गेल्या तीन महिन्यांपासून फ्रान्समधले तरुण जगभरात चर्चेचा विषय ठरले आहेत. डिसेंबर महिन्यात एकीकडे जगातील सर्व तरुणाई न्यू इअर सेलिब्रेशनच्या तयारीत व्यस्त होती. तर दुसरीकडे त्याचवेळी फ्रान्समधले तरुण इमॅनूअल मेक्रॉ सरकारच्या निर्णयाविरोधात रस्ते जाम करीत होते. पिवळे जॅकेट परिधान केलेल्या हजारो तरुणांनी संपूर्ण पॅरीस शहर वेठीस धरलं होतं. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि कररचनेतील वाढीविरोधात हे आंदोलन होतं.
नोव्हेंरबला सुरू झालेलं हे आंदोलन डिसेंबर येता रौद्र रुप धारण करून गेलं. हळूहळू करत फ्रान्सची जनता एकजुटता दाखवत सरकारविरोधात रस्त्यावर उतरली. आंदोलनामुळे रस्ते, शाळा, महाविद्यालये, व्यावसायिक प्रतिष्ठान, शॉपिंग मॉल सगळी बंद झाली. एकवेळ परिस्थिती अशी आली की सरकार आणीबाणी जाहिर करण्याच्या तयारीत होतं. फ्रेंच जनता सरकारला वेठीस धरून जाचक निर्णय मागे घेण्याची मागणी करीत होती. पण सरकार काही मागे हटायला तयार नव्हतं. परिणामी जनतेचा आक्रोश वाढत राहिला व ‘यलो जॅकेट मूवमेंट’ आकाराला आली.
वाचा : दक्षिण कोरियाची 'एस्केप द कॉर्सेट' मोहीम
वाचा : क्राउन अॅक्ट : वर्णभेदी हिंसाविरोधात अमेरिकेचे पाऊल
ऑक्टोबरला चेंज ओआरजीवर इंधन दरवाढीविरोधात एक निवेदन आलं. सामाजिक कार्यकर्त्या सीन-एट-मर्ने यांनी हे निवेदन पोस्ट केलं होतं. तब्बल ३ लाख लोकांनी या याचिकेवर सह्या केल्या. कुणीतरी हे निवेदन सोशल मीडियावर शेअर करीत म्हटले की १७ नोव्हेबरला देशभरातील सर्व रस्ते बंद करून विरोध प्रदर्शन करावे. हा मेसेज व्हायरल झाला. आवाहनानंतर काहीजण ट्रॅफिक पोलीस वापरत असलेला पिवळा रेडियम जॅकेट घालून रस्त्यावर उतरले. लोकांचे लक्ष आपल्याकडे वळावे यासाठी पिवळा जॅकेट घालण्यात आलं. हा जॅकेट लांबून चमकत असल्याने तो सहज लोकांचे लक्ष वेधून घेत होता. लक्ष वेधण्याची ही शक्कल कामाला आली व आंदोलनाची व्याप्ती देशभरात वाढली.
२००८च्या एका कायद्यानुसार प्रत्येक वाहनधारकांना आपल्या गाडीत हे जॅकेट ठेवणे अनिवार्य करण्यात आलं आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हे जॅकेट कंम्पलसरी करण्यात आलं आहे. कारण रस्त्यावर गाडी खराब झाली की हा जॅकेट घालून बाहेर पडावं लागतं. गेल्या काही विरोधी आंदोलनात हा जॅकेट सांकेतिक पद्धतीने घालण्यात आला होता. पण यावेळी हा जॅकेट मोठ्या आंदोलनाचा सिम्बॉल झाला. तब्बल ८४ हजार आंदोलकांनी यलो वेस्ट परिधान करून सरकारच्या नाकी नऊ आणले. तज्ज्ञांच्या मते गेल्या ५० वर्षांत फ्रान्समध्ये अशा प्रकारचे आंदोलन झालेलं नाही. १८७१ सालच्य़ा पॅरीस कम्यूननंतर १९६८ साली विद्यार्थ्यांनी जाचक नियमाविरोधात अशाच प्रकारचे आंदोलन फ्रान्समध्ये केलेलं होतं. ज्याने आजही जगाच्या इतिहासात मोठी जागा पटकावलेली आहे.
फ्रान्समध्ये सध्या डिझेलचा दर १२१ रुपये प्रतिलिटर आहे. गेल्या वर्षांच्या तुलनेत ही किंमत तब्बल २३ टक्क्यांनी वाढली आहे. या व्यतिरिक्त विविध प्रकारच्या कररचना वाढल्याने लोकांची सॅलरी मोठ्या प्रमाणात कपात होणार आहे. तसेच पेन्शनधारकांचेसुद्धा हाल होणार आहेत. फ्रेंच जनतेने या धोरणांचा तीव्र विरोध केला. राष्ट्रपती इमॅनूअल मेक्रॉ सरकारच्या या जाचक धोरणाविरोधात जनता संघटित झाली. त्यातून ‘यलो वेस्ट’ मूवमेंट आकाराला आली.
