अमेरिकेच्या जॉर्ज फ्लॉयडच्या दुर्दैवी घटनेनंतर
ब्राझीलमध्ये वर्णद्वेशातून एका पाच वर्षीय बालकाच्या मृत्यु झाला. घटनेनंतर
ब्राझीलमध्ये #ब्लॅक लिव्हस मेटर ट्रेंडनं वर्णद्वेषी विकृतीवर जोरदार हल्ला चढवला जात आहे.
लॉकडाऊनच्या काळात फिजिकल डिस्टिन्सिंगचे नियम तोडत हजारो माणसं रस्त्यावर उतरली.
त्यातून हे आंदोलन आकाराला आलं. या निमित्ताने जगभरात रंग, केशरचना,
दिसणे इत्यादींवरून तिरस्कार करण्यांविरोधात कडक कारवाईची
मागणी होत आहे.
कोरोनामुळे होत असलेल्या सर्वाधिक मृत्युच्या आकडेवारीत
ब्राझील जगात अमेरिकेनंतर दूसरा देश आहे. या लॅटीन अमेरिकन देशात कोरोनामुळे
आत्तापर्यंत 6 लाख 92 हजार माणसं संक्रमित झाली असून 36,499 लोकांचा
मृत्यू झाला आहे. बीबीसीनं जारी केलेली ही आकडेवारी कदाचित शेवटची असू शकते. कारण
इथून पुढे मृत्युचे आकडे सार्वजनिक न करण्याचा निर्णय ब्राझीलनं घेतला आहे.
सरकारच्या हलगर्जीपणामुळे देशात कोरोनाबाधितांची संख्या
वाढतेय,
असा आरोप करत राष्ट्रपती जॉयर बोल्सोनारो यांना ट्रोल केलं
जात आहे. विरोधक व सामान्य लोकांच्या टीकेपासून बचाव म्हणून मृतांची माहिती अधिकृत
सर्व्हरवरून काढून टाकली आहे.
अमेरिकेचं अनुकरण करू पाहणाऱ्या या देशात कोविडमुळे भीषण
परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून अमेरिकेत वर्णद्वेशावरून
कल्लोळ माजला आहे. अशावेळी हीच विकृत घटना ब्राझीलमध्ये घडली. परिणामी ब्राझील
सध्या अशांत देश झाला आहे.
वाचा
: अफगाणिस्तानात
स्वस्त व्हेटिलेंटर्स बनविणाऱ्या मुलींची गोष्ट
काय आहे घटना
प्रतिष्ठित जर्मन मीडिया हाऊस डॉयच्च वेलेनं याबद्दल प्रथम
अधिकृत माहिती उपलब्ध करून दिली. वेबसाईटच्या मते 3
जूनला ही घटना घडली. पर्नाम्बुको राज्याच्या राजधानी रेसिफे शहरातला हा प्रसंग
अंगावर शहारा आणणारा आहे.
मिर्तेस रेनाटा सौझा ही एक घरकामगार महिला. आपले पाच वर्षीय
मुल मिगुएलला घेऊन ती सकाळीच कामावर गेली. शाळा बंद असल्याने हल्ली तो आईसोबतच
असायचा. मालिकीनीने रेनाटाला बाहेरून कुत्रा फिरवून आणण्यास सांगितलं. मुलाला
मालकिनीच्या देखरेखीत ठेवून ती बाहेर पडली.
कुत्रा फिरवून रेनाटा घराकडे परतली. इमारतीच्या आवारात आईला
आपलं मूल रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेलं दिसलं. रेलिंगवरून पडून त्याचा
मृत्यू झाला होता. सीसीटीवी फूटेजवरून या घटनेचं गंभीर पैलू समोर आले. मिर्तेस
रेनाटा बाहेर पडताच मालकिनीनं तिच्या मुलाला बाहेर सर्विस एलिवेटरजवळ आणून सोडलं.
पायऱ्यावरून तो वरच्या मजल्यावर गेला.
सुरक्षा कॅमेर्याच्या फुटेजवरून दिसते की मुलगा नवव्या
मजल्यावरील लिफ्टमधून बाहेर पडला आणि खिडकीतून एका बाल्कनीच्या रेलिंगवर चढला.
