गेल्या आठ महिन्यापासून जग कोरोना संकटाशी दोन
हात करतोय. काही देशात परिस्थितीनं विदारक स्परूप धारण केलं आहे तर बरेच देश आता
कोरोनामुक्तीच्या मार्गावर वाटचाल करत आहेत. त्यात पहिला नंबर न्यूजीलँडचा लागतो.
न्यूजीलँडसह नऊ देशांनी कोविड-19पासून मुक्ती मिळवली आहे.
वेगवेगळ्या प्रयोगामुळे सतत चर्चेत असणारा
न्यूजीलँड सध्या कोरोनामुक्तीसाठी जगभरातील शुभेच्छा संकलित करत आहे. या देशात जून
महिन्यापासून एकही कोविड पेशंट आढळला नाही. जनतेला धन्यवाद देत पंतप्रधान जेसिंडा
आर्डन यांनी देशाला कोरोनामुक्त घोषित केलंय. 8 जूनपासून देशातील सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना
मागे घेण्यात आल्या आहेत.
50 लाख लोकसंख्या असलेल्या या देशात
कोरोनामुक्तीचा बहुमान तरुण आणि महिलांना मिळतोय. दक्षता, योग्य नियोजन, संवेदनशिलता व दूरदृष्टी हा पंतप्रधान जेसिंडा
यांचे गुण आहेत. या कौशल्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून त्या सर्वोच्च प्रमुख
म्हणून जगभरात मानांकित झाल्या आहेत.
देशात मार्च महिन्याच्या दूसऱ्या आठवड्यात पहिले
6 कोविड पेशंट आढळले. त्यानंतर देशात बाहेरून येणाऱ्या सर्व प्रवाशांना सेल्फ
आइसोलेशन बंधनकारक केलं गेलं. लोकांना एकत्र येण्यास मनाई हुकूम काढण्यात आला. 25 मार्चला संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा झाली.
वाचा : ब्राझील #ब्लॅक लिव्हस
मेटर
न्यूजीलँडची कामगिरी
जगभरात एप्रिल-मे महिन्यात या रोगराईचा प्रसार झपाट्याने होत होता. परंतु न्यूजीलँडमध्ये मात्र ही संख्या 1154 वर येऊन थांबली. कोविमुळे देशात फक्त 22 माणसांचा मृत्यु झाला. आज देशात एकही कोरोना पेशंट नाहीये. याचं श्रेय पंतप्रधानांनी जनतेला दिलंय. विशेष म्हणजे तरुणाईनं कसोशीनं पाळलेल्या सूचना व नियमांची केलेली अंमलबजावणीला त्यांचं हे क्रेडिट असल्याचं त्या म्हणाल्या.
रॉयटर्सच्या मते कोरोनामुक्तीची घोषणा करताना त्यांनी ‘काम अजून संपलेलं नाही. वायरसला संक्रमणापासून पूर्णपणे रोखलं आहे, पण या दिशेने आमचे प्रयत्न अजून सुरू’ राहतील.’ असं म्हटलं. घोषणेच्या वेळी त्यांनी हॅप्पी डांस करून जल्लोषदेखील केला.
37 वर्षीय जेसिंडा आर्डन जगभारीतल तरुणाईच्या आयकॉन झाल्या आहेत. देशावर आलेल्या प्रत्येक संकटाच्या वेळी त्या ठामपणे उभ्या राहिल्या. अबॉर्शन लॉ, प्रोटेस्टंट-कॅथलिक संघर्ष असो वा दहशतवादी हल्ला त्यांनी ठामपणे सर्वांचा मुकाबला केला.
इराकवरील अमेरिकेचा हल्ला असो वा चीन व म्यानमारमधील अल्पसंख्याकाचे शोषण किंवा डोनाल्ड ट्रम्प यांचा महिला संदर्भातील दृष्टिकोन आदी प्रकरणात त्यांनी नेहमी आपली मानवीय भूमिका वठवली. त्यांच्या या एकूण कामगिरीबद्दल फोर्ब्स मैगझीनने त्यांना 2019 मध्ये जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तीमध्ये स्थान दिलं. तर टाइमनं ‘पर्सन ऑफ द इयर’ म्हणून त्यांचा सन्मान केला.
