कोरोना आणि वाढते कौटुंबिक अत्याचार

फ्रान्सचं एक शांत शहर नैंसी स्थित एका केमिस्टच्या दुकानात एक महिला येते आणि औषधाचं निमित्त करून मदत मागते. ती दुकानदाराला सांगतेलॉकडाउन सुरू झाल्यापासून तिचा नवरा तिला दररोज मारहाण करतोय आणि शिव्या देतोय. फोनदेखील वापरू देत नाही. बऱ्याच प्रयत्नाअंती औषधं घेण्याच्या निमित्तानं मुलांना घेऊन ती बाहेर पडली आहे. महिलेची व्यथा ऐकून तो दुकानदार पोलिसांना फोन करतो. काही तासात पोलीसरेस्कयू टीमसोबत हजर होतात. पोलीस पतीला अटक करून महिला आणि तिच्या मुलांना रेस्क्यू करते.
लाईव्ह लॉ’ या कायदेविषयक वेबपोर्टलवर परदेशातील ही एक घटना नोंदवण्यात आली आहे. भारतात परिस्थिती या उलट आहे. तात्काळ मदत तर लांबच राहिली पण मारहाण करणाऱ्या पुरुषावर साधी कारवाईदेखील झाल्याची बातमी कुठे निदर्शनास आलेली नाही. अर्थातच याला तक्रार न करण्याची भारतीय मध्यमवर्गीय मानसिकताही तेवढीच जबाबदार आहे.

वाचा : लॉकडाऊन डायरी : भग्न मनाचे अस्वस्थ अवशेष 
वाचा : 
आणि मैक्सिकोत महिला झाल्या अदृष्य

