लॉकडाऊन डायरी : फेक नरेशन आणि मुस्लिम

कोरोना संक्रमणाच्या काळात फेक न्यूजचा वावर जगभरात चिंतेचा विषय झाला आहे. कदाचित मृत्युच्या भयातून सामान्य लोकांमध्ये फॉरवर्डेड मानसिकता वाढली असावी. वर्ल्ड हेल्थ ऑरगनायजेशननं याबद्दल काळजी व्यक्त केली आहे. भारतात सोशल मीडियावर खोट्या वृत्त पसवरून दहशतीचं वातावरण तयार केलं जात आहे. याउलट मुख्य प्रवाही मीडियानं संयमानं घेण्याऐवजी सनसणाटीपणा सुरू केला आहे.
स्पेनच्या एका रस्त्यात मृतदेहाचे सडे पडले, त्याला उचलायला कुणी नाही, असा एक फोटो आणि बातमी दैनिक सकाळ व नंतर दैनिक लोकसत्तानं छापली. विशेष म्हणजे फॅक्ट चेकरनं दोन दिवसापूर्वीच ही बातमी फेक सिद्ध केली होती. तरीही अशा प्रकारच्या खोट्या बातम्यांचा सुळसुळाट मराठीतील अग्रणी दैनिके व माध्यमात दिसला.
तबलीगच्या बातमीनं तर कहरच केला. ह्या फेक प्रपोगंडाचा सामान्य मुस्लिम समुदायाच्या मनावर विपरित परिणाम दिसून आला. मीडियानं त्यांच्याविरोधात पुकारलेल्या अघोषित युद्धामुळे ते अधिक असुरक्षित झालेले दिसून आले. मुस्लिम ग्रुपमधले या काळातले व्हॉट्सएप चॅट जर पाहिले त्याची भीषणता जाणवते.
निजामुद्दीन दरगाह व तबलीग मरकज या दोन वेगवेगळ्या संस्था आहेत. दोघांची सरळमिसळ करून प्रारंभी हिंदी मीडियानं बातम्या प्रसारित केल्या. याच बातम्याची पाऊलवाट चालत अनेकजण खोटी व दिशाभूल करणारी वृत्त प्रसारित करीत होती. वाटत होतं, जणू देशात फेक न्यूजची लाटच आली. 
अग्रणी मीडिया संस्था, प्रागतिक संघटक, सुधारणावादी पत्रकार, लेखक, भाष्यकार, विचारवंत तबलीग संबंधित फोटो व वादग्रस्त मजकूर प्रकाशित करत होती. बरीच विचारी म्हणवणारी लोकंदेखील प्रचारी बातम्यांचा आधार घेत मुस्लिमाविरोधात द्वेशमूलक, कुत्सित व टारगेटेट बोलत होती. त्यांची भाषा बहुसंख्य गटाला एका समाजाविरोधात पेटवण्याची होती.

वाचा : लॉकडाऊन डायरी : भग्न मनाचे अस्वस्थ अवशेष

वाचा : जिवघेणा कोण? कोरोना की मराठी मीडिया
#
वैभव छाया नावाचे फेसबुक मित्र आहेत, त्यांनी तबलीगची तुलना थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी केली. हा आवेग बघून मी त्यांना असा प्रतिसाद दिला - संघ स्वातंत्र्य संग्रामात कुठेच नव्हता, त्यांनी ब्रिटिशांना सहकार्य केलं. उलट तबलिगींनी ब्रिटिशांना थेट आव्हान देऊन त्यांच्याविरोधात उघड संघर्ष केला. हजारोंच्या संख्येत देशासाठी बलिदान दिले, इत्यादींची आठवण काढून दिली. हे वाचून त्यांनी तात्काळ रियक्ट होण्याचीआपली चूक उमगली. कमेंट डिलीट केली व ते निघून गेले.
