळू शकेल.

दुसरीकडे लहान मुलांना मतदानाचा हक्क कदापि मिळता कामा नये, असा विचारप्रवाहदेखील कार्यरत आहे. या वयोगटातील युवक अनुकरण व प्रभावातून निर्णय घेतात व कृती करतात, असं या विश्लेषकांचं म्हणणं आहे. 

या वयात त्यांची बौद्धिक कुवत विकसित होत नाही, पालकांच्या व गॉडफादरच्या मदतीने असे युवक पटकन प्रसिद्धीझोतात येतात व तात्काळ प्रभावातून बेदखलही होतात, असंही टीकाकार म्हणत आहेत.

संविधानिक सरंक्षण

कोरोना संक्रमणाच्या काळात किशोरवयीन व बाल हक्कांकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाल्याची आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे मुलांचे हक्क संरक्षित देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 'डायच्च वेले' या माध्यम समूहाने यावर स्पेशल फिचर लिहून कव्हरेज दिलं आहे. त्याचा आधार घेतल्यास असं दिसून येतं की कोरोना संकटकाळात जर्मनीतील किशोरवयीन मुलांवर मोठा परिणाम झाला आहे. 

एका सर्वेक्षणातून ७२ टक्के पालकांनी बाल हक्कांची बेदखल झाल्याची कबुली दिली आहे. या धक्कादायक आकडेवारीनंतर जर्मनीच्या केंद्रीय कायदा मंत्र्यांनी लहान व किशोरवयीन बालकांच्या हक्कांना राज्य घटनेत स्थान देण्याची मागणी केली आहे.

प्रस्तावित बदलानुसार बालके व किशोरवयीन मुलांना संरंक्षण पुरवण्यासाठी सरकार त्यांचा ताबा घेऊ शकेल. मीडिया रिपोर्ट्स सांगतात की, 2019 मध्ये सरकारी विभागाने मुलांच्या सुरक्षेसाठी ४५ हजारापेक्षा अधिक प्रयत्न केले आहेत. 

वाचा : कोरोना आणि वाढते कौटुंबिक अत्याचार 

वाचा : इराणने अ‍ॅथलीट नवीदला का दिली फाशी ?

सरकारी संरक्षणात घेतलं गेलेलं प्रत्येक तिसरं मूल १२पेक्षा कमी वयाचं होतं. शिवाय प्रत्येक १०व्या मुलाचं वय ३ वर्षे होतं. मुलांची योग्य काळजी न वाहणे, हे ताब्यात घेण्याचं प्रमुख कारण होतं.

रिपोर्ट्स सांगतात की, यातले १७ टक्के पालक जर्मनीत शरणार्थी म्हणून आलेले आहेत. तर १४ टक्के कुटुंबात मुलांना योग्य देखभाल मिळत नव्हती. कोरोना काळात घरातील तणावाच्या वातावरणामुळे अनेक मुलं बेदखल झाली, असं सरकारी अहवाल सांगतो. २० टक्के मुलांनी विविध सरकारी स्वत:हून मदत मागितली होती. यातले पन्नास टक्के मुलं घरी परतली तर उरलेल्यांची पर्यायी व्यवस्था केली गेली.

पाश्चात्य देशात कोरोना काळात विविध कारणामुळे महिला व तरुणांना वेगवेगळ्या मानसिक आजारांना सामोरं जावं लागलं, असे रिपोर्ट प्रसिद्ध झाले आहेत. लहान मुलांवरदेखील संक्रमित काळात पालकांच्या गैरवर्तनामुळे विघातकी परिणाम दिसून आले आहेत. एका सर्वेक्षणातून जगभरातील तब्बल ८० टक्के पालकांनी मुलांशी अभद्र व्यवहार केल्याची कबुली दिली आहे.

बेरोजगारी, आर्थिक चणचण, कौटुंबिक ताण-तणाव, बंद पडलेले शिक्षण, चिडचिड, हिंसा व मारामारीमुळे सर्वच वयोगटातील घटकावर परिणाम झाले. परंतु पूर्णपणे पालकावर अवलंबित्व असणारे लहान मुले, बालके, किशोरवयीन व तरुणांना अधिक मानसिक आघात झेलावे लागले. विविध देशातली अशी आकडेवारी रोजच प्रसिद्ध होत आहे. पण त्याचं पुढे काय करायचं हे ठरवलं जात नाही.

जर्मन सरकारने मात्र सकारात्मक निर्णय घेतला आहे. किशोरवयीन मुलं व बालकांना आर्थिक, सामाजिक व मानसिक सरंक्षण देणारे घटनात्मक हक्क तयार करण्यात येणार आहेत. 

वाचा अफगाणिस्तानात स्वस्त व्हेटिलेंटर्स बनविणाऱ्या मुलींची गोष्ट

डायच्च वेलेच्या मते नवा प्रस्तावित कायदा १५ ते २७ वयोगटातील १५ लाख युवक-युवतींना सरंक्षण मिळवून देईल. घटस्फोट, कौटुंबिक हिंसा अन्य तत्सम तणावाच्या परिस्थितीतून पोलीस, न्यायालये, कौन्सिलिंग सेंटरच्या माध्यामातून युवकांना मानसिक आधार प्राप्त करून दिला जाईल. बाल आणि युवा गृहात राहणाऱ्यांना १८ वर्षांनंतरही आर्थिक मदत मिळू शकेल.

जर्मन सरकारचे उपरोक्त दोन निर्णय सकारात्मक आहेत. पण त्याच्या अंलबजावणीत त्याचे यश दडले आहे. नव-युवकांना निर्णय प्रक्रियेत सामिल करून घेणे, हा आशादायक प्रयत्न ठरेल. त्यातून एक व्यावहारिक व नॉलेज सोसायटी तयार होण्यास मदत होईल. परंतु त्यावर अपेक्षांचे ओझं लादता कामा नये. दूसरा निर्णय किशोरवयीन मुलांना सरंक्षण देऊन त्यांना परावलंबित्वापासून मुक्त करेल व एक तणावमुक्त, स्वछंद व निरागस जगण्याची भेट देऊ शकेल.

(सदरील लेख लोकमतच्या २४ सप्टेंबर २०२०च्या अंकात प्रकाशित झालेला आहे)

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,38,किताब,25,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,302,व्यक्ती,23,संकलन,65,समाज,265,साहित्य,80,सिनेमा,22,हिंदी,54,
ltr
item
नजरिया: जर्मनीत तरुणांना संविधानिक संरक्षण
जर्मनीत तरुणांना संविधानिक संरक्षण
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjXXd31ywpiPi8nBYBIpLKEvcaIaRCaz8o1BszUdolNplnyfNctpjZmzToEWXb6HFQeJiv1fYd_WdceEVvCcdez1SMO2SwY2Rsy42k3GfV2oGtrDTYje_ZM7lN7P4nHmV3an-BKBuZ2Vnv0/w640-h360/Germony+Youth.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjXXd31ywpiPi8nBYBIpLKEvcaIaRCaz8o1BszUdolNplnyfNctpjZmzToEWXb6HFQeJiv1fYd_WdceEVvCcdez1SMO2SwY2Rsy42k3GfV2oGtrDTYje_ZM7lN7P4nHmV3an-BKBuZ2Vnv0/s72-w640-c-h360/Germony+Youth.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2020/09/blog-post_25.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2020/09/blog-post_25.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content