A quarantine bungle has allowed #Covid19 back into New Zealand, with Prime Minister Jacinda Ardern calling the mistake "absolutely nonsensical". https://t.co/WcDjNwCq4n pic.twitter.com/dC1n4pdrdk— SCMP News (@SCMPNews) June 17, 2020
2017मध्ये पंतप्रधान पदाचा शपथविधी होताच त्यांनी
आपण प्रेगनंट असल्याची घोषणा केली. त्यावेळी त्यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केली
गेली. त्यांना ट्रोल करण्यात आलं. पण त्यांनी या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करत
आपल्या कामावर लक्ष केंद्रीत केलं. आज त्यांच्या कर्तृत्वाची दखल जगाने घेतली आहे.
कोरोना संकटाशी योग्य सामना केल्याबद्दल
झालेल्या सर्वेक्षणात 59.5 टक्क्यांनी त्यांची पॉपुलॅरिटी वाढली आहे. त्या
न्यूजीलँडच्या सर्वात लोकप्रिय पंतप्रधान ठरल्या आहेत. कोविडमुक्तीसाठी त्यांनी
केलेले प्रयत्न आज जगभरात चर्चेचा विषय आहेत. संकटातून बाहेर पडण्यासाठी सुपर पावर
असण्याची गरज नाही, हे त्यांनी दाखवून दिलं. योग्य वेळ साधून केलेलं
नियोजन आणि त्याचं प्रामाणिकपणे केलेलं पालन कुठलंही संकट दूर लोटू शकते, हा महत्वाचा संदेश त्यानी आपल्या प्रयत्नातून दिला आहे.
वाचा : अफगाणिस्तानात
स्वस्त व्हेटिलेंटर्स बनविणाऱ्या मुलींची गोष्ट
कोविडमुक्तीचा फिजी मॉडेल
फिजी तसा कमी लोकसंख्येचा गरीब देश. पर्यटन हा
देशाचा प्रमुख व्यवसाय. स्पा, हॉटेलिंग व समुद्र पर्यटनावर देशाचा मोठा जीडीपी
उभा आहे. कोरोना संकट आणि जगव्यापी टाळेबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली
असून जनतेला त्याचा मोठा फटका बसत आहे.
न्यूजीलँड व फिजीत पर्यटन करार आहेत.
न्यूजीलँडची बरीच मंडळी फिजीत व्यवयाय करते. त्यातून कर रूपात मोठा अर्थलाभ फिजीला
होतो. कोरोना संकटानंतर बरेच न्यूजीलँडवासी मायदेशी परतले. त्यामुळे स्थानिक
व्यवसाय व व्यवहारावर त्याचा परिणाम होतोय.
फिजीत या रोगराईचा सर्वाधिक फटका तरुणांना बसला
आहे. कारण पर्यटन संबंधी व्यवसायात जसे स्पा,
बार, टुरीस्ट ऑपरेटर, गाईड आदीत तरुणांची मोठी संख्या आहे. शिवाय अन्य
उद्योगातही तरुणाची संख्या लक्षणीय आहे. बँकाक पोस्टच्या मते फिजीत कोरोना
संकटामुळे 150,000 हून अधिक कामगार प्रभावित झाले. इतकं गंभीर
संकट असूनही कोविडमुक्तीनंतर तुर्तास पर्यटन सुरू करणार नसल्याची घोषणा या देशानं
केली आहे.
Fiji has just cleared the last of our active #COVID19 patients.— Frank Bainimarama (@FijiPM) June 4, 2020
And even with our testing numbers climbing by the day, it's now been 45 days since we recorded our last case. With no deaths, our recovery rate is 100%.
Answered prayers, hard work, and affirmation of science!
5 जूनला फिजीनं स्वत:ला कोरोनामुक्त घोषित केलं. 9 लाखांची लोकसंख्या असलेल्या या देशात मार्चमध्ये कोरोना संक्रमणाची 18 प्रकरणे समोर आली. पण विशेष म्हणजे एकाचाही मृत्यू झाल्ला नाही.
इथं आढळलेले सर्व पेशंट वायरस मुक्त झाली आहेत.
पंतप्रधान फ्रैंक बैनिमारमा यांनी ट्विट करून देशवासीयांना धन्यवाद दिले आहेत. 45 दिवसांपासून एकही नवा पेशंट फिजीत आढळला नसून आम्ही करोनामुक्त झालो. आमचा
रिकवरी रेट 100 टक्के राहिला, असं त्यांनी लिहिलंय.
तरुणाईचा पुढाकार
फिजी प्रशांत महासागरच्या त्या काही देशात होता, ज्यांना संक्रमणाची लागण झाली होती. या दहशतीतून अनेक लोक मायदेशी परतले.