चंद्रकांत वानखेडे या ज्येष्ठ पत्रकाराने आपल्या फेसबुक वॉलवर हीच तुलना करत ठळक अक्षरात मजकूर लिहिला. वानखेडेंनी तबलीग व देवबंद चळवळीबद्दल किती वाचलं मला ठावूक नाही. कदाचित ते फेसबुकच्या बहुमताच्या प्रवाहात बोलत असावेत. कारण त्यांनी इंग्रजाच्या वसाहतवादाला आव्हान देणाऱ्या व बलिदान देणाऱ्या या चळवळीबद्दल वाचलं असतं तर मूळ मुद्द्याला बगल देत वाईट-साइट लिहिण्यात ते धजावले नसते. 
बरं ते विदर्भात राहतात. संघ नेमकं काय करतो, हे त्यांना चांगलच ठावूक आहे. निजामुद्दीन प्रकरणापूर्वी तबलीगच्या कुठल्या संघटकांना त्यांनी देशविरोधी, समाजविरोधी कृत्य करताना पाहिलं आहे का? असल्यास त्यांनी त्याबद्दल वृत्तपत्रातून लिहावं. आम्ही आमची भूमिका बदलू!


मटाचे समर खडस यांनी तबलीगची वैचारिक चिरफाड करणारी एक पोस्ट लिहिली. अनेक प्रतिगामी व पुरोगामी संघटकांनी, पत्रकारांनी व लेखकांनी आठवडाभर ती वायरल केली. खडस यांनी तबलीगबद्दल बरंच काही सत्य-असत्य लिहिलं. (तबलीगचे माझे मतभेद उघड आहेत. मी मदरसा पद्धतीवर टीका करणारा एक सविस्तर लेख मुक्तशब्दमध्ये लिहिला आहे.) पण त्यांनी मूळ समस्या, प्रश्न, वस्तुनिष्ठता व तथ्यांना डोळ्याआड केले. तबलीगच्या संघटकांना दिल्ली प्रशासन, पोलीस, सरकारने दिलेली भेदभावाची वागणूक त्यातून रचलेले खोटे कुंभाड त्यावर ते बोलले नाही. त्यांनीदेखील मूळ मुद्द्याला बगल देत तबलिगवर तोंडसुख घेतले.
अनंत बागाईतकरांनी घटनेच्या आठवडाभरानंतर दैनिक सकाळमध्ये 'तबलिगीचे कृत्य अक्षम्यच, पण...' हा लेख लिहिला. सहा-सातशे शब्दांच्या आपल्या लेखात त्यांनी पाचशे शब्द तबलीगच्या वैचारिक बांधणीवर खर्च केले. 
उर्वरित दोन-तीन वाक्यात त्यांनी दिल्ली सरकार, भाजपची तबलीग संघटकांना दिलेली भेदभावाची वागणूक, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशी मौलाना साद यांनी घेतलेल्या भेटीवर लिहिले. जागेअभावी यावर अधिक भाष्य करता येणार नाही असेही ते म्हणाले. पुढच्या उर्वरीत जागेत त्यांनी पुन्हा तबलगीला व पर्यायाने भारतीय मुसलमानांना न केलेल्या चुकीची जाणीव करून दिली.
बागाईतकर एक आठवड्यानंतर लेख लिहित होते. म्हणजे तोपर्यंत तबलीगच्या वैचारिक बांधणीवर बोलून-लिहून चोथा झाला होता. तरीही बागाईतकर त्याबद्दल अतार्किक मांडणी करण्यात आपली बहुमोल जागा खर्च करीत होते. मूळ प्रश्नांला बगल देत त्यांनी मुसलमनांना प्रबोधनाचे डोस पाजले. मला तर ही बनवेगिरी वाटते. लेखकीय कुरघोडी म्हणतात ती यालाच!