राष्ट्रीय महिला आयोगाच्या मते 24 मार्च नंतर भारतात कौटुंबिक हिंसाचारात वाढ झाली आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या आठवड्यातच तब्बल 257 तक्रारी मंडळाकडे आल्या होत्या. स्थानिक पातळीवरही असा तक्रारी वाढल्या आहेत. कौटुंबिक हिंसाचाराची जगभरात हीच परिस्थिती आहे. याची दखल घेत संयुक्त राष्ट्र संघाने पत्रकार परिषद घेत याचं गांभीर्य पटवून देण्याचा प्रयत्न केला. विविध क्षेत्रीय भाषेत निवदेन जारी करत प्रत्येक देशाला घरगुती हिंसाचार रोखण्याच्या उपाययोजना करण्याची विनंती केलेली आहे.
का वाढत आहेत घटना
कोराना वायरसमुळे जवळ आलेल्या मृत्युचं भय तर दरवाज्याआड एकटेपणाहतबलता आणि त्यातून बंदिस्त जगणं वाट्याला आलं. जगात 150 देशामध्ये कोरोना वायरसची आपत्ती ओढवली. वैश्विक पातळीवर कोरोना रोगराईमुळे भयान शांतता अनुभवायला मिळते आहे. एखाद्या फिक्शन कादंबरीसारखी जगाची अवस्था झाली आहे. जणू एका बटनावर जगानं पॉझ घेतला असावाअशी स्थिती आहे.
संसर्गजन्य आजार असल्याने एकाहून दूसरातिसराचौथापाचवा अशी या रोगराईच्या संक्रमणाची साखळी आहे. या रोगावर अद्याप कुठलीही लस उपलब्ध झालेलं नाही. त्यामुळे प्रादूर्भाव झाला तर पुढ्यात विदारक व अटळ मृत्यू वाढून ठेवलाय. प्रसार ऱोखण्याच्या दृष्टीने ‘फिजिकल डिटन्सीचा आधार घेत लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे.
शट डाऊन घोषित झाल्याने सगळं काही बंद झालं आहे. शाळा, कॉलेज, ऑफिसेस, कारखाने, कंपन्या, बाजार, वाहतूक सर्वकाही बंद होऊन मनुष्यबळ घरात कोंडलं गेलं. अनेकांचे रोजगार गेले. हातातला पैसा संपत आला. ठेविणीतल्या व सेव्हिंगच्या मिळकतीवर गुजराण सुरू आहे. मध्यमवर्ग हलाखीत लोटला जात आहे. कामगार, मजूर, गरीब व निराश्रीत कुटुंबे उपासमार व अन्न-पाण्याविना भूकबळी ठरत आहेत.
चोहीकडे नैराश्यअनिश्चितता व अस्वस्थता बोकाळली आहे. फ्रस्टेशन, डिप्रेशनअनिद्रा व चिडचिड वाढली आहे. परिणामी घरात बंदिस्त असलेली लोकं ऐकमेकांवर राग काढत आहेत. त्यातून हिंसाचाराला बळकटी मिळत आहे. रिसर्चेर्स डाटा पोर्टलच्या रिपोर्ट्सचा आधार घेतला तर असं दिसून येईल कीतनावपूर्ण वातावरण नेहमीच कौटुंबिक हिंसांचाराला बळकटी प्रदान करतो.
विविध सर्वेक्षणाची आकडेवारी सांगते की2008च्या जागतिक मंदीच्या काळात जगभरात कौटुंबिक हिंसाचारात झपाट्याने वाढ झाली होती. इबोला रोगराईनंतरही आफ्रिकी देशात डोमेस्टिक वायलन्सचं प्रमाण वाढलं होतं. यंदा लॉकडाऊनमुळे तीच परिस्थिती उदभवली आहे. पुरुषी मंडळी आपला राग घरातील महिलांवर काढत आहेत. विवाहित महिलांना त्यांच्या पतीकडून शारीरिकमानसिक तसंच भावनिक छळ सहन करावा लागत आहे.
