सध्या शेजारी राष्ट्र पाकिस्तान कोरोना रोगराई व त्यातून उद्भवणाऱ्या संकटाशी
दोन हात करत आहे. आरोग्य सुविधेच्या कमतरतेमुळे देशात आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या
सुरू आहेत. विरोधी पक्षापासून सामान्य जनता सरकारला दोषी ठरवत आहे. या दोषारोपणात
एका चांगल्या बातमीने सर्वच स्तरातील मंडळी आनंदी झाल्याचं दिसून आलं.
सैन्य दलात लेफ्टिनेंट जनरलपदी निगार जौहर यांची निवड झाली अन् एकाएकी चैतन्याचं वातावरण पाकिस्तानात
पहायला मिळालं. निवडीनंतर काढण्यात आलेल्या रॅलीत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. या रॅलीत लष्करी अधिकाऱ्यासमवेत सामान्य नागरिकांची संख्याही लक्षणीय होती. एका उच्चपदावर एक महिलेची निवड होणे आश्चर्यकारक घटना असल्याचं मत
पाकिस्तानी मीडिया व्यक्त करत आहे. मेनस्ट्रीम व सोशल मीडियात अजूनही यावर चर्चा
सुरू आहे.
वाचा : लेडी पोलीस फैजा नवाजने वकिलाला घातल्या बेड्या
वाचा : सुहाई अजीज : पाकची सुपरकॉप लेडी
निगार जौहर लष्करी सेवेत मेडिकल डॉक्टर आहेत. ब्रिगेडियर असलेल्या निगार आता लेफ्टिनेंट जनरल झाल्या आहेत. या प्रमोशनने त्यांना थ्री स्टार रँकच्या पहिल्या महिला अधिकारी म्हणून बहुमान मिळवून दिला आहे. याशिवाय त्यांना अजून एका पदावर म्हणजे सैन्य दलातील पहिल्या महिला सर्जन जनरल म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. एकाच वेळी दोन महत्त्वाच्या आणि मोठ्या जबाबदाऱ्या त्यांना देण्यात आल्या आहेत.
वाचा : लेडी पोलीस फैजा नवाजने वकिलाला घातल्या बेड्या
वाचा : सुहाई अजीज : पाकची सुपरकॉप लेडी
निगार जौहर लष्करी सेवेत मेडिकल डॉक्टर आहेत. ब्रिगेडियर असलेल्या निगार आता लेफ्टिनेंट जनरल झाल्या आहेत. या प्रमोशनने त्यांना थ्री स्टार रँकच्या पहिल्या महिला अधिकारी म्हणून बहुमान मिळवून दिला आहे. याशिवाय त्यांना अजून एका पदावर म्हणजे सैन्य दलातील पहिल्या महिला सर्जन जनरल म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. एकाच वेळी दोन महत्त्वाच्या आणि मोठ्या जबाबदाऱ्या त्यांना देण्यात आल्या आहेत.
#Pakistan first female Lt General #NigarJohar assumed new responsibilities as Surgeon General in #Army pic.twitter.com/1kxMiQNayc— Muhammad Ishtiaq (@Mishtiaq) July 1, 2020
सर्वप्रथम लष्कराच्या आधिकारिक ट्विटर हँडलवरून हे वृत्त देण्यात आलं. या
ट्विटवर अजूनही चर्चा सुरू आहे. लाखों लोकांनी शुभेच्छा देत सकारात्मक प्रतिक्रिया
व्यक्त केल्या आहेत. या निवडीचा आनंद साजरा करणाऱ्यामध्ये तरुण मुलींची संख्या
अधिक आहे.
निगार लष्करात सेवा देणाऱ्या
आपल्या तिसऱ्या पिढीचं नेतृत्व करतात. त्यांचे वडिल व काका याच सेवेतून निवृत्त
झाले आहेत. शिवाय त्यांचे पतीदेखील लष्करी सेवेत आहेत. बीबीसी उर्दूच्या मते 50
वर्षीय निगार यांचा जन्म खैबर पख्तूनख्वामधील स्वाबी जिल्ह्यातील
पांजपीर गावातला.
