पाकिस्तान किंवा मानवतेला भेडसावणारे कुठलेही प्रश्न
असो, सबीन लगेच त्यावर चर्चा, परिसंवाद घडवून आणायची. हिंमतीने ती प्रसंगाला तोंड
द्यायची. आपल्या कामामुळे अनेक जण दुखावत आहेत, याची पण तिला जाणीव होती. कराचीत
एका महिलेला अशा स्वरूपाचं काम करणं सोपं नाही.
पत्रकार आणि सामाजिक-राजकीय कार्यकर्त्यांसाठी
पाकिस्तान हे अत्यंत असुरक्षित राष्ट्र आहे. दरवर्षी २० ते २५ पत्रकारांची हत्या
होत आहे. धर्मनिंदाविरोधी कायद्यावर टीका करणाऱ्यांची किंवा असल्या प्रकरणातील
आरोपींचा बचाव करणाऱ्या वकिलांची दिवसाढवळ्या हत्या केली जाते. ही कटू वस्तुस्थिती
असूनही पत्रकार आणि सामाजिक-राजकीय कार्यकर्ते कुठल्याही दबावाला बळी न पडता आपली
जबाबदारी पार पाडताना दिसतात. अशाच एका जिगरबाज तरुणीची- सबीन महमूदची शुक्रवारी
रात्री अज्ञात इसमांनी गोळ्या घालून हत्या केली. सबीन महमूदच्या हत्येची बातमी
लगेच पसरली आणि संतप्त लोकांनी ट्विटरून, फेसबुकवरून निषेध नोंदवला. सबीनची हत्या
पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराची येथे करण्यात आली.
वाचा : लेडी पोलीस फैजा नवाजने वकिलाला घातल्या बेड्या
वाचा : लेडी पोलीस फैजा नवाजने वकिलाला घातल्या बेड्या
सबीन आपल्या आईसोबत कारने घरी जायला निघाली तेव्हा.
तिच्या कारच्या दोन्ही बाजूंनी मोटारसायकलवरून हल्लेखोर आले आणि त्यांनी गोळ्या
चालवल्या. ते लगेच पळूनदेखील गेले.सबीन ही उच्चशिक्षित तरुणी. इंटरनेट आणि
दळणवळणाच्या इतर आधुनिक साधनांतून जग सुखरूप आणि शांततामय बनवता येईल, यावर तिचा
विश्वास होता. स्वत: माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातली असल्यामुळे आपल्या
उद्दिष्टाच्या दिशेने तिचा प्रवास अखंड सुरू असायचा.
द सेकन्ड फ्लोर (T2F)
नावाच्या संघटनेतून सबीन कला आणि संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करीत असे.
पाकिस्तान किंवा मानवतेला भेडसावणारे कुठलेही प्रश्न असो, सबीन लगेच त्यावर चर्चा,
परिसंवाद घडवून आणायची. हिंमतीने ती प्रसंगाला तोंड द्यायची. आपल्या कामामुळे अनेक
जण दुखावत आहेत, याची पण तिला जाणीव होती. कराचीत एका महिलेला अशा स्वरूपाचं काम
करणं सोपं नाही. दोन वर्षापूर्वीच परवीन रहमान नामक आर्किटेक्ट आणि सामाजिक
कार्यकर्तीची हत्या झाली होती.
कराची हे अत्यंत स्फोटक शहर झालं आहे. वेगवेगळ्या
अतिरेकी संघटनाचं या शहरात अस्तित्व आहे.भारतात K आणि पाकिस्तानात B अक्षर अतिशय
संवेदनशील आहेत. हा K म्हणजे काश्मीर आणि B म्हणजे बलुचिस्तान. प्रस्थापित
विचारांपेक्षा वेगळं मत काश्मीरच्या बाबतीत मांडणाऱ्यांना भारतात अनेक जण लगेच
राष्ट्रविरोधी संबोधून मोकळे होतात.
बलुचिस्तान तर पाकिस्तानात त्याहुनही संवेदनशील व स्फोटक शब्द ठरला आहे. क्षेत्रफळाचा विचार केल्यास पाकिस्तानचा हा सर्वात मोठा प्रांत. अर्ध्या पाकिस्तानच्या आकाराइतका. मात्र सर्वात कमी लोकसंख्याही बलुचिस्तानात. नैसर्गिक वायू आणि खनिज पदार्थांनी संपन्न असलेल्या या प्रांतातील लोक मात्र सर्वाधिक गरीब. झारखंडबद्दल म्हटलं जात की, झारखंड श्रीमंत आहे पण झारखंडी गरीब.
तसंच बलुचिस्तानाबद्दल म्हटलं जातं की, बलुचिस्तान श्रीमंत आहेत पण बलुची लोक गरीब. या नैसर्गिक वायू आणि खनिज पदार्थावर चीन आणि पाकिस्तानच्या अन्य प्रांतांचा डोळा. चीनने बलुचिस्तानात ग्वादर नावाचं प्रचंड बंदर बनविलं आहे. सुई येथील नैसर्गिक वायूचा पाकिस्तानच्या पंजाबात मोठ्या प्रमाणात पुरवठा केला जातो. आपल्या नैसर्गिक वायू व खनिज पदार्थावर आपलं नियंत्रण नसल्याची खंत बलुची जनतेत आहे आणि मग त्यासाठी आंदोलन होतात. काही सामाजिक-राजकीय गट स्वतंत्र बलुचिस्तानची, तर काही स्वायत्तेची, तर काही अधिक अधिकारांची मागणी करतात.