वाचा : अमेरिकेची खासदार का बनली बारटेंडर?
वाचा : कॅनडात सेक्युलर विधेयकाचा वाद
यलो वेस्ट आंदोलनाची नियोजनपूर्वक तयारी करण्यात आली होती. आंदोलकांना प्रशिक्षण देऊन त्यांना रस्त्यावर आणले गेले होते. अश्रूधुर, पाण्य़ाचा मारा, रबराच्या गोळ्या आदींपासून बचाव करण्यासाठी विषेश ट्रेनिंग दिली गेली होती. अनेक आंदोलकांनी डोक्यावर हेल्मेट व चेहऱ्यावर स्टोल वापरला होता. इतकेच नाही तर प्रत्येकांनी हातात जे येईल ती वस्तू हत्यार म्हणून वापरली होती. संपूर्ण पॅरीसच्या जनतेचा राग इतका होता की दरवाढ मागे घ्यावी या मागणीसह सरकारने जनतेची माफीदेखील मागावी, जनता अशा हट्टाला पेटली होती.
राष्ट्रपती इमॅनूअल मेक्रॉ यांनी संवादासाठी आंदोलकांना बोलावलं. पण आंदोलकांनी संवाद करण्यास नकार दिला. आधी दरवाढ मागे घ्यावी त्यानंतर संवाद होईल, असा पावित्रा आंदोलकांनी घेतला होता. सरकारने विविध प्रकारे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला, फ्रेंच जनता संघटित राहिली. या आंदोलनात १० लोकांचा मृत्यू झाला असून १८ हजार लोकं जखमी झालेली आहेत. तर ५ हजार पेक्षा जास्त आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तर या विरोधी आंदोलनामुळे फ्रेंच सरकारचे १७ अब्ज डॉलर म्हणजे १.१९ लाख कोटींचे नुकसान झालेलं आहे. बघता-बघता यलो जॅकेट मूवमेंट शेजारी राष्ट्रात पोहोचली. वाढत्या महागाईविरोधात इटली, बेल्जियम आणि नेदरलैँडमध्ये विरोधी आंदोलनं सुरू झाली. पण ती यशस्वी होऊ शकली नाही.
फ्रान्समध्ये काही तरुणांनी एकत्र येऊन हा मोठा लढा उभा केलेला आहें. २०१८च्या इतिहासात जगातली सर्वांत मोठी लोकचळवळ म्हणून गणली जात आहे. २०१० साली डिसेंबरमध्ये ‘अरब स्प्रिंग’ घडलं. महागाईविरोधात उडालेला हा भडका इजिप्त, लीबिया, अल्जेरिया, ट्युनिशिया, मोरोक्को, सुडान या सहा राष्ट्रामध्ये सत्ता हलवून गेला. योगायोग म्हणजे गेल्या १७ डिसेंबरला अरब स्प्रिंगला ९ वर्षे झालेली आहेत. सोशल मीडियातून उभारी घेतलेलं हे गेल्या दशकातले सर्वांत मोठं आंदोलन होतं. चालू दशकाच्या फ्रान्सच्या यलो वेस्ट मूवमेंटनं यात भर घातली आहे.
इंटरनेटच्या लोव्हर्च्युअल जगतात लाईक कमेंटीत व्यस्त राहणाऱ्या तरुणांनी बेसिक प्रश्नांसाठी मोठा लढा उभा केलेली ही दोन उदाहरणे आहेत. ‘यलो वेस्ट’ आंदोलनाची व्याप्ती इतकी होती की फ्रान्स सरकारला अखेर नमतं घ्यावं लागलं. यलो वेस्टची ही एक छोटीशी ठिणगी फ्रान्सची सत्ता धोक्यात आणण्यासाठी पुरेसी होती. मेक्रॉ सरकारने हा धोका लक्षात घेऊन येत्या काळात अशा प्रकारची कुठलीच आंदोलनं उभी राहू नये याची दक्षता घेतली आहे. त्यासाठी फ्रान्स सरकार कडक कायदा करण्याच्या तयारीत आहे. सरकारच्या परवानगीशिवाय कुठलेही आंदोलन केले तर संघटकांना कडक शिक्षेची तरतूद करण्यात येणार आहे.
(हा लेख लोकमतच्या ऑक्सीजनमध्ये 31 जानेवारी 2019ला प्रकाशित झालेला आहे.)

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com