थोड्याच वेळातच त्याचा मृत्यू झाला. मीडिया रिपोर्ट सांगतात की, मालिकीने जाणून-बुजून नोकराच्या मुलाकडे दुर्लक्ष केलं. इतकच नाही तर तिनं
मुलाच्या हाताला धरून एलिवेटरवर सोडलं.
ब्लॅक लिव्हस मेटर
मिगुएल हे मिर्तेस रेनाटा सौझाचे एकुलते एक मूल होते.
त्याच्या निधनानंतर,
रेसिफे शहरात संतापाचे लोंढे रस्त्य़ावर उतरले. वर्णभेदाचा
आरोप करत विकृत मानसिकतेविरोधात लोकांनी निदर्शनं सुरू केली. रंगभेदातून लहान
मुलाची हत्या झालीय असा आरोप होत आहे.
घटनेच्या दिवशी शेकडों लोकं रेसिफेच्या रस्त्यावर होती.
पोलिसांच्या गोळीबार व प्रतिकारापासून बाचाव म्हणून तरुण-तरुणी रस्त्यावर उताणी
झोपली होती. प्रत्येकांच्या हातात ब्लॅक लिव्हस मेटर या आशयाचे निषेध फ्लेक्स
होते. फिजिकल डिस्टन्सचा नियम पाळत आंदोलन सुरू होतं. विषेश म्हणजे यात गोऱ्या
ब्राझीलियन्सचा देखील समावेश होता.
सोशल नेटवर्क्सवर केवळ दु:ख आणि धक्काच नव्हे तर द्वेष आणि
संताप व्यक्त करण्यात आला. सेलिब्रिटी, राजकारणी आणि
कार्यकर्त्यांनी न्यायाची मागणी करत #justicapormiguel हॅशटैग
मोहीम सुरू केली. अनेक मान्यवर मंडळी घटनेवर शोक व्यक्त करत लिहित होते. मिगुएलला
न्याय मिळावा यासंदर्भात एका ऑनलाइन याचिकेवर 24 तासांपेक्षा कमी
कालावधीत 680,000 हून अधिक सह्या गोळा झाल्या.
रॅपर, लेखक जॉयस फर्नांडिस यांनी
गोऱ्या लोकांच्या वर्णद्वेशी मानसिकतेवर हल्ला केला. ते लिहितात, “शापित पांढरपेशा व पतन होत असलेल्या समाजाच्या मानसिकमुळे एक आयुष्य संपलं.
माझ्या पूर्वजांना गुलाम बनवणाऱ्या व वारशाने मिळालेल्या पैशाने सर्व काही विकत
घेणाऱ्या उच्चवर्गाची ही वृत्ती निंदनीय आहे.”
मुलाच्या मृत्युवर दुख व्यक्त मिगुएलची आई म्हणाली, “माझ्या मालकाने तिच्या मुलांना वारंवार माझ्याकडे सोपवले. मी त्यांची काळजी
घेतली. दुर्दैवाने जेव्हा मी माझ्या मुलाची जबाबदारी तिच्यावर सोपविली तेव्हा
त्याच्याकडे तिनं लक्ष दिलं नाही. त्याला धोकादायक एलिवेटरकडे सोपवलं.”
वर्ग-आधारित समाज
कृष्णवर्णीयांवर कोरोना आजारावर उपचार करताना होणाऱ्या
भेदभावात ब्राझीलही आहे. वॉशिग्टन पोस्टच्या मते, रिओ
दि जिनेरो शहरात कोविड19चा पहिला रुग्ण हा एक वृद्ध घरकामगार होता. आपल्या मालकाकडून त्याला लागण झाली
होती. मार्चमध्ये तो इटलीहून परतला होता. मालकाची टेस्ट झाली. परंतु पॉजिटीव
असल्याचं त्यानं घरकामगाराला कळवलं नाही. 1 मार्चला रिओच्या एका
हॉस्पिटलमध्ये त्या 63 वर्षीय डायबेटीस पीडित नोकराचा मृत्यू झाला.
