गेल्या काही दिवसांपासून एका रशियन तरुणीचे दोन
फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्यातल्या पहिल्या फोटोत ती मुलगी
सशस्त्र पोलिसांच्या घोळक्यात जमीनीवर शांतपणे बसली आहे. हातात पुस्तकाची प्रत
असून ती काहितरी वाचत आहे. दुसऱ्या फोटोत त्या तरुणीला जेन्टस पोलीस हात-पाय पकडून
उलट्या अवस्थेत फरफटत घेऊन जात आहेत.
Olga misik, pro-democracy movement आणि Peaceful या हैशटॅगसह हे दोन
फोटो सोशल मीडियावर महिनाभरापासून धुमाकूळ घालत आहेत. कोण आहे बरं ही मुलगी?
ओल्गा मिसिक असं तिचं नाव. ती १७ वर्षाची असून
मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत आहे. ओल्गा मॉस्कोच्या उपनगरातील निवासी
आहे. हुकूमशाही राजवटीबद्दल लिहिणारे जॉर्ज ऑरव्हेल आणि अल्डस हॅक्सले तिच्या खास
आवडीचे लेखक. सरकारच्या निषेधासाठी हजर असलेल्या हजारो लोकांपैकी ओल्गा एक होती.
आज ती रशियाच्या लोकशाही समर्थक चळवळीची प्रतीक म्हणून जगभरात ओळखली जात आहे.
येत्या सप्टेंबर महिन्यात रशियातील मॉस्कोत सिटी
असेम्बलीच्या (ड्यूमा) निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत काही अपक्ष उमेदवारांना
तांत्रिक कारणामुळे अर्ज भरण्यापासून वंचित ठेवण्यात आलं आहे. या निषेधार्थ २७
जुलैला हजारो लोकशाही समर्थक रस्त्यावर उतरले. पारदर्शक पद्धतीने निवडणुका घेण्यात
याव्या, असा या आंदोलकांचा आग्रह आहे. परंतु अपक्ष
उमेदवारांना सरकार निवडणुका लढविण्यापासून लांब ठेवत आहे, असा आरोप करत मॉस्कोत निषेध आंदोलने सुरू आहेत.
वाचा : सुदानी राज्यक्रांतीची नायिका
वाचा : रशियन कॉन्स्टिट्यूशन गर्ल
मीडिया रिपोट्स म्हणतात की, सरकारने हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी पोलिसी बळाचा वापर केला आहे.
त्याचवेळी आपले संविधानिक अधिकार मिळावेत म्हणून ओल्गा दंगल रोखणाऱ्या सशस्त्र
पोलिसांच्या गराड्यात जमिनीवर फतकल मारून बसलीय. बुलेटप्रुफ जॅकेट घातलेल्या
ओल्गाच्या हातात देशाची राज्यघटना असून तिचं वाचन ती करत आहे. अभिव्यक्ती
स्वातंत्र्याचं रक्षण करणारं कलम ती वाचून दाखवताना हातात गन घेतलेले पोलीस बघत
आहेत. लोकशाही अधिकारांसाठी सत्याग्रह करणारी ही तरुणी बंदुका व रायफलच्या
सान्निध्यात अतिशय शांत बसली आहे.
ट्विटरवर या पीसफुल मार्चचे अनेक फोटो व्हायरल
झाले आहेत. अन्य फोटोमध्ये ओल्गा पोलिसांच्या राऊंडमध्ये फिरून राज्यघटनेच्या अन्य
कलमांचे वाचन करत आहे. त्यात ती म्हणते. "प्रत्येकजण निवडणुकीत भाग घेऊ शकतो, प्रत्येकांना स्वातंत्र्य मिळविण्याचा हक्क आहे. जनतेचे अधिकार व
इच्छा ही देशासाठी सर्वात महत्वाची बाब आहे."
ओल्गाच्या निषेधाचे हे फोटो सोशल मीडियावर हजारो
वेळा शेअर केले गेले. काहीजणांनी तिची तुलना बीजिंगमधील तियानॅनमेन स्क्वेअरच्या
टँक मॅनशी केली आहे, जो १९८९मध्ये एका लष्करी रणगाड्याच्या समोर उभा
होता. भारतातील काही नेटकऱ्यांनी तिची तुलना मणिपुरी नग्ग महिला आंदोलकांशी केली, ज्या २००४मध्ये वादग्रस्त अस्फा कायद्याविरोधात भारतीय लष्कराच्या
समोर आपले कपडे काढून नग्न झाल्या होत्या.
