हुदान नैलाहला जगातून निरोप घेऊन महिना होतोय, पण ती नसण्याची पोकळी तिच्या सर्व फॉलोव्हर्सनी भरून काढलीय. तिला टीव्हीवर बघणारे दर्शक स्वत:ला नैलाह म्हणून प्रोजेक्ट करत आहेत. जणू तिच्या कामातून तिला अमरत्व प्रदान करण्याची धुरा त्यांनी सांभाळलीय.
नैलाहनं केलेल्या ‘हट के’ कामाचं कौतुक जगभरातून होतोय. दुसरीकडे तिच्या अकाली मृत्युबद्दल हळहळ व्यक्त होतेय. ती फेमस पत्रकार तर नव्हती पण तिनं केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल जगभरातील एकही असं वृत्तपत्र आणि न्यूज वेबसाईट नव्हते, ज्यांनी तिच्याबद्दल स्पेशल स्टोरी पब्लिश केली नाही.
बीबीसीने ‘चमकदार तारा’ आणि ‘एक सुंदर आत्मा’ म्हणून नैलाहचे वर्णन केलं आहे. मृत्युनंतर श्रद्धांजली म्हणून तिच्या ट्विटर आणि इंस्टावरील तिच्या बातम्यांचे अनेक फोटो फॉलोव्हरकडून शेअर केली जात आहे. या फोटोंसोबत अनेकांनी नैलाहबद्दल कृतज्ञतेच्या ओळी लिहून पोस्ट केल्या आहेत. अनेकांनी तिच्या या स्टोरीतून जगण्याची उर्मी मिळाल्याचे बोलून दाखवलंय. अनेकजण म्हणतात, तिनं चालू केलेला लढा आम्ही पुढेही निरंतर सुरू ठेवू.
कोण आहे नलायाह?
अल जझिरानं प्रकाशित केलेल्या विषेश लेखातून तिच्या व्यक्तिमत्वाबद्दल अनेक पैलू उलगडतात. नैलाह एक हौशी पत्रकार होती. पती फरीदसोबत नलायाह सोमालियनांसाठी ‘इंटिग्रेशन टीवी’ नावाचं ट्यूब चॅनल चालवत असे. त्याचे जगभरात लाखो सबक्राईबर आहेत. ती आपल्या रिपोर्टिंगमधून सोमालियातील उपासमार, दारिद्र्य, बेरोजगारी, गुन्हेगारी अशा नियमित बातम्या न करता जगण्याची उर्मी देणारे व इच्छा आकांक्षाना बळ देणाऱ्या हट के स्टोरी दाखवत असे. आपल्या न्यूज स्टोरीतून देशवासीयांना दारिद्य अवस्थेतून बाहेर पडण्याचा मार्ग नैलाह दाखवत असे. या सर्व स्टोरी ‘INTEGRATIONTV’ या युटयूब चॅनलवर बघायला मिळतील.
राजकीय तज्ज्ञाच्या मते, देशाच्या पुनर्बांधणीसाठी तिने केलेले प्रयत्न सोमालियनासाठी पॉझिटिव्ह एनर्जी देणारे आहे. ती प्रसिद्धीसाठी नव्हे तर सोमालींना संघटित करण्यासाठी पत्रकारिता करत होती. तिने केवळ सोमाली युवकच नव्हे तर जगभरातील तरूणांना प्रतिकूल परिस्थितीत जगण्यासाठी प्रेरणा नैलाहने दिलेली आहे. त्यामुळेच तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला लाखों दर्शक लाभलेले आहेत.
१३ जुलैला सोमालियाच्या किसनयो शहरात असारे नावाच्या हॉटेलात आत्मघाती स्फोट झाला. या हल्ल्यात ९ महिन्याची गर्भवती हुदान नैलाह आणि तिचा पती फरीद जुमा सुलेमानचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दोघांसह २६ जण या हल्ल्यात मरण पावले. या हॉटेलमध्ये मुक्कामी असलेल्या विदेशी पाहुण्यांना लक्ष करून हा हल्ला करण्यात आला होता. अल शबाब या संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी घेत जगातील पत्रकारांना वंशभेदापासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे.
सकारात्मक व्यक्तिमत्व
एका फेसबुक पोस्टमधून तिच्या कुटुंबियांनी नैलाहच्या मृत्युच्या वृत्ताला दुजोरा दिला. तत्पूर्वी अनेक मीडिया पर्सन नैलाहच्या मृत्युबद्दल साशंक होतं. कुटुंबियांनी नलायाहला श्रद्धांजली वाहताना म्हटलंय, “नैलाहने आपले जीवन सोमाली लोकांची सेवा करण्यासाठी समर्पित केलं आणि त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह आणि उर्मी देणाऱ्या अनेक बातम्या व रिपोर्ताज दिलेल्या आहेत. तिच्या या कार्यातून तिला सोमालियन लोकं अतिव प्रेम आणि प्रार्थना देत आहेत." नैलाहच्या दुर्दैवी मृत्युबद्दल अनेकांनी दुख व्यक्त केलं आहे.
४२ वर्षीय नैलाह कॅनेडियन नागरिक होती. ६ वर्षांची असताना तिनं आई-वडिलांसह सोमालिया सोडला. उत्तर सोमालियाच्या लास अनोड शहरात तिचा जन्म झाला होता. पण देशातील अस्थिर वातावरणामुळे आपल्या लहान मुलांसह कॅनडात आश्रय घेतला.