माझ्या लेखी तबलीगची चूक एवढीच की त्यांनी मजुरासारखं दिल्लीच्या रस्त्यावर गर्दी का केली नाही? जर त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन बसच्या मागणीसाठी ठिय्या मांडला असता तर कदाचित सरकारने लोकलाजेखाली वाहनं पुरवली असती. परदेशी मीडियानं मजुरांचे लोंढे, फिजिकल डिस्टन्सिगची हरताळ प्रकाशित केल्यानं त्यांना आपल्या प्रदेशात जायला वाहनं मिळाली. तबलिगींनी ते केलं नसल्यानं ही त्यांची मोठी चूक ठरली. त्याचे परिणाम भारतातील सर्व मुस्लिमांना (जे तबलीगशी संबंधित नाहीत व समर्थकही नाहीत) भोगावे लागले.

वाचा : कोरोना तबलिगी : वो क़त्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होता

वाचा : कोरोना आणि वाढते कौटुंबिक अत्याचार
#
केंद्रप्रणित भाजप सरकार व दिल्ली पोलिसांनी तबलीगला नाकारलेली मदत, वाहतुकीसाठी मागितलेले पास न देणे, वारंवार पाठपुरावा करूनही निजामुद्दीन मरकजला कुठलेही सहाय्य न पुरवणे, त्याच काळात केंद्रीय गृहंमत्री अमित शहांच्या गुजरातला हरिद्वारहून भाविकासाठी विशेष बसेस पाठवणे, यावर फारसं कुणी बोलताना, लिहिताना आढळलं नाही. सर्वजण तबलीगच्या वैचारिक बांधणीवर अतार्किक बोलत राहिले.
ही वेळ तबलीगच्या वैचारिक मतभेदावर नाही तर मुसलमानांशी होत असलेल्या भेदभावावर बोलण्याची आहे. ही वेळ भाजपच्या मुस्लिमद्वेशी राजकारणाची समीक्षा करण्याची आहे. ही वेळ भाजपच्या आयटी सेलनं समाजात कालवलेल्या विषाक्त वातावरणावर बोलण्याची आहे. ही वेळ कोरोना पसरवल्याचा आरोप करत मुस्लिमांवर होत असलेल्या हल्ल्यावर बोलण्याची आहे.
ही वेळ तबलीग संघटकाविरोधात पसरवणाऱ्या खोट्या वे द्वेशी बातम्यांविरोधात बोलण्याची आहे. ही वेळ बहुसंख्याकाच्या मनात मुसलमानांविरोधात पसरवणाऱ्या तिरस्कृत वातावरमावर, तुच्छतावादावर बोलण्याची आहे. पण दुर्दैव असं की बहुतेक प्रागतिक संघटक, पत्रकार, लेखक, भाष्यकार मृत्युच्या भयानं आरएसएसचा मुस्लिमद्वेशी प्रचार राबवत होते. तबलीगच्या वैचारिक मतभेदावर बोलल्यानं मूळ मुद्दा बाजुला राहिला. भाजप, केंद्र सरकार व संघाच्या प्रचारकांना हेच हवं होतं.
गोदी मीडियाच्या मुस्लिमद्वेशावर तर न बोललेलं बरं. पण लोकसत्ता व सकाळ आणि लोकमतसारख्या प्रतिष्ठित माध्यमांनी ही प्रचार मोहीम उघडपणे राबवली, याबद्दल खंत वाटते. वाईटही वाटते. पत्रकारितेच्या भविष्याबद्दल दु:ख वाटते. बघता-बघता पुढच्या काही दिवसात मुस्लिम समुदाविरोधात फेक न्यूजची लाटच आली. फॅक्ट चेकर वेबसाईटनं तबलीग व इतर संदर्भातल्या एकूण सगळे वृत्त, बातम्या, वीडियो आणि तत्सम मजकूर खोटा व बनावट असल्याचं सिद्ध केलं.
टाइम्स ऑफ इंडियानं विशेष लेख लिहून कथित थुंकल्याचा वीडिओ फेक असल्याचं जाहीर केलं. मूळ वीडिओ मुंबई मिररनं काढला होता. काही वर्षांपूर्वीचा तो होता. बीबीसीक्वेन्टइंडियन एक्सप्रेस सारख्या तमाम (चांगल्या) मीडियानं पाठपुरावा करत त्यातला खोटा भाग जगासमोर मांडला.
