‘मुली नाजूक नसून बहादूर असतात; आणि महिला फक्त धाडसी असत नाहीत तर त्या महात्वाकांक्षीदेखील असतात.’
पाकिस्तानच्या
सुहाई अजीजचं हे वाक्य. गेल्या आठवडय़ात पाकिस्तान चॅनल्सनेच नाही तर जगभरात अनेक
वाहिन्यांनी दाखवलं. 30 वर्षाची पाकिस्तानी तरुण मुलगी असं काही बेधडक सांगतेय, याचंच हे
अप्रूप नव्हतं, तर ती
जे बोलली ते तिनं करून दाखवलं होतं. 22 नोव्हेंबरची ही गोष्ट. त्यादिवशी कराची
शहरातल्या चीनच्या वाणिज्य दूतावासावर आत्मघाती हल्ला झाला. पोलीस अधिकारी म्हणून
काम करणार्या सुहाईनं हा दहशतवादी
हल्ला उधळूनच लावला नाही तर तीन हल्लेखोरांना तिनं कंठस्नानही घातलं. या
हल्लेखोरांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे व दारुगोळा जप्त केला. सुहाईच्या
प्रयत्नामुळे मोठा हल्ला ठळला. हस्तगत झालेली शस्त्रे पाहता मोठी जीवीतहानी
होण्याची भीती होती.
जगभरातील प्रसारमाध्यमांनी
सुहाईचं हल्ला उधळून लावल्याबद्दल अभिनंदन करत तिला शाबासकी दिली. अनेक मीडिया
संस्थांनी तिच्या धाडसाचे किस्से रंगवले आहेत. अजूनही सुहाईच्या ‘बहादुरीचे किस्से’ जगभरातील मीडियात सुरू आहेत.
पंतप्रधान इमरान खान, मुख्यमंत्री मुराद अलींपासून
अनेक महत्त्वाचे नेते व सेलिब्रिटींनी सुहाईची जाहीर प्रशंसा केली आहे. फेसबुक व
ट्विटरवर सुहाईच्या कर्तृत्वाचे हे जंगी सेलिब्रेशन अजूनही सुरूच आहे. जगभरातील
नेटीझन्सनं तिला ‘सुपरकॉप लेडी’ म्हणून प्रचारित केलंय.
वाचा : लेडी पोलीस फैजा नवाजने वकिलाला घातल्या बेड्या
वाचा : निगार जौहर : पाकिस्तानची पहिली लेफ्टिनेंट जनरल
वाचा : लेडी पोलीस फैजा नवाजने वकिलाला घातल्या बेड्या
वाचा : निगार जौहर : पाकिस्तानची पहिली लेफ्टिनेंट जनरल
सुहाई अजीजचे वर उल्लेखित वाक्य
२०१३ सालचे आहे, ज्यावेळी ती सिविल सेवा परीक्षा
उत्तीर्ण झाली होती. तिनं पंचवीशीत सेंट्रल
सुपीरियर सर्व्हिसेस (सिविल सेवा) पास केली होती. सर्वात कमी वयात सिविल
सर्व्हिसेस परीक्षा पास होण्याचा बहुमान तिला मिळाला होता. वर्षभर पाकिस्तानी
मीडिया तिच्या यशाच्या कौतुकानं रंगला होता. पाच वर्षानंतर तिनं चीनी अंबेसीवरील
हल्ल्याच्या निमित्तानं आपलं विधान पूर्ण करून दाखवलं आहे.
पाच वर्षांपूर्वी प्राईड ऑफ
पाकिस्तान या वेबपोर्टलनं त्यांची यशकथा दीर्घ स्वरुपात प्रकाशित केली होती. अनेक
खडतर प्रवासातून तिनं यश मिळवल्याच्या अनेक नोंदी या लेखातून समोर येतात. लेखात
तिनं आपल्या प्रवासाचे अनेक रोचक किस्से सांगितले आहेत. एका ठिकाणी किमान चार्टेड
अकाऊंट तरी होता येईल की नाही यांची शाश्वती नव्हती असे ती म्हणते.
सिंध प्रातांतील एका मध्यमवर्गीय
घरात जन्मलेल्या सुहाईला आपले नातेवाईक धार्मिक शिक्षण देऊ करत होते. मुलींनी
जास्त शिकू नये अशा मतांच्या वातावरणात वडील अजीज तालपूर सुहाईंच्या पाठिशी
खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी कुटुंबाविरोधात बंड करून आधुनिक शिक्षण मिळणाऱ्या
एका शाळेत आपल्या मुलीला टाकलं. परिणामी कुटुबांने त्यांच्यावर बहिष्कार घातला. या
घटनेनं व्यथित होऊन अजीज तालपूर यांनी गाव सोडलं. मुलीच्या शिक्षणासाठी
आप्तस्वकीयांना सोडून त्यांनी स्थलांतर स्वीकारलं.
