संतप्त झालेला जमाव व पोलिसात झालेल्या संघर्षात १० जण मारले गेले. या अमानूष हल्ल्याचा निषेध करत राजधानीत ठिकठिकाणी तीन दिवस पोलीस विरोधाचे मोर्चे निघाले.
दि गार्डियनने घटनाक्रमाचा तपशिल देत, पोलिसी अत्याचारावर टीका केली आहे. या रिपोर्टनुसार घटना बुधवारी पहाटे घडली. राजधानी बोगोटामध्ये भर रस्त्यात मद्य प्राशन करून गोंधळ घालणाऱ्या ऑर्डोनेझ नावाच्या एका विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली.
आरोपीला मारहाण करून स्टेशनकडे घेऊन जात असल्याचा एक वीडियो वायरल झाला. हा वीडियो ऑर्डोनेझच्या सोबत असलेल्या दुसऱ्या मित्राने तयार केला होता. वीडियोत पोलीस ऑर्डोनेझला बेदम मारहाण करत असल्याचे दिसते. मला दम लागतोय, चालता येत नाही, असे ऑर्डोनेझ म्हणतोय, पण पोलीस त्याच्या विनंतीकडे दुरल्क्ष करून त्याच्या इच्छेविरोधात फरफटत घेऊन जात आहेत.
वाचा : इराणने अॅथलीट नवीदला का दिली फाशी ?
वाचा : का होतायत अण्टी कोरोना प्रोटेस्ट?
न्यूयॉर्क टाइम्सच्या मते जखमी अवस्थेत त्याला हॉस्पिटलमध्ये अडमीट करण्यात आलं परंतु दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. बोगोटाचे प्रसिद्ध वृत्तपत्र एल एस्पेटाडोर म्हणते, कोठडीत असताना डोक्याला आदळल्याने ऑर्डोनेझचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच शहरातील व्हिला लूजमधील पोलीस स्टेशनबाहेर मृताचे मित्र व नातेवाईक, मानवी हक्क कार्यकर्त्यांची गर्दी झाली. दोषी पोलीस अधिकाऱ्याला अटक करावी, अशी मागणी केली गेली.
संतप्त झालेली तरुणाई सततच्या पोलिसी अत्याचारावर कायमचा तोडगा काढण्याची मागणी करत होती. चर्चेत पोलीस फारसा प्रतिसाद देत नसल्याचं लक्षात येताच जमावाने पोलिसांवर दगड आणि बाटल्या फेकल्या. स्टेशनच्या खिडक्यांवर हल्ला चढवला. काहींनी स्टेशनच्या काचा आणि वॉल पोस्टरवर स्प्रेची फवारणी करत निषेध नोंदवला.
बराच वेळ हा संघर्ष चालला. ऑर्डोनेझचे मित्र, नातेवाईक व संतप्त नागरिक दोषी पोलिसांवर तात्काळ कारवाईची मागणी करत होते. उत्तरादाखल पोलिसांनी टियर गॅस व लाठीहल्ला केला. वृत्तपत्राचे रिपोर्ट सांगतात की, या संघर्षात १५० आंदोलक व १७ पोलीस जखमी झाले.
पोलिसांच्या या कथित क्रौर्याची बातमी पसरताच बुधवारी रात्री बोगोटाच नव्हे तर मेडेलिन, पेरिडा आणि इबॅग या शहरांमध्येही पोलिस ठाण्यांवर आणि सार्वजनिक वाहतुकीवर हल्ले करत निदर्शक रस्त्यावर उतरले. जमावाने अनेक ठिकाणी तोडफोड केली.
दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी राजधानीत ठिकठिकाणी पोलिसी अत्याचाराविरोधात जोरदार निदर्शने झाली. जवळजवळ 300 निदर्शक पुन्हा पोलीस स्टेशनच्या बाहेर जमले. आंदोलक पोलिसांना अमानुष छळाचा जाब विचारत होते. तीन दिवसापर्यंत चाललेल्य़ा या संघर्षात एकूण १० जण मारले गेले. मीडिया रिपोर्ट सांगतात की, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आंदोलक मरण पावले आहेत.
वाचा : बेलारूसी तरुणांचा हुकूमशाहीविरोधात जयघोष
मीडियाला दिलेल्या प्रतिक्रियेत पोलिसांनी आपली बाजू मांडली. त्यांच्या मते फिजिकल डिस्टेन्सच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे कारवाई करावी लागली. अनेक मीडिया संस्थानी पोलिसांच्या या अमानवी वर्तनावर टीका केली आहे. आंदोलकांवर गोळीबार करणे, व्यक्तीच्या सुरक्षेशी दगा करणे असल्याचा आरोप मानवी हक्क संघटनांनी केला आहे.
