मंगोलिया ते लंडन अशा १४ देशांच्या ट्रिपवर बायगेल्माचा काफिला आहे. तीन वर्षे चालणाऱ्या या सफरीचा मार्ग खडतर आहे. व्हिसा, स्थानिक प्रशासनाची संमती, भौगोलिक अडचणींवर मात करत वर्षभरापासून तिचा प्रवास सुरू आहे. तिच्या या धाडसी प्रयोगामुळे ती जगभरातील मंगोलीयन लोकांत प्रसिद्ध झाली आहे. तिच्य़ावर अनेक मीडिया संस्थावी स्पेशल स्टोरी प्रकाशित केलेल्या आहेत. तसेच तिच्या या थरारक सफऱींवर फिल्मदेखील बनविल्या जात आहेत.
बायगेल्माच्या या प्रवासाची कथा फारच रोचक आहे. एका हौशी व निसर्गप्रेमी कुटुंबात तिचा जन्म झाला. ती गेल्या १० वर्षांपासून पर्यटन व्यवसायात सक्रीय आहे. तिची स्वतःची ‘ऑफ रोड मंगोलिया’ नावाची टूर एजन्सी आहे. पर्वतारोहण करणे तिचा आवडीचा छंद. तिने संपूर्ण मंगोलियाच्या टेकड्या फिरून पालथ्या घातल्या आहेत. देशातील जवळजवळ सर्व शिखरावर चढण्याचा तिने विक्रम केला आहे. याच छंदापायी तिने माउंटनियरिंगची डिग्री मिळवली आहे.
2010 साली तिला ऑस्ट्रेलियातील टीम कॉपबद्दल समजलं. तो मंगोलिया ते हंगेरी घोड्यावरून यात्रा करत होता. तिलाही असंच काहीतरी करायचं सूचलं. तिने विचार केला की 'हे धाडसी काम जर एखादा परदेशी हे करू शकत असेल तर मी का नाही, मी तर मंगोलीयन आहे.' लागलीच तिने प्रवासाची आखणी केली.
ही ड्रीम कल्पना ज्यावेळी तिने आपल्या मित्रांना सांगितली त्यावेळी तेही तिच्यासोबत सफरीवर येण्यास तयार झाले. सर्वांनी मिळून मंगोलिया ते लंडन अशा 14 देशांच्या प्रवासाची आखणी केली. या प्रवासातून युरोप, तुर्की आशिया खंडातून जाणाऱ्या सिल्क रुटचा शोध त्यांना घ्यायचा आहे. कारण याच रस्त्यावरून प्राचीन काळी त्यांचे मंगोल पूर्वज उंटावरून जगाच्या सफरीवर निघाले होते.
5 नोव्हेंबर 2017ला तिचा प्रत्यक्ष प्रवास सुरू झाला. 10 उंटासोबत त्यांच्या 'स्टेप्स टू द वेस्ट' या कारवाँने लंडनमार्गे कूच केली. सुरुवातीला 7 मित्र या ऐतिहासिक ट्रीपमध्ये होते. पण तीनच महिन्यात गोठणाऱ्या थंडीला घाबरून दोघेजण मंगोलला परतले. उरलेल्या 4 मित्रांनी बायगेल्माची संगत सोडली नाही. मंगोलियातून बर्फाळ आणि वाळवंटी प्रदेशातून प्रवास करत लंडनला पोहोचणे एक आव्हान होतं ते या मित्रांनी स्वीकारलं.
मायनस 58 डिग्री सेल्सियस अशी जीवघेण्या थंडीत हा काफिला वर्षभरापासून अविरतपणे चालत आहे. तिने प्रवासासाठी घोडे न निवडता उंट का निवडले? या प्रश्नांला तिने दिलेलं उत्तर भन्नाट आहे. ती म्हणते, “मंगोल घोड्यांच्या कथा जगाला माहीत आहेत. ते किती चपळ आणि साहसी होते. त्याची नोंद इतिहासात आढळते. पण मंगोल उंटाबद्दल फारसं कुणाला माहीत नाही. त्य़ामुळे मगोल उंटाची जगाला ओळख व्हावी म्हणून त्यांना प्रवासात सोबत घेतलं.” मंगोलियात घोड्याएवढेच उंटालादेखील महत्व आहे. देशातील 60 दशलक्ष पशुधनात तब्बल 0.7 टक्के उंट आहेत.
उंटाबद्दल बोलताना ती म्हणते, “बऱ्याच लोकांना वाटते की, गाडी चालविण्याइतका हा प्रवास सोपा आहे. पण प्रत्यक्षात जास्त वेळ घेणारा, जास्त जोखीम असलेला ही ट्रीप आहे. सोबत उंट असल्याने त्यांची देखरेख करणे, त्यांना वेळीच खायला देणे, बर्फाळ प्रदेशात पाणी शोधून त्यांना पाजणे, त्यांच्या आरोग्यावर सतत लक्ष देणे इत्यादी बाबींवर लक्ष द्यावे लागते. उंट दररोज फक्त 30 किलोमीटर चालतात. बर्फाळ प्रदेशातून चालणे त्यांच्यासाठी खूप त्रासदायक काम आहे. त्यांच्या वेदना कमी करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या तेलाने मालिश करावे लागते. मी थकले तरीसुद्धा त्यांच्या गरजा पूर्ण करणे माझ्यासाठी आवश्यक आहे.”
मंगोलियन योध्यांप्रमाणेच तिचा हा थरारक प्रवास जारी आहे. या रोमांचक प्रवासाचे अनेक व्हिडिओ किस्से ‘Steppes to the West’ या यूट्यूब चॅनेलला बघायला मिळतील. या व्हिडिओतून त्यांच्या प्रवासाच्या आंखोदेखा हाल पाहता येऊ शकतो.
आत्तापर्यंत या चमूने चीन आणि कझाकिस्तान राष्ट्रे पार केली आहेत. पुढे ती उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तानमध्ये प्रस्थान करणार आहे. नेव्हिगेशन मॅप टूर गाईड म्हणून त्यांचा आधार झाला आहे. एका मुलाखतीत ती या थरारक प्रवासाबद्दल सांगताना म्हणते, "मी माझ्या लोकांच्या इतिहासापासून प्रेरणा घेतली आहे. जगभरात मंगोलियन लोकांचा प्रभाव राहिलेला आहे. प्रतिकूल परिस्थितीत केवळ जिद्दीपोटी मंगोलियन लोकांनी मोठी आव्हाने स्वीकारलेली आहेत. मला तर सर्व सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. मी आता प्रवासाला लागले आहे, माझी सफर खरोखरच रोमांचक व मनोरंजक आहे."
तिला प्रत्येक ठिकाणी स्थानिक लोकांची मदत मिळते आहे. लोकांचा प्रतिसाद बघता बायगेल्माचा उत्साह वाढला आहे. मंगोल हा भटका समुदाय मानला जातो. मंगोलिया त्य़ांचा देश. जगभरात १ कोटी मंगोल जातीचे लोकं पसरले आहेत. या अद्भूत सफऱीत मंगोल देशाची पारंपरिक वेशभूषा साकारत ती मार्गस्थ झाली आहे. या ट्रीपमधून तिला मंगोलीयाचा सांस्कृतिक वारसा जगाला सांगायचा आहे. बायगेल्माचा हा धाडसी प्रवास यशस्वी झाला तर ती उंटाने एवढा दीर्घ प्रवास करणारी इतिहासातील एकमेव स्त्री पर्यटक ठरेल.
(हा लेख लोकमतच्या ऑक्सीजनमध्ये 13 जून 2019ला प्रकाशित झालेला आहे.)

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com