न्यूयॉर्क टाइम्स, दि गार्डियन, अल जझिरा सारख्या परदेशी वृत्तपत्र समूहाने विशेष रिपोर्ट प्रकाशित भारतीय मीडियावर टीका केली. भाजप व मोदीप्रेमी गोदी मीडिया, संघाच्या अपप्रचाराचा सगळा बनाव वायर, स्क्रोल, ऑल् न्यूज, सारख्या अल्टरनेटिव्ह मीडियाने उघडकीस आणला. तरीही बहुतेक मीडिया समूह आपल्या वेबसाईटवर, फेसबुक पेजवर व काही प्रमाणात वृत्तपत्राच्या इ-आवृत्तीतही या फेक न्यूज वारंवार प्रकाशित करत होते.
मीडियाचा हा अजेंडा मुस्लिमद्वेषी होता, हे उघड आहे. दूसरं म्हणजे आणीबाणीच्या काळात अशा प्रकारच्या बातम्यांना मागणी खूप असते. मागे जाऊन पाहिले तर हे पैसा जमवण्याचे बाजारु कारस्थान सहज समजू शकते. उदाहरण द्यायचे झाल्यास निर्भया प्रकरण, कोपर्डी बलात्कार, कठुआ बलात्कार, कुलदिप सिंह सेंगर, चिन्मायनंद, हैदराबाद आयटी प्रोफेशनसिल्टची हत्या आदी प्रकरणानंतर तशा बातम्यांची आठवडाभर मीडियात महापूरच आला होता.
अशा प्रकरणात बहुतेक मीडिया आचारसंहिता पाळत नाहीत. तबलीग प्रकरणात तर पत्रकारितेची नैतिकता, मूल्य, नियम आणि प्रामाणिकता बासनात गुंडाळून एका समुदायाविरोधात शत्रुकरणाची महीम राबवली गेली. जे माझ्यासारख्या पत्रकारितेतल्या व्यक्तीला, सजग नागरिकाला व एक सामान्य मुस्लिम म्हणून वाटणाऱ्या भावना शब्दातित आहेत.  
#
एएनआय सारखी भाजप धार्जिणी वृत्तसंस्थाच अशा प्रकारचे वृत्त पुरवत असल्यानं प्रमाण सोर्स म्हणून सगळ्या माध्यम संस्था तो फीड घेणारच. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात Asian News international (ANI)च्या भाजपाई धोरणाला उघड करणारा  'समाचार एजेंसी एएनआई : प्रोपगेंडा का करोबार' हा दीर्घ रिपोर्ताज केरव्हान या प्रतिष्ठित मासिकाने प्रकाशित केलाय. हे वाचून कुणालाही ANIBJPचे सहसंबंध उघड दिसतील. कोरोना काळात एएनआयचे फीड उचलत अ-विचारी माध्यम संस्थांनी पत्रकारितेचे नियम, कायदेकानू, नैतिकता धाब्यावर बसवली.
गोदी मीडियाच नव्हे तर अनेक पेड मीडियानंदेखील तबलीग संदर्भातल्या खोट्या बातम्या विकृत पद्धतीने मांडल्या. मोदी मीडियानं सतत व वारंवार प्राइमटाइम आयोजित केले. त्यातून टोकाचा मुस्लिम द्वेश प्रसारित केला गेला. सतत अशा प्रकारच्या वेगवेगळ्या फेक बातम्या येत राहिल्या. भविष्यात फेक बातम्यांना प्रमाण मानून मुस्लिमाविरोधात तुच्छतावादाची, द्वेशाची मोहीम राबवली जाणार हे वेगळं सागायला नको.