संयुक्त राष्ट्राच्या निरिक्षण सांगते की लॉकडाऊन काळात विवाहित महिला पतीकडून मोठ्या प्रमाणात लैंगिक अत्याचाराला बळी ठरत आहेत. बीबीसीनं तर अशा काही भयकथा प्रकाशित केलेल्या आहेत. त्यांच्या मते ज्यांचं घर एका खोलीचं आहे तिथं अशा प्रकारच्या अत्याचाराच्या टक्केवारीत वाढ झाली आहे.
गेल्या महिन्यात विधानसभेत राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर झाला. त्यात गरीब व मध्यम वस्त्यांमध्ये कौटुंबिक हिंसाचाराचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढल्याचं दिसून आलं.
पुणे-मुंबईसारख्या शहरात दाट वस्तीची घरे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. जुन्या चाळीएसआरएम्हाडा संकूलात एक किंवा दोन खोलीची अरुंद घरं आहेत. एका खोलीत सरासरी चार ते पाच जण राहतात. कोरोना वायरसमुळे ही दोन शहरं पूर्णत: सील करण्यात आलेली आहेत. लॉकडाऊनमुळे सर्वजण घरातच आहेत. परिणामी वाद-विवाद-तंटे-बखेडे वाढत आहेत.
पुण्यात मी कोंढवा भागात राहतो. संमिश्र आर्थिक स्तर असलेल्या आमच्या मिठानगर लेनमध्ये 7-8 मजली अपार्टमेंट व अनेक चाळी आहेत. लॉकडाऊन काळातही चाळीतली लोकं सहसा चौकातच उभे असतात. पोलिसांच्या शिट्ट्या ऐकून घराकडे धाव घेतात. या चाळीत भांडण-तंटे नित्याचेच आहेत. लॉकडाऊन काळात सहाजिकच तिकडं आरडोओरड वाढली आहे. आपसातील वाद वाढली आहेत.
आरोग्य बीट सांभाळणाऱ्या माझ्या एका पत्रकार मैत्रिणीच्या मते सामान्य व किरकोळ आजाराचे उपचार बंद असल्यानंदेखील कुटुंबात वाद व कलह वाढला आहेत. लॉकडाऊनमुळे स्तनदा माता व गरोदर महिलांमध्ये डिप्रेशनचं प्रमाण वाढल्याचं ती सांगते. महिलांच्या स्वयंपाकाच्या वेळेत सरासरीपेक्षा वाढ झाल्याचं दिसून आलेलं आहे. घराची देखरेखमुलांची आरडाओरडघरकामाचा अतिरिक्त ताण हीदेखील वादाची काही कारणे आहेत.
हिंसाचारात अजून कारण सोशल मीडियातून पुढं आलेलं आहे. पती-पत्नी कामानिमित्त बाहेर असतात. पण सध्या लॉकडाऊनमुळे दोघेही एकाचवेळी अनिश्चित काळासाठी घरात आहेत. ऐकमेकांची फारशी सवय नसलेल्या अशा जोडप्यामध्ये भांडणे वाढली आहेत. घरात राहून सतत ऑफिसचं काम करत राहिल्यानेदेखील वाद विकोपाला जात आहेत.
महिला सुरक्षेवर काम करमाऱ्या रेणुका कड यावर म्हणतात, “महिलांच्या शारीरिक मानसिक थकव्याचाघर आणि कार्यालयीन कामाचामुलांच्या जबाबदारीचा विचार फारसा केला जात नाही. परिणामी महिलांना पुन्हा कौटुंबिक हिंसाचाराला सामोरी जाते. आजपर्यंतचा इतिहास पहिला तर जगातील कोणत्याही घटनेचानैसर्गिक आपत्ती किंवा कोणतेही संकटाचा सर्वाधिक परिणाम सगळ्यात पहिल्यांदा महिला आणि मुलांवर होतो...”     
एनसीडब्ल्यूच्या अध्यक्षा रेखा शर्मा म्हणतात, “लॉकडाउन काळात वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी पहावयास मिळाल्या. इच्छा असूनही महिला पलिसांकडे जाऊ शकत नाहीत. बऱ्याच घटना अशा आहेत की महिलांना पोलिसात जायचेच नाहीयेकारण जेव्हा पती सुटून बाहेर येईलत्यावेळी त्यांचं जगणं अधिक दूभर होईल.