ओल्गा मिसिक जगभरातील नेटकऱ्यांची रोल मॉडेल
बनलीय. अनेकांनी तिचे फोटो शेअर करत तिला पाठिंबा दर्शवला आहे. रशियातच नव्हे तर
बाहेरही तिला समर्थन मिळत असून लोकशाहीचं प्रतीक म्हणून तिला प्रसारित केलं जात
आहे. अनेकांनी तिच्याकडून प्रेरणा घेऊन लोकशाही व्य़वस्थेचं समर्थन केलंय.
आंदोलनाबद्दल ओल्गानं बीबीसीला सांगितलं की, “मी कुठल्याही राजकीय पक्षाची समर्थक नाही. माझा निषेध फक्त आगामी
निवडणुकांपुरता नाही, तर रशियन लोकांच्या अधिकारांचे सतत हनन होत
असल्याच्या विरोधात आहे.”
ब्रुट्स मीडियाला दिलेल्या इंटरव्यूत ओल्गा
म्हणते की "रशियामधील परिस्थिती सध्या अस्थिर आहे. शांततावादी निदर्शकांचा
पाठलाग करण्यासाठी देशातील वेगवेगळ्या भागातून सैन्य दलांना एकत्रित केलं जात आहे.
कारण त्या आंदोलकांची सरकारला भीती वाटत आहे. सरकारला घेऊन सामान्य लोकांची
मानसिकता बदलली आहे, हे विविध प्रकारे समोर आलेलं दिसू शकतं.”
या निषेध आंदोलनापूर्वी विरोधी पक्षातील अनेक
बड्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यांना लोकशाही समर्थक चळवळीत
सामील होण्यापासून रोखण्यात आलं. परंतु लोकशाही रक्षणासाठी मास्कोत हजारो लोकं
रस्त्यावर उतरली. या निदर्शनानंतर रशियन पोलिसांनी सर्व आंदोलकांसह ओल्गालाही अटक
केलं. तिच्यासोबत अतिशय क्रूरतापूर्वक व्यवहार करण्यात आला. अन्य आंदोलकांना
पोलिसांनी लाठी-काठीनं मारल्याच्या मीडिया रिपोर्ट्स आहेत.
ओल्गाला गेल्या तीन महिन्यांत ४ वेळा ताब्यात
घेण्यात आलं आहे. यावर ती म्हणते की, 'प्रत्येक वेळी ती
शांततेत निषेध करत असते तरीही पोलीस मला उचलतात.' यावेळी तिला १२
तासांनंतर सोडण्यात आलं. विनापरवाना व बेकायदेशीरपणे सरकारविरोधी मार्चमध्ये भाग
घेतल्याबद्दल तिला २०,००० रूबल (२१ हजार भारतीय रुपये) दंड ठोठावण्यात
आला आहे.
शंभर वर्षापूर्वी १९१७ला बोल्शेविक क्रांती होऊन
सोव्हियत युनियनची सत्ता स्थापन झाली. जगात कामगार कल्याण व सामान्य लोकांच्या
अधिकारांचा पुरस्कार प्रथमच करण्यात आला. याच रशियात आज सामान्य नागरिक लोकशाही
अधिकारांसाठी रस्त्यावर येत आहेत.
वाचा : इस्रोच्या दोन रॉकेट विमेन
वाचा : पॅशनेट नलायाहतज्ज्ञांच्या मते १९९१च्या सोव्हियत युनियनच्या विघटनानंतर रशियात लोकशाही हक्कांचे हनन मोठ्या प्रमाणात सुरू झालंय. सध्याचे राज्यकर्ते व्लादिमिर पुतीन तानाशाह मानले जातात. गेल्या वर्षी त्यांनी आपण तहयात राष्ट्राध्यक्ष राहू अशी तरतूद राज्यघटनेत करून घेतली आहे. सामान्य लोकांचे हिताचा पुरस्कार करणारा हा देश आज कॉमन मॅनचेच अधिकार हिरावून घेण्यात अग्रेसर असल्याचं आळून येत आहे. जगभरातील लोकशाही राष्ट्रांसाठी ही चिंतेची बाब आहे, पण भांडवलशाहीच्या ओझ्याखाली दबलेले देश याविरोधात चकार शब्द न काढणे मानवतेची अपरिमित हानी आहे.
कलीम अजीम, पुणे
Twitter@kalimajeem
Twitter@kalimajeem
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com