इराणने जगभरातील आक्रोशाकडे दुर्लक्ष करीत अॅथलीट नवीदला अखेर फासावर चढवलं. आंतरराषट्रीय पातळीवर या घटनेचे पडसाद उमटले आहेत. या घटनेवरून आंतरराष्ट्रीय ओलंपिक समितिने निंदा केली आहे. २७ वर्षीय नवीद अफकारीच्या बचावासाठी जगभरात मोहीम सुरू झाली होती. सर्वांचे प्रयत्न अपयशी ठरले असून इराण सरकारने आपला हुकूमशाही हट्ट पूर्ण करण्याठी एका खेळाडूचा बळी घेतला आहे.
नवीदची फाशीची शिक्षा रद्द व्हावी, या मागणीसाठी जगभरात ‘सेव्ह नवीद’ मोहीम सुरू झाली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पसह अनेक मान्यवरांनी यात सहभाग नोंदवला होता. चेंज दि ओरजीवर आलेल्या पिटिशनवर सह्यांचा आकडा २० हजारच्या जवळपास पोहचला होता. शिवाय सोशल मीडियावरदेखील जगभरातील मानवी हक्क संघटना व नागरिक संघटित झाले होते.
नवीद अफकारी नावाच्या या २७ वर्षीय रेसलरवर हत्येच्या आरोप होता. देशातील लोकप्रिय कुस्तीपटू अशी त्याची ओळख आहे. इराणी अॅथलीट म्हणून त्यानं राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदके मिळवली आहेत. इराणमध्ये कुस्ती हा लोकप्रिय खेळ आहे. या खेळात अनेक तरुण व तरुणी प्राविण्य मिळवण्यासाठी सतत प्रयत्नरत असतात. नवीद अफकारी एक कोच म्हणूनही अशा नवख्या प्रशिक्षार्थींना ट्रेंड करत होता.
कोण आहे नवीद?
नवीद हा इराणचा सेलिब्रिटी अॅथलीट आहे. सप्टेंबर २०१८ला झालेल्या एका सरकारविरोधी निदर्शनात तो सामिल होता. बेरोजगारी, आर्थिक संकट आणि महागाईच्या विरोधात हे आंदोलन सुरू होतं. बीबीसीच्या मते देशभरात झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने तरुणांचा सहभाग होता. दक्षिण इराणमधील फारस प्रातांतील शिराज शहरात झालेल्या एका निषेध आंदोलनात नवीद आपल्या मित्रांसह सामिल झाला. आंदोलनस्थळी पोलीस व निदर्शकांत चकमक झाली. यात एका खासगी सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला.
पोलिसांचं म्हणणं आहे की, नवीदने चाकूने भोसकून ही हत्या केली. मयत वाटर कंपनीत सिक्युरिटी गार्ड असून त्याचे नाव हसन तुर्कमान आहे. फॉक्स न्यूजच्या मते सरकारविरोधी षडयंत्रातून ही हत्या झाली, असं स्थानिक पोलीस म्हणत आहेत. पोलिसांनी नवीदचा भाऊ वाहिद अफकारीलादेखील शासनविरोधी षडयंत्राचा भाग म्हणून अटक केली. शिवाय त्याचा तिसरा भाऊ हबीब यालादेखील ताब्यात घेतलं.
संबंधित खटला सुरू असताना सरकारी पक्ष व पोलिसांनी कोर्टात अनेक सरकारी पुरावे सादर केले. त्यात नवीदच्या दोन्ही भावांचा कबुलीजबाबही होता. रॉयटर वृत्तसंस्थेच्या मते नवीदनं हत्येची कबुली दिली, असा अहवाल पोलिसांनी कोर्टात दाखल केला. प्रत्यक्ष पुरावे व परिस्थिती पाहता शिराजच्या स्पेशल कोर्टाने गेल्या महिन्यात नवीदला डबल फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाने त्याच्या दोन्ही भावांना आजीवन कारावास व फटके मारण्याची शिक्षा दिली.
काय आहेत आरोप?
नवीदविरोधातच हत्या, राष्ट्रद्रोह, ईश्वराविरुद्ध युद्ध छेडणे व अवमान करणे इत्यादी गंभीर गुन्हे नोंदवण्यात आलेली होती. इराणचा धर्मगुरू राष्ट्रप्रमुख असतो. त्यांच्या देखरेखी व नेतृत्वाखाली सरकार कार्य करते. त्यांना ईश्वराचा दर्जा आहे. धर्मगुरुचा विरोध म्हणजे ईश्वराचा विरोध अशी रीत इराणमध्ये आहे.
जगभरातून नवीदच्या या शिक्षेवर टीका केली जात होती. इराणच्या सर्व राष्ट्रीय स्पोर्ट्स चॅम्पियन्सनी फाशीचा विरोध केला. मोसलिम इस्कंदर फिलाबी, इराणचे राष्ट्रीय खेळाडू. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये १७ सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक मिळवले आहेत. त्यांच्या पुढाकाराने इराणचे अॅथलेटिक्स समितीनं नवीद बचाव मोहीम सुरू केली. तब्बल ४८ अथलिटनं आंतरराष्ट्रीय अथलिट कमिटीला या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती.