हैदराबादला येऊन सुहाईनं
आर्किटेक्ट होऊन उंच इमारतींना अधिक सुंदर करण्याचे स्वप्न पाहिले. तर कधी
न्यूरोसर्जन म्हणून गरिबांची सेवा करण्याचे इच्छा बाळगली. कालातंरानं आपण वैमानिक
होऊ अशा स्वप्नरंजनात ती रमली. आकाशात उंच भरारी घेण्याचे तिचे स्वप्न होते.
तिच्या या ‘सपनो में’ एक प्रकारची जिद्द होती. या आकांक्षांना तिच्या कुटुंबाने
पाठिंब्याचे पंख दिले होते. त्यामुळे वेगवेगळ्या शिक्षणाच्या रुपाने ती उंच-उंच
भरारी घेत होती.
दैनिक डॉनच्या मते हैदराबादला
तिनं बीकॉमपर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर सिंध यूनिव्हर्सिटीमधून तिनं
अर्थशास्त्रात मास्टर पूर्ण केलं. एमएनंतर चार्टर्ड अकाउंटेंसीमध्ये सर्टिफिकेट
कोर्स केला. प्रग्लभता वाढली तसे त्यांचे स्वप्नदेखील बदलले. दरम्यानच्या काळात
देशात राजकीय अस्थिरता व हिंसक कारवाया वाढल्या होत्या. देशात सैन्यशासन आलं.
सैन्यप्रमुख परवेज मुशरफ यांचे धोरण देशासाठी घातकी ठरत होती. आठ वर्षे मुशरफ
राष्ट्रप्रमुख होते. त्याच्याकाळात असंतुष्ट गटांचा उन्माद प्रचंड वाढला. त्यातूनच
माजी पंतप्रधान बेनजीर
भुट्टोंची हत्या झाली. असा इत्यादी गोष्टींमुळे तिचे मन आणखी कणखर बनले. यातून
तिनं पोलिसी सेवेत जाण्याचे ध्येय बाळगलं. सेंट्रल सुपीरियर सर्व्हिसेसची तयारी
सुरू केली. पहिल्या प्रयत्नात २०१३ मध्ये तिला यश मिळालं.
एएसपी रँक तिला मिळाली होती.
लोअर सिंध प्रांतात जाऊन सेवा करण्याची इच्छा तिनं बाळगली. ती एएसपी म्हणून जाईन
झाली. ज्या भागानं त्यांना स्थलांतर करण्यास भाग पाडलं होतं, त्याच भागात अभिमानानं तिनं जनसेवा पर्यायानं देशसेवा सुरू केली.
वाचा : सबीन महमूदची हत्या म्हणजे अस्थिर पाकिस्तान
वाचा : हिजाबधारी एथलिट : मुस्लिम महिलांचं बदलतं वास्तव
वाचा : सबीन महमूदची हत्या म्हणजे अस्थिर पाकिस्तान
वाचा : हिजाबधारी एथलिट : मुस्लिम महिलांचं बदलतं वास्तव
तालपूर कुटुंबासाठी ही गौरवाची
गोष्ट होती. लेखक व सामाजिक कार्यकर्ते असलेले त्यांचे वडील अजीज तालपूर मुलींच्या
यशानं प्रचंड आत्मविश्वासी झाले. कराचीमधील दहशतवादी हल्ला उलथवून लावल्याने ती
जगभरात पोहचली. अनेक देशामधून एक शक्तिशाली महिला म्हणून तिला सन्मान मिळत आहे.
भारतातही अनेक मीडिया संस्थांनी तिच्या कर्तृत्वाची दखल घेतली. राज्य सरकारकडून
सुहाईला बढती देण्यात आली आहे. इतकेच नाही तर राज्य सरकारने तिच्या शौर्याबद्दल
तिला देशातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ‘कायदे
आझम’ पदकाची शिफारसदेखील केली आहे.
(हा लेख लोकमतच्या ऑक्सिजनमध्ये प्रकाशित झालेला आहे. संपादकीय संस्कारामुळे ऑक्सिजनला तो बराच कमी करावा लागला त्यामुळे तो पूर्ण स्वरुपात इथे देतोय)
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“ फा तिमा शेख जोतीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम कर चुकी हैं। जब जोतीराव-सावित्रीमाई को उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा और उन...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“ फा तिमा शेख जोतीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम कर चुकी हैं। जब जोतीराव-सावित्रीमाई को उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा और उन...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
बी ते 9 जनवरी को गूगल ने फ़ातिमा शेख पर डूडल बनाकर उन्हें 191 वें जन्मदिन की बधाइयां पेश की। जिसके बाद देशभर में बधाइयों का सिलसिला चला। ...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com