स्वाभाविकपणे अशा प्रकारच्या आंदोलनांच्या विरोधात
सरकार, लष्कर, आयएसआय कठोर भूमिका घेत असताना आढळते. काही दिवसापूर्वीच चीनचे
अध्यक्ष शी जीनपिंग पाकिस्तानात येऊन गेले. चिनी अधिकारी आणि कामगार पाकिस्तानात
मोठ्या प्रमाणात काम करतात. दोन्ही देशांतील नेत्यांमध्ये त्यांच्या सुरक्षेची
चर्चा झाली. ग्वादरपासून ते चीनपर्यंत रस्ता बनविण्याची चीनची महत्त्वाकांक्षी
योजना आहे. बलुची जनता बाहेरून येणाऱ्या या आक्रमणाच्या विरोधात बोलत आहे.
सबीनने शुक्रवारी बलुचिस्तानच्या प्रश्नावर कराचीत एक परिसंवाद आयोजित केला होता. त्यात तिने माया कादीर, वसातुल्ला खान, मीर मोहमद अली तालपुर, फरझाना बलोच अशा पाकिस्तानातील नामवंत वक्त्यांना बोलावलं होतं. हा परिसंवाद २१ एपिलला होणार होता. परंतु आयोजकांना धमकी मिळायला लागल्यामुळे तो पुढे ढकलण्यात आला. यापूर्वी लाहोर येथे प्रतिष्ठित लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्सेसने बलुचिस्तानवर परिसंवाद आयोजित केला होता. परंतु शेवटच्या क्षणी तो रद्द करावा लागला. आपल्याकडे पुण्यात देखील एका प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेने शेवटच्या क्षणी काश्मीरवरील एक फिल्म दाखविण्यास नकार दिला होताच.

मामा कादीर हे मोठं नाव. गेल्या वर्षी त्यांनी
बलुचिस्तानची राजधानी क्वेटा ते इस्लामबाद असा लाँग मोर्चा काढला होता. त्यांची
मागणी अत्यंत साधी आणि सरळ होती. बलुचिस्तानात अनेक तरुण मुलं अचानक गायब होतात
आणि काही दिवसानंतर त्यांचा मृतदेह सापडतो. हा प्रकार बंद व्हायला पाहिजे, अशी
त्यांची मागणी. बलुचिस्तानात तरुण मुले वेगवेगळ्या आंदोलनात सहभागी होतात.
त्यातील अनेक स्वतंत्र बलुचिस्तानवाले आहेत. बलुची लोकांवरील अन्याय, अत्याचार थांबवावेत ही मागणी लोकांची आहे. आपल्या नैसर्गिक स्रोतांवर ते आपला अधिकार मागत आहेत. जवळपास १,२०० कि.मी. पायी चालून मामा कादीरनी अचानक अदृश्य होणाऱ्या तरुणांचा प्रकार जगासमोर मांडला. पाकिस्तानचं सर्वोच्च न्यायालयही याची चौकशी करत आहे.या पार्श्वभूमीवर सबीनवर हल्ला झाला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.

सबीनच्या हत्येनंतर मामा कादीरनी व्यक्त केलेली
प्रतिक्रिया बोलकी आहे. त्यांनी म्हटलं, ते मला पाकिस्तानच्या बाहेर जाऊ देत नाही.
ते मला लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस येथे बोलू देत नाहीत. आमच्या
अधिकाराबद्दल बोलण्यासाठी आम्ही कुठे जावं? आम्ही आमचा आवाज कुठे बुलंद करायचा?
आमचा परिसंवाद चांगला झाला आणि त्याला प्रतिसादही चांगला मिळाला.
कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर आम्ही काही वेळ तिथेच थांबलो. सबीन लांब राहात असल्यामुळे ती निघाली आणि थोड्या वेळात आम्ही गोळ्यांचा आवाज ऐकला. सबीनला काही दिवसापासून धमक्या मिळत होत्या. अचानक गायब होणाऱ्या लोकांसाठी ती आंदोलन चालवत होती.

बलुचिस्तानच्या प्रश्नावर बोलल्याबद्दल गेल्या वर्षी
हमीद मीर या वरिष्ठ पत्रकारावर कराची येथे हल्ला झाला होता. त्यात ते गंभीर जखमी
झाले पण वाचले. सलीम शेहझाद नावाचा एक पत्रकार ३-४ वर्षीपूर्वी अचानक अदृश्य झाला
आणि काही दिवसानंतर त्याचा मृतदेह सापडला.
सबीनच्या हत्येने पाकिस्तानने मानवाधिकाराच्या प्रश्नावर सातत्याने काम करणारी एक सच्ची कार्यकर्ती गमावली आहे, तर पुरोगामी चळवळीने एक मित्र. पंतप्रधान नवाझ शरीफपासून सगळ्यांनी सबीनच्या हत्येचा निषेध केला आहे. पण आवश्यकता आहे पत्रकार आणि सामाजिक-राजकीय कार्यकर्ते निर्भीडपणे आपली जबाबदारी पार पाडू शकतील, असे वातावरण बनवण्याची.

-जतीन
देसाई
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com