जगप्रसिद्ध ‘टाईम मॅगझीन’ने यंदा ‘पर्सन ऑफ द इअर’ म्हणून व्यक्तीला नव्हे तर एका कॅम्पेनला जागा दिली आहे. लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवणाऱ्या महिलांच्या सोशल मीडिया कॅम्पेनला टाईमने ‘पर्सन ऑफ द इअर’ घोषित केलं आहे. या अभियानात सामील होणाऱ्या निवडक पाच महिलांना टाईमने मॅगझिनच्या कव्हर पेजवर जागा दिली आहे.
या धाडसी स्त्रीयांना टाईमने ‘द साइलेंस ब्रेकर्स’ म्हणजे शांतता मोडणाऱ्या धाडसी महिला म्हणून गौरवलं आहे. आपल्या कव्हर स्टोरीत टाईमने लैगिक शोषमाविरोधात वाचा फोडमाऱ्या महिला-पुरुषांच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. टाईमने ‘मी टू’ कॅम्पेनला दिलेला सन्मान जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. एका अर्थाने टाईमने यातून लौंगिक शोषणाला बळी पडलेल्या सर्वच वयोगटातील स्त्री-पुरुषांना मानसिक आधार दिला आहे.
वाचा : सन्मान #MeToo कॅम्पेनचा
वाचा : ब्राझीलमध्ये महिला जर्नलिस्टचा का होतोय लैंगिक छळ?
ऑक्टोबरमध्ये हॉलीवूडमधील एका सेलिब्रिटी नटीने प्रसिद्ध फिल्म प्रोड्यसूरवर बलात्काराचा आरोप केला होता. या घटनेनं सबंध हॉलीवूड हादरलं होतं. ‘एशले जड’ या अभिनेत्रीने ‘हार्वी वाइन्सटाइन’ नावाच्या ऑस्कर विनर प्रोड्यूसरवर लैंगिक शोषणाचे एका पाठोपाठ अनेक आरोप केले. या सेलिब्रिटी सेक्स स्कैंडल’च्या बातमीने जगभरात एकच हाहाकार माजला.
एशले नंतर अनेक अभिनेत्रींनी वाइन्सटाइनने अनेकदा लैंगिक शोषण केल्याचे आरोप लावले. या फिल्ममेकरने
अनेक नट्यांना कामाच्या बदल्यात शरिरसुखाची मागणी केल्याच्या तक्रारीचा पाऊस पडत
होता. भारतातून अभिनेत्री ऐश्वर्या रॉयनेदेखील वाइन्सटाइनने ‘तशी’ मागणी केल्याचा
खुलासा केला.
जगभरातून वाइन्सटाइन यांच्यावर कारवाईची मागणी होऊ लागली. #MeToo हैशटॅग वापरुन वाइन्सटाइनविरोधात एक मोहीम सुरु करण्यात आली. अक्ट्रेस अलिसा मिलानो हीदेखील वाइन्सटाइनच्या अत्याचाराला बळी पडली होती. तिने #MeToo पहिला मेसेज प्रसारित केला.
ज्यांच्यावर लैंगिक हल्ला झाला त्यांनी #MeToo नावाने रिप्लाई
करावं असा आशयाचा एक ट्विट अलिसाने 15 ऑक्टोबरला केला. या ट्विटला बघता-बघता एका
दिवसात 2 लाख रिट्विट झाले. दोन दिवसात तब्बल 5 लोख लोकांनी #MeToo म्हणून रिप्लाई केला. असंच फेसबुकला झालं. फेसबुकवर 24 तासात 47 लाख
लोकांनी #MeTooच्या एक कोटी 20 लाख पोस्ट टाकल्या. काहीच
अवधीत ही मोहीम इतर देशात पसरली. या हैशटॅग अंर्तगत अनेक मुलींनी आपल्यासोबत
झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या कथा मांडायला सुरुवात केली.
सुरुवातीला पुरुषांनी या मुलींना ट्रोल केलं. खाजगीपणा चव्हाट्यावर आणी नका म्हणून टीका करायला सुरुवात केली. पण शोषितांच्या बाजुने बोलणाऱ्यांची संख्या मोठ्य़ा प्रमाणात वाढतच होती. हळुहळू पुरुषही या मोहीमेत सामील झाले व त्यांनीही आपल्यासोबत झालेल्या लैंगिक अत्याचाराला वाचा फोडली.