मिर्तेस रेनाटा सौझा ज्या घरात काम करते त्याच्या मालकाला
कोविडची लागण झालेली आहे. मालक सर्जिओ हॅकर हे रेसिफे जवळील नगराचे महापौर आहेत. 22 एप्रिल रोजी एका सेल्फी व्हिडिओत त्यांनी आजाराची माहिती दिली. विशेष म्हणजे
अशावेळी त्यांनी घरातील नोकरांना सुटी द्यायला पाहिजे होती. परंतु त्यांनी
सर्वांना कामावर येण्याची ताकिद केली.
एएफपी वृत्तसंस्थेनुसरा अशाच घोडचुकीमुळे ब्राझीलमध्ये
कोरोनाचे संक्रमण वाढले आहे. मीडिया रिपोर्ट सांगतात की बाधितामध्ये आफ्रिकन वंशीय
कृष्णवर्णीयांची संख्या अधिक आहेत. धक्कादायक म्हणजे मृतांमध्ये तरुणांचा आकडा
मोठा आहे. कोरानामुळे जगात सर्वाधित तरुणांचा ब्राझीलमध्ये मृत्यु झाला आहे.
आपत्तीच्या
दिशेने
ब्राझीलनं मृतांत रशियाला मागे टाकलं आहे. न्यूयॉर्क
टाइम्सच्या मते ब्राझीलमध्ये कोरोना व्हायरस आपत्तीच्या दिशेने मार्गक्रमण करत
आहे. उपचाराविना मरणारे लोकं ब्राझीलमध्ये वाढली आहेत. परंतु सरकार मृतांची योग्य
आकडेवारी जाहीर करत नसल्याचा आरोप विरोधक करत आहेत. आकडेवारीत हेराफेरी झाली असून
सरकार याबाबत गंभीर नसल्याचं म्हटलं जात आहे.
आरोपांचा बचाव म्हणून सरकारने मृतांची आकडेवारीच काढून
टाकण्याची घोषणा केली. तसंच कृतीवर टीका करणाऱ्या डब्ल्यूएचओमधून
बाहेर पडण्याचे संकेतही ब्राझीलनं दिले आहेत. राजकारण, आरोप प्रत्यारोपात ब्राझीलमध्ये कोरोना संक्रमणाचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे.
ह्यूमन राइट वॉच या मानवी हक्क संघटनेच्या मते ब्राझीलमध्ये
अलीकडच्या काळात कृष्णवर्णीय समुदायाविरोधात वर्णविद्वेषी हल्ले चिंतनीय बाब
झाली आहे. राष्ट्रपती जॉयर बोल्सोनारो यांच्या कारकीर्दीत
हल्ल्यांच्या घटनात वाढ झाली आहे असंही
संघटनेचं मत आहे.
बोल्सोनारो परंपरावादी व मूलतत्त्ववादी विचारांचे मानले
जातात.
त्यांची वादग्रस्त विधाने रोज नव-नवे वाद उत्पन्न करीत असतात. सामाजिक संघटनांचं
म्हणणं आहे की ही विधाने द्वेश आणि तिरस्काराला बळकटी मिळवून देतात.
यूरोपसह, लॅटिन अमेरिकेत वर्णभेद ही 21व्या शतकात गंभीर बाब म्हणून पुढे आली आहे. अमेरिकेत अशा मानसिकतेचे विकृत
प्रकार बातम्यांचा विषय होतात. ही सरंजामी मानसिकता बदलण्याची कुणाचीही तयारी
नाही. कोरोना वायरसच्या रोगराईत जगातील काही देशात गरीब-वंचित समुदायावर
संक्रमणाचा आरोप करत त्यांच्याविरोधात तिरस्काराची वृत्ती वाढली आहे. ही धक्कादायक
बाब पायंडा पडण्यापूर्वी त्याला रोखण्याची गरज आहे.
(सदरील लेख लोकमतमध्ये प्रकाशित झालेला आहे)
कलीम अजीम, पुणे
Twiter@kalimajeem
FB/Kalim Ajeem
मेल-kalimazim2@gmail.com
जाता जाता हे ही वाचा

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com