या सर्व प्रकारामुळे सामान्य लोकांच्या मनात मुस्लिम समुदायाविरोदात 'फेक नरेशनतयार झालं. कोरोना देशभर पसरवण्यात मुस्लिम जबाबदार आहेत, संघाने हा प्रचार प्रागतिक लोकांच्या खांद्यावरून वाहिला. या गटाने कधी स्वप्नातही विचार केला नसेल की आपण संघाचे प्रचारक होऊ. पण नकळतपणे तर काही जाणून-बुजून मुस्लिमद्वेशाचा भडक प्रचार करत आहेत.
कोरोनासारख्या भयान मृत्युला ते घाबरले असावे असं म्हणायला जागा आहे. पण ते नमस्ते ट्रम्पसारख्या इव्हेंटवर का बोलत नाहीत. या जंगी कार्यक्रमातून गुजरातमध्ये मोठ्या प्रकारे कोरोनाचा संसर्ग पसरला आहे. अशा प्रकारच्या कुठल्याही बातम्या प्रसारमाध्यमात का येत नाहीत.
तबलीग संदर्भात वास्तविक बातमी बाहेर आल्यानंतरही ही माध्यमे, प्रागतिक संघटक तबलीगच्या फेक नरेशनचा वापर समाजामध्ये विष कालवण्यासाठी करत आहेत. त्यामुळे त्यावर युक्तिवादात मुसलमानांनी आपली एनर्जी खर्च घालू नये. ते फेक न्यूजच्या नरेटिव्ह दुनियेत जगत आहेत. त्यांना जागे करून काही उपयोग नाही.
या घटनेतून मुसलमानांविरोधात राजकीय व सांस्कृतिक संघर्ष उभा राहिला आहे. त्याला फेस करण्याची तयारी आता मुस्लिम समुदायाला ठेवायला हवी. देशातल्या काही भागातून मुस्लिम व्य़ावसायिक, व्यक्ती, पथारीवाले, दूधवाल्यासोबत भेदभाव होत असल्याच्या बातम्या येत आहेत. हा फेक प्रपोगंडा सामान्य मुस्लिम समुदायाच्या जीवावर उठला आहे. त्यांच्यावर ठिकठिकाणी खूनी हल्ले होत आहेत.
हिंदू पाणी, मुस्लिम पाणी, हिंदू भाजीवाला, मुस्लिम भाजीवाला अशी विभागणी सुरू झालीय. हरयाणामध्ये एका मुस्लिम व्यक्तीनं सामाजिक भेदभावामुळे आत्महत्या केली आहे. भविष्यात या घटना अधिक तीव्र स्वरूपात पुढे येतील. पुढे हा संघर्ष अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित करणार आहे. कारण याला बहुसंख्याकाची संमती आहे. त्यामुळे त्याला सांस्कृतिक व राजकीय पातळीवरच उत्तर द्यावं लागेल. जो होना था वह हो गयाअपने अच्छे अखलाको का मुजाहरा करते हुए फिर से लोगो का दिल जीत लो.
#
एक मुसलमान म्हणून आपणास तुर्त काही गोष्टी कराव्या लागतील. प्रथम, आपल्या नातेवाईकमित्र व संपर्कातील ५-५ लोकांना फोन लावून सांगा. तुमच्या घरात कुणी निजामुद्दीनहून आला असेल तर त्याला घेऊन हॉस्पिटलला जा. हे लक्षात असू द्या की ती लोकं बदनामीच्या भीतीनं पुढे येत नाहीयेत. त्यामुळे त्यांना विश्वासात घेऊन सांगा आम्ही ही माहिती गुप्त ठेवूसर्वांनी हे काम करायचंय.
दूसरं, जे लोकं त्या काळात दिल्लीहून आले त्यांनी स्वत:हून प्रशासनाशी संपर्क साधावे. याद राखा की तुम्हाला आता व्हिलेन ठरवलं गेलं आहे. त्यामुळे तुमची तुर्तास तरी सुटका नाही. तुम्ही कुणापासून लपत आहात. तुम्हें गैब कि आवाज पता होंगी. अपने जिद के वजह से तमाम घरवालों कि जिन्दगी खतरे में मत डालो. बाहेर निकलो और हॉस्पिटलाईलज्ड हो जाओ.