सबंध दोन महिने ‘मी टू’ मोहीमेअंतर्गत लैंगिक अत्याचारावर
मोकळेपणाने बोलू लागले. पोलिसांनी तक्री दाखल करुन गेतल्या. काहींना अटकही झाली. भारतात
अनेक सोशल मीडिया सेलिब्रीटींनी आपली व्यथा मांडली. बॉलीवूडमधील अनेक तक्रारी मी
टू अंतर्गत बाहेर आल्या. भारतात विषेश म्हणजे मेल व फीमेल दोन्हीकडून तक्रारींचा
पाऊस पडत होता.
वाचा : कोरोना आणि वाढते कौटुंबिक अत्याचार
बॉलीवूडला मुलींचे लैंगिक शोषण काही नवं नाहीये, मागे अनेकदा नामवंत निर्माता-दिग्दर्शकांवर लैंगिक शोषणाचे आरोप लागले आहेत. अन्नू मलिक, मधूर भांडारकर, शक्ती कपूर, अमन वर्मा, आदित्य पांचोली, ऋतिक रोशन यांच्यावर असे आरोप लागले आहेत, काहीचे खटले अजूनही कोर्टात सुरु आहेत.
अभिनेत्री कंगना राणावतने जाहीरपणे ऋतिकचे नाव घेऊन प्रेमात
दगा केल्याच आरोप केला. नुकतंच अभिनेता इरफान खानने आपल्या सोबत झालेल्या कास्टींग
काऊचबद्दल जाहीरपणे भूमिका मांडली आहे. विद्या बालनने एक आर्मी जवान तिच्या
छातीकडे टकटक बघत होता, असं विधान ‘प्रेस
मीट’मध्ये केलं या एका वाक्यामुळे ती आठवडाभर ट्रोल होत
होती.
‘मी टू’ अभियानामुळे अनेकांनी आपल्या घुसमटीला जागा करुन दिली. अनेक सामान्य मुलं-मुलींही या कॅम्पेनमध्ये सहभागी झाले होते. अनेकांनी धाडस करुन आपली धक्कादायक व्यथा मांडल्या. बीबीसीने सलग आऑवडाभर सिरीज करुन अनेकांच्या व्यथा मांडल्या आहेत. यात धक्कायादक बाब म्हणजे बहूतेक पीडित हे अल्पवयीन होते. अनेकांना ‘बॅड टच’ काय असतो हेदेखील माहिती नव्हते. तर अनेकजण आपल्यासोबत काय झाले हे देखील नीटसं सांगू शकत नव्हते.
30 नोव्हेबरला ‘मी टू’ व ‘बॅड टच’वर न्यूयॉर्क टाईम्सने एक लेख प्रकाशित
केलाय. यात लेखिका जेसिका बेनिट्टने काही मुलींचे अनुभव लिहले आहेत, ‘मी टू’ मुळे स्वप्नांचा चुराडा झाल्याचे अनेकांनी
म्हटलंय. काहीजणांना हॉस्पिटच्या बेडवर, घरातील बेडरुममध्ये तर काहींना शाळेच्या
गॅलरी व पायऱ्यावर ‘बॅड टच’चे विचित्र
अनुभव आल्याचे सांगितलं आहे.
वरील अनुभव मांडल्याने त्याची दाहकता कळत होती, पण असंख्य प्रकरणे अशी आहेत ती याहून जास्त धक्कादायक आहेत. केवळ त्याची कुठं नोंद झाली नाही म्हणून त्या घटना पडद्याआड झाल्या. अनेक लैंगिक शोषण व अत्याचाराच्या घटना पोलिसांच्या गुन्हे रजिस्टरपर्यंत पोहचतच नाही. 30 नोव्हेबरला नॅशनल रेकॉर्ड क्राइम ब्युरोची वार्षिक आकडेवारी जाहीर झाली. यात एक निरिक्षण धक्कादायक आहे, केवळ भितीपोटी अनेक गुन्हे नोंदवले जात नाहीत असं निरिक्षण एनसीआरबीने मांडलं आहे.
तसेच
2015च्या तुलनेत
2016 मध्ये महिला
अत्याचाराचे गुन्ह्यांत 3
टक्क्यांनी वाढ झाल्याची आकडेवारी एनसीआरबीने दिलीय. अजून धक्कादायक म्हणजे हे अत्याचार करणारे 94 टक्के
आरोपी हे जवळचे
नातेवाइक, शेजारी, परिचित
होते. या मुली व महिलांमध्ये
प्रत्यक्ष भेटून त्यांना बोलतं करुन ‘मी टू’ मोहीम राबवाली लागेल.
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com