त्यात ब्रिटेनच्या नागरिकांची सख्या अधिक होती. आता फिजी कोरोनामुक्त आहे तर
ब्रिटेन मृत्यूदरात तीन नंबरवर आहे.
चक्रीवादळातून सावरतोय तोच कोरोना संकट नवं
आव्हान म्हणून पुढं आलं. या नव्या संकटाचा सामना करण्य़ासाठी तरुणांनी पुढाकार
घेतला. फिजी तरुणांनी ताळेबंदी काळात सरकारला सर्वोतोपरी सहकार्य केलं.
अनेकांनी आपला व्यवसाय स्वत:हून बंद केला.
उपजीविकेच्या संकटापेक्षा त्यांच्यापुढे कोरोनाचं संकट अधिक बलाढ्य होतं. त्यावर
मात करण्याची इच्छा बाळगून तरुणांनी जनतेला सरकारी निर्बंधांचे कसोशीनं पालन
करण्याचं आवाहन केलं. गट स्थापन करून पोलीस व सरकारी यंत्रणेला मदत केली.
दूसरीकडे रस्त्यावर येऊन हुदडंग माजवणारी तरुण
मुलेही विविध प्रातांत दिसली. पण त्यांना वेळीच जेरबंद करण्यात आलं. परदेशातून
आलेल्या पर्यटकांची ओळख करून त्यांना आयसोलेट करण्यात आलं. लॉकडाऊन काळात
तरुणांच्या गटांनी एकत्र येऊन लहान मुलांच्या शिकवणी घेतल्या. फिजी तरुणांच्या
मदतीसाठी कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग आणि यूएसपी ग्लोबल संस्थांनी पुढाकार घेतला. बँकाक
पोस्ट म्हणते तरुणांची जगण्यासाठीची ही धडपड होती. वृतपत्रानं लिहिलं आहे की
साथीचा रोग नियंत्रणात आणण्यासाठी फिजी तरूणांनी महत्वाची भूमिका बजावली.
अन्य देश
कोरोनाच्या विरोधात लढा देण्यासाठी काही देशांनी
वेळीच पावले उचलली. तर काहींनी संकट समजून घेण्यात गल्लत केली.
ज्या देशांना भविष्याची चाहुल लागली त्यांनी वेळीच शक्य त्या
उपोययोजना केल्या. त्यांना त्याचा मोठा फाय़दाही झाला.
जगात कमी लोकसंख्या असलेल्या काही देशांनी कोरोनावर पूर्णपणे विजय मिळवला आहे. ज्यात न्यूजीलैंड, फिजीनंतर टांझानिया, मॉन्टेनीग्रो, वेटिकन सिटी, सेशेल्स, सेंट किट्स एंड नेविस, इरिट्रिया, मोंटेनेग्रो,
होली सी, तिमोर लेस्ते आणि पापुआ न्यू गिनी यांचा समावेश आहे. या सर्वांची जनसंख्या असल्यानं त्यांना वायरसचा पार्दूर्भाव लवकर रोखता आला.
तुर्त जगात कोविड-19चा प्रादूर्भाव वाढतो आहे. शेवटची वृत्त हाती
आलं त्यावेळी जगभरात 78.92 लाख माणसं संक्रमित झाली होती. तर मृत्यु झालेल्यांचा आकडा 4.33 लाख होता. अमेरिकेनंतर ब्राझील, ब्रिटेन इटलीचा समावेश सर्वाधिक फटका बसणाऱ्या देशाच्या यादीत अग्रस्थानी
आहेत.
मुक्तीचा दावा करणाऱ्या चीनमध्ये वायरसनं पुन्हा
डोके वर काढलं आहे. बीजिंगमध्ये संक्रमणाची लाट आली आहे. कोरोनामुक्त झालेल्या
देशांचे मॉडेल समोर ठेवून संकटाशी दोन हात करण्याचा प्रयत्न सगळे देश करत आहेत. एकीकडे आर्थिक संकट तर दूसरीकडे मृत्यु असा
दूहेरी संकटातून लवकर जग बाहेर पडो अशी अपेक्षा करूया.
(सदरील लेख लोकमतमध्ये प्रकाशित झालेला आहे)
जाता जाता हे ही वाचा:
Twiter@kalimajeem
FB/Kalim Ajeem
मेल-kalimazim2@gmail.com

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com