तिसरं अजून एक काम तुम्ही करू शकता. होम क्वारण्टाइन म्हणजे घरातल्या घरात स्वत:ला वेगळं ठेवा. ज्यावेळी भाजपच्या कम्युनल अजेंड्याच्या आहारी जाऊन बहुसंख्य समाजाने तुमचे अलगीकरण केलं आहेअशावेळी होम क्वारण्टाइनला तुम्ही सहज पार करू शकता.
जिन्हें क्वारंटाईन किया गया हैंवह तसबीर लेकर एक ही जगह बैठे रहें. तिलावत करते रहें और अल्लाह से तमाम उम्मत के लिए दुआ करे. कडे-तिकडे बाहेर पडू नका. याद राखा फेक न्यूजवालेगोदी मीडिया व समाजातले तुमचे द्वेषबांधव तुमचा पाठलाग करत आहेत. त्यामुळे नियमांचं पालन करा.
#
शेवटचं काम, तबलीगच्या फेक नरेटिव्हला युक्तिवाद करत बसू नका. कदाचित भविष्यात ते आपल्या चांगल्या संस्कारातून हा डाग धुवून काढतीलही. त्यांच्या सत्कार्याच्या काही बातमी अल्टरनेटिव्ह मीडिया प्रकाशित करत आहे. त्याकडे दुर्लक्ष करत जनसमर्थन असलेला विश्वासू मीडिया फेक बातम्या तयार करतोय. त्याच्या प्रचाराला सामान्य माणूस बळी पडतोय. 
बरं मीडिया, बीजेपी आयटी सेलच्या या प्रचाराला बहुसंख्य प्रथमच बळी पडतोय अशातला भाग नाही. त्यामुळे उन्हें बख्श दो. जी लोकं अनावधानाने या प्रचारात उतरली होती वो सुबह के भूले हैंशाम तक घर आ ही जायेंगे.
काही लोकांना खोट्या जगात वावरायचं असेल तर तुम्ही त्यांना बाहेर काढू शकत नाही. तबलिगीच्या कृत्याचं समर्थन करू नका. ते दिल्लीत दोषी नव्हतेतिथं प्रशासनाने त्यांना जाणून बुजून मदत नाकारली. त्यामुळे ते संक्रमित झाले. पण आता ते बाधित होऊनही समोर येत नसतील तर ते समाजाचे गुन्हेगार आहेत.
कुठल्याही गुन्ह्याचं कधीच समर्थन होऊ शकत नाही. हा लढा जसा आरोग्याचा आहे तसाच तो आता राजकीय झालेला आहे. त्याला त्याच भाषेत उत्तरं द्यायला हवीत.
 जाता जाता मुनव्वर राणा यांचा एक शआर
कलीम अजीम, पुणे
Twitter@kalimajeem

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: लॉकडाऊन डायरी : फेक नरेशन आणि मुस्लिम
लॉकडाऊन डायरी : फेक नरेशन आणि मुस्लिम
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiU2DZPty-kSYSF64A2bjXIURZGVeYcwan7hY-NJ8L-tgh8DkbMKee8IdqJ2N7aNNpKsVrD5ccIetdr5U88W0Gmjkgnbrexn1lNp9LGk3KDkXKHLDS8to7nnSJD4h-PvYa-n6TaHYHgRPp3/s640/Corona+Muslim+Targeted+fake+news.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiU2DZPty-kSYSF64A2bjXIURZGVeYcwan7hY-NJ8L-tgh8DkbMKee8IdqJ2N7aNNpKsVrD5ccIetdr5U88W0Gmjkgnbrexn1lNp9LGk3KDkXKHLDS8to7nnSJD4h-PvYa-n6TaHYHgRPp3/s72-c/Corona+Muslim+Targeted+fake+news.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2020/04/blog-post_4.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2020/04/blog-post_4.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content