काही महिन्यापूर्वी मायदेशी परत आली होती. इलेक्ट्रॉनिक मीडियाचे शिक्षण घेतलेल्या नलायाहने २०१४ला आपला स्वत:चा ऑनलाईन मीडिया सुरू केला होता. आपल्या इंटिग्रेशन टीवीमधून ती सोमाली वंशाच्या कॅनडियन लोकांच्या सामाजिक स्थिती आणि लोक संस्कृतींना स्थान देत असे.
याशिवाय ती प्रत्यक्ष सोमालियात जाऊन तिथल्या शैक्षाणिक, राजकीय आणि सांस्कृतिक घटनांचा वेध घेत असे. तिचे म्हणणे होते की, “आपणच आपले प्रश्न आणि सामाजिक समस्यांना घेऊन सजग झालो नाही तर आफ्रिकेतील अडव्हेंचर कथांपुरतेच आपले अस्तित्व शिल्लक राहील.”
वेगळेपण सांगणाऱ्या तिच्या वृत्तकथांमुळे कॅनडात अनेक सकारात्मक बदल दिसून आल्याचे स्थानिक सरकारने म्हटलेले आहे. हा बदल तिला आपल्या देशात हवा होता, त्यासाठी ती स्वदेशी परतली होती. सोमालियात तिने आपलं काम अधिक उत्साहानं सुरू केलं.
नुकतेच तिनं सोमालियन महिला उद्योजकांवर वेब सिरीज पब्लिश केली आहे. ही सिरिज बरीच लोकप्रीय झाली आहे. याशिवाय तिने आपल्या विविध स्टोरीमधून लास अनोड शहरातील सांस्कृतिक घडामोडींवर लक्ष केंद्रित केले होते. तिच्या सर्व स्टोरी #SomaliaSuccess आणि #SomaliPositivity या हैशटॅगमधून सोशल मीडियावर शेअर झालेल्या आहेत. तिच्या बऱ्याच स्टोरी सोमालियन संस्कृती आणि तिथल्या सामाजिक जीवनाला हायलाइट करणाऱ्या आहेत.
कॅमेऱ्याच्या लेन्सनं शोधलं नवं जग
तिच्या अकाली मृत्यनुंतर सोशल मीडियावर तिने केलेल्या वेगवेगळ्या बातम्यांचे फोटो व व्हीडिओ शेअर केली जात आहेत. नेटकर्सनी नैलाहला श्रद्धांजली वाहताना तिचे ‘प्रेरणादायक’ असे वर्णन केले आहे. तिच्या अनेक मित्रांनी सोशल मीडियावर तिच्याबद्दल लिहिताना म्हणतात, ‘तिने आपली लोक आणि मातृभूमीचे सर्वोत्कृष्ट प्रतिनिधित्व केलं आहे. ती नेहमी लोकांमध्ये किंवा लेन्सच्या नजरेतून आढळलेल्या गोष्टींमध्ये सौंदर्य शोधत असत. सामान्य दर्शकांना दिसत असलेल्यापेक्षा वेगळा सोमालिया ती आपल्या कॅमेऱ्यातून सांगायची."
बीबीसीचे सोमालियन पत्रकार फरहान जिमाले म्हणतात, "ती विशेषत: तरूणांसाठी प्रेरणास्थान होती. ती इंग्रजी आणि सोमाली अशा दोन्ही भाषांमध्ये बोलत होती, म्हणून वृद्ध सोमालियन आणि तरुण यांच्यात एका पुलासारखी होती."
नैलाहच्या मृत्युनंतर इंटिग्रेशन टीव्हीने तिच्यावर अडीच तासांचं स्पेशल फीचर रिलीज केलं आहे. यातून तिच्या कामाचे अनेक वेगवेगळे पैलू डोळ्यासमोर येतात. तसंच देशातील लोकांबद्दल व राष्ट्राबद्दल असलेले अतीव प्रेमाचे दाखले या विषेश फिचरमधून मिळतात.
हा हल्ला ठरवून केलेला होता, असं काही न्यूज एजन्सीजनी म्हटलंय. अल् शबाब संघटनेनं यापूर्वी विदेशी पत्रकारांना धमक्या दिलेल्या होत्या, असं अल जझिराचं म्हणणे आहे. अल् शबाब यां संघटेनेनं २००६ पासून हजारो निष्पाप सोमालियन नागरिकांचा बळी घेतला आहे.
दारिद्र्य, गरिबी, उपासमार आणि वंर्णभेदाने ग्रासलेल्या या देशाला गेल्या दशकभरापासून दहशतवादाने घेरलं आहे. धर्माच्या नावावर काही माथेफिरू उपाशी, गरिब, निराश्रित लोकांचा बळी घेत आहेत. कुठलाही धर्म मानवता शिकवतो, हिंसा नाही. धर्माच्या नावावर झालेल्या या हिंसेत नलायाहसारख्या जगण्याची उर्मी व प्रचंड उर्जा देणाऱ्या एका प्रेरणादायी व्यक्तीचा अंत होणे त्या मानवीय धर्माचा गळा घोटण्यासारखे आहे.
कलीम अजीम, पुणे
Twitter@kalimajeem
जाता जाता वाचा :
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com