धिप्पाड दिसणारा एक पुरुष. त्याच्या दोन्ही हाताला बेड्या. त्या
बेड्याचा दोर एका तरुणीच्या हातात. ही तरुण मुलगी त्या पुरुषाला फरफटत कुठेतरी
घेऊन जात आहे. विजयीमुद्रेत असलेला तो तरुण निमूटपणे त्या मुलीच्या मागे-मागे
चालतोय. काही सेंकदाचा हा व्हिडिओ काही आठवड्यापूर्वी प्रचंड व्हायरल झाला. फेसबुक, ट्विटर, यू ट्य़ूब आणि व्हॉट्सअपवर या व्हिडिओचा धुमाकूळ.
ट्विटरवर याच घटनेचा एक फोटो तुफान गाजतोय. फोटोत त्या तरुणीच्या चेहऱ्यावर
अभिमानाचे भाव दिसत आहेत. किंचितसं समाधानाचे भाव जपत ती तरुणी हळूहळू चालत पुढे
जात आहे.
तरुणीचे नाव फैजा नवाज, पाकिस्तानच्या पंजाब
प्रांतातील फेरोजेवाला शहरात ती एक पोलीस कॉन्स्टेबल आहे. तिच्याशी अभद्र वर्तन
केल्याच्या आरोपावरून एका वकिलाच्या मुसक्या तिने आवळल्या होत्या. अभद्र नव्हे
त्या वकिलाने फैजाला बेदम मारहाण केली. तिही सार्वजनिक ठिकाणी.
तक्रार दाखल झाल्यानंतर अहमद मुख्तार नावाच्या वकिलाला अटक केलं गेलं.
फैजा नवाज त्या वकिलाला बेड्या ठोकून पोलीस स्टेशन ते कोर्ट असे फरफटत घेऊन जाते.
फैजाला पाहून फोटो काढणाऱ्यांनी एकच गर्दी केली. एकाएकी शेकडो मोबाईल कॅमेरे
फैजाकडे वळले. काहीच सेकंदात फैजा नवाजचे व्हीडिओ आणि फोटो ट्विटर, फेसबुकवर व्हायरल होतात. आणि २५ वर्षीय फैजा देशभरात पोहोचते.
बघता-बघता पाकिस्तानातून फैजा नवाजच्या धाडसाचे कौतुक सुरू झाले.
प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेत्यांकडून फैजाचे फोटो कॅप्शनसह शेअर, ट्विट-रिट्विट केले गेले. अशा रीतीने फैजा काही वेळातच टॉप ट्रेंडला
पोहोचली. अनेकांनी तिच्या धाडसाचे कौतुक केले. पण तिचे ते धाडस अल्पायुशी ठरले.
कोर्टाने आरोपी वकिलाला जामीन मंजूर केला. एफआयआरमध्ये चुकीचे नाव नोंदवल्याचा
युक्तीवाद वकिलाला जामीन मिळविण्यासाठी पुरेसा ठरला.
वाचा : लेबनानने का लावला होता सोशल मीडियावर
टॅक्स?
वकिलांनी आणला दबाव
क्षणार्धात फैजा नवाज एकटी पडली. तिने एका व्हिडिओ मॅसेजद्वारे आप-बिती सांगितली. कोर्ट परिसरातून जारी केलेल्या संदेशात ती म्हणते, “चेकिंग पाइंटजवळ गाडी पार्क करण्यास रोखले असता त्याने मला लाथा-बुक्क्याने मारले. कोर्टाने माझी बाजू ऐकून न घेताच त्याला जामीन मंजूर केलाय. आता मी कुणाकडे तक्रार करू. माझे ज्येष्ठ सहकारी मला गप्प राहण्याची भाषा बोलत आहेत. मला न्याय कोण मिळवून देणार?”
वकिलांनी आणला दबाव
क्षणार्धात फैजा नवाज एकटी पडली. तिने एका व्हिडिओ मॅसेजद्वारे आप-बिती सांगितली. कोर्ट परिसरातून जारी केलेल्या संदेशात ती म्हणते, “चेकिंग पाइंटजवळ गाडी पार्क करण्यास रोखले असता त्याने मला लाथा-बुक्क्याने मारले. कोर्टाने माझी बाजू ऐकून न घेताच त्याला जामीन मंजूर केलाय. आता मी कुणाकडे तक्रार करू. माझे ज्येष्ठ सहकारी मला गप्प राहण्याची भाषा बोलत आहेत. मला न्याय कोण मिळवून देणार?”
सहकारी व वरिष्ठांनीदेखील फैजाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. फैजाचा
आरोप आहे की, वकिलांच्या दबावाखाली त्यांनी तिची साथ सोडली. तिच्या
सहकाऱ्यांनीच जाणून-बुजून एफआयआरमध्ये चुकीचे नाव नोंदवले, असे ती जिओ न्यूजला दिलेल्या फोनोत म्हणते. डॉन न्यूजच्या बातमीत ती
उधविग्न होऊन म्हणते,
“मला न्याय मिळेल अशी कुठलीच शक्यता दिसत नाही.