शिवाय जगभरातील अॅथलिट, खेळ संघटना, कुस्तीवीर व खेळाशी संबंधित आंतरराष्ट्रीय संस्था अॅक्टिव्ह झाल्या. सर्वांनी नवीदचा मृत्युदंड रद्द करण्याची मागणी केली आहे. नवीदला राजकीय प्यादा बनवू नका, असा आक्रोश केला गेला. यूरोपमधील अनेक मानवी हक्क संघटना, राजकीय नेते, लेखक, विचारवंत इत्यादींना इंटरनेशनल स्पोर्ट्स अकादमीला सेव्ह नवीदची गळ घातली.
नवीदच्या आईने एका वीडियो मेसेजमधून तिचा आवाज ऐकणाऱ्या प्रत्येकाला अपिल केली होती की, आपल्या तीन तरुण मुलांचा जीव वाचवण्यास मदत करा. मेसेजमध्ये तिनं मुलांचा छळ करून त्यांना एकमेकांविरूद्ध साक्ष द्यायला भाग पाडले आहे, असा आरोप केला आहे. २ लाख पेक्षा अधिक लोकांनी या मेसेजला रिट्विट केलं. नवीदचे गावकरी, मित्र, हितचिंतक इत्यादींनी नवीदसाठी सहकार्य करण्याचं आवाहन केलं होतं.
नवीदचे वकिल हसन यूनुसी डेली मेलला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणतात, ‘‘सरकार नवीदचा बळी घेत आहे. त्याच्याविरोधात कुठलाही ठोस पुरावा नाही. हत्येचा कथित वीडियो घटनेच्या तासाभरापूर्वीचा आहे. तो निर्दोष आहे, त्याची राजकीय हत्या होता कामा नये.’’
सरकारची कठोर वृत्ती
मानवी हक्क संघटनांनी नवीदच्या कबुलीजबाबावर शंका उपस्थित केली आहे. बळजबरी कबुलीजबाब नोंदवण्याची इराणी सरकारची जुनी पद्धत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. इंटरनॅशनल फेडरेशन फॉर ह्यूमन राईट्स आणि लंडनस्थित जस्टिस फॉर इराण यांनी जूनमध्ये एका अहवालात म्हटलं होतं की, गेल्या दशकात इराणमध्ये सरकारी यंत्रणांनी ३५५ हून अधिक सक्तीची कबुलीजबाब नोंदवली आहेत. इराणी अधिकारी मात्र हे आरोप नाकारतात. फॉक्स न्यूजच्या मते स्थानिक मीडियाने वेळोवेळी संशयितांच्या कबुलीजबाबांवर प्रश्न उपस्थित केलेली आहेत.
सरकारविरोधी आंदोलकांना कडक शासन करण्यासाठी इराण कुख्यात आहे. गेल्या चार-पाच वर्षात अनेक सरकारविरोधी आंदोलने मोडून काढण्यात आली. पोलीस व निदर्शकात झालेल्या चकमकीत शेकडो तरुण मारले गेले आहेत. अनेक आंदोलकांना अटक करून त्यांना आजीवन कारावास, देहदंडाची शिक्षा दिली गेली. अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या म्हणण्यानुसार २०१९च्या अशांततेनंतर झालेल्या कारवाईत १० वर्षांपर्यंतच्या मुलांसह ७,००० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.
सरकारविरोधाचं प्रत्येक शस्त्र मोडून काढायचं ही इराणची रीत राहिलेली आहे. विरोध दडपण्यासाठी कठोर शासन ही एकमेव पद्धत इराणी राज्यकर्ते हाताळातात. नवीदच्या निमित्ताने अनेक मानवी हक्क संघटना, राजकीय विश्लेषक, अभ्यासकांनी ही सक्ती थांबण्याची मागणी केली. शिवाय देहदंडाच्या शिक्षेची तरतूद कायमची रद्द करण्याची मागणी झाली.
हुकूमशाहीला विरोध
नवीदच्या निमित्ताने सोशल मीडियावर सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्तीची समिक्षा झाली. आज नवीद आहे उद्या तुम्हीदेखील असू शकता, असं ट्विट केलं जात आहे. अभिनेत्री नाझनीन बोनाडी यांनी ट्वीट करत म्हटलं, “इराणमध्ये फाशी थांबवण्याची वेळ आली आहे.’’
अमेरिकी-इराणी विचारवंत मरियम मेमारसादेगी म्हणतात, “नवीद अफकारीचा एकमेव गुन्हा म्हणजे देशप्रेम. आपल्या 2 भावासोबत ते स्वातंत्र्यासाठी देशव्यापी निषेधांमध्ये सामील झाले. कृपया न्यायासाठी आमच्या बाजूने उभे रहा!”
