रविवारी नायजेरियन युवकांनी पोलिसी अत्याचाराविरोधात भला मोठा मोर्चा काढला. तरुणांईच्या या आक्रोशाला जागतिक मीडियाने हवी तेवढी प्रसिद्धी दिली नाही. ऐतिहासिक परिणाम देणारी ही घटना छोटीशी स्टोरी झाली. पण सोशल मीडियावर याचा आवाका तपासल्यास या मोर्चाची व्याप्ती किती मोठी होती, हे सहज लक्षात येऊ शकते.
रविवारी राजधानी अबुजा आणि लागोस शहराच्या रस्त्यावर हजारों तरुण उतरले. जोरदार घोषणाबाजी करत पोलीस दलात सुधारणेची मागणी त्यांनी लावून धरली. आंदोलनाचे स्वरूप व व्याप्ती पाहता सरकारने तात्काळ प्रभावातून ३० वर्षे जुन्या स्पेशल पोलीस दलाला बरखास्त केले.
नायजेरियन नागरिकांसाठी पोलिसी क्रौर्य तसं नवं नाही. इथं आजही मोठ्या प्रमाणात टोळी समाज आहे. रोजगार, उदरनिर्वाह व सामाजिक समस्या याशिवाय त्यांचे अनेक प्रश्न आहेत. दारिद्र्य, अशिक्षा, संधीच्या असमानतेमुळे सरकारी यंत्रणेवर मोठा जनसमूह नाराज असतो.

वाचा : कोलंबियात पोलिसांविरोधात हाहाकार का उडाला? काय आहे प्रकरण?
आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मोठा असल्याने सामाजिक अपप्रवृत्ती वाढणे स्वाभाविक आहे. अशावेळी रोजगार व पायाभूत सुविधा पुरवण्याऐवजी सरकारने लोकांचे वर्तन-व्यवहार नियंत्रित करण्याची योजना काढली. त्यातून १९९२ साली ‘अँटी रॉबरी स्कॉड’ची (Sars) स्थापना केली.
सामाजिक तत्त्वाचा बंदोबस्त करण्यासाठी अतिरिक्त अधिकार या दलाला प्रदान करण्यात आले. पण झाले उलटेच. अतिरिक्त शक्तीमुळे पोलिसांनी सामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील केले.
या विशेष पोलीस पथकाविरोधात कारवाईच्या नावाने रस्तोरस्ती स्टॉप-अँड सर्च ऑपरेशन राबवणे. आरोपींचा क्रूरतेने छळ करणे. चोरीच्या आरोपावरून निरपराध तरुणांना उचलणे, अमानुष व निदर्यीपणे मारहाण करणे, उलटतपासणीत जीवघेणा उपचार करणे, रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना बळजबरी रोखत त्यांच्या मौल्यवान वस्तू काढून घेणे, अशा अनेक तक्रारी आहेत.
वॉशिग्टन पोस्ट म्हणते, अॅम्नेस्टी इंटरनेशनलने गेल्या तीन वर्षांतील पोलीस पथकाच्या क्रौर्याच्या घटनांचे दस्तऐवजीकरण केले आहे. ज्यात फाशी, मॉक फाशी, मारहाण, ठोसा आणि लाथ मारणे, सिगारेटीचे चटके देणे, वॉटरबोर्डिंग आणि इतर हिंसक डावपेचांचा समावेश होता. मीडिया रिपोर्ट सांगतात की, पोलीस कस्टडीत अनेक तरुणांचे बळी गेले आहेत.
नागरी हक्क संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि बुद्धिजीवी वर्गाने पोलीस दलाच्या अमानुषतेचा वारंवार निषेध केला आहे. त्यांच्या मते, पोलीस अधिकाऱ्यांनी छुप्या शक्तीचा गैरफायदा घेतला आणि लोकांना त्रस्त करून सोडले. तक्रार व पाठवुरावा करूनही पोलिसांच्या वर्तन-व्यवहारात कसलाही बदल झाला नाही. उलट चौकशीच्या नावाने अत्याचार आणखीन वाढले.
अखेर तरुणांनी एक येत पोलिसी अत्याचाराचा कायमचा बंदोबस्त करण्याचे ठरवले. सोशल मीडियाचा वापर करत नियोजनबद्ध आखणी केली गेली. लोकशाही पद्धतीने विरोध दर्शवला. त्यासाठी मोठी मोर्चेबांधणी केली. ही चळवळ दोन प्रकारे राबवली गेली. एकीकडे ऑनलाईन तर दुसरीकडे प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून.

सेलिब्रिटी बनले चेहेरे
नायजेरियन सेलिब्रिटींनी #EndSARS हॅशटॅग व्हायरल करण्यास मदत केली. पोलिसांच्या गैरवर्तनाविरोधातील प्रतिक्रिया सोशल मीडियावर संकलित करण्यात आल्या. पीडितांनी आपला छळ व दाहक अनुभव वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये शेअर केला. बघता-बघता यातनामय प्रतिक्रियांची रिघ लागली. अनेकांनी पोलिसांसोबतचे कटू अनुभव उघडपणे व्यक्त केले. त्यातून आकार घेतले ‘एण्ड सार्स’सारखे भले मोठे अभियान.
दि गार्डियन म्हणते, अनेक सेलिब्रिटी या आंदोलनाचे चेहेरे होते. त्यात फुटबॉलर मार्कुस रशफोर्ड आणि अभिनेता जॉन बोयगा ही मोठी नावे. आपल्या लोकप्रियतेच्या जोरावर त्यांनी पोलिसी क्रौर्याविरोधात जनचळवळ उभी केली. त्यांच्या अपीलला मोठा प्रतिसाद लाभला.
प्रत्यक्ष रस्त्यावर उतरणाऱ्यांची संख्यादेखील लक्षणीय होती. शनिवार-रविवारी देशभर झालेल्या या आंदोलनात २० ते ३० वयोगटातील शेकडों तरुणांनी सहभाग नोंदवला. शिवाय अनेक युवतींनीदेखील या मोहिमेला प्रतिसाद दिला. शहरा-शहरात ठिकठिकाणी तरुणांईचे लोंढे रस्त्यावर आले.
शनिवारी लागोसमधील सरकारी इमारतीच्या बाहेर शेकडो निदर्शकांनी तळ ठोकला. त्यांच्या हातात ‘आता सर्व संपेल’, असे बोर्ड होते. निदर्शकांनी राजधानी अबूजा येथे पोलीस पथकाचे मुख्यालय घेरले आणि हिंसाचाराचे प्रतीक म्हणून रस्त्यावर लाल रंग ओतला.
मोर्चात सामिल झालेला २६ वर्षीय ओनोला म्हणतो, “प्रथम ती सार्स आहे आणि मग ती संपूर्ण पोलिस यंत्रणा आहे, त्यांच्या क्रूर वर्तनात सामान्य पोलीस आणि स्त्रियासुद्धा सुरक्षित नाहीत.” पुढे तो म्हणतो,
“हे (आंदोलन) फक्त सार्सबद्दलच नाही, तर पोलिसांच्या पाशवीपणाच्या समाप्तीविषयी आहे. बदल होईपर्यंत आम्ही थांबणार नाहीत. इथेच लोक नव्हे तर जागतिक पातळीवर सर्वजण वैतागले आहेत.”
पोलिसांनी ही निषेध चळवळ नियमितपणे दडपण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना त्यात यश आले नाही. कारण आंदोलनांची व्याप्ती मोठी होती. सुरक्षा दलाने निदर्शकांना धोकादायक ठरवले. वॉशिग्टन पोस्टच्या मते, पोलिसांनी निदर्शकांना पागंवण्यासाठी विरोधात अश्रूधूर व पाण्याचा मारा केला.

वाचा : इराणने अॅथलीट नवीदला का दिली फाशी ?
सार्स युनिटशी झालेल्या चकमकीनंतर अनेकांनी सोशल मीडियावर वीडियो पोस्ट केले आहेत. त्यात एकजण म्हणतो, “जवळजवळ मी जीव गमावला होता.” सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या अनेक वीडिओंमध्ये अधिकारी पळ काढून निदर्शकांना मारताना दिसत आहेत. एकात पोलिसाचा एक गट महिलेला लाठी-काठीने मारहाण करताना दिसत आहे.
गार्डियनच्या मते, निदर्शक आणि पोलिसात झालेल्या चकमकीत बरेचजण जखमी झाले. जखमींची श्रृशुषा करण्यासाठी अनेक डॉक्टर रस्त्यावर उभे होते. विविध भागात आंदोलकांसाठी पाणी व अन्नाचा पुरवठा करण्यात आला होता. शिवाय शेकडो वकिलांनी अटक केलेल्यांना कायदेशीर मदत उपलब्ध केली.
लागोसमधील शासकीय मुख्यालयाबाहेर उपस्थित असलेल्या रीनू ओडुआ नावाच्या महिला म्हणतात, "हे प्रेरणादायक आहे. कारण लोक जगभरातून पैसे, अन्न आणि सर्व दान देण्यासाठी बाहेर आले आहेत. मी आशावादी आहे कारण संपूर्ण जग आपल्याला पहात आहे.”
मोठ्या जनसर्थनामुळे आंदोलकांचा आत्मविश्वास बळावला. त्यांनी पोलिसांचा त्रास सोसला मात्र माघार घेतली नाही. अखेर प्रशासनाला विशेष दरोडा विरोधी पथकाला तातडीने बरखास्त करावे लागले. राजधानी अबुजाचे इन्स्पेक्टर जनरल मुहंमद आदमू यांनी या बाबत पुष्टी करत मीडियाला प्रतिक्रिया दिली.
ते म्हणतात, “नायजेरियन लोकांच्या तक्रारींना प्रतिसाद म्हणून नवीन उपाययोजना जाहीर केल्या जातील. सार्सचे अधिकारी इतर युनिटमध्ये वर्ग केले जातील आणि त्यांना बदलण्यासाठी लवकरच नवीन घोषणा केली जाईल.”
नायजेरियातील अॅम्नेस्टी इंटरनॅशनलचे संचालक ओसाई ओजीगो म्हणतात, “मानवी हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करुन त्यांना न्यायालयासमोर उभे करावे. त्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली पाहिजेत.”
अशा रितीने दोन आठवड्याच्या नायजेरियन तरुणाईंच्या आंदोलनाला यश येत तीन दशक जुन्या विशेष पोलीस पथकाचे अखेर विघटन झाले. त्याचा आनंदोत्सव इंटरनेट व गल्लीबोळात साजरा झाला. लोकांनी घरावर नायजेरियनचे झेंडे फडकावले. आत्मविश्वास व उत्तम नियोजनाच्या जोरावर नायजेरियन तरुणाईंने बलाढ्य, करप्ट आणि हिंसक झालेल्या पोलिसी यंत्रणांना शरण येण्यास भाग पाडले. नायजेरियन तरुणांचे सर्वात मोठे यश म्हणावे लागेल.
लाभले मोठे जनसमर्थन

(सदरील लेख १५ ऑक्टोबर २०२०च्या लोकमतच्या ऑक्सिजनमध्ये प्रकाशित झालेला आहे)
जाता जाता

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com