मला पोलिसी सेवेचा राजीनामा द्यावासा वाटतो. मी प्रचंड नैराश्यात आहे. मला
आत्महत्या कराविशी वाटते. ताकतीच्या जोरावर तो वकील बाहेर आला. त्याने माझ्याशी
सार्वजनिक स्थळी दुर्व्यवहार केलेला आहे. एका महिला पोलिसांला मारहाण करणे गुन्हा
नाही का?”
वाचा : नागपूरच्या अमेरिकन सिनेटर गझाला हाशमी
वाचा : बंडखोर पॉप स्टार सुलीचा एकाकी अंतमहिला पोलिसांवर हल्ला
फैजा नवाज एक उच्चशिक्षीत तरुणी आहे. ती २०१४ साली एकाच वेळी पंजाब पोलीस दलात कॉन्स्टेबल आणि त्याचवेळी काउंटर टेररिझम डिपार्टमेंटमध्ये निवडली गेली होती. आपल्या व्हिडिओ संदेशात ती म्हणते, “मोठ्या अभिमानाने मी पोलिसात सामील झाले होते. मला समाजाला आणि विशेषत: महिलांना न्याय मिळवून देण्याची इच्छा होती. पण आज माझेच लोक माझ्याविरोधात उभे रहिले आहेत. अशावेळी मी काय करावे?”
आरोपी अहमद मुख्तारने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत, तो म्हणतो,
“मी काय हातगाडीवाला आहे का, तिची हिंमत कशी झाली मला रोखायची? मला बेड्या टाकायची
काय गरज होती. लेडी कॉन्स्टेबल आहे, तिने जपून राहावे
ना!, ती माझ्यावर खोटे आरोप करत आहे. मला न्याय
मिळाला.”
बीबीसी उर्दूला दिलेल्या प्रतिक्रियेत फैजा म्हणते, “त्याने मला व माझ्या कुटुंबियाला जीवे मारण्याची धमकी दिली. माझ्यावर
लाच्छनास्पद आरोप लावत चारित्र्यावर शिंतोळे उडवले. न्याय मिळवून देणारा असा असतो
का?”
भ्रष्ट व्यवस्थेला कंटाळून तिने घटनेच्या दुसऱ्या दिवशी आपल्या पदाचा
राजीनामा दिला. मात्र, तिचे सहकारी बदनामीच्या भीतीपोटी फैजा कामावर
असल्याचे सांगत आहेत. याउलट, पंजाबमधील बहुतेक
जनता फैजाच्या समर्थनात उतरली आहे. फैजा नवाजवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात
फेसबुक लाईव्ह करून ते बोलत आहेत. अनेकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. जिथे महिला
पोलिसांना बेदम मारलं जातं, तिथे जनतेची सुरक्षा
कोण करणार? असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत.
वाचा : सबीन महमूदची हत्या म्हणजे अस्थिर पाकिस्तान
वाचा : हिजाबधारी एथलिट : मुस्लिम महिलांचं बदलतं वास्तव
वाचा : सबीन महमूदची हत्या म्हणजे अस्थिर पाकिस्तान
वाचा : हिजाबधारी एथलिट : मुस्लिम महिलांचं बदलतं वास्तव
“माझं पोलिसात
येण्याचे एकमेव उद्दीष्ट्ये ‘न्याय’ हेच होते. या मार्गात कितीही समस्या आल्या तरी मी
लढणार. एकटीने का होईना मी हा लढा देणार आहे. मी जर गप्प राहिले तर भविष्यात
कोणीही आपली मुलगी पोलिसी सेवेत पाठवणार नाहीत. त्यामुळे माझ्या अस्तित्वाची ही
लढाई मला लढावी लागणार आहे,” राजीनाम्यावर फैजाने
ही प्रतिक्रिया जिओ न्यूजला दिली आहे.
हा फोटो पाहून वकिलाचा पुरुषी अहंकार ठळक जाणवतो. एका महिला
पोलिसाच्या विरोधात फेरोजेवालाची पूर्ण वकिलाची टीम उभी राहिली आहे. हातात बेड्या
टाकल्याचा राग हा व्यक्तिगत आकस होत, सूडबुद्धीत
परावर्तीत झाला. या पुरुषी अहंकारानेच फैजा नवाजला लढण्याची उर्मी दिलेली आहे.
तिचा लढा नक्कीच यशस्वी होईल, अशी प्रार्थना आपण
तुर्तास करूया.
कलीम अजीम, पुणे
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“ फा तिमा शेख जोतीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम कर चुकी हैं। जब जोतीराव-सावित्रीमाई को उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा और उन...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“ फा तिमा शेख जोतीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम कर चुकी हैं। जब जोतीराव-सावित्रीमाई को उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा और उन...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
बी ते 9 जनवरी को गूगल ने फ़ातिमा शेख पर डूडल बनाकर उन्हें 191 वें जन्मदिन की बधाइयां पेश की। जिसके बाद देशभर में बधाइयों का सिलसिला चला। ...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com