रावळपिंडीमधील एका कॉन्वेंट गर्ल्स
हायस्कूलमधून त्यांचं शिक्षण झालं. त्यानंतर 1985 साली त्यांनी आर्मी मेडिकल कॉलेजमधून डिग्री
मिळवली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर याच कॉलेजमध्ये त्यांनी मेडिकल सेवा बजावली. नोकरी
करत असताना त्यांनी वेगवेगळ्या पदव्या संपादित केल्या. त्यात सशस्त्र दलात पोस्ट ग्रेजुएट, एडवांस मेडिकल एडमिनिस्ट्रेशनमध्ये डिप्लोमा तसेच मास्टर ऑफ पब्लिक हेल्थमधील डिग्रीचा समावेश आहे.
शिवाय अजूनही काही कोर्स त्यांनी केलेले आहेत.
वाचा : सुदानी राज्यक्रांतीची नायिका
वाचा : रशियन कॉन्स्टिट्यूशन गर्ल सध्याचे आर्मी प्रमुख क़मर जावेद बाजवा रावळपिंडीच्या कोअर कमांडर असताना निगार त्यावेळी सीएमएच झेलमच्या कमांडिंग ऑफिसर होत्या. बीबीसीच्या मते हे पद मोठं आणि महत्त्वाचं मानलं जातं. त्या सीएमएच संस्थेच्या डिप्टी कमांडेंटसुद्धा राहिलेल्या आहेत. तसेच आर्मी मेडिकल कॉलेजच्या त्या वाइस प्रिंसिपॉलदेखील होत्या. मिलट्री हॉस्पिटलच्या उच्चपदाची जबाबदारीदेखील त्यांनी सांभाळळी आहे.
2017 साली त्यांनी मेजर जनरल पदी प्रोमोट करण्यात आलं होतं. त्यावेळी पाकिस्तानी
लष्करात मेजर जनरलपदी असणाऱ्या त्या तिसऱ्या महिला होत्या. यापूर्वी डॉ. शाहिदा
मलिक आणि डॉ. शाहिदा बादशाह या महिला या अधिकारी या पदावर विराजमान होत्या.
बीबीसीच्या मते एका सार्वजनिक कार्यक्रमात निगार यांनी या दोन महिला
अधिकाऱ्यांच्या कर्तृत्वाबद्दल गौरवाचे उद्गार काढले होते. त्यावेळी त्या
ब्रिगेडियर होत्या. आता त्यांच्यापेक्षा वरच्या पदावर निगार यांना बढ़ती मिळाली
आहे.
विविध पदावर जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या निगार जौहर यांना ‘मूव्हर’ म्हटलं जातं. याचा अर्थ कधीही न थांबणाऱ्या
असा होतो. या बढ़तीवर बीबीसी उर्दूने त्य़ांच्या एका कलीगची प्रतिक्रिया दिली आहे,
त्यांच्या मते निगार ज्यावेळी कुठल्या कार्यालयात असतात त्यावेळी त्या एकाच वेळी चार
पुरुषाएवढं काम करतात.
दि न्यूजच्या मते त्या अत्यंत प्रामाणिकपणे व चोखपणे रकाम बजावणाऱ्या महिला
अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. दि न्यूजने त्यांच्यावर विशेष स्टोरी प्रकाशित
करत विविध प्रतिक्रिया छापल्या आहेत. सोशल मीडियावर निगार जौहर यांच्यावर शुभेच्छांचा
वर्षाव करत मुलींनी त्यांच्यासारखे पद मिळवण्याची इच्छाशक्ती व्यक्त केली आहे.
पाकिस्तानच्या प्रतिष्ठित दैनिक डॉनने या निवडीला एक ऐतिहासिक पाऊल म्हटलं
आहे. बीबीसीच्या उर्दू सेवेने त्यांच्यावर स्पेशल स्टोरी केली असून त्यात निगार
यांच्या दुर्दम्य आशावादाची विस्ताराने चर्चा केली आहे.