नवीदने तुरुंगात असताना एका वायरल ऑडियोमधून तपास अधिकाऱ्याकडून छळ होतोय, असा आरोप केला होता. शिवाय त्याने खटल्याची पुर्नविचार व पुनर्परीक्षण याचिका इराणच्या सर्वोच्च कोर्टात दाखल केली होती. सरकारी वकिलाने ती रद्द करण्याची विनंती सुप्रीम कोर्टाला केली. परिणामी ही याचिका फेटाळली गेली.
देशातील राष्ट्रीय स्पोर्ट्स चॅम्पियन्सने आरोप केला हे की, "सत्ताधारी राजवटीकडून खेळाडूंना सतत त्रास देण्याची प्रयत्न मोहीम सुरू असते. अॅथलिटविरोधात वेळोवेळी शासन केले गेले. त्यांना दडपण्याचा प्रयत्न केला. अशा प्रत्येकवेळी आमची संघटना खेळाडूंच्या पाठीशी उभी राहिली. इराणमधील शासन अशा लोकप्रिय व्यक्तींना सहन करू शकत नाही."
अॅम्नेस्टी इंटरनॅशनलचा आधार घेतल्यास दिसून येते की इराणमध्ये कॅपिटल पनिशमेंट म्हणजे मृत्युदंडाची टक्केवारी लक्षणीय आहे. २०१५-१७ या कालावधीत जवळपास २ हजार फाशी इराणमध्ये झाल्या आहेत. एकीकडे जगात मृत्युदंडाची शिक्षा रोखण्यात यावी, अशी चर्चा सुरू असताना एकट्या इराणमध्ये मोठ्या संख्येने दिली जाणारी फाशीची शिक्षा चिंतनीय बाब आहे.
गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजची एक लिंक शेअर करत नवीदच्या माफीची मागणी केली. त्यानंतर जगभरात या खटल्याची समिक्षा सुरू झाली. इराणच्या हेकेखोर धोरणाचा समाचार घेतला गेला. यापूर्वीही अशा अनेक प्रकारावरून इराणला लक्ष्य करण्यात आलेलं आहे. इथं तरुणींचं गीत गायन, मुलीचं स्पोर्ट्स स्टेडियमला विरोध केला गेला. शिवाय स्वत्रंत्र विचारांच्या तरुणांच्या अभिव्यक्तीवरदेखील बंधने लादण्यात आलेली आहे.
जगभरात आक्रोश
थोडक्यात संपूर्ण मध्य आशियात सारखीच परिस्थिती आढळून येते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने सतत मोर्चे, आंदोलने होतच असतात. इराणच्या संबंधित प्रकरणामुळे जगभरात प्रतिक्रिया उमटल्या. या विरोधामुळे गुरुवारी इराणने फाशी स्थगित करत आहोत, असं जाहीर केलं. परंतु अचानक शनिवारी नवीदला फासावर चढवलं गेलं.
नवीद अफकारीच्या निमित्ताने इराण पुन्हा एकदा यूरोपीयन मीडिया व टीकाकारांचा लक्ष्य झाला आहे. मानवी हित डोळ्यासमोर ठेवून धोरणे आखण्याची विनंती व सल्ला इराणला जगभरातून दिला जात आहे. राजकीय बदलांची मागणी करत इराणी नागरिक आक्रमक होत आहे.
अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने फाशीवर इराणला लक्ष्य केलं आहे. हा प्रकार प्रतिवादीच्या हक्कांचं उल्लंघन आहे, अशी प्रतिक्रिया संघटनेने दिला आहे. नवीदचे वकिलांनी ट्विट करत मानवी हक्काची पायमल्ली झाल्याचं म्हटलं आहे. मृत्युपूर्वी नातेवाईकांना भेटण्याची पद्धत आहे, सरकारने या प्रकरणी तीदेखील नाकारली, असे त्यांनी म्हटलं आहे.
नवीदच्या फाशीच्या निमित्ताने इराणच्या राजकीय धोरणाची चिकित्सा केली जात आहे. हा इराणचा अंतर्गत प्रश्न असला तरी पब्लिक सेलिब्रिटिला अशी शिक्षा करणे, नियमात बसत नाही, अशी टीका पाश्चात्य मीडिया करत आहे. या घटनेवरून इराणी तरुण संतप्त झाले असून दुसऱ्या क्रांतीसाठी प्रयत्न सुरू करावा लागेल, असी प्रतिक्रिया सोशल मीडियातून व्यक्त होत आहे.
(अपडेट रविवार ६:३० वाजता)
सदरील लेख १० सप्टेंबर २०२०च्या लोकमतच्या ऑक्सिजनमध्ये प्रकाशित झालेला आहे. त्यात शेवटचे अपडेट (फाशीनंतर) इथे रविवारी करण्यात आलेले आहे.)
जाता जाता

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com