वाचा : इराकचा लोकशाही लढा 

वाचा : सुदानी राज्यक्रांतीची नायिका

अत्याचारात लक्षणीय वाढ
आर्थिक पाहणी अहवालात नमूद केल्यानुसार राज्यात महिला अत्याचारात नेहमीप्रमाणे लक्षणीय वाढ झाली आहे. वर्ष 2018मध्ये 35,497 घटना घडल्या होत्या. तर 2019 मध्ये हे प्रमाण वाढून 37,567 पर्यंत पोहोचले आहे. वर्ष 2018मध्ये बलात्काराचे 4,974 गुन्हे नोंदविण्यात आले होते त्यात वाढ होऊन 2019 मध्ये 5,412 पर्यंत पोहोचले आहे.
एनसीआरबीची आकडेवारी सांगते की भारतात गेल्या पाच दशकात बलात्काराच्या गुन्ह्यात हजार पटीने वाढ झालेली आहे. 1971मध्ये ही संख्या 2 हजार 784 होती. तर 2006मध्ये 19 हजार 348तर 2014मध्ये हाच आकडा 37 हजाराच्या घरात गेला आहे. 2017च्या आकडेवारीनुसार देशातील 1,371 जेलमधील 50 हजार 669 आरोपींवर महिला अत्याचाराच्या गुन्ह्याची नोंद आहे.
ज्या रेकॉर्डवर नाहीत त्या घटनांची दाहकता विदारक आहे. कारण कौटुंबिक हिंसाचाराच्या बहुतेक घटना रजिस्टर नोंदणीपर्यत पोहचतच नाहीत. सामान्य व मध्यमवर्गीयात हे प्रमाण मोठं आहे. कारण तिथं कुटुंब ही पहिली व शेवटची जबाबदारी असते.
लॉकडाऊनमुळे स्क्रीन टाइममध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. लहान मुलं व पालकांमध्ये मोबाईल व टीव्हीच्या कार्यक्रमामुळे वाद वाढलेले दिसून आलेलं आहे. एरवीदेखील लहान मुलं मोबाईलसाठी हट्ट धरतात. आता तर तो आणखीन बळावला आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर लहान मुलांमध्ये वेगवेगळी आजार उदभवू शकतातअसंही एक्सपर्ट सांगत आहेत.
कोरो संस्थेच्या मुमताज शेख म्हणतात, “सध्याच्या लॉकडाऊनमध्ये पुढे कस होणारकाम मिळेल की नाहीघर लहान आहेतखाणारी तोंड जास्त आहेतव्यसन करता येत नाहीये या सगळ्या गोष्टी पुरुषाच्या डोक्यात असतीलया सर्वांमध्ये आपण काहीच करू शकत नाही, ही खंत येऊन भांडणं वाढत आहेत. त्याला थांबवायला संवाद साधणं गरजेचं आहे. दूसरं म्हणजे पोलीस स्टेशनला घरगुती हिंसाचाराच्या तक्रारी जात आहेत, त्याला अटेंड करायला पाहिजे. पोलीस यंत्रणा सध्या कोविडशिवाय काही बघत नाही. त्यामुळे त्यांनी कोविडसोबत या तक्रारींना गंभीरपणे घायला हवं.”
वाचा : व्हिनसचा पराभव करणारी १५ वर्षीय कोको
वाचा : रशियन कॉन्स्टिट्यूशन गर्ल 
कारवाईचे आदेश
राज्याचे गृहंमत्री यांनी एक निवदेन जारी करून कौटुंबिक हिंसाचारावर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. दूसरीकडे केंद्र सरकारने कडक निर्देश दिलेले आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाने काही पावले उचलली आहेत. आयोगाने कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारी व समुपदेशनासाठी 7217735372 हा व्हॉट्सअप नंबर जारी केला आहे. शिवाय complaintcell-ncw@nic.in या मेलवरही तक्रार दाखल करता येऊ शकते.
जगभरात चिंतेचं सावट
संयुक्त राष्ट्राच्या मते कोविड-19 रोगराईचा प्रकोप सुरू झाल्यानंतर जगभरात कौटुंबिक अत्याचारात वाढ झाली आहे. ऑस्ट्रेलियालेबनान आणि मलेशियामधून ‘हेल्पलाइन’ वर येणाऱ्या फोन कॉल्सची संख्या दुप्पटीने वाढली आहे. चीनमध्ये तर हा आकडा तिपटीने वाढला आहे. फ्रान्सस्पेनमध्येही डोमेस्टिक वायलन्सचे प्रकार वाढले आहेत.
ऑस्ट्रेलियात गूगल सारख्या सर्च इंजनवर कौटुंबिक हिंसा संबंधी मदतीसाठी गेल्या पाच वर्षांत सर्वाधिक माहिती शोधण्याचा प्रयत्न लॉकडाऊन काळात झालेला आहे.
स्पेन व फ्रान्स सारख्या राष्ट्रात तर डोमेस्टिक वायलन्सपासून मदतीसाठी ‘एन-19 मास्क’ असा कोड तयार करण्यात आलेला आहे. ज्या महिला उघडपणे बोलू शकत नाहीअशांना हा सांकेतिक कोड सांगून तात्काळ मदत मिळवता येते. बऱ्याच अंशी त्याचा फायदा होताना दिसून येत आहे.
अरब राष्ट्रातही कौटुंबिक हिंसाचारात वाढ नोंदवण्यात आलेली आहे. संयुक्त राष्ट्राकडून आर्थिक तनावबेरोजगारी आणि खाद्य असुरक्षा ही कारणे नोंदवण्यात आलेली आहेत.
दूसरीकडे अमेरिकेत लॉकडाऊन काळात ‘गन कल्चर’ फोफावल्याचं दिसून आलं आहे. न्यूयॉर्क टाइम्सनं वृत्त दिलंय कीअनिश्चितता आणि नैराश्यामुळे लोकं बंदूका खरेदी करत आहेत. लोकांना वाटते कि या रोगराईपासून सरकार आपला बचाव करू शकणार नाहीआपली सुरक्षा आपणच केली पाहिजेयासाठी लोकं मोठ्या प्रमाणात बंदूका खरेदी करत आहेत.
अमेरिकेत मार्च महिन्यात तब्बल 19 लाख बंदूका विकल्या गेल्या. पत्र म्हणते कीअल्फरेट्टामध्ये एका व्यक्तीने दोन महिलांवर केवळ यासाठी बंदूक रोखली की त्यांनी मास्क आणि ग्लोज परिधान केलेलं होतं. त्याला भीती वाटत होती कीत्या महिला त्याला संक्रमित करतीलपोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली.

(सदरील लेख लोकमतच्या अंकात प्रकाशित झालेला आहे)

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: कोरोना आणि वाढते कौटुंबिक अत्याचार
कोरोना आणि वाढते कौटुंबिक अत्याचार
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhjZLh8poDx2Y5QELt6oWOLXveZXGH23AbPUPt9bd2zW0de6ryGSPejDxJIlOlYE1cD7f-vZMU3s5WQIedlvP3f_eBIhG6F-uK-Q8LvftN5H7akVGQRlPRCZKDZZx5X9t8BLedSv0xMbl4j/w480-h270/Domestic-violence-under-lockdown.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhjZLh8poDx2Y5QELt6oWOLXveZXGH23AbPUPt9bd2zW0de6ryGSPejDxJIlOlYE1cD7f-vZMU3s5WQIedlvP3f_eBIhG6F-uK-Q8LvftN5H7akVGQRlPRCZKDZZx5X9t8BLedSv0xMbl4j/s72-w480-c-h270/Domestic-violence-under-lockdown.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2020/04/blog-post_22.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2020/04/blog-post_22.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content