दैनिक डॉनच्या मते निगार तज्ज्ञ डॉक्टर आहेत. शिवाय त्या उत्तम निशानेबाज
आहेत. लेफ्टिनेंट जनरल म्हणून त्या पाकिस्तान आर्मीच्या मेडिकल कोरमध्ये पोस्टेड आहेत.
त्या दक्षिण आशियाच्या अशा सर्वात मोठ्या आर्मी हॉस्पिटलची जबाबदारी सांभाळत आहेत
तिथे दररोज 700 पेक्षा अधिक पेशंटला आरोग्य
सुविधा पुरवली जाते.
वाचा : इस्रोच्या दोन रॉकेट विमेन
वाचा : सोमालियाची पॅशनेट नलायाह निगार यांच्या निवडीवर विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते व राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. या निवडीमुळे पाकिस्तानातील मुलींना सकारात्मक उर्जा मिळेल अशी आशा पंजाबचे माजी मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांनी व्यक्त केली आहे. पीएमएल-एनचे अहसान इकबाल यांनी या कामगिरीला ‘पाकिस्तानी महिलांसाठी झेप’ म्हटलं आहे. निगार यांच्या निवडीवरील फेसबुकवरील चर्चा संमीश्र स्वरूपाची आहे.
दखलनीय बाब अशी की मार्च महिन्यात महिला दिनी पाकिस्तानात भव्य ‘औरत
मार्च’ काढण्यात आला होता. त्यात मध्यमवर्गीय कुटुंबातील अनेक
महिला रस्त्यावर येऊन मूलभूत अधिकारांची मागणी करत होत्या. त्यात मुक्त वातावरणात काम
करणे, शिक्षणाला बंदी नसणे, मुक्त विहार करता यावा, अशा मागण्या प्रमुख होत्या.
महिलांच्या या रॅलीवर पुरुषांनी दगडफेक केली होती. अनेक ठिकाणी आंदोलक
महिलांना मारहाणही करण्यात आली. मोर्चादरम्यान पुरुषांनी रस्त्यावर उभे राहून
महिलांकडे बघून अभद्र वर्तनही करण्यात आलं. रिपोर्टिंग करणाऱ्या मुलींवर दगडफेक करण्यात
आली. त्यांचे कॅमेरे तोडण्यात आले. महिलावर अनैतिक व्यवहाराची शेरेबाजी करण्यात
आली. मीडियाच्या चर्चेतूनही सहभागी पॅनलिस्ट महिलांविरोधात
जाहिररित्या अभद्र भाषेचा वापर करत होते. थोडक्यात
महिलांना मुक्त वातावरण देण्यात मज्जाव करण्यात आला होता.
वाचा : सबीन महमूदची हत्या म्हणजे अस्थिर पाकिस्तान
वाचा : हिजाबधारी एथलिट : मुस्लिम महिलांचं बदलतं वास्तव
वाचा : सबीन महमूदची हत्या म्हणजे अस्थिर पाकिस्तान
वाचा : हिजाबधारी एथलिट : मुस्लिम महिलांचं बदलतं वास्तव
मीडिया रिपोर्ट सांगताता की, गेल्या काही वर्षात इथे महिलांविरोधात
लक्ष्यकेंद्री हल्ले वाढल्याचं दिसून येते. महिलाविरोदात होत असलेल्या लैंगिक
हल्ल्यांचा निषेध करणारी मोठ-मोठी आंदोलन अनेक वेळा झाली आहेत. परंतु परिस्थिती
मात्र अजूनही बदलली नाही. अशा घुसमटणाऱ्या वातावरणात महिला घरात न बसता अधिक जोमाने सक्रीय झालेल्या दिसतात. अशा दपडशाहीच्या वातावरणातही पाकिस्तानी महिला
अधिक प्रखरतेने पुढे आल्या आहेत, ही केवळ सकारात्मक उर्जाच नव्हे तर रोखणाऱ्यांना
खुले आव्हान आहे, असे म्हणता येईल.
Twitter@Kalimajeem
(सदरील लेख 16 जुलै 2020च्या लोकमत ऑक्सिजनमध्ये प्रकाशित झालेला आहे)
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com