कोलंबियन पोलिसावर अमानवीय व्यवहाराचा आरोप जुना आहे. रिपोर्ट सांगतात की, कृष्णवर्णीयाविरोधातील संघर्षातही पोलिसांची भूमिका शंकास्पद राहिलेली आहे. पोलिसांचे नागरिकाशी वर्तन क्रूर असल्याचा आरोप मानवी हक्क संघटना करत असतात. नेहमीच्या गैरवर्तनाला कंटाळून नागिरकांनी पोलिसी यंत्रणेविरोधात आंदोलनाचा पावित्रा घेतला.
ऑर्डोनेझच्या हत्येच्या निमित्ताने नागरिकांनी ठिकठिकाणी पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध केला. या निषेध आंदोलनात तरुणांची संख्या लक्षणीय होती. विशेष म्हणजे कृष्णवर्णीय तरुणांनी सरकार व पोलिसांवर कठोर शब्दात टीका केली. दी गार्डियनच्या मते आंदोलकांचा आक्रोश वातावरणात गांभीर्य आणणारा होता.
संतप्त जमाव पोलिसांच्या क्रूर शासनाविरोधात घोषणाबाजी करत होता. काहींनी संतप्त होत पोलिसांना अपशब्ददेखील वापरले, असे मीडिया रिपोर्ट आहेत. अल जझिराला दिलेल्या प्रतिक्रियेत एकजण म्हणतो, “आपण अजून किती मरणार आहोत. संरक्षण करणारे अधिकारीच आमची हत्या करीत आहेत! असे किती दिवस चालेल.”
मृतक ऑर्डोनेझच्या एका महिला नातेवाईकाने रॉयटरला दिलेल्या प्रतिक्रियेत थेट पोलिसावर हत्येचा आरोप केला आहे. ती म्हणते, “त्याचा खून पोलीस अधिकाऱ्यांनी केला आहे. आधीच कोरोना संघर्षाने त्रस्त असलेल्या देशात आम्हाला अजून मृत्यू नको आहेत, आम्हाला न्याय हवा आहे.”
सरकारी कर्मचारी लॉरा म्हणाली, "आम्ही पोलिसाकडून दंडात्मक कारवाईत मारले जात आहोत. रस्त्यावरुन जाताना लाच मागितली जाते. आमच्यावर त्यांची मालकी असल्यासारखे ते वागतात. आपण एका आजारी व्यवस्थेत जगत आहोत.”
शहराच्या पश्चिमेस, एन्टाटिवा परिसरातील निषेध आंदोलनात सामील झालेली एक तरुणी म्हणते, “पोलिसाच्या अत्याचारी वृत्तीत सुधारणांची खूप गरज आहे.” एबीसी चॅनेलवर प्रतिक्रिया देताना एक प्रौढ महिला म्हणते, “अशा वातावरणात मला माझ्या मुलांच्या भवितव्याची काळजी वाटते. या देशात न्याय मिळणार नाही अशा भावनांनी माझी मुलं मोठी व्हावी अशी माझी इच्छा नाही. माझ्या देशात कायदे पाळले जातात हे जाणून त्यांनी मोठे व्हावे असे मला वाटते.”
वाचा : लैंगिक अत्याचाराच्या विरोधात मैक्सिकोत महिला अदृष्य
वाचा : पर्यावरण बचावसाठी मेक्सिकोत 'नेकेड राईड'
१० आंदोलकाच्या मृत्युनंतर कोलंबियाचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जनतेचा आक्रोश पाहता संरक्षणमंत्र्यांनी पोलिसांच्या वतीने माफी मागितली आहे. शिवाय कठोर शासन करण्याची हमी देत दोन पोलिसांना बडतर्फ केलं.
दुसरीकडे राजधानी बोगोटाच्या महापौर क्लॉडिया लोपेझ यांनी पोलिसांच्या क्रौर्याला ‘अस्वीकार्य’ म्हणत हिंसाचाराचा निषेध केला. शुक्रवारी ट्विट करत त्यांनी लिहिलं, “हिंसाचारात दोषी आढळलेल्या पोलिसांची सुटका होणार नाही.”
ऑर्डोनेझच्या मृत्युनंतर कोलंबियात सार्वजनिक सुरक्षा किंवा पोलिसांवरील अविश्वासावर चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडिया व वृत्तपत्रात याविषयी टिपण लिहिले जात आहे. केवळ पोलिसच नाही तर सरकारवरही नागरिकांशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला जात आहे.
कोरोना रोगराईच्या काळात दक्षिण अमेरिका संकटाशी दोन हात करत आहे. अशा वातावरणात कृष्णवर्णीयांवरील हल्ले व पोलिसी अत्याचार कोरोनापेक्षा गंभीर मुद्दा म्हणून पुढे आला आहे. अशा वेळी प्रशासनाला दोन्ही आघाड्यावर निर्णायक भूमिका घेत कृती कार्यक्रम आखण